कर्मवीर जयंती!
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
2
(जन्म २२ सप्टेंबर १८८७)
पाखीफुट्या पाखरांसी पवित्रसा वटवृक्ष लावीला!
जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला!!
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत पोहचवणारे कर्मवीर पद्मविभुषण डॉ. भाऊराव पायगोंडा पाटील अर्थात कर्मवीर अण्णा ह्यांची आज जयंती.
रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाखाली विसावलेल्या जगभरातील तमाम रयतेला हार्दिक शुभेच्छा!!!
जय कर्मवीर!
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=50373&boxid=1191515&pgno=4
प्रकार:
शेअर करा
कर्मवीर भाऊराव पाट्लांना आमचा
कर्मवीर भाऊराव पाट्लांना आमचा मानाचा मुजरा .
आमच्या गावातल्या घराकडे यायचे
आमच्या गावातल्या घराकडे यायचे अण्णा बरेच्वेळा असे वडील सांगतात. माझ्या आजोबा बद्दल जिव्हाळा होता त्याना खुप. काय असेल ते शिळी, ताजी भाकरी खायचे आणि चालत निघायचे.
त्या काळात बायका शिकणे किती दुर्लभ होत. पण त्यांच्या प्रेरणेमुळे माझ्या आत्या त्याकाळात शिकल्या. ग्रॅज्युएट झाल्या. माझी एक आत्या तर सातार्याला त्यांच्या संस्थेत जावुन शिकली.
आमच्या गावाच्या entry लाच त्यांचा पुतळा आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता केवळ तळागाळातील, खेड्यापाड्यातील बाया बापड्याना साक्षर करण्यासाठी जीवाचे रान करणार्या "कर्मवीराना" माझे अभिवादन.