एक फसलेली वूफी (woofi)

Submitted by एडी on 22 November, 2016 - 04:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साधारण सामग्री अशी -

उत्तम प्रकारची व्हिस्की - प्रमाण मापात

क्रमवार पाककृती: 

एका शनिवारच्या निवांत दुपारी अस्मादिकांना Beer Country हा कार्यक्रम बघून एका नवीन मद्यकृती चा शोध लागला. लागलीच शनिवार असल्याने आणि संध्याकाळ चढत असल्याने हि नवीन पाककृती बघण्याची करून खुमखुमी सुरु झाली. त्यात सौ ने दुजोरा भरला आणि एका थंडीच्या संध्याकाळी सामग्री गोळा करण्याची लगबग सुरु झाली. वुफी विषयी थोडक्यात सांगायच म्हणजे व्हिस्की घातलेली कॉफी.

सर्वात प्रथम व्हिस्की च्या शोधात निघालो. या बाबतीत आम्ही ढ गोळा असल्याने गुगल बाबाची मदत घेत (आणि बायको समोर अडाणीपणा) दाखवत शेवटी RC या ब्रॅण्ड वर स्थिरावलो. सुट्टे पैसे आणि कार्ड याचा मेळ घालत शेवटी एकदाची ती क्वार्टर आमच्या पदरात सॉरी खिशात पडली आणि वरात घरी येऊन स्थिरावली.एक अक्खी क्वार्टर खिशात म्हणजे काय याचा अभिमान अनुभवला आणि तयारीला लागलो.

कृती -

सर्वप्रथम एका खोल भांड्यात व्हिस्की ३०ml काढून घ्या. त्यात ते दोन चमचे क्रीम टाकून एका बलदंड आणि रिकाम्या माणसाकडे व्हिस्कर घालून द्या. त्याने बघणार्याला कंटाळा येईपर्यंत आणि त्याचा ट्रायसेप फुगून बेंडकुळी येईपर्यंत हलवावे. तरीही ते तयार होणार नाहीच याची खात्री बाळगावी. व्हिस्की फेसाळून त्यावर एक तवंग येईपर्यंत हलवून ठेवावे.

दुसऱ्या बाजूला आपली कॉफी उकळण्यास ठेवावी. चवीनुसार साखर घालून एक उकळी काढावी.

हे झाल्यावर वुफी सर्व करायला तय्यार !

एका छानशा ग्लासात सर्वप्रथम कॉफी ओतून घ्या. एक चमचा घेऊन त्यावर हळू हळू फेटलेली क्रिमी लेयर सोडा.

कॉफी ची कडक चव आणि व्हिस्की चा मधुर गिळगिळीतपणा एका वेगळीच अनुभूती देतो. थोड्या वेळानंतर जे झिंगालाला होत ते वेगळंच. सगळं करून झाल्यावर ह्याची जातकुळी आयरिश कॉफी असल्याचं समजलं आणि कपाळावर हात मारून घेतला.

पुढच्या खेपेस अजून काही कॉकटेल मध्ये आहुती देण्यास उरलेली व्हिस्की अजूनही फ्रिजवर वाट बघत आहे. तज्ञांच्या प्रतीक्षेत!

वाढणी/प्रमाण: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं लिहिलीत रेसिपी!
व्हिस्की ३० एम एल हे समजलं.
कॉफीचं द्रावण किती एम एल साधारण?
एक फायनल प्रॉडक्टचा फोटो टाकायचा ना?
(की झिंगालाला झाल्यामुळे ब्लर्ड आला! Happy )

करून पिणार!

ह्या बायांना बरोबरी करायची हौसच भारी. Light 1

बरी आहे की रेस्पी. फसलेली का लिहिलेय? नंतरच्या काही साइड एफेक्ट मुळे का? Happy

Happy

तशी ट्रायसेप फुगून बेंडकुळी येत नाही, बायसेप फुगून येते.
पण 'वुफी के साईड इफेक्टस' म्हणून टंकन चुका माफ केल्यात!

फ्रिजवर ठेऊ नका प्लीज उरलेली व्हिस्की. एखाद्या कपाटात किंवा कपाटाच्यावर ठेवा. हीट सोर्स पासून दूर, प्रखर सूर्यप्रकाश / उन्हापासून दूर अशा ठिकाणी ठेवा.

बेलीज आयरिश क्रीम वापरण्याबद्दल + १

चीअर्स

व्हिस्कीच्या बाबतीत ढ गोळा, हे ३० एमेल व्हिस्कीत वाढणीप्रमाण २, तीपण आरसी व तेवढंच पिऊन झिंगालाला हे वाचताच आपोआप समजले. Lol

देवा! १५ मिलि व्हिस्कीने झिंगालाला होता तुम्ही! खोकल्याचं औषध १० मिली पिऊन बाहेर जाऊ नका कधीच

पुढच्या खेपेस अजून काही कॉकटेल ........फ्रिजवर वाट बघत आहे
चांगली नीटच घ्या की. तशीच पितात व्हिस्की. उगाच यात नि त्यात घालून सगळ्याचीच भेसळ.

व्हिस्की निट घेऊन तरतरी येते ,
याचा अर्थ पुरेशी घेतली नाही. अख्खी हाफ संपवा - खाली पडाल ते दोन दिवस उठणार नाही.

इतका उपद्व्याप करून फसण्यापेक्षा सरळ 'बेलीज आयरिश क्रीम' आणून प्या

हाय काय आठवण काढलीत हो!! सद्ध्या आम्ही ग्लेनफिडीच भक्त आहोत, अन फ्रंटला असलो तर ओल्ड मॉन्कची आराधना करतो Happy

सस्मित - भारतात मिळतं का बेलीज आयरिश क्रीम? फसलेली कारण अर्धा तास फेटल्यावर जेवढं क्रीम तयार व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही.

साती - धन्स

झाडू : Proud

प्रतिसादासाठी सगळ्यांचे धन्यवाद

वास आवडत नाही म्हणून या प्रकाराच्या नादाला लागले नाही कधी पण कॉफीत घातलं तर वास कमी होईलसं वाटतं.
३० मिली मधे २ म्हणजे चाटून बघीतल्यासारखे होणार खरं तर.. किंवा मग ते शिंतोडे उडवतात ना पिण्याआधी काही लोक, तसे जाणार वाया. जास्ती घालून बघेन कधी जमलच तर. बेंडकुळ्या वाढवायच्या नाहीत पण, फुगलेले दंड कमी होतील का?