कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत.
http://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/tirangyach...अ
बातमी ऐकताच चीड यावी अशी आहे. सोबत तसेच खरमरीत शब्द वापरून ती तशी पसरवली जाते. पण सुरुवातीचा रागाचा जोर ओसरल्यावर प्रश्न पडतो की हे असे मुद्दाम करतात का? व्यावहारीकदृष्ट्या विचार करता कोण स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणार. मागे आमीरचे एक देशासंबंधित विधान लोकांना आवडले नाही तर भारतीयांनी टाकलेल्या बहिष्काराची दखल घेत स्नॅपडीलने आमीरला हटवले होते. त्यामुळे एमेझॉन जाणूनबुझून असे करेन याची शक्यता त्या दृष्टीने कमी वाटते. तसेच आणखी एक म्हणजे ईतरही काही देशांचे राष्ट्रध्वज तिथे बिनधास्त विक्रीला ठेवले आहेत. आणि कदाचित त्या देशांचा यावर आक्षेपही नसावा. तर त्यामुळे आपल्यालाही गृहीत धरून ही चूक घडली असेल का? की नाही, ही मुद्दामच काढलेली खोड आहे?
राष्ट्रवादी फ्लिपकार्ट ला मदत
राष्ट्रवादी फ्लिपकार्ट ला मदत करण्याचे घाट घालत आहेत की काय?
ऍमेझॉन विरुद्ध कॅम्पेनिंग सुरु झालंय आयटीसेल देशभक्तांचे....
कोणत्याही देशाच्या
कोणत्याही देशाच्या राष्ट्र्ध्वजाचा अशा तर्हेने केलेला अपमान निंद्य आहे.
पण अमेरिकेत लोक आणि अमेरिकन सरकार या बाबतीत फारच सैल आहेत. मी अमेरिकेत असताना वॉलमार्ट मध्ये अमेरिकन ध्वजाचे कव्हर असलेली उशी विकायला ठेवलेली मी पाहीली आहे, त्याबद्दल वॉल मार्ट वाल्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले 'इथे चालते असले ..."
अॅमेझॉन ने हे मुद्दाम केले असावे असे मला वाटत नाही, तिथे लाखोंच्या घरात प्रॉड्क्ट विकायला ठेवलेली असतात प्रत्येक प्रॉडक्ट असे तपासून ठेवणे अव्यवहार्य होईल.
पण असला प्रकार निदर्शनास आणून दिल्यावर ते उत्पादन त्वरीत हटवून , त्याच्या विक्रेत्याला समज देऊन, संबधीतांची म्हणजे भारत सरकार आणि भारतीय जनता यांची माफी मागणे शक्य आहे आणि मला वाटते अॅमेझॉन ते केले आहे.
अॅमेझॉन वर काहीही विकायचे असेल तर मोठी प्रक्रिया असते , बरीच माहीती (खरी) पुरवावी लागते त्यामुळे हे उत्पादन विकणार्या / बनवणार्याची पूर्ण माहीती अॅमेझॉन कडे असणारच. ती भारत सरकार ला पुरवून अॅमेझॉन चुकीची भरपाई करु शकते. ह्या माहीती वरुन हा अनावधाने घडलेला प्रकार आहे की मुद्दाम केलेला खोडसाळ पणा आहे आणि हे करणारे कोण आहेत याचा खुलासा होऊ शकतो.
मला एक वेगळीच शंका येते... गेल्या दोन वर्षात अॅमेझॉन भारतात चांगलाच जम बसवला आहे, चांगली सेवा , स्पर्धात्मक किंमती, तत्पर डिलीव्हरीज, चांगला कस्टमर सपोर्ट, फेअर रिफंड पॉलिसीज च्या जोरावर अॅमेझॉन ने इतर बर्याच ऑन लाईन रिटेलर्स ना घाम फोडला आहे. तेव्हा ह्या अॅमेझॉन ला अडचणीत आणण्या साठी केलेली ही एक कार्पोरेट खेळी सुद्धा असू शकते. (मॅगी नुडल्स चा किस्सा !)
आधीही कोणी तरी टाकलेले आहे.
आधीही कोणी तरी टाकलेले आहे.
पण प्रत्येक देशाचे फ्लॅग कोड्स वेगळे असतात. अमेरिकेत किंवा कॅनडा मध्ये त्यांचा राष्ट्रध्वज कसाही वापरला तरी चालतो. आपल्याकडे आपल्या फ्लॅग कोड नुसार राष्ट्रध्वज फक्त त्याच्या दिलेल्या आकारात राष्ट्रध्वजाकरता बनवलेल्या कापडावरच वापरलेला चालतो. त्यानुसार आपले फ्लॅग कोड्स खुप स्ट्रिक्ट आहेत.
अॅमॅझॉन ने ते पायपुसणे विकायला ठेवताना थोडे फ्लॅग कोड्स चेक करायला हवे होते. ही त्यांची चूकच झाली. त्याविरोधात सुषमा स्वराजांनी त्यांना समज दिलेली आहे.
शेवटी अॅमॅझॉन एक मार्केटप्लेस आहे. बर्याच गोष्टी अॅमॅझॉन स्वतः न विकता इतर छोट्या उद्दोजकांना आपापली उत्पादने विकण्याकरता मदत करते. पण त्यामुळेही अशी चूक घडता कामा नये. आणि त्यात जर
भारतासारखी मोठी बाजारपेठ त्यांना गमवायची नसेल तर खचितच नाही.
भरत म्हणतोय त्याप्रमाणे मुद्दाम किंवा खोडसाळपणे नक्कीच केलेले नाही. आपण अमेरिकेचे बनवतोय तसेच भारताचे ही बनवून टाकू या दृष्टीकोनातून कोणी तरी ज्याला फ्लॅग कोड्स माहिती नाहीत अश्याने बनवलेले आहे.
तेव्हा ह्या अॅमेझॉन ला अडचणीत आणण्या साठी केलेली ही एक कार्पोरेट खेळी सुद्धा असू शकते. सध्याची फ्लिपकार्ट्ची स्थिती बघता ही शंका येणं अगदी रास्त आहे !!!
जे इतके दिवस अॅमॅझॉन वापरत
जे इतके दिवस अॅमॅझॉन वापरत नसत त्यांचेहि लक्ष अॅमॅझॉन कडे वेधले जाईल. भारतातील बरेच लोक खूप श्रीमंत आहेत, तेंव्हा त्यांचे लक्ष वेधून घेऊन अॅमॅझॉनचा धंदा वाढवता येईल.
उद्या फुकटची किंवा ५०-७५% ऑफ स्कीम आणू द्या अॅमेझॉन ला सगळे तुटुन पडतील!
त्यात काय चुकले, अहो तेच पायपुसणे सुद्धा घेतील विकत लोक! स्वस्त! अमेरिकन! (चीनमधे बनवले असले तरी अमेरिकन कंपनीकडून घेतले!)
दया पता करो पतंजली ओनलाईन
दया पता करो पतंजली ओनलाईन मार्केट मे उतर रहा है क्या!
(इथे 'पतंजली' च्या जागी रिलायन्स/अडानी समूह असे घालून वाचले तरी चालेल.)
(वॉट्सॅप फॉरवर्ड!)
एक चक्कर फॅशन स्ट्रीट वर
एक चक्कर फॅशन स्ट्रीट वर मारा. यूएस युके ऑस्ट्रेलिया ईत्यादी हायफंडू देशांचे झेंडे रंगवलेले कित्येक बर्मुडे दिसतील.
जर आपण दुसर्या देशांच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करत नसू तर ईतरांनी तो करावा ही अपेक्षा दुटप्पीपणाची नाही का झाली.
आता यात एक युक्तीवाद असा होऊ शकतो की त्यांना हे चालते. पण प्रत्यक्षात जे असे कपडे वापरतात त्यांना हे ठाऊकच असेल असे नाही. ते ही माहीती न काढताच बिनधास्त घालतात. आणि समजा चालतही असले तरी ते त्यांच्या देशवासीयांना चालत असेन. त्याने आपल्याला तसे करायचा हक्क नाही मिळत.
त्याच धर्तीवर असेही म्हणू शकतो की आपल्या झेंड्याबाबतचे प्रोटोकॉल आपल्यासाठी असतात. जगाने तो कसा वापरावा हे आपण नाही ठरवू शकत.
एक करू शकतो. याने आमच्या भावना दुखावतात तर तसे करू नका अशी विनंती करू शकतो, किंवा आपण जगातील एक महत्वाचे राष्ट्र असू तर प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष धमकी देऊ शकतो.
पण प्रत्येक देशाचे फ्लॅग
पण प्रत्येक देशाचे फ्लॅग कोड्स वेगळे असतात. अमेरिकेत किंवा कॅनडा मध्ये त्यांचा राष्ट्रध्वज कसाही वापरला तरी चालतो. आपल्याकडे आपल्या फ्लॅग कोड नुसार राष्ट्रध्वज फक्त त्याच्या दिलेल्या आकारात राष्ट्रध्वजाकरता बनवलेल्या कापडावरच वापरलेला चालतो. त्यानुसार आपले फ्लॅग कोड्स खुप स्ट्रिक्ट आहेत. >>>> यु.के. मध्येसुद्धा त्यांच्या राष्ट्रध्वजाची अंतर्वस्त्रे, स्लिपर्स वगैरे अगदी पायपुसणी सुद्धा मिळतात. त्यामुळे कदाचित हे कोणी मुद्दाम केलेले नसावे. अल्प माहितीमुळे झालेली चूक असू शकते. सुषमा स्वराज ह्यांनी योग्य ती पाऊले उचलेली आहेत तेव्हा पूढे काय होते ते पहाणे महत्वाचे.
धनि: +१
धनि: +१
माझ्या जुन्या फ्लिपफ्लॉप वर
माझ्या जुन्या फ्लिपफ्लॉप वर अमेरिकन झेंड्याचे प्रिंट होते. सुरुवातीला विचित्र वाटले पण इथे लेबर डे, मेमोरिअल डे ला बर्याच लोकांना असले फ्लिपफ्लॉप्स, कपडे , अॅक्सेसरीज घातलेले पाहिले तेव्हापासुन बिनधास्त वापरले. आता तुटले म्हणुन टाकुन्द दिले. पण पायपुसणं म्हणजे अतिच आहे.
>>पण पायपुसणं म्हणजे अतिच
>>पण पायपुसणं म्हणजे अतिच आहे.<<
अहो, ओवल आॅफिसमधल्या रगवर राजमुद्रा आहे, तर झेंड्याचं काय घेऊन बसलाय. शेवटि निष्ठा, देशप्रेम जेंव्हा/जिथे/ज्याकरता जाणतेपणानं दाखवणं हे महत्वाचं...
शुजपण आहेत म्हणे तिरंग्याच्या
शुजपण आहेत म्हणे तिरंग्याच्या कलरचे.
धनि +१ हात आणि पाय यात उच्च
धनि +१
हात आणि पाय यात उच्च नीच भेद पाश्च्यात्य जग करत नाही. डोर मॅट, शूज, कपडे कुठेही वापरलं की देशप्रेमच दिसतं असं समजलं जातं.
त्यातच फ्रीडम ऑफ स्पीच नुसार झेंडा जाळणे हे ही अपमान समजत नाहीत. राज रोस हे कृत्य तुम्ही करायचं असेल तर करू शकता.
भारताला आवडलं नाही, हे क्लीअर केल्यावर amazonने त्या उत्पादनाची विक्री थांबवली. यात कुठेही मुद्दाम केलेला प्रकार वाटत नाही.
इतके दिवस अॅमॅझॉन वापरत नसत
इतके दिवस अॅमॅझॉन वापरत नसत त्यांचेहि लक्ष अॅमॅझॉन कडे वेधले जाईल. भारतातील बरेच लोक खूप श्रीमंत आहेत, तेंव्हा त्यांचे लक्ष वेधून घेऊन अॅमॅझॉनचा धंदा वाढवता येईल.
^^^^
नॉट अ गुड थेरी...
या बातमीत इतकी चीड यावी असे
या बातमीत इतकी चीड यावी असे काय आहे ? कॅनडा च्या अॅमॅझोन वर एखाद्या विक्रेत्याने इतर अनेक देशांबरोबर भारताचाचाही ध्वज असलेले डोअर मॅट ठेवले. सुषमा स्वराज यांनी इतकी दमदाटी करण्या ऐवजी एखाद्या अधिकार्याकडून ई मेल केली असती तरी पुरेसे होते. अॅमेझोन असे जाणून बुजून करणार नाही.
एका महिलेने पोलिसात तक्रार दिली की तिच्या शेजारच्या इमारतीतील माणूस घरात विवस्त्र फिरतो त्यामुळे हिला हॅरॅसमेंट वाटते. पोलीस तपासासाठी घरी आले.
पोलीस : कुठाय तो माणूस ?
महिला : त्या खिडकीतून पहा.
पोलीस : तुमची खिडकी इतकी उंच आहे की मला काहीच दिसत नाही.
महिला : या स्टूल वर चढून बघा.
पोलीस : आता ठीक आहे पण ती इमारत दूर आहे. अंधूक दिसते.
महिला : या दुर्बीणीतून बघा !.
भारतील उपाशी झोपणार्या मुलांची संख्या, शालेय वयातच मजूरी करणार्या मुलांची संख्या, स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण,
अशी आकडेवारी वाचून चीड यायला हवी. अशा रेंडम बातम्या वाचून नव्हे.
काहीतरी करतोय हे 'दाखवायला'
काहीतरी करतोय हे 'दाखवायला' नको! थेट विजा देणार नाही हे जरा अतिच होतंय! परराष्ट्र मंत्रालय चांगले काम करतंय, असले चीप पब्लिसिटी स्टंट करायची गरज फक्त राजकीय असते!
थेट विजा देणार नाही हे जरा
थेट विजा देणार नाही हे जरा अतिच होतंय!
>>>>
खरंय, सकाळी त्यांनी तावातावाने मारलेले डायलॉग वाचून मी हा काहीतरी सिरीअस मॅटर समजलो आणि धागा काढून बसलो. आता रात्र अर्ध्यावर आली तर दुर्लक्ष करणेबल प्रकार वाटतोय.
सुषमा स्वराज जी चांगलंच काम
सुषमा स्वराज जी चांगलंच काम करतात .. त्या खरोखरच ग्रेट आहेत !
खरंतर राजकारणात मायावती,जयललिता , ममता जी आणि सुषमाजी हे खूप वर्षांपासून आहेत ..पण खरंच आदर वाटावा असं काम त्यांनीच केलय फक्त .. त्या खूप भारी आणि तडफदार आहेत आणि म्हणुनच ते ज्या बोलल्या आणि ज्या पद्धतीने बोलले ते योग्यच होते
सारखच काय तारतम्याने बोलायचं ?! तसही त्यांच बोलणे कधी कधी आक्रमक असूनही "स्लिप ऑफ टँग" कधी झालय असं काही ऐकिवात नाही.
कधी कधी असं कठोर बोलावंच लागतं मला नाही वाटत त्यात काही राजकीय स्टंट आहे .
सारखच काय तारतम्याने बोलायचं
सारखच काय तारतम्याने बोलायचं ? >> अगदी अगदी
त्या खूप भारी आणि तडफदार
त्या खूप भारी आणि तडफदार आहेत
>>>>
हे मात्र खरेय. मला स्वतःला राजकारणातले काडीचेही समजत नसल्याने त्यांचे एक राजकीय नेता म्हणून मूल्यमापन करू शकत नाही. पण नक्कीच प्रभावी व्यक्तीमत्व. मला त्या लेडी शत्रू वाटतात किंवा त्या इनस्पेक्टरच्या भुमिकेतील रेखा सारख्या
राहिला प्रश्न त्यांच्या आजच्या स्टेटमेंटचा, तर हे शब्द त्याचे असले तरी मूळ पॉलिसी त्यांच्या सरकारचीच आहे. अश्या घटनांमधून देशभक्ती दाखवायची संधी न सोडणे
प्रत्येक देशात काहि
प्रत्येक देशात काहि प्रोटोकोल असतात. आपल्या कडे जे सभ्य ते दुसरीकडे असभ्य असु शकते. परदेशातिल भारतीयाना याचा अनुभव असेलच. इन्टरनेट च्या जमान्या मुळे हे आता सगळ्याना समजतय इतकेच.
राहिला प्रश्न मान अपमानाचा - अमेझोन किंवा त्या विक्रेत्याने त्या देशाच्या प्रोटोकोल (मान्यते) नुसार इतर देशांसारखा आपल्या देशाचा सुद्धा झेंडा वापरला. (मुद्दामुन करायला तो काय पाकिस्तान (डोळा मारा) आहे?)
आता- भारतीयांना हे पटले नाहि (आपल्या मान्यते नुसार) म्हणुन निषेध करणे स्वाभाविक आहे. उगिच अमेरिकेत झेंड्याची बिकनि चालते हा युक्तिवाद चुकिचा आहे. अमेझॉन चे अॅप्लीकेशन डिलीट करणे किंवा निषेधाची पोस्ट लिहिणे हे वैयक्तिक मार्ग वेगळे असतील.
आपल्या "राष्ट्रध्वज" अचार संहिते नुसार हे अयोग्य आहे म्हणुन परराष्ट्र मंत्रालयाने दखल घेउन खडसावले - आणि
अमेझोननी त्याचा मान राखुन ते उत्पादन कढुन टाकले - विषय मिटला.
(आवंतर :
पूर्वी पासून आपण भारतीय तसे संवेदनशील आहोतच म्हणा. परदेशी लोक आपली भावना दुखवायचे आणि आपण "भारतात(च)" निषेध करायचो अगदी आप-आपल्या भांडण होई पर्यंत. पण आता आपले सरकार पण हळू हळू संवेदनशील होताना दिसते आहे - थेट परराष्ट्र मंत्रालय धमकी देताय म्हणजे काय ?
मध्यंतरी गूगल आणि इतर नकाशे दर्शवणार्यांना काश्मीर भारतात दाखवायची सक्ती काय केली नाही तर डायरेक्ट दंडाची धमकी ? त्या मुळे कि काय पण इकडे "टार्गेट" नामक दुकानात पृथ्वीच्या गोलावर भारताचा काश्मीर सहित नकाशा दिसला (made इन इंडिया नव्हता). इतर नकाशे पण काश्मीरसह दिसताहेत)
बाकी ती देशभक्त का विरोधक या विषया वर चर्चा चालू दे
..
..
आशचर्य वाटतं. प्रत्येक देशाचे
आशचर्य वाटतं.
प्रत्येक देशाचे राष्ट्र ध्वजाचे कोड ऑफ कंडक्ट आहे (अमेरिकेत ही आहे. गुगाळल तर सापडेल, पेनलटी ऑफ नॉट मोर देन १००डॉलर किंवा ३० दिवसाचे कारावस ऑर बोथ), बट ड्यु टु फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन इट्स नॉट रिगरसली फॉलोड.
इफ अ कोड ऑफ कंडक्ट इज इन ईफेक्ट, इट शुड बी रिस्पेक्टेड. द कोड ऑफ कंडक्ट इस नॉट ड्राफ्टेड जस्ट फॉर फन, इट्स ड्राफ्टेड टु रिस्पेक्ट दी फ्लॅग.
नथिंग टु डु विथ नॅश्नलिझ्म, आय हॅव व्युव्ड इट विथ डिफरंट पर्सपेक्टीव्ह ऑफ एथिकल सिव्हीक सेंस अॅन्ड बिझनेस प्रॅक्टिस.
नथिंग परसनल अगेंस्ट एनी आय डी.
रोजा सिनेमातला एक प्रसंग आठवला, जेव्हा आतंकवादी तिरंग्यास जाळण्याचे प्रयत्न करतात तेव्हा नायकाचे हाथ बांधलेले असतात, तरी ही नायक जिवाच्या आकांताने तो तिरंग्याचे रक्षण करण्यास सरसावतो, पुर्ण चित्रपटगृहा मध्ये शांतता. शॉट संपल्यावर एका प्रेक्षकाने उत्स्फुर्त पणे भारतमाता कि जय चा नारा दिला, पुढचे ५ मिनीटे पुर्ण चित्रपटगृह भारत माता कि जय च्या घोषणेने दुमदुमुन गेले होते.
बरेचदा एखादी प्रिन्ट 'छान
बरेचदा एखादी प्रिन्ट 'छान उठावदार दिसते' म्हणुन वापरली जाते.
यु एस्/युनियन जॅक्/ऑस्ट्रेलिया फ्लॅग सारख्या पर्सेस आणी क्लचेस मस्त दिसतात.
लहान्पणी वापरले असावे, आठवत नाही.मी स्वतः कोणत्याही देशाचा फ्लॅग माहित असताना असा प्रोडक्ट म्हणुन वापरणार नाही.
अगदीच फ्रिडम ऑप्फ स्पीच म्हटले तरी किमान त्याचे ग्राफिक्स हुबेहुब न वापरता बदलणे/रंगसंगती उलट करणे/अशोक चक्र काढणे हे केल्यास कंपन्या अडचणीत येणार नाहीत.एखाद्या देशाचा झेंडा हा ब्रँड आहे, आणि जाहिरात क्षेत्रात आणि उत्पादनात ब्रँड लोगो ग्राफिक्स /स्पेलिंग मध्ये जे नियम लागु होतात तेच इथेही व्हावे.तसेच्या तसे न वापरणे, हुबेहुब लोगो ग्राफिक वापरुन फक्त गुची चे गुसी करणे, डेअरी मिल्क चे डेली मिल्क करणे या गोष्टी सर्रास असल्या तरी या निदर्शनास आल्यावर त्यावर मूळ उत्पादकाना कॉपीराईट खाली अॅक्शन घेता येते.
मला स्वराज यांनी घेतलेली अॅक्शन आवडली.
फ्रिडम ऑफ स्पीच म्हणुन सौदी अरेबिया,सिरीया आणि अफगाणीस्तान च्या फ्लॅग्स ची पायपुसणी आणि कमोड कव्हर्स आहेत का? तपास करायला हवा.
मोदीजीनी तिरंगासदृश्य फडके
मोदीजीनी तिरंगासदृश्य फडके तोंड पुसायला वापरले होते ना ?
हात आणि पाय यात उच्च नीच भेद
हात आणि पाय यात उच्च नीच भेद पाश्च्यात्य जग करत नाही. डोर मॅट, शूज, कपडे कुठेही वापरलं की देशप्रेमच दिसतं असं समजलं जातं.
>>>>
हो पाश्चात्य कसलेही म्हणजे अगदी कसलेही भेद करत नाहीत. टोटल समानता असते तिथे
वरच्या सर्व पोस्ट वाचल्या.
वरच्या सर्व पोस्ट वाचल्या. आपण अॅमेझॉन कसे चुकीचे आहे, किंवा बाकीच्या देशांचे राष्ट्रध्वज कसे वापरले गेले आहेत याबद्दल चर्चा आहे.
आपल्या देशाचा राष्ट्रध्वज अशा रीतीने वापरण्यासाठी जाहिरात करणे हा आपल्या राष्ट्रध्वजाचा सरळ सरळ अपमान आहे हे आपण स्वतः मान्य करतो ना? मग झाले.
आता आपण काय करू शकतो? "अगर सवा सौ करोड भारतीय ये तय कर लें की अॅमेझॉन से एक साल के लिये कुछ भी नहीं खरीदेंगे; तो उनका बिझनेस १० साल पीछे चला जायेगा"
आपण हेच केले पाहिजे. चर्चा नको, ऊहापोह नको, सरकारतर्फे बंदी नको; आपणच स्वयंस्फूर्तीने हे काम केले पाहिजे!!
अगर सव्वासौ करोड भारतीय अगर
अगर सव्वासौ करोड भारतीय अगर ये तय कर ले के मॅगी नही खानी है तो पंतजली की मॅगी बाजार मे आ जायेगी.
शरद जी.
ते देशभक्तीचे वचन आम्ही स्नॅपडीलच्या वेळेस सुध्दा ऐकले होते. नंतर त्यामागची सत्यकथा जगासमोर "आय एम ट्रोल" या पुस्तकाद्वारे आली. कृपया ते पुस्तक वाचून घ्यावे.
पुन्हा तेच तेच होणार असेल तर...
कठिण आहे ब्बा
नंतर त्यामागची सत्यकथा
नंतर त्यामागची सत्यकथा जगासमोर "आय एम ट्रोल" या पुस्तकाद्वारे आली.
>>
काय कथा?
पुस्तक वाच रे.. आयते नाही देत
पुस्तक वाच रे.. आयते नाही देत
तुमच्या याच धोरणामुळे सत्य
तुमच्या याच धोरणामुळे सत्य जगासमोर येत नाही
Pages