आंबाडी च्या पाकळ्यांचे लोणचे

Submitted by सायु on 7 December, 2016 - 06:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी आंबाडी च्या बोंडांच्या पाकळ्या (हिवाळ्यात बाजारात हमखास मिळतात, मला मैत्रिणीच्या शेतातल्या मिळाल्या.:))

१/२ वाटी गुळ (खिसलेला)
मेथी दाणे १०,१२
मोहरीची डाळ - २ चहाचे चमचे..
तिखट - २ चहाचे चमचे
तेल - १ पळी
हिंग , मिठ अंदाजेच

क्रमवार पाककृती: 

आंबाडीच्या पाकळ्या स्वच्छ धुवून एका सुती कापडावर पसरवुन ठेवाव्यात. कोरड्या झाल्या की चिरुन घ्याव्या (जास्त बारिक नको) आणि मिठ घालुन एखाद्या दगडीत / काचेच्या बरणीत ५, ६ तास झाकुन ठेवायच्या. नंतर खिसलेला गुळ घालुन नीट कालवुन घ्या.

मसाला तयार करयाच्या आधी १ प़ळी तेल कढईत तापवुन ते थंड व्हायला बाजुला ठेवा.

एका भांड्यात लोणच्याचा मसाल नेहमी जसा रचतो तसाच रचायचा आधी हिंग, मेथी दाणे मोहरीची डाळ, तिखट अणि शेवटी मिठ. त्यावर पळी भर कोमट तेल सोडा. हा मसाला थंड झाला की त्यात आंबाडीच्या पाकळ्या कालवुन घ्या!

झाले लोणचे तय्यार!!!

भाकरी,पोळी वरण भात कशा बरोबरही छानच लागते.

वाढणी/प्रमाण: 
एक वाटी भर होतं.
अधिक टिपा: 

मिठ लावलेल्या पाकळ्यामुळे लोणचे लगेच खाण्याजोगे होते..

माहितीचा स्रोत: 
एका प्रदर्शनात विकत घेतले होते त्यातले घटक + स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आणि सोपी पाककृती. फोटो पाहून खुप चटकदार दिसतंय.

बादवे हे तयार कुठे मिळेल. अंबाडीची फुले मुंबईत कुठे मिळतील ते माहित नाही. आणि जरी मिळाली तरी एक वाटी लोणचे बनवणे म्हणजे घरी लोणच्याचा अपमान समजले जाईल. Wink

वाटीभर लोणच्यासाठी ताटभर फुलं लागली म्हणजे बरणीभर लोणच्यासाठी एक पोते भरून लागतील. तुम्ही द्या पोतेभर फुलं पाठवून बरणीभर बनवून वाटीभर तुम्हाला सुध्दा पाठवतो. Lol Light 1

मस्त लोणचे..

फक्त या फुलांच्या पाकळ्या नाहीत तर फळांच्या / बोंडांच्या पाकळ्या असतात. आंबाडीचे फुल जास्वंदीसारखेच पण आकाराने लहान आणि पिवळे असते.

मुंबईत बरीच अंबाडीची शेती होते, पण या पाकळ्या बाजारात दिसल्या नाहीत कधी.

नरेश आभार, हा प्रयोग पहिल्यांदाच केला म्हणून वाटी भरच लोणच केलेलं.
आणी हो ताट भर पाकळ्यांचे वाटीभर लोणचे होत नाही...:)

साती, धन्स.. आंबाडी फॉन क्लब मधे तुम्ही पण आहातच, त्यामुळे नक्की करुन बघा.. आवडेलच..:)

दा धन्स..
फक्त या फुलांच्या पाकळ्या नाहीत तर फळांच्या / बोंडांच्या पाकळ्या असतात.+++ हा बरोबर.. धन्स, पा. कृ.बदल करते..

ही अंबाडी आहे होय, आम्ही या पाकळ्यांचा जॅम करतो. आणि अशीच उगवतात ही झाड तर कापून टाकतो. आता ही रेसिपी पण ट्राय करेन.

अवांतर: आमच्या गोव्यात अंबाड्याच झाड असत भलं मोठं त्याला फळे धरतात त्यांना अंबाडे म्हणतात.त्याचही लोणचं बनत

फोटोसाठी डोळ्यात बदाम.

अंबाडी बघितली नाही कधी ही. कोकणात ऐकलंय पण आमच्याकडे नाहीये.

ओह्ह्ह्ह्ह
म्हणजे ते घोंगुरा पिकल म्हणतात ते आंबाडीच्या पानांपासून नाही तर फुलांपासून बनवलेले असते Uhoh
मी बरेच दिवस पानांचं लोणचं कसं बनवलं त्याचा विचार करून आश्चर्यचकित होत होते

रि, आंध्रामध्ये गोंगुरा पिकल अंबाडीच्या पानांचेच करतात.
>>>>
ओके ओके
\रेसीपी नको... मी काही करायला जाणार नाहीये. मला आवडतं गोंगुरा पिकल

सायु, मस्त दिस्तंय लोणचं

रावी,प्रीत्,अन्जु ताई,रिया, मंजु ताई,मॉगी सगळ्यांचे आभार...
प्रीत जॉम ची पा. कृ पण द्या..
अवांतर: आमच्या गोव्यात अंबाड्याच झाड असत भलं मोठं त्याला फळे धरतात त्यांना अंबाडे म्हणतात.त्याचही लोणचं बनत++ जागु ची रेसिपी आहे बघा , पण ईकडे नाही मिळत आंबाडे...
आंध्रामध्ये गोंगुरा पिकल अंबाडीच्या पानांचेच करतात.+++ खुप मस्त लागत हे पण..

सालाबाद प्रमाणे "महालक्ष्मी सरस" हे प्रदर्शन वांद्रे, मुंबई येथे सुरु आहे. काल, दि. १५ जानेवारी २०१६,प्रदर्शन भेटीला गेले होते. तिथे 'गावकूस' नावाचा नागपूरचा स्टॉल आहे. त्यांनी अंबाडीचे विविध प्रकार आणले आहेत.
- अंबाडीची सुकवलेली फुले, अंबाडीची चटणी, सरबत पावडर, चाटमसाला पावडर, पीठ (याचा झुणका करायचा).
मी सगळेच घेतले. आता या सुकवलेल्या फुलांचे लोणचे कसे करू याचे मार्गदर्शन करा. फुले पाण्यात भिजवून मग चीरून वापरावीत असा विचार आहे.

कुणी मार्गदर्शन करेल का? शनिवारी करीन म्हणते.

नव्या मायबोलीवर प्रतिसाद दिल्यावर तो धागा लिस्टमधे वर येत नाही असे वाटते.

धागा वर आलेला दिसतोय की. आता कदाचित इतर धागे अजून आले तर पुन्हा हा मागे जाईल.
(धागा वर आलेला लगेच दिसत नाहीये हे खरे आहे. पण काही मिनिटात येतो आहे. हे का होत आहे ते पाहतो.)

आंबाडीच्या पाकळ्या 'पुण्यनगरीत' कुठे मिळतील बरे?
आंबाडीची पालेभाजी आसते तीचीच ह्या पाकळ्या आसतात का? का ही आंबाडी वेग्ळी?