मायबोलीचा २०१५-२०१६ मागोवा
मायबोलीनं या गणेशचतुर्थीला वीस वर्षं पूर्ण केली (तारखेप्रमाणे १६ सप्टेंबरला) आणि एकविसाव्या वर्षात पदार्पण केलं आहे. या वाढदिवसाच्या धामधुमीत वार्षिक अहवाल प्रकाशित करायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मायबोलीकर मोठ्या मनानं माफ करतील, याची खात्री आहे.
गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केलं, याचा हा एक मागोवा.
मायबोलीवरच्या वाचकांची आणि सभासदांची संख्या वाढते आहे. मायबोलीकरांच्या मायबोलीवर असलेल्या वेळेतही वाढ होताना दिसतेय. जगातल्या सगळ्याच देशांतून वाढता प्रतिसाद आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या डेट्रॉईट अधिवेशन समितीनं मायबोलीला वीस वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या फेसबुक पानावर आपल्याला "प्रकाशझोतात" आणलं.
मायबोली.कॉम
गणेशोत्सव - २०१५ -
गणेशोत्सव संयोजक समितीनं २०१५चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजित केला. लहान मुलांसाठी 'देई मातीला आकार' व 'बाप्पा इन टॉप गिअर', 'ज्युनियर चित्रकार' हे उपक्रम, पाककलानिपुण मायबोलीकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त ’अशी ही अदलाबदली’ ही खास स्पर्धा, मोठ्यांसाठी 'रंगरेषांच्या देशा - चित्रकला', ’तीट कवितेला’ ही यावर्षीची वैशिष्ट्यं होती.
मराठी भाषा दिवस - २०१६ -
या उपक्रमाला खूपच छान प्रतिसाद मिळाला. 'शब्दपुष्पांजली-मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक', 'वृत्तबद्ध कविता', 'बोलू कौतुके' हे मोठ्यांसाठी, तसंच छोट्यांसाठी 'आनंदवनभुवन' हे उपक्रम होते.
वर्षाविहार २०१६ -
यंदा वर्षाविहाराचं सोळावं वर्षं होतं. यंदाचा हा मैत्री-सोहळा ३१ जुलै, २०१६ या दिवशी, कामशेत येथील पवना हट्समध्ये संपन्न झाला. पुणे आणि मुंबई येथील मायबोलीकरांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर पल्ली यांनी सुलेखन केलेले सुरेख टीशर्टही आपण यंदा बनवले. त्यालाही मायबोलीकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यातून एकूण २१,००० रु. देणगीसाठी जमा झाले होते. ही रक्कम आधी जाहीर केल्याप्रमाणे 'निसर्ग जागर प्रतिष्ठान' ह्या संस्थेला सुपूर्त करण्यात आली.
मदत समिती
सतत वर्षभर शांतपणे मदत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्त्वाचा वाटा आहे.
सोशल नेटवर्क आणि मायबोली
गेली काही वर्षं आपण मायबोलीबाहेरच्या सोशल नेटवर्कवरही कार्यरत आहोत. मायबोलीबाहेरच्या वाचकांना या माध्यमातून मायबोलीवरच्या लेखनाची, प्रकाशचित्रांची ओळख आपण करून देत असतोच. फेसबूक लाईव्ह या माध्यमातून आपण सौ. रचना बोडस आणि पं. रघुनंदन पणशीकर यांच्या मैफिलींचं लाइव्ह प्रक्षेपण केलं. फेसबूकवरच्या मायबोलीच्या चाहत्यांची संख्या या वर्षी ११६,०००+ झाली आहे. गूगल प्लस या नेटवर्कवर मायबोलीच्या चाहत्यांची संख्या एका वर्षाच्या आत ३,४०,०००वर गेली आहे.
युट्यूब या माध्यमात आपण या वर्षी थोडं अधिक कार्यरत झालो आहोत. ’फिर जिंदगी’ हा अवयवदान या विषयावरचा संपूर्ण चित्रपट आपण डिसेंबर २०१५मध्ये प्रकाशित केला आणि आतापर्यंत ४४,०००हून अधिक प्रेक्षकांनी तो पाहिला आहे. एका चांगल्या सामाजिक कार्यात नेहमीपेक्षा वेगळ्या तर्हेनं मायबोलीचा हातभार लागला, ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
बातम्या.कॉम
बातम्या.कॉमच्या संगणक प्रणालीचे उर्ध्वश्रेणीकरण पूर्ण करण्यात आले. आता मोबाईलवरही बातम्या.कॉम व्यवस्थित पाहता येईल.
खरेदी विभाग
काही अपरिहार्य तांत्रिक अडचणींमुळे खरेदी विभाग बंद ठेवावा लागला आहे. तो पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जाहिरात विभाग
जाहिरात विभागात फार मोठे बदल झाले नाहीत. त्याला मायबोलीकरांचा उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. विशेषतः विवाहविषयक विभागास या वर्षात भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. जाहिरात विभागाचे वेगळे फेसबूकपानही सुरू केले असून त्याला आतापर्यंत ५१००+ चाहते मिळाले आहेत.
कानोकानी.कॉम
या विभागात यावर्षी फारसे बदल झाले नाहीत.
इतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे
याशिवाय हार्डवेअर / सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचं संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गीकरण, मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणं, एखाद्याला डच्चू देणं ही कामं चालूच असतात.
मायबोलीचं कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणं, प्राप्तिकर आणि विक्रीकर यांचा परतावा सादर करणं यांसारखी महत्त्वाची कामं (अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.
विविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकर -
मदत समिती - नंद्या
गणेशोत्सव २०१५ -
संयोजक - आशूडी, आत्मधून, स्वरुप, प्राजक्ता_शिरीन, अमितव, रायगड, चनस
मराठी भाषा दिवस २०१६ - हर्पेन, अमितव, इन्ना, जयु, नियती, मॅगी, लाडू, साधना
वर्षाविहार २०१६ - मयूरेश , anandmaitri, MallinathK, अरुंधती कुलकर्णी, आयडू, दक्षिणा, घारुआण्णा, नील., मिनू, मुग्धानंद, योकु, राखी.., विवेक देसाई, विनय भिडे, शुभांगी., हिम्सकूल
मायबोली टीशर्ट - मयूरेश, विनय भिडे, anandmaitri, नील., पल्ली, हिम्सकूल
एखादे नाव नजरचुकीनं राहून गेले असेल तर क्षमस्व.
यावर्षी दिवाळी अंक असणार का?
यावर्षी दिवाळी अंक असणार का?
छान!
छान!
याशिवाय हार्डवेअर /
याशिवाय हार्डवेअर / सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचं संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गीकरण, मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणं, एखाद्याला डच्चू देणं ही कामं चालूच असतात.>>
एखाद्याला डच्चू दिला की admin- team म्हणत असेल
का?
stupidectomy - पुन्हा एकदा!
छान आढावा आणि मायबोली
छान आढावा आणि मायबोली उत्तरोत्तर वाढत जावो ह्याकरता शुभेच्छा.
बरे झाले लिहिलेत ते. बर्याच
बरे झाले लिहिलेत ते.
बर्याच लोकांना माहित नसते की मायबोली चालवणे हे किती कष्टाचे, वेळखाऊ काम आहे नि त्यात किती माणसे सहभागी असतात.
त्या सर्वांचे उत्कृष्ट कामाबद्दल अभिनंदन.
उत्तम कामगिरी ! एकविसाव्या
उत्तम कामगिरी ! एकविसाव्या वर्षी हा आलेख असाच उंचावत राहो !
खरेदी विभाग पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. >>> प्लीज, लवकर सुरु करा.
अभिनंदन ,ज्या सर्वांनी विविध
अभिनंदन ,ज्या सर्वांनी विविध उपक्रमात कार्यकर्ता म्हणुन भाग घेतला त्यांचे आभार.
धन्यवाद मागोवा दिल्याबद्दल
धन्यवाद मागोवा दिल्याबद्दल !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणं, एखाद्याला डच्चू देणं ही कामं चालूच असतात.>>> Hit it भावड्या Hit it.
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! >> + १०००.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!>>>> +१००००
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!>>>> +१००
मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणं, एखाद्याला डच्चू देणं ही कामं चालूच असतात.>>>>> खुप महत्वाचे काम आहे हे.
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!