कवठाचे लोणचे

Submitted by सायु on 29 November, 2016 - 07:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एका कच्या कवठाच्या फोडी (साधारण दीड ते दोन वाटी होतात)

मला बर्‍या पैकी मोठे कवठ मिळाले होते आणि कच्चे असुन ही त्याच्या कडा गुलाबी होउ लागल्या होत्या.
त्यामुळे लोणचे चवीला खुप छान झाले.

गुळ १ वाटी (आंबट गोड चवीनुसार कमी जास्त करु शकता)
तिखट = २ ते चमचे
चिमुट भर हळद
शोप / सोप = १ चहाचा चमचा
मेथी दाणे = १/२ चहाचा चमचा
जिरे = १ चहाचा चमचा
लवंग - २
मिरे - ६,७
कलमी - १ पेरा एवढा तुकडा
मीठ अंदाजे

क्रमवार पाककृती: 

कवठ फोडुन त्याच्या फोडी करुन घ्या. त्यात मीठ घालुन ५, ६ तास झाकुन ठेवा.
त्यात गुळ आणि तिखट घालुन कालवुन घ्या.(गुळ किसलेला किंवा फोडलेला असावा, लोणचे लगेच मुरते)
जीरे, मेथी दाणा, शोप भाजुन घ्या गॉस बंद करा त्यातच लवंगा मिरे आणि कलमी घाला
मिक्सर मधुन फिरवुन घ्या. ही पावडर / भुकटी लोणच्यात घालुन व्यवस्थीत कालवुन घ्या..
झाले कवठाचे लोणचे तय्यार..

परठे, पुर्‍या, किवा वरण- भात कशा बरोबरही छानच लागते..

अधिक टिपा: 

कवठ कच्चे च हवे, पिकलेले नको.

माहितीचा स्रोत: 
माझी आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!!! पण आता पिकलेली मिळायला लागलीत बाजारात !!

तरी पण बघणार करून !!
एक प्रश्न : कच्च्या कवठामुळे तोठरा (काही जणांना सुपारी लागते तसा )नाही ना बसत???

मस्तच.
मुंबईत, बर्‍याचदा कच्चीच मिळतात. ती पिकेपर्यंत वाट बघावी लागते. आधी हा प्रकार माहीत असता तर भारतात असताना नक्की केले असते.

वॉव मस्त दिसतय लोणचं,
कवठ खाल्ल आहे पण आता चवही आठवत नाही. अस काही कधी खायला मिळेल अस वाटत नाही.

जेलीच्या रेसिपी मधे आहे बघ फोटो, जाई.

विक्रम पहिल्या वहिल्या प्रतिसादा साठी धन्यवाद!!!
पण आता पिकलेली मिळायला लागलीत बाजारात !! +++ बाजारातुन कवठ निवडतांना वजनाने जड असे निवडावे, हलके असेल तर ते आतुन पिकलेले असणार.

कच्च्या कवठामुळे तोठरा (काही जणांना सुपारी लागते तसा )नाही ना बसत???+++ अजीबात नाही!! गुळ आणि मीठा मुळे तुरट पणा कमी होतो..

हेमा ताई खुप खुप धन्स.. कलमी म्हणजे दालचीनी.

मंजु ताई , दिनेश दा धन्स.. धी हा प्रकार माहीत असता तर भारतात असताना नक्की केले असते.+++ दा तिकडे कवठ मिळत नाही का?

माणीक, राया, जाई ,आदिती, अन्जु ताई, सरिवा सगळ्यांचे प्रतिसाद खुप आवडलेत.. पा कृ. आवडल्या बद्द्ल आभार...

माणिक, एकदा खाऊन बघ, नक्की आवडेल तुला... नागपूरला आलीस की कळव!:)

Nice

भारताबाहेर कवठ ...... वूड अ‍ॅपल म्हणतात आणि माझ्या बघण्यात फिलिपिनो शॉप मधे त्याचा जाम बघितला होता. ताजे कवठ बाजारात कधीच बघितले नाही. अपवाद श्रीलंकेचा. इतर फळांसोबत तिहे बेलफळ, कवठही विकायला होते, इतकेच नव्हे तर या दोन्ही फळांचे रसही ( ताजे आणि बाटलीबंद ) विकायला होते.

सपना,अपर्णा,अनिल, जागु सगळ्यांचे आभार..
किती दिवस टिकते? फ्रिज मध्ये ठेवावे लागते का?+++ १०-१५ दिवस बाहेर राहु शकेल. त्याच्या आधीच संपत Happy
दा, बेलफळ आणि कवठाचा ताजा रस, मस्तच!!!

सायो..बर झालं नाही तर मी टायपली होती हि पाकृ...
छान केलस...
माझ्या कृतीमधे आम्ही कवठाला जराशी टिचकी मारुन ते गॅसवर ठेवून भाजुन घेतो अन मग त्यात तिखट, मिठ, गुळ इत्यादी टाकतो... सुपर्ब लागत.. माझ आवडत लोणच आहे हे..

ऋन्मेऽऽष , टीना धन्स..

माझ्या कृतीमधे आम्ही कवठाला जराशी टिचकी मारुन ते गॅसवर ठेवून भाजुन घेतो अन मग त्यात तिखट, मिठ, गुळ इत्यादी टाकतो... +++ ती चटणी मी पण करते..
मला तरी कधीच नाही दिसले बाजारात ++++ मानिनी कुठे राहाता तुम्ही ?
ओळखायचे कसे +++ फोटो देते वेळ मिळाला की..

आमच्याकडे अंड्याला पण कवठच म्हणतात गावी
>>>
येस्स मलाही तेच आठवलेले. आम्ही नाही वापरत तो शब्द, आमच्या गावचे बोलतात. कवठ की कवट नक्की माहीत नाही. आपण कोकणातले का?


फोटो जालाहुन सभार...

मानिनी माझी धाकटी बहिण मुंबईला असते तीला तीथे मिळतात कवठ...तुम्ही पण शोधा, मुंबईत मिळत आहेत तर ठाण्यात पण मिळतीली की..

थॅंक्स सायु... आईला सांगेन आता हे लोणचे करायला पर्यायाने कवठ शोधायला

@ ऋन्मेऽऽष
मी कोल्हापुरची कोकणातली नाही