४ चिकन लेग्ज
पहिले मॅरीनेशन
१ लिंबाचा रस
१ चमचा लाल मिरची पावडर
मीठ चवीनुसार
दुसरे मॅरीनेशन
१/२ लहान वाटी दही
१ चमचा आले-लसूण पेस्ट
२ चमचा तंदुरी मसाला/चिकन मसाला
पा़कृ -
चिकन लेग्ज धूवून, स्किन असेल तर साफ करून त्यावर सुरीने प्रचीमध्ये दाखवल्याप्रमाणे कट द्या
चिकनला पहिले मॅरीनेशन लिंबूरस+लाल मिरची पावडर+मीठ लावून मॅरीनेट करावे, अर्धातास फ्रिजमध्ये. यामुळे या मॅरीनेशनची चव व्यवस्थित मुरते.
अर्धातासानंतर यात दुसरे मॅरीनेशन दही+तंदुरी मसाला+आले-लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मॅरीनेट करावे आणि रात्रभर/४-५ तास कमीतकमी फ्रिजमध्ये (फ्रिजरमध्ये नाही) ठेवावे.
कन्वेक्शन ओव्हन २०० डिग्रीवर प्री-हीट करावा, त्यात मॅरीनेट केलेले चिकन लेग्ज ठेवून ५मि. भाजावेत.
आता तापमान थोडे कमी ठेवून (१७०-१८० डिग्री) २०-२५ मिनिटे भाजावे. दरम्यान एकदा उलटून सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जातेय याची खात्री करावी.
कांदा+चाट मसाला+लाल मिरची पावडर+मीठ ची सलाड बनवून कबाबसोबत सर्व्ह करावे
अधीक टीपा -
१) लाल मिरची पावडर - मी एवरेस्ट चा तिखालाल वापरला आहे, तिखट + लाल रंगसाठी उत्तम
नसेल तर तुम्ही साधी लाल मिरची पावडर + चिमुट्भर लाल रंग घेवू शकता
२) दुसर्या मॅरीनेशनमध्ये चमचाभर बेसन/ पंढरपुरी डाळीचे पिठ घालतात, यामूळे मॅरीनेशनथोडे थिक होते आणि त्याचा एक थर चिकन लेग्जवर चि़कटतो.मला तसे आवडत नाही त्यांमूळे साहित्यात बेसन/ पंढरपुरी डाळीचे पिठ नाहीए.
३)दही शक्यतो घट्ट, पाणी नसलेले घ्यावे . नसेल तर तलम कापडात बांधून पाणी निथळून घ्यावे
४) कबाबसोबत पुदिन्याची चटणीपण सर्व्ह करु शकता. कबाबच्या मॅरीनेशनमध्ये पुदिन्याची चटणी घातली तर अजुन वेगळी चव येते. तुमच्या आवडीप्रमाणे याच्या मॅरीनेशनमध्ये तुम्ही फेरफार करु शकता
फोटो नसलेली पाककृती चांगली
फोटो नसलेली पाककृती चांगली मानली जात नाही कितीही चांगली असली तरी. फोटो द्या मग्गच पाककृतीवर प्रतिसाद!
फोटो दिले होते दिसत नाहीएत
फोटो दिले होते दिसत नाहीएत .. मला एडिट करता येइल का हा धागा ?
व्हय जी, करता येईल. हे आपलं
व्हय जी, करता येईल.
हे आपलं असंच मदतीसाठी.
http://www.maayboli.com/node/1556
धन्यवाद.. फोटो दिले आहेत
धन्यवाद..
फोटो दिले आहेत
छान दिसताहेत,. यांनी बेसन
छान दिसताहेत,.
यांनी बेसन लावलय थोडं.
http://www.maayboli.com/node/51825
मस्तं!
मस्तं!
मस्तच !
मस्तच !
(No subject)
स्किन काढून करीन. धन्यवाद!
स्किन काढून करीन. धन्यवाद!
खतरा , आणि हो तंगडीच !
खतरा , आणि हो तंगडीच !
वाह! चिकन लेग तंदूरी, तंगडी
वाह! चिकन लेग तंदूरी, तंगडी कबाब हे माझे फार आवडीचे पदार्थ.. तशी अख्खी कोंबडीच आवडती असली तरी .. त्यातले हे एक लाडके.. मी आमच्या ईथल्या होटेलातून वरचेवर तंदूरी मागवतो त्यात माझी स्पेशल ऑर्डर असते, हाल्फ तंदूरीत जे चार तुकडे येतात त्यातील दोन तुकड्यांजागी एक रसरशीत लेग पीस
बाकी पाकृतले फारसे कळत नाही. दिसतंय भारी. खायला बोलवा पटकन
धन्यवाद सर्व
धन्यवाद सर्व प्रतिसादकर्त्यांचे..
मस्त!!! एकदम तोंपासु.
मस्त!!! एकदम तोंपासु.
mala kuni ambadi chya fulachi
mala kuni ambadi chya fulachi chatani chi recipe sangata ka please...
<मायबोलीवर स्वागत, आरोग्यम्
<मायबोलीवर स्वागत, आरोग्यम् धनसंपदा, पाककृती आणि आहारशास्त्र, मुलांचे संगोपन, सोलापूर, गुलमोहर - कथा/कादंबरी, गुलमोहर - ललितलेखन, गुलमोहर - प्रकाशचित्रण, गुलमोहर - विनोदी लेखन, गुलमोहर - चित्रकला, गुलमोहर - इतर कला, संयुक्ता>
एवढे सगळे गृप का निवडलेत?
खूप ग्रुप्स निवडल्यामुळे
खूप ग्रुप्स निवडल्यामुळे मायबोलीच्या इंडेक्स पेजचं सेटींग बिघडतंय. तुमची इच्छा असेल तर ज्यांचा पाककृतीशी संबंध नाही असे ग्रुप्स कमी करणार का संपादन मधे जाऊन ?
काही तरी गडबड आहे ,.. मी गृप
काही तरी गडबड आहे ,.. मी गृप निवड्ले नव्ह्ते. पण करते बदल
पण काय आश्चर्य आहे न इथे बरेच बिनकामाचे , रतिब घातल्यासारखे धागे निघतात त्यावर कोणी काही बोलत नाही उलट प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. असो ..
मी करते बदल
मला हे असा दिसते आहे , यात
मला हे असा दिसते आहे , यात कुठे बदल केल्यावर 'मायबोलीच्या इंडेक्स पेजचं सेटींग बिघडणार नाहीए ते क्रुपया सांगा , मी करते बदल
हे ठीक आहे.
हे ठीक आहे.
लई झक्कास!
लई झक्कास!
पण काय आश्चर्य आहे न इथे बरेच
पण काय आश्चर्य आहे न इथे बरेच बिनकामाचे , रतिब घातल्यासारखे धागे निघतात त्यावर कोणी काही बोलत नाही उलट प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. >>> ओह ! माफ करा , विनंती केल्याबद्दल. जबरदस्ती तर नव्हती केली. इतके लागेल याची कल्पना नव्हती. माझी विनंती मी मागे घेते, आपण पुन्हा पूर्वीसारखे सेटींग्ज ठेवू शकता. पुन्हा एकदा क्षमस्व !
वांग्याचे करेन
वांग्याचे करेन
छान रेसिपी एक विनंती आहे
छान रेसिपी एक विनंती आहे फोटोज ठीक आहे पण फोटोज ऐवजी रेसिपी चा व्हिडियो दिला तर खूप छान होईल
दोन्ही मॅरिनेशनचे
दोन्ही मॅरिनेशनचे इन्ग्रिडिंट्स एकत्र करुन एकदाच जास्त वेळ मॅरिनेट केलं तर?
मनिमाऊ, तंदूरीला ते दोन
मनिमाऊ, तंदूरीला ते दोन मॅरिनेट्स करावेच लागतात. अन तसे नाही केले तर ती चव येत नाही. उगं तंदुरीचं कॅरिकेचर खाल्ल्यासारखं वाटतं.
मस्त दिसताहेत. करनेको मंगता.
मस्त दिसताहेत. करनेको मंगता.
मनिमाऊ, तंदूरीला ते दोन
मनिमाऊ, तंदूरीला ते दोन मॅरिनेट्स करावेच लागतात. अन तसे नाही केले तर ती चव येत नाही. उगं तंदुरीचं कॅरिकेचर खाल्ल्यासारखं वाटतं. >>> बरं बरं. उगीच जरा आळशी शॉर्टकट जमतो का पाहिलं. थँक्स !
ओह ह्याला कबाब पण म्हणतात का?
ओह ह्याला कबाब पण म्हणतात का? मला खिम्याचे केलेच कब्बाब असतात अस वाटत होत.
मस्त..
मस्त..
अदिति,
अदिति,
कबाब = (तंदूर)भट्टीत/निखार्यावर इ. भाजलेले मांसाचे छोटे तुकडे. युज्वली बोनलेस. (रिमेंबर कबाबमें हड्डी ?
अर्थात कबाबमधे बोन नको. छान लागत नाही.)
"तंदुरी" म्हटलं, की कोंबडी/मासा/रान इ. अख्खी/अर्धी/चतकोर इ. मोठ्या साईजेसमधे भाजतात, त्यात दह्याचे मॅरिनेट मस्ट असते.
मॅरिनेट केलेला तुकडा भाजला असेल तर त्याला म्हणायचे बोटी कबाब, अन खिमा+मसाला सळईवर थापून भाजलेले पुंगळीस्टाईल ते शिग कबाब (शिग = लोकंडी सळई)
मॅरिनेशन प्रमाणे बोटी कबाबची नावं बदलतात. जसे मलई कबाब, हराभरा कबाब, कश्मिरी कबाब इ.
Pages