व्हेजीटेबल ब्रॉथ साठी:
५-६ कप पाणी
१ मध्यम मुळा
२-३ ब्रोकोलीची फुलं
१ लहान कांदा
३ मोठ्या लसूण पाकळ्या (कॉस्टको साईझ)
मिरी पावडर
कोथिंबीरीच्या जून काड्या, (मुळासकट कोथिंबीर मिळाली तर उत्तम), किंवा मूठभर कोथिंबीरीची पानं.
सगळे जिन्नस एकत्र करून साधारण २० - ३० मिनीटे उकळून घ्या. गाळून घेऊन ते पाणी ब्रॉथ म्हणून वापरा.
सूप साठी:
वरील प्रमाणे केलेला स्टॉक
लेमन ग्रासच्या ३-४ इंचाच्या ४-५ काड्या
केफिर लाईमची ६-७ पानं
ऑइस्टर मश्रूम्स (किंवा कोणतेही आवडते मश्रूम्स)
२ गाजर पातळ चकत्या करून
१ मध्यम टोमॅटो मध्य तुकडे करून
चिली पेस्ट (किंवा १-२ थाई मिरच्या मधे चिरून)
३ टेबल स्पून सोया सॉस
१ टिस्पून साखर
चवी नुसार मीठ
१ टिस्पून शेंगदाण्याचे तेल
वरून घालायला कोथिंबीर
या सूपमधे लेमनग्रास, केफीर लाईम इत्यादी असल्यानं सर्दी झाल्यास (इतर वेळेसही) छान वाटतं.
या सूपसाठी वरील ब्रॉथ करून घ्या. तयार ब्रॉथ वापरला तरी चालेल, पण या सूपसाठी वरील पद्धतीनं केलेला ब्रॉथ जास्त चांगला वाटला. तसंच ब्रॉथ तयार करताना गाजर अजिबात घालू नये. गोडसर चव येते.
तेल तापवून मिरच्या किंवा चिली पेस्ट घालावी. लेमन ग्रासच्या काड्या -थोड्या ठेचून, केफिर लाईमची पानं -तोडून, मश्रूम्स, गाजर, टोमॅटो घालून किंचीत परतावं.
व्हेजिटेबल ब्रॉथ घालून मीठ, सोया सॉस, साखर घालून उकळी आणावी. साधारण ५-७ मिनीटं उकळू द्यावं.
चव बघून सिझनिंग adjust करावं. लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा.
सर्व्ह करताना थोडी वर कोथिंबीर घालून द्यावी.
लेमन ग्रास, केफिर लाईम एशिअन दुकानांत मिळेल. ताजे मिळाले नाहीत तर फ्रोजनही चालतील.
थंडीत, सर्दी झाली असताना गरम गरम प्यायला छान वाटतं.
Non veg सूप करताना सोया सॉस ऐवजी फिश सॉस घालावा. तसंच कोलंबीही घालता येईल. ब्रॉथ करताना कोतासकट कोलंबी घालता येईल.
मस्त ! माझं आवडतं सूप !
मस्त ! माझं आवडतं सूप !
काय एकेक रेसिप्या टाकते आहेस.
काय एकेक रेसिप्या टाकते आहेस. यम्मी.
दुकानातला रेडीमेड मसाला आणुन बनवलेल, एकदम बेक्कार झाले होते हे सुप. उद्याच बनवते!
मस्त. माझंही आवडतं.
मस्त. माझंही आवडतं. न्यूयॉर्कात एके ठिकाणी मस्त टॉम यम सूप मिळतं.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आता पुढची रेसिपी थाय करी किंवा किमाव नूडल्स वगैरे असणार का?
सायो, जिंजर तोफू व्हेजीटेबल
सायो, जिंजर तोफू व्हेजीटेबल स्टर फ्रायचा विचार करतीये![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
टाक टाक. नूडल्स एनी टाईम
टाक टाक. नूडल्स एनी टाईम वेल्कम.
मस्त रेसिपी यात फिश सॉस किंवा
मस्त रेसिपी यात फिश सॉस किंवा थोडी किमची घात्ली तर सुपर उमामी टेस्ट येते.
मस्त, करुन बघेन. जिंजर तोफू
मस्त, करुन बघेन.
जिंजर तोफू व्हेजीटेबल स्टर फ्रायचा विचार करतीये >> नक्की टाका
सूप मधे किमची घालून कधी
सूप मधे किमची घालून कधी बघितलं नाही. त्याचा वास उग्र वाटतो म्हणून. बघायला पाहिजे.
सही! मी नारळाचं दूध घालते,
सही!
मी नारळाचं दूध घालते, आणि आलं, लिंबू. सोय सॉस नाही घालत.
(मी तोम यम कढी करते म्हणजे. :P)
कोलंबी घातलेले हे सूप
कोलंबी घातलेले हे सूप आमच्याकडे फार आवडते.
>> (मी तोम यम कढी करते
>>![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(मी तोम यम कढी करते म्हणजे.>> तोम यम कढी आणि मस्त आंबेमोहोर भात. यम यम
हे सूप आणि नारळाचं दूध घालून
हे सूप आणि नारळाचं दूध घालून असे दोन्ही प्रकार घरी सगळ्यांचेच आवडते आहेत.
काफिर लाइम आणि लेमन ग्रास ब्याकयार्डात आहेत. त्यामुळे पटकन करता येतं.
या सूपात मी कधी कधी "गलांगल" नावाचा आल्यासारखा दिसणारा कंद पण घालते. ते एशियन मार्केटमधे मिळते. रेस्टॉरंट रेसिपीत ते असतेच.
मी पण आलं घालत नाही, पण लसूण
मी पण आलं घालत नाही, पण लसूण मस्ट आहे (म्हणे). कढी बरोबर तोंडी लावयला किमची घेतेस का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शुगोल, माझ्या थाई मैत्रिणीच्या घरातपण केफिर लाईम आणि बॅकयार्डात लेमनग्रास, कोथिंबीर वगैरे. मला करून दाखवताना तिनं कोथिंबीरीच्या काड्या मुळासकट उपटून आणल्या. मुळं स्वच्छ धुवून ठेचून घेतली आणि ती ब्रॉथ करताना वापरली.
अरे वा! थाय थीम दिसते आहे
अरे वा! थाय थीम दिसते आहे अंजलीची सध्या.
त्या टॉम खा सूप (ज्यात कोकोनट मिल्क असतं भरपूर) पेक्षा थंडीत आणि ओव्हरऑल च हे सूप जास्त बरं वाटतं लाईट आणि स्पायसी असल्यामुळे.
कोथिंबीरीच्या काड्या मुळासकट
कोथिंबीरीच्या काड्या मुळासकट उपटून आणल्या >>>> किती छान!
अंजली, मी कोथींबीर उगवण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले आहेत. पण जरा उगवायला लागली की पक्षी खाऊन टाकतात.
केफिर लाईमची ६-७ पानं
केफिर लाईमची ६-७ पानं <नेहमीचे लाईम पानं चालतील का?
मस्त. पाहूनच भूक लागली.
मस्त. पाहूनच भूक लागली.
अदिति, मी घरी जे लाइमचं झाड
अदिति, मी घरी जे लाइमचं झाड आहे त्याचीच पाने वापरते. ते केफिर व्हरायटीचं आहे का ते माहित नाही. पण माझ्याकडच्या लिंबाच्या पानांनाही खूप छान वास येतो. एखादं पान तोडून , थोडं चुरगाळून वास घेऊन बघ.
मस्त रेसिपी आणि फोटोज!
मस्त रेसिपी आणि फोटोज!
यम सुप :ड
यम सुप :ड
मी आजच केले. too good! मी
मी आजच केले. too good!
मी आलं घातलं. फ्रेंच बिन्स घातल्या. ५/६ श्रिम्प्स पण घातल्यात. लिंबुरस विसरले. घरात एक्दम हिट झालय हे सुप.
पुढच्या वेळेस ब्रॉथ मधेच आलं, लेमन ग्रास, आणि लेमनची पानं घालायचा विचार करतेय. सुप पितांना काढायचा त्रास होत होता.
मस्त झालं होतं सूप. थँक यू
मस्त झालं होतं सूप. थँक यू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)