मराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ...

Submitted by santosh.shinde9 on 17 September, 2009 - 15:22

सर्वांनी लक्ष द्यावे...

मराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश आता सीडी आवृत्तीत उपलब्ध झाला आहे. तो संगणक प्रकाशनने उपलब्ध केला आहे. त्याची किंमत फार कमी म्हणजे फक्त ७५/- रू. आहे व त्यामध्ये ६०००० हून अधिक मराठी शब्दांचे अर्थ हे इंग्रजी भाषेत उपलब्ध केलेले आहेत. तो शब्दकोश युनिकोडमध्ये असल्याने त्यामध्ये मराठी शब्द शोधण्याची सोयही त्यात केलेली आहे. तसेच वाचण्यासाठी टाईप लहान-मोठा करण्याची सोयही त्यात दिलेली आहे.

अशी संधी चालून आल्यामुळे मला ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावीशी वाटते. आणि ती उपयुक्त अशीच आहे. जर तुम्हाला तो शब्दकोश हवा असेल तर मी त्यासाठी संगणक प्रकाशनचा नंबर देत आहे त्यांचा नंबर आहे ०२२-२७६९५६०३/ ९९८७६४२७९१/९९.

संगणक प्रकाशनने मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश विक्रीसाठी www.molesworth.esanganak.com ह्या संकेतस्थळावर ठेवला आहे. तसेच त्याची इत्थंभूत माहितीही त्यांनी दिलेली आहे. संगणक प्रकाशनने दीड वर्षात हा शब्दकोश उपलब्ध केला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वागतार्ह घटना!
मी ते संस्थळ पाहिलं; पण ही सीडी महाराष्ट्रभरात कुठेही किंवा परदेशांत पोस्टाने पाठवली जाईल किंवा कसे हे कळले नाही. संस्थळावरच्या 'ऑर्डर फॉर्म' पानावर 'आय.सी.आय.सी.आय. बँक' व 'फंड ट्रान्सफर' असेही पैसे भरण्याचे पर्याय आहेत, त्या अर्थी जगभरातून ऑनलाइन बँकिंग स्वीकारलं जात असणार; पण सीडीच्या पोचेबद्दल स्पष्ट लिहिलेलं नाही.

ये हुई ना बात! हेच मलाही हव होत! Happy
(इन फ्याक्ट मागे अस काही इथेही तयार करता येईल का याची चाचपणी करत होतो)
इन्ग्रजी टू मराठी अनेक हार्डकॉपीचे पर्याय आहेत
पण मराठी टू इन्ग्रजी असा हार्डकॉपीत देखिल कुठे मिळाला नाही!
लिन्क बद्दल धन्यवाद