अॅमेझॉनवर तिरंग्याचा अपमान

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2017 - 23:14

कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत.

http://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/tirangyach...

बातमी ऐकताच चीड यावी अशी आहे. सोबत तसेच खरमरीत शब्द वापरून ती तशी पसरवली जाते. पण सुरुवातीचा रागाचा जोर ओसरल्यावर प्रश्न पडतो की हे असे मुद्दाम करतात का? व्यावहारीकदृष्ट्या विचार करता कोण स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणार. मागे आमीरचे एक देशासंबंधित विधान लोकांना आवडले नाही तर भारतीयांनी टाकलेल्या बहिष्काराची दखल घेत स्नॅपडीलने आमीरला हटवले होते. त्यामुळे एमेझॉन जाणूनबुझून असे करेन याची शक्यता त्या दृष्टीने कमी वाटते. तसेच आणखी एक म्हणजे ईतरही काही देशांचे राष्ट्रध्वज तिथे बिनधास्त विक्रीला ठेवले आहेत. आणि कदाचित त्या देशांचा यावर आक्षेपही नसावा. तर त्यामुळे आपल्यालाही गृहीत धरून ही चूक घडली असेल का? की नाही, ही मुद्दामच काढलेली खोड आहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निषेध
भारत काय इतर कुठल्याही देशाचा राष्ट्रध्वज हा पायपुसनी म्हणून ठेवण्यात येऊ नये. इतकी काळजी अ‍ॅमेझोन ने नक्कीच घ्यायला हवी होती.

अरे! अमेरिकेचा ध्वज डिझाईन अमेरिकन लोक कुठे कुठे वापरतात.

बाकी, Canada नी आपल्या सगळ्या देशद्रोही अतिरेक्यांना राजकीय आश्रय दिलाय. त्यामुळे अजून काय अपेक्षा करणार! मला खात्री आहे त्यांच्यापैकीच कोणाच्या डोक्यात हि आयडिया आली असणार, असा product काढायची.

भारत काय इतर कुठल्याही देशाचा राष्ट्रध्वज हा पायपुसनी म्हणून ठेवण्यात येऊ नये. इतकी काळजी अ‍ॅमेझोन ने नक्कीच घ्यायला हवी होती._________ +१

भारत काय इतर कुठल्याही देशाचा राष्ट्रध्वज हा पायपुसनी म्हणून ठेवण्यात येऊ नये. इतकी काळजी अ‍ॅमेझोन ने नक्कीच घ्यायला हवी होती. >>> +१

पल्यालाही गृहीत धरून ही चूक घडली असेल का? की नाही, ही मुद्दामच काढलेली खोड आहे? >>> मला तरी मुद्दामहुन काढलेली खोड वाटतेय कारण आत्ताच मटामध्ये वाचले की यापुर्वी त्यांनी भारतीय देवी-देवतांविषयी सुद्धा असे केले आहे आणी त्यावेळी पण नंतर अशीच माघार घेतली

खरेतर आपण हा मुद्दा जागतिक पातळीवर फार जोरदार उठवला पाहिजे.
हालकटपणाचा कळस आहे हा, मुद्दामच केलेले आहे हे.

अरे! ह्या न्यायाने उद्या म्हणाल कि एका देशाने दुसऱ्यावर आक्रमण करु नये.

आपला कोणी हात धरलाय का आपल्या देशात कॅनडा किंवा इतर कोणत्या देशाच्या झेंड्याच्या डिझाईन चे पायपुसने, अंतर्वस्त्रे किंवा use your imagination गोष्टी तयार करून भारतीय Amazon वर विकायला.

हे म्हणजे शेजारी त्याच्या संडासात पादला आणि (बिल्डिंगला कॉमन duct असतात) मला माझ्या बाथरूम मध्ये त्याचा आवाज आणि वासाचा त्रास झाला म्हणून त्याने त्याच्या संडासात पादू नये कि काय!

भारत काय इतर कुठल्याही देशाचा राष्ट्रध्वज हा पायपुसनी म्हणून ठेवण्यात येऊ नये. इतकी काळजी अ‍ॅमेझोन ने नक्कीच घ्यायला हवी होती. >>> +१

अ‍ॅमेझॉनचा लोगो वापरुन पायपुसणी तयार करुन अ‍ॅमेझॉनवरच विकायला ठेवली तर?>>>>>>> ही आयडेची कल्पना भारीये Lol

देशभक्ताने स्पॉन्सर ---- forgetting थे point, तिरंगा पायपुसने करायची आयडिया hater ची असणार कोणत्याही भक्ताची नाही.

अ‍ॅमेझॉनचा लोगो वापरुन पायपुसणी तयार करुन अ‍ॅमेझॉनवरच विकायला ठेवली तर?
>>
त्याना जाहिरात होत्येय म्हणून आनंदच होईल.
पण त्यापेक्षा ते कॉपीराईटची केस घालून आणखी पैसे मिळवतील.
Happy

अरेच्या देशभक्तीच्या नावाने मत मागितले चालते. पण मी स्पॉन्सरशीप मागतोय तर नाक मुरडने चालू आहे Uhoh Wink

सिलेक्टिव्ह देशभक्त Biggrin

भारत काय इतर कुठल्याही देशाचा राष्ट्रध्वज हा पायपुसनी म्हणून ठेवण्यात येऊ नये. इतकी काळजी अ‍ॅमेझोन ने नक्कीच घ्यायला हवी होती.>> इथवर ठिके पण आपण आपल्या राष्ट्रध्वजाबाबत असली धोरणे ठेवून असताना नमस्ते लंडन सारख्या चित्रपटात ऋषी कपूर जेव्हा अमेरिकन राष्ट्रध्वज असलेला कच्छा घालुन असतो तेव्हा ते सेन्सॉरने कात्री लावुन कापायला नको होते का?
मला म्हणायच अस आहे कि अशाने ते लोक सुद्धा म्हणतील ना कि स्वतःच्या दिव्याखाली किती अंधारे ते बघा म्हणुन..

अमेरिकन बायका म्हणे त्यांच्या ध्वजाच्या बिकीन्या शिवतात व बिचवर घालून फिरतात,त्यांच्याकडून काय अपेक्षा.

मला म्हणायच अस आहे कि अशाने ते लोक सुद्धा म्हणतील ना कि स्वतःच्या दिव्याखाली किती अंधारे ते बघा म्हणुन..>>>>>>>>>> तो तर असतोच Wink

Canadaसकट अनेक देशांच्या झेंड्यांच्या डिझाइनची पायपुसणी असतात असं दिसतं.
त्यामुळे हे मुद्दाम, खोडसाळपणे केलं असेल असं नाही. आपल्या आणि त्यांच्या पावित्र्याच्या, मनापमानाच्या कल्पना वेगळ्या असतील.

राजसी, गिरी, अतिशय चुकीची सजेशन्स आहेत तुमची. Sad
अ‍ॅमेझॉन नाही, पण अमेरिकेसारख्या देशाच्या ध्वजाबद्दल असे करुन बघाच काय होईल ते.
आपल्या राष्ट्रध्वजाचा ढळढळीत अपमान होत आहे आणि त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही ? Angry
राजसी यांनी दिलेली उपमा तर अतिशयच दुर्दैवी आहे. Sad

त्यामुळे हे मुद्दाम, खोडसाळपणे केलं असेल असं नाही. आपल्या आणि त्यांच्या पावित्र्याच्या, मनापमानाच्या कल्पना वेगळ्या असतील. >>> हे पटत आहे, पण जेव्हा राष्ट्रध्वजाच्या प्रतिमा वापरुन वस्तु विकायला ठेवल्या जातात तेव्हा त्यासंबंधीचे नियम आधी तपासुन बघितले जावेत. किमान तेवढी अपेक्षा अ‍ॅमेझॉनसारख्या मोठ्या कुंपणीकरुन होती.

आपल्या आणि त्यांच्या पावित्र्याच्या, मनापमानाच्या कल्पना वेगळ्या असतील.>>

हे वाक्य मान्य!

पण ह्याचा निषेध करुयात आपण करु शकतो नक्कीच!

किती जणांनी आपल्या मोबाईल वरून अमेझॉन चे अ‍ॅप्लीकेशन डिलीट केले?
किमान एक महिना बंद करा अ‍ॅमेझॉनवरून खरेदी!

आपण नुसते निषेध करू! उद्या फुकटची किंवा ५०-७५% ऑफ स्कीम आणू द्या अ‍ॅमेझॉन ला सगळे तुटुन पडतील!

महेश, इथे मी फक्त माझं मत(?) / दृष्टिकोन मांडत होते, पटायलाच पाहिजे असा काही विचार नसतो. Just थिंकिंग आऊट लाऊड.

मागे एकदा घरच्यांनी पायपुसने आणलेली online नव्हे, तुळशीबागेतून. त्यातलं एक थेट जर्मनीच्या झेंड्याचे होते. मी उडालोच ते बघून, पण नंतर लक्षात आले की बनवणर्याला कदाचित हे माहितीही नसेल कि जर्मनीचा झेंडा कसा आहे, त्याने random रंग घेऊन काहीतरी पट्टे मारले असणार.
या प्रकरणी असेच झाले आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. मला त्या अनुषंगाने हा प्रसंग आठवला इतकेच

>>म्हणजे अ‍ॅमेझॉन ने मुद्दाम केलंय असं वाटत नाही.
अहो अ‍ॅमेझॉनने मुद्दाम केले नसणारच, कारण त्यांच्याकडे हजारो गोष्टी विकायला ठेवतात ते.
ज्या कोणी ते बनविले आहे त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. Angry
अ‍ॅमेझॉनच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी हे हटविले आहे (किंवा हटवतीलच)

Pages