"चाहूल"-नवी रहस्यमय मालिका

Submitted by कविता९८ on 16 November, 2016 - 10:33

कलर्स मराठी वर चाहूल ही नवी मालिका सुरू होणार आहे.
जाहिरात बघून तरी वाटत की रहस्यमय मालिका असेल.
रात्रीस खेळ चाले या मालिकानंतर आता ही नवीन मालिका
प्रेक्षकांना किती पसंत पडेल हे बघण्यासारखे असेल.
े.प्रत्येकाला जाणीवेपलीकडच्या गूढरम्यतेचं आकर्षण असतं आणि त्याविषयी भीतीही असते… याच भयाच्या भावनेला ‘चाहूल’ या मालिकेतून साद घालण्यात येणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेला सर्जेराव भोसले म्हणजेच ‘कमला’ मालिकेतून प्रेक्षकांचा आवडता बनलेला अक्षर कोठारी सुमारे एका दशकानंतर सातारा जिल्ह्यातल्या भवानीपूर या त्याच्या मूळ गावी परततो, तो त्याच्या होणा-या बायकोसह – जेनिफरसह… जेनिफर ही पदरेशी तरुणी सर्जेरावला त्याच्या परदेश – वास्तव्या दरम्यान भेटलेली असते आणि सर्जेरावच्या प्रेमासाठी ती तिचा देश, तिची माणसं सोडून, सर्जेरावशी आणि त्याच्या माणसांशी नातं जोडायला भारतात, भवानीपुरात आली आहे.मात्र सर्जेराव आणि जेनिफर यांच्या प्रेमात, त्यांच्या लग्नात अडथळा येऊ लागतो एका अज्ञात शक्तीमुळे… आणि मग प्रवास सुरू होतो एका गूढाच्या शोधाचा, एका अमानवी रहस्याच्या भेदाचा…ही चाहूल आहे अकल्पिताची, अघटिताची आणि अधु-या राहिलेल्या एका प्रेमकहाणीची… काय आहे हि प्रेमकहाणी? कोणाची आहे हि प्रेमकहाणी ?‘चाहूल’ या मालिकेचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लीझान ही परदेशी युवती या मालिकेत जेनिफरची व्यक्तिरेखा रेखाटत आहे. एका परदेशी युवतीने नायिकेची भूमिका करणं, हे मराठी दैनंदिन मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. याशिवाय या मालिकेत अक्षर कोठारी, शाश्वती पिंपळकर, माधव अभ्यंकर, उमा गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
(अधिक माहिती लोकसत्ता मधील आहे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा

प्रोमोवरुन वाटतंय त्या हिरोचं (अक्षय कोठारीचं) लग्न झालेलं अज्ञात शक्तीला आवडलं नाही म्हणजे लग्न नसतं झालेलं, ती होणारी बायको खोटं सांगते मग गाडी बंद पडते. हिरो सांगतो नाही झालं लग्न मग स्टार्ट होते.

हो पेपरमध्ये वाचलं.

खरं म्हणजे साडेदहाला दाखवणार असतील तर सुरु व्हायला हवी होती एव्हाना. आत्ता त्यावेळी नवीन नाहीये कुठली सिरीयल, रिपीट असते एक ८ ची.

नाही बघत मी तिथे, क्वचित स्व जो चा शो बघितला तर बघते. रात्री साडेदहा वेळ असेल असा माझा अंदाज, झी ला टक्कर द्यायला.

‘कमला’ मालिकेतून प्रेक्षकांचा आवडता बनलेला अक्षर कोठारी >>> प्रेक्षकांचा आवडता? त्याला त्या सिरियलमुळे फेसबुक वर किती शिव्या पडल्या ते मला विचारा. Lol मी बघत होते ना ही सिरीयल.

मजबूत शिळा , वास मारणारा विषय आहे , या विषयावर आत्तापर्यंत असंख्य कथा / कांदबर्‍या/ सिनेमे होऊन गेलेत , काय नविन आहे यात ?

'चाहूल' चा पहिला एपिसोड पाहिला. हिरोने 'मराठी माती' हे शब्द उच्चारल्याबरोबर मला सखाराम गटणे आठवला. म्हणे खूप दिवस मराठी बोललो नाही. मेल्या! परदेशात तुला एकही मराठी भेटला नाही? तिथे एक वेळ फॉरेनर्स भेटणार नाहीत पण मराठी लोक दिसणार नाहीत असं होणं शक्य नाही. नाहीतर मायबोलीवर यायचं की. त्या गोर्‍या बायकोपेक्षा ती 'निsssssर्मला' बरीच बरी दिसायला. पण म्हणतात ना 'गधीपे दिल आया तो परी क्या चीज है'.

राखेच्या मधले अण्णा इथेही अण्णाच्या भूमिकेत आहेत काय? सेटवरची कपाटं दडवा आधी.

जमिनीवर पडलेलं पाणी हिरवं वगैरे झालेलं बघून मी तर सिरियलीला रामराम ठोकला.

आता पर्यंतचे एपी पाहून तरी असच वाटतंय, खूप लांबवणार हि शिरेल ....
राखेचा सारखं करू नये म्हणजे मिळवल

बोअर. त्या निर्मलाचा खून बहुतेक हिरोच्याच वाड्यात झालाय आणि पळून गेली सांगतायेत. तो हिरो सर्व शोधून काढेपर्यंत कित्ती पिडणार काय माहिती.

आणि त्या निर्मलेचं भूत असेल तर ते सर्जाला येऊन काय झालंय ते सांगत का नाहिये? उगाच पाणी घालताहेत. त्या मिनूची आत्या, आई आणि मामा 'मी' म्हणतात आणि ही बयो 'म्या' का म्हणते ते कळत नाही. आत्याचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय काय आहे म्हणे? जेनीवहिनी नुसती बसलेली बघून मलाच कंटाळा येतो.

मी नाही बघत, पहीले काही बघितले. त्यातली एकजण ज्यु. सोनाली कुलकर्णीची स्टाईल मारते, दिसते पण थोडी तशीच.

काय ह्या लोकांनी वाड्यात खून केलाय तिचा बहुतेक निर्मलाचा, असं वाटलं तेव्हा. ते आत्याचं विंग्रजी बोलणारं पोरगं, ती आत्या आणि सर्जेरावचे वडील हे काहीतरी गेम करतात. असं वाटलं.

हायला. ती जेनी काय बोलते ते निर्मलेला कळत नाही आणि निर्मला काय बोलते ते जेनीला. त्या जेनीने कागद पुढे करावा आणि म्हणावं बाई काय म्हणायचं आहे ते लिही ह्याच्यावर. बरं, ती जेनी इथे का थांबलेय ते कळत नाही. सांगायचं न त्या सर्जाला की आधी त्या निर्मलेला शोध, मग मी येते परत लग्नाला. ते आरश्यावर रक्ताने काही लिहिलं होतं त्याचा फोटो काढून ठेवायचा की. सगळं आम्हीच सांगायचं होय. जेनी ओरडली की सगळ्यांना तिच्या खोलीत धावत यायचं एव्हढं एकच काम उरलंय. तो हिरो तर असला माठशिरोमणी आहे. अरुंधती परत येणार असं वाटतंय मला. निर्मला आता फुल-ऑन व्हॅम्प मोड मधे गेली आहे. तिला आता त्या सर्जाचा काय उपयोग आहे देव जाणे. म्हणे मीच त्याच्या नावाचं कुंकू लावणार. धन्य आहे! ती रोखून बघताना 'भूलभुलैय्या' मधल्या विद्या बालनची डिट्टो कॉपी मारतेय.

स्वप्ना Lol
तो सर्जा तर इतकं निर्मला निर्मला करतो की जेनीने त्याला आधीच सांगायला हवं होतं की तू बस निर्मलाला शोधत, मी चालले! जेनीला बिचारीला फारच डम्ब दाखवलंय. बरं, सर्जा तिच्याशी मराठीत बोलते ते सग्ळं सग्ळं कळतं तिला. मग निर्मलाचंच तेवढं कळत नाही होय? Wink

तो सर्जा तर इतकं निर्मला निर्मला करतो की जेनीने त्याला आधीच सांगायला हवं होतं की तू बस निर्मलाला शोधत, मी चालले! >>> Lol

आज एक तासाचा महाएपिसोड होता. ती कोण मंत्रविद्या जाणणारी निर्मलाला भेटलेय तिने तिला स्पष्ट सांगितलं की तुला सर्जाला मिळवायचं असेल तर त्याला मारावं लागेल. तो प्रताप्या सर्जा लग्न करून इथून गेला नाही तर त्याला 'ढगात पोचवेन' (क्लाऊड अपलोड???) म्हणाला तेव्हा निर्मलाला राग आला. उलट बरंय की, त्याने सर्जाला मारलं तर हिला तो मिळेल. मला काय बी कळंना ह्या निर्मलेचं Happy आता त्या मांत्रिकबाईने तिला जेनीच्या शरीरात शिरायचा सल्ला दिलाय. जेनीबाई मराठीत बोलायचं कसं जमवणार काय माहित.

आता सर्जाची एक मावशी आलेय त्याच्या लग्नासाठी. ओह, आणि अरुंधती इज बॅक.

बाकी प्रताप्या = मराठी लोकांचा शोअब अख्तर

Pages