माझी जाहिरात पाहुन तीने फोन केला की ज्योतिषविषयक सल्ला घेण्यासाठी भेटायचे आहे. मी मोकळाच होतो मग लगेचच आमची भेट सुरु झाली.
ती सुशिक्षीत एकुलती एक मुलगी आयुर्वेदीक डॉक्टर. वय ३१ एक लग्न काही कारणाने मोडले मग सहाजिकच कुळाला बट्टा लागला इ मुळे कावलेली. त्यात दुसरे स्थळ आले. फारशी चौकशी न करता लग्न झालेही.
नवरा मुलगा ३७ वर्षांचा. इंजिनीयर झालेला पगार बेतास बात. आयुष्यात फारसे काही करु न शकलेला. आत्मविश्वास गमावलेला. कंपनीत धक्याला लावतात. फालतु कामे देतात. काही मान देत नाहीत म्हणुन त्रास लेला. मुलीला हळु हळु समजु लागले की या मुलाने वडीलांच्या दबावाखाली इंजिनीयरींगला प्रवेश घेतलेला. ४ वर्षांचा इंजिनीयरींग कोर्स ८ वर्षात पास झालेला. कोण ह्याला कॅपस मधे जॉब देणार मग ही नोकरी - ती नोकरी करत आयुष्य जगणारा. आपण का जन्माला आलो आहोत याचे कोडे पडलेला.
मुलीने एका शाब्दीक चकमकीत तुम्ही "हा" असा आहे याचा उहापोह केला. लगेचच सासरे हा तसा नव्हताच लग्न झाल्यावर तु दबाव टाकतेस म्हणुन तो असा झाला हा कांगावा सुरु केला. तुझ्या घरचे नीट संस्कार नीट नाहीत पर्यंत गाडी येऊन पोहोचली.
दोघांनी गाव सोडुन पुण्याला यायचा निर्णय घेतला. सुदैवाने सासरी त्याला मज्जाव नव्हता. मग दोघे पुण्याला आले. तीला पटकन जॉबही मिळाला मग तो तिच्यशी भांडला आणि गावाला निघुन गेला. आई- वडील बोलत नाहीत. सासरचे तर प्रश्न नाही. नवर्याने चार पाच वेळा समझोता करायचा प्रयत्न केला तर ही ताठ झाली. मला तुझ्याबरोबर संसार करायचा नाही म्हणाली.
अश्यावेळी वकील लोक तयारच होते. दोन्ही बाहुने नोटीसांचे बाण मारले गेले. सुदैवाने छळ झाला म्हणुन पोलीस तक्रार कर असे सांगणारी तथाकथीत समाजसेवीका भेटली नाही. मधल्या काळात अश्या समाजसेवीकांचे आणि पोलीसांचे साटे लोटे होते. मुलाच्या घरच्यांना अजामिनपात्र गुन्हा नोंदवुन अटकेत घालुन जामिनासाठी उखळ पांढरे करण्याचे षडयंत्र करणारे काही लोक होते.
आता काय करावे हा तीचा प्रश्न होता.
मी म्हणालो घटस्फोट काय लगेच मिळेल. पुढे काय दोघांवरही दुसरेपणाचा शिक्का बसेल. दुसरे लग्न सुखासुखी होणार नाही. का घटस्फोट झाला याची शहानिशा होईल तोवर तुमचे वय वाढले असेल.
तुझी पत्रिका १००% उत्तम वैवाहीक सौख्याची नाही. पुन्हा जुगारच खेळावा लागेल. जर तो कर्तबगार नाही इतकेच कारण असेल. बाकी तो प्रेमळ आहे, काळजी घेणारा असेल तर त्यानेच संसारात लीड रोल घ्यावा असे नाही. तुला हे जुळवुन घेता येईल. त्याचा पगार कमी आहे,. तो निर्णय घेऊ शकत नाही याबाबत चकार शब्द न काढता, त्याला पदोपदी न हिणवता राहिलीस तर या वैगुण्यासह थोडे सुख लाभेल.
माझ्या आयुष्यात असे अनेक लोक मी पाहिले आहेत ज्यांनी स्ंसारासाठी फारसे काही केले पण त्यांचा संसार नोकरी करुन त्यांच्या पत्नीने चालवला. हा त्यापेक्षा बरा आहे. कदाचीत तो पुढे योग्य काम मिळाल्यास आत्मविश्वासाने पुढे जाईल.
बघ तुला पटत आहे का ?
मुलीचे डोळे चकाकले होते. बहुदा माझे म्हणणे तीला पटले होते. आता फक्त मानसीक त्रासावर काय उपाय ती विचारत होती. यावर नाते संबंध सुधारण्यासाठी व मानसीक स्वास्थ्यासाठी उपाय सुचवुन मी भेट संपविली.
मुळात योग्य व्यवसाय- नोकरी मार्गदर्शन न होता जगात आलेल्या पुरुषाची ही कहाणी. करियरचे हजार पर्याय सुचवणारी पुस्तके/ व्यक्ती ज्याला सल्ला देतो त्याचे व्यक्तीमत्व, बुध्दीमत्ता, कौशल्ये, कल आणि क्षमता याची सांगड घालण्याचे तंत्र वापरत नाहीत. परीणामी एक तर करीयर सुरु होण्यासाधीच क्रॅश होते किंवा आयुष्याचा मध्यावर आपण खुष नाही. केवळ पैसा मिळतो आहे म्हणुन आयुष्य खेचणारी माणसे तयार होतात.
यातुन निर्माण झालेले हे सामाजीक प्रश्न . मुलाला जन्मताच इंजिनीयर करणार हे घोष वाक्य बोलणारे अजुन किती इडीयट सहस्त्रबुध्दे बाप दिसणार आहेत ?
छान लेख... पु.ले.शु. ! ! !
छान लेख...
पु.ले.शु. ! ! !
मुलाला जन्मताच इंजिनीयर करणार
मुलाला जन्मताच इंजिनीयर करणार हे घोष वाक्य बोलणारे अजुन किती इडीयट सहस्त्रबुध्दे बाप दिसणार आहेत ? >>>>>>>>>>
मलाही हाच पर्श्न पडला आहे. का नही ज्याचे त्याला त्याचे करियर निवडू देत..........
घटस्फोट मिळेल का? असा प्रश्न
घटस्फोट मिळेल का? असा प्रश्न ज्योतिषाकडे घेउन येणार्या लोकांची संख्या वाढलेली आहे. आपला सल्ला व्यावहारिक दृष्ट्या योग्य होता.
उत्तम लेख.
उत्तम लेख.
छान विचार, पण हे
छान विचार,
पण हे सहस्त्रबुद्धे जुन्या पिढीतील होते.
आता पालक झालेली तरुण पिढी कसा विचार करते हे बघणे गरजेचे.
(किंवा आयुष्याचा मध्यावर आपण
(किंवा आयुष्याचा मध्यावर आपण खुष नाही. केवळ पैसा मिळतो आहे म्हणुन आयुष्य खेचणारी माणसे तयार होतात.)
++१ पटले.. अगदिच १००% लागू नसले तरी बर्याच अंशी खरे आहे हे.
छान. नशिबवान मुलगा. मुलीला
छान.
नशिबवान मुलगा.
मुलीला ड्रायव्हरचा रोल देउन निवांत कंडक्टर होउन रहावे.
खूप छान अनुभव... अतिशय चांगला
खूप छान अनुभव...
अतिशय चांगला निर्णय घेतलात...
एक कुटुंब तुटण्यापासून वाचवलंत...
ज्योतिषाचा भाग: तुझी पत्रिका
ज्योतिषाचा भाग: तुझी पत्रिका १००% उत्तम वैवाहीक सौख्याची नाही. पुन्हा जुगारच खेळावा लागेल.
बाकी सहस्रबुद्धे बरेच असतात.ते ध्यान गळ्यात पडल्याने प्रश्न आला. ती चर्चा वेगळी.
डोळे उघडणारा लेख. आपल्या
डोळे उघडणारा लेख. आपल्या समाजात दुर्दैवाने पुरूष हा कर्तबगार असलाच पाहिजे, म्हणजे शिक्षणाने उच्च आणि पैशाने सुद्धा. पण मला ही बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की एखादा पुरूष नसेल महत्वाकांक्षी तर? छोट्याश्या नोकरीत, छोट्याश्या पगारात रमणारा असेल तर? अशा पुरूषना बायका मिळणार च नाहीत का? शेती आणि भिक्षुकी करणाऱ्याना पण बायका मिळत नाहीत असं मी मध्यंतरी वाचलं कुठेतरी.