मायबोलीवर धागे ब्लॉक करायची सोय का नाही?

Submitted by अतुल. on 4 October, 2016 - 00:08

मायबोलीवर च्या सर्व धाग्यांमध्ये सर्वांनाच रस असेल असे नाही. काही जणांचा अतिशय आवडीचा धागा इतर काहीजणांच्या दृष्टीने पूर्णपणे निरस असू शकतो. तरीही धागा वर आल्यास तो सर्वांच्याच नजरेस पडतो. माझ्या मते हे चुकीचे आहे. एखाद्या सभासदाला काही धागे कायमचे नजरेआड (ब्लॉक) करायचे आहेत. जेणेकरून त्यात रस असणाऱ्या सभासदांनी ते जरी वर आणले तरी त्याला मात्र ते दिसणार नाहीत. ज्यांनी ते धागे ब्लॉक केलेले नाहीत त्याच सभासदांना ते दिसतील.

पण अशी सोय मायबोलीवर का नाही? कृपया विचार करावा. अनेक मायबोलीकरांना याचा उपयोग होईल असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो खरच अशी सोय हवी होती. मी आधी 'गझल' विभाग ब्लॉक केला असता.. Angry डोकं ख़राब होतं तिथला रतीब बघुन.

तुम्ही रस्त्याने जात असताना तुम्हाला वाटेत कित्येक गोष्टी दिसतात. तिथे थांबणे न थांबणे हा तुमचा निर्णय असतो आणि तो प्रत्येक वेळी तिथे थांबून, पाहून तुम्ही घेत नाहीत तर आधीच्या अनुभवावर आधारून घेत असता.

हीच strategy माबोवर वापरा.

प्रत्येक आयडी मध्ये त्याची राजकीय, सामाजिक, उदात्त, वैचारिक, शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी, वैवाहिक, एकटी, दुकटी, मोराल, immoral, काळी, पांढरी, करडी वगैरे मते साठवून, शिवाय ती प्रत्येक धाग्यातही साठवून ह्या दोन्ही गोष्टी जुळतील असेच धागे दृश्यमान करायची सोय हवी हि मागणी याआधी बर्याच वेळा केली गेलीय. त्यामुळे माबो प्रशासन असल्या सॉफ्टवेअरवर काम करत असणार हे नक्कीच. लवकरच येईल हि सोय.

hitguj.jpg

मायबोलीवर 'नवीन लेखन' या दुव्यावर गेलात तर सर्व सार्वजनीक धागे दिसतात. वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे जर ग्रूपमध्ये नवीन दुव्यावर गेलात तर फक्त तुम्ही ज्या ग्रूपचे सदस्यत्व घेतले आहे त्यातील धागे दिसतील.

पण अ‍ॅडमिन, लोक ग्रूपात धागे काढून ते सार्वजनिकही दिसतील अशी सोय करतात.
म्हणजे मग या ग्रूपांचा लिखाणाचे वर्गीकरण यापेक्षा जास्त उपयोग होत नाही.
नको असलेले धागे परत परत वर येत जातात.

धागा अनफॉलो करायची सोय असायला हवी.

@साती आणि इतर
ग्रूपात धागा सार्वजनिक आहे किंवा नाही याचा या सुविधेवर काहीच परिणाम होत नाही आणि तुम्हाला नको असलेले ग्रूप तुम्हाला पहायची गरज नाही.

मायबोलीवर नवीनः
मायबोलीवरचे सगळे नवीन सार्वजनिक लेखन आणि जे लेखन तुम्हाला पाहण्याची परवानगी आहे ते दिसते. तुम्ही त्या ग्रूपचे सभासद असाल किंवा नसाल.

ग्रूपमधे नवीनः
तुम्ही फक्त ज्या ग्रूपचे सभासद आहात त्या ग्रूपमधे असलेले नवीन लेखन दिसते. इतर ग्रूपमधले लेखन जरी सार्वजनिक असले तरी दिसत नाही.

माझ्यासाठी नवीनः
मायबोलीवर सगळीकडे किंवा तुमच्या ग्रूपमधले जे लेखन तुम्ही अजून एकदाही पाहिले नाही (आणि तुम्हाला पहाण्याची परवानगी आहे) तेच दिसते. एकदा त्या पानाला भेट दिल्यावर पुन्हा जो पर्यंत त्यात बदल होत नाही (किंवा नवीन प्रतिसाद येत नाही) तो पर्यंत ते पान या यादीत दिसत नाही.

@admin: धन्यवाद! पण ग्रुप मध्ये सुद्धा नको असलेले धागे खूप असतात.

@webmaster: धन्यवाद! पण यातील कोणत्याही सुविधेमुळे "नको असलेला धागा वर आला कि दिसणे" हे टाळता येत नाही

@ ऍडमीन, प्रत्येक धाग्याच्या शीर्षकाअगोदर एक चेक बॉक्स दिसायला हवा. त्यावर टिक (√) केली असता तो धागा आपणांकरिता ब्लॉक व्हावयास हवा.
तसेच, आपणांकरिता ब्लॉक केलेल्या धाग्यांची एक स्वतंत्र यादी दिसायला हवी. (शक्यतो माझे सदस्यत्व पानावर) जेणेकरून अन् टिक करून आपणांस तो धागा पुनः दिसायला हवा.
थोडक्यात, आपणांकरिता धागा ब्लॉक किंवा अन् ब्लॉक करता यायला हवा.
कृपया, योग्य ती सोय करावी.

माझ्यासाठी नवीनः
मायबोलीवर सगळीकडे किंवा तुमच्या ग्रूपमधले जे लेखन तुम्ही अजून एकदाही पाहिले नाही (आणि तुम्हाला पहाण्याची परवानगी आहे) तेच दिसते. >>> हायला तरीच म्ह्टलं मला गझला कशा काय दिसेनात Proud

माझ्यासाठी नविन आणि ग्रूपमध्ये नविन टेबवर क्लिक केल्यावर चक्क कोरं पान येतंय मला.
मी काय अख्खी माबो वाचलीय की कॉय?

मी वर हसलो आहे ते माणिकमोति ह्यांना गझलेचा उबग आलेला पाहून हसलो आहे. खरे तर आजकाल मायबोलीवर विशेष गझला येतही नाहीत. पण त्यांना आलेला सात्विक संताप पाहून मनापासून हसू आले.

बाकी ह्या धाग्याचे आणि प्रतिकियांचे आश्चर्यच वाटले.

जे आपल्याला पाहायचे नाही ते पाहायचे नाही. त्यात इतके काय अगदी? जणू काही दोन्ही हातांनी खूप पसारा बाजूला सारल्यावरच आपल्याला हवा तो धागा सापडतो असे आविर्भाव आहेत.

जे आपल्याला पाहायचे नाही ते पाहायचे नाही. त्यात इतके काय अगदी? जणू काही दोन्ही हातांनी खूप पसारा बाजूला सारल्यावरच आपल्याला हवा तो धागा सापडतो असे आविर्भाव आहेत.

<<

सहमत,
धागा लेखक किंव्हा एकादा धागा आवडत नसेल तर उघडून पाहूच नका न. कुणी जबरदस्ती केलेय धागा वाचायची.

@वाचू नका ना धागे असे सुचविणारे:
केली अशी अनफॉलो करण्याची सोय, तर काय फरक पडतो?
अशी सोय नसताना कसे मॅनेज करावे हे तर सर्वांना माहितच आहे.

ठराविक धागे अनफॉलो करण्याची सोय असल्यास चांगले होईल.

उदा. आमचे गाण्यांचे धागे जे सतत वर येतात. लोकांना नसेल इंटरेस्ट तर ते अनफॉलो करु शकतील, त्यांना त्यांच्या इंटरेस्टचे धागे वर दिसतील.

So Indirectly अशी सोय हविये की मला न आवडणार्‍या ग्रुपचं, लेखकाचं नाव सुद्धा मला दिसायला नकोय.. Wink Biggrin

Admin please provide this facility for Rs. 500/- per month. Then we will see how many use that facility.

Admin please provide this facility for Rs. 500/- per month. Then we will see how many use that facility. >>>>> Lol

मलातरी असे वाटते की आपल्याला काय वाचायचेय काय नाही हे जर आपण ठरविले तर अनावश्यक धागे/ लिखाण/ लेखक/ प्रतिसाद आपण ईग्नोर करु शकतो ना मग काय फरक पड्तो सगळी लिस्ट जरी दिसली तरी.....

Admin please provide this facility for Rs. 500/- per month. Then we will see how many use that facility.

<<

याच्याशी अत्यंत सहमत आहे.

अनुमोदन.

बकवास गप्पा, फालतू टी.व्ही. सिरीयल्स(जाहिरात व्हावी म्हणून?), अमुक गल्लीतल्या मेम्बरांचे गटग, दुध वाल्यांचे गटग, सूप वाल्यांचे प्रकार, पकवणाऱ्या कृत्या, काय बे एरिया, गज्जाली, फटाली, कुटाली, भुते आली... वगैरे वगैरे मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. तरीही हे सतत डोळ्यासमोर ठेवण्याची जबरदस्ती का? ते Annoying आहे. या सगळ्यात चांगल्या चर्चा मात्र गायब होत आहेत.

"कशाला हवे तुम्हाला हे? ते सोडून बाकीचे वाचा" सांगणारे बहुधा कुठेतरी बुद्रुक पालिकेत कामाला असावेत. मानसिकता तीच आहे. तुम्हाला साजूक तूपभात करून दिला आणि त्यात खंडीभर खडे घातले आणि सांगितले "त्यात काय? खडे सोडून बाकीचे खा" तर कसे वाटेल?

"त्यासाठी पैसे पडतील" म्हणणारे तर त्याच्या पुढची पायरी. यांच्याकडून तर प्रत्येक प्रतिक्रियेसाठी १०० रुपये पैसे मोजायला हरकत नाही.

मायबोली social networking आहे. फेसबुक सारखे. पण फेसबुक कित्येक पटीने पुढे आहे कारण त्यात या सगळ्या गोष्टी आहेत. पालिका कामगारांचे ऐकले असते तर कधीच झुकरबर्गचा भिकारबर्ग झाला असता.

धन्यवाद सर्वांचे. कृपया भांडू नका. Happy

हि सोय झाली तर माबोवर सर्वांनाच त्याचा उपयोग होईल इतकेच माझे म्हणणे आहे. नाही झाली तरी हरकत नाही. जे आहे ते तसे सुरु राहीलच कि Happy पुन्हा एकदा धन्यवाद.

डायव्हरसिटी / वैविध्य हे कुठल्याही प्रगतीकरता आवश्यक असते. मला तरी सध्याचा फॉर्मॅट आवडतो. कारण एखादा विषय माझ्या आवडीचा नसला तरी त्या विषयावरचा एखादा धागा माझ्या विचारांना चालना देऊ शकतो. या जगात नेहमी आपल्या विरोधी मतांचा सामना करावा लागतो. आणि त्या परस्पर संवादातूनच पुढील सर्जनाची सुरूवात होत असते. त्यामुळे कुठलीही ब्लॉकींगची सुविधा देवू नये असे मला वाटते.

>>ज्यांनी ते धागे ब्लॉक केलेले नाहीत त्याच सभासदांना ते दिसतील<<

एस्क्युएल स्क्रिप्ट "माझ्यासाठि नविन", "ग्रुपमध्ये नविन" इ. फिल्टर्स आॅल्रेडि ॲप्लाय करत आहे; युझरने ब्लाॅक्ड केलेल्या धाग्यांची लिस्ट (प्रोफायलनुसार) या फिल्टर्स मध्ये जोडुन डिझायर्ड रिझल्ट मिळवु शकतो.

टेक्निकली डुएबल आहे, फिजीबल आहे कि नाहि तो प्रशासनाचा निर्णय...

>>टेक्निकली डुएबल आहे, फिजीबल आहे कि नाहि तो प्रशासनाचा निर्णय...
अर्थात टेक्निकली डुएबल तर नक्कीच आहे. शेवटी, डाटाबेस क्वेरी फिल्टर्सचाच सगळा खेळ असला तरी फ्रंट एंड चेंजेस आणि स्किमा चेंजेस (new table/column for blocked threads vs users, for example) पण आहेत Happy त्यामुळे त्याचा impact तसा बराच आहे. शिवाय सध्याचे डिजाईन कसे आहे त्यावर सुद्धा हे इम्प्लीमेंट करणे किती क्लिष्ट/सोपे हे अवलंबून. त्यावर effort and cost estimation अवलंबून कि जे सगळ्यात महत्वाचे Lol Lol

पण या व अशा गोष्टी असतील तर पोर्टल मध्ये value additions खूपच प्रभावी होतात हे निर्विवाद.

५००/- महिना अशी सुविधा मिळणार असेल तर मी तयार आहे.
मला चालेल!
>>>>>>

मला १००० सुद्धा चालतील. एमेनसीत युरो मध्ये कमावतो मी. तर फार नाही होणार.
चार दिवस मी धागा काढला नाही तर माझा शेवटचा धागा मलाच आठ पाने मागे जाऊन शोधावा लागतो.
नाक्यावर पान खायला रिक्षा घेऊन जाणारा मी मला जेवढे श्रम वाचवायची फॅसिलिटी द्याल तितकी हवीच आहे.
तो वाचणारा महिना दोनेक तासाचा वेळ जर मी ओवरटाईम केला तर जे शुल्क आकाराल त्या पेक्षा जास्त सुटतील Happy

आणि हो, मी ही पोस्ट उपरोधाने लिहिलीय की गंमतीने की सिरीअसली असा फार विचार करू नका.
नाही आवडली तर टाळून पुढे जा.
पण उद्या न आवडणार्‍या पोस्ट कश्या नजरेआड करायच्या ही फॅसिलिटी मागू नका Happy

चार दिवस मी धागा काढला नाही तर माझा शेवटचा धागा मलाच आठ पाने मागे जाऊन शोधावा लागतो. >> मित्रा, स्वतःच्या लेखनात जाऊन शोध की.

आणि हो, मी ही पोस्ट उपरोधाने लिहिलीय की गंमतीने की सिरीअसली असा फार विचार करू नकोस. Proud

भास्कराचार्य, मी विचार करेन अशी अपेक्षाही माझ्याकडून करू नका.
आयुष्यात प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतात जेव्हा आपण विचार करायला लागतो.
(बालपणाच्या सुखाचे रहस्यही यातच लपले आहे)

ईथेही आता बरेच लोकांचे तेच होऊ शकते.
माबोवर धागा ब्लॉक करायची सोय गरजेचे आहे असे काही लोकांच्या ध्यानीही नसेल. पण कोणीतरी धागा काढला की विचारांची शृंखला सुरू होते. हो यार, असे झाले तर बरे होईल. तशी गरज मलाही आहे. मी तर त्यासाठी अमुकतमुक पैसेही मोजायला तयार आहे. अरे यार एवढे दिवस मला काहीतरी हवे हवे वाटत होते ते हेच तर आहे... मग दुसर्‍या दिवशीपासून माबोवर आल्याआल्या आपण आपल्या आवडीचे धागे न वाचता नावडीचे धागे मोजायला बघायला सुरुवात करतो आणि मनोमन विचार करू लागतो की आता आपल्याकडे ब्लॉका फॅसिलीटी असती तर मी हा धागा ब्लॉक केला असता, मी तो धागा ब्लॉक केला असता. पण ती फॅसिलिटी तर आपल्याकडे नसते. मग तो धागा उगाचच आणखी खुपू लागतो. आणखी त्रास देऊ लागतो.... जराशी वाहावत् गेली असेल पोस्ट तर क्षमस्व.. फार विचार करून तर लिहिली नाहीये Happy

मी कुठेही गेलो (माझ्यासाठी नवीन, ग्रुपसाठी किव्वा मायबोलीवर नवीन) तर मला हवे असलेलेच धागे दिसतात.... नको असलेले धागे सहसा उघडले जात नाहीत. रस्त्याने चालणे कला आहे, काय नको ते टाळत - टाळत तुम्ही तुमच्या इप्सित स्थानी पोहोचतात. केवळ १-२ अपवाद असतील. एकाने १००-१३० धागे काही तासात काढले होते, त्यावेळी हवे असलेले सर्वच धागे पान ३, पान ४ वर गेलेले असायचे.

जेव्हा निवान्त वेळ असेल त्यावेळेला नवा प्रकार/ धागे वाचण्याचे धाडस करतो.

<<नाक्यावर पान खायला रिक्षा घेऊन जाणारा मी मला जेवढे श्रम वाचवायची फॅसिलिटी द्याल तितकी हवीच आहे.>>
----- थोडे पैसे जास्त खर्च केले तर पानवाला घरपोच पान पोहोचवेल, तेव्हढाच एखाद्या गरजवन्ताला ३००० रु/ महिना रोजगार मिळेल. एमेनसीत युरो मध्ये कमावणार्‍याला ३००० रु जास्त नक्कीच नसतील.

पानासाठी जाण्या-येण्याच्या वाचलेल्या वेळात तु अजुन एक नवा धागा काढशिल... आणि माझ्यासारख्या, तुझ्या चहात्या रसिक वर्गाला, एक जादा मेजवानी मिळेल. productivity वाढवण्यासाठी (अनेक पैकी) एक सजेशन. Happy

@ इनामदार, तुम्हाला साजूक तूपभात करून दिला आणि त्यात खंडीभर खडे घातले आणि सांगितले "त्यात काय? खडे सोडून बाकीचे खा" तर कसे वाटेल?>>>> उदाहरण आवडले, आणि पटलेही! आपणांस अनुमोदन.

दुसरा मुद्दा- नवीन धागा येतो. आपण उत्सुकतेने त्यावर येणारे प्रतिसाद वाचत जातो. पण काही कालांतराने, काही कारणाने आपला त्या धाग्यात असणारा रस निघून जातो. तरीही वेळोवेळी येणाऱ्या नवीन प्रतिसादांमुळे तोच तोच धागा सारखा सारखा आपल्या नजरेसमोर येतच राहतो. अशाने हतोत्साही व्हायला होते हो!

>>आयुष्यात प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतात जेव्हा आपण विचार करायला लागतो.
>> (बालपणाच्या सुखाचे रहस्यही यातच लपले आहे)

आवडले Happy

>> धाग्यात असणारा रस निघून जातो. तरीही वेळोवेळी येणाऱ्या नवीन प्रतिसादांमुळे तोच तोच धागा सारखा सारखा आपल्या नजरेसमोर येतच राहतो

अगदी खरे आहे. हेच तर टाळायचेय.

>> आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ऋन्मेषचे धागे इग्नोर करता आले पाहिजे Happy

धागे इग्नोर करायची सोय झाली तर धागे सुरु करताना सुद्धा आपसूकच काळजी घेतली जाईल ना ? Wink

ज्यांना अशा सुविधेची गरज नाही, त्यांनी तसे मत मांडले आहे.
पण काहींनी असे मत मांडताना अशी सुविधा (इतरांनापण) देऊच नये असे सुचविले आहे. अशी सुविधा सुरु केली तर ज्यांन त्याची गरज नाही त्यांना काय फरक पडेल? कृपया प्रकाश टाकावा.

कृपया विषयांतर नको

>> म्हणजे वेबमास्तर हा धागा वाचत आहेत तर. धन्यवाद वेबमास्तर.
बहुमताचा कौल आणि अवेलेबल रीसोर्सेस वरून तुम्ही काय ते ठरवालच.

अशी सुविधा सुरु केली तर ज्यांना त्याची गरज नाही त्यांना काय फरक पडेल? कृपया प्रकाश टाकावा.>>> +१

@सचीन काळे, प्रसाद कृपया +१ साठी परत नवीन प्रतिक्रिया देणे टाळा. या साठीच या पानावर आधीच्या प्रत्येक प्रतिसादाला + करण्याची सुविधा आहे.
काही सुविधा असताना, त्या न वापरता, दुसर्‍या नवीन सुविधा हव्या आहेत हे थोडे विचित्र नाही का? मान्य आहे या दोन्ही सुविधांचा संबंध नाही, पण तुम्हीही असलेल्या सुविधांकडे थोडे तरी लक्ष द्या की.

अशी सुविधा सुरु केली तर ज्यांन त्याची गरज नाही त्यांना काय फरक पडेल? कृपया प्रकाश टाकावा.
>>>

सुविधा देणे जर सहज सोपे असते तर पहिल्या पोस्टलाच वेबमास्टरांनी "चला दिली" म्हणत चर्चा तिथेच थांबवली असती. याचा अर्थ काहीतरी खर्चा होतच असेल. (खर्चा म्हणजे थेट पैश्याचा हिशोबच असे नाही)

तसेच खर्चा करायची एक मर्यादा असणारच. जसे त्या बाटलीतल्या लक्ष्या गंगारामकडेही मर्यादीत वाळू होती तसे.

मग का नाही तो खर्चा अश्या गोष्टी, अश्या सुविधांवर व्हावा जे आपल्या फायद्याचे आहे वा जी आपली प्रायोरीटी आहे, असे प्रत्येकालाच वाटणे शक्य आहे.

एक उदाहरण द्यायचे झाल्यास,
कंपनीची फुकट बससेवा असते. कंपनीला काहीतरी भुर्दंड सोसावा लागतोच. तो अर्थातच कंपनी स्वत:च्या खिशातून नाही तर कर्मचार्‍यांच्याच पगारातून काढते. वेगळ्या भाषेत त्यानुसारच पगारावर किती खर्चा करायचा हे ठरवले जाते. पण आता गोम अशी की या सेवेचा फायदा सर्वच कर्मचारी नाही उचलत. अश्यावेळी त्या फायदा न उचलणार्‍या किंवा त्या सेवेची गरजच नसणार्‍या कर्मचार्‍यांना वाटले की हि सेवा बंद करत कम्पनीने त्याबदल्यात संध्याकाळचा नाश्ता सुरू करावा तर त्यांचे चुकले काय?

हे मी मानव यांच्या पोस्टला उत्तर म्हणून लिहिलेय. माझा या सुविधेला विरोध किंवा समर्थन दोन्ही नाही. पण सांगायची मॉरल ऑफ द स्टोरी - जगात फुकट काही मिळत नाही. तर अमक्याला अमुकतमुक फुकट मिळतेय म्हणून तमक्याच्या पोटात दुखायचे कारण काय हा युक्तीवाद ईथे लागू होत नाही Happy

>> त्या सेवेची गरजच नसणार्‍या कर्मचार्‍यांना वाटले की हि सेवा बंद करत कम्पनीने त्याबदल्यात संध्याकाळचा नाश्ता सुरू करावा तर त्यांचे चुकले काय?

ऑब्जेक्शन युवर ऑनर, आरोपींचे वकील चुकीचे उदाहरण देऊन कोर्टाची दिशाभूल करत आहेत. सदर आरोपींनी अशी कोणतीही बदली सुविधा मागितलेली नाही याकडे मी कोर्टाचे लक्ष वेधू इच्छितो. ते कोणतेही कारण न देता फक्त हि सुविधा नको म्हणत आहेत.

@ वेबमास्टर, धन्यवाद. आपण + संबंधी केलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन केले जाईल, ह्याची मी आपणांस हमी देतो. तसदीबद्दल क्षमस्व.

सुविधा देणे जर सहज सोपे असते तर ...... अर्थ काहीतरी खर्चा होतच असेल. (खर्चा म्हणजे थेट .....)

तसेच खर्चा करायची एक ........

मग का नाही तो खर्चा अश्या गोष्टी, अश्या सुविधांवर व्हावा जे आपल्या फायद्याचे आहे वा जी आपली प्रायोरीटी आहे, असे प्रत्येकालाच वाटणे शक्य आहे.

एक उदाहरण .....
कंपनीची फुकट ..... पगारावर किती खर्चा करायचा हे ...... चुकले काय?

खर्चा?? Uhoh

माझ्या अकाऊंटमधे 'माझ्यासाठी नवीन' आणि 'ग्रुपमध्ये नवीन' यावर क्लिक केलं की सगळ्यात वर 'हितगुज दिवाळी अंक २०१४'ची लिंक अजूनही दिसते आहे.

माझ्या मनात खर्च व खर्चा यात फरक असा, की "खर्च" हा स्पेसिफिकली पैशाचा असतो. "खर्चा" मधून बौद्धीक, वेळेचा, किंवा तत्सम रिसोर्सेसचा एक्स्पेंडिचर, असा अर्थ मला लागला.