चहासोबत खायला नमकीन बिस्किट्सच्या रेसिपीज हव्या आहेत

Submitted by स्वप्ना_राज on 2 October, 2016 - 03:17

चहासोबत खारी/टोस्ट खाऊन वैताग आलाय. बाजारातसुध्दा क्रॅकजॅक/५०-५०/मस्का चस्का, मारी, मोनॅको, टॉप अशी काही बिस्किट्स सोडल्यास बाकी सर्व गोड बिस्किटस मिळतात. घरी इलेक्ट्रिक अव्हन आहे. त्यात काही नमकीन बिस्किटस करता येतात का ते पहायचं आहे. कोणाकडे काही रेसिपीज असतील तर पोस्ट कराल का प्लीज?

धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना,
दोन कप मैदा, अर्धा कप घरच लोणी, पाव ते अर्धी वाटी दूध आणि पाव चमचा मीठ.
ही बेसिक सामुग्री.
मिक्स करून अर्धा पाऊण तास ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायची.
आणि मग त्या गोळ्याच्या जाडसर पोळ्या लाटून त्या छोट्या वाटीने कट करून १८० डिग्री ला प्री हिट केलेल्या ओवनात १८० डिग्रीला १०-१२ मिनीटे बेक करायच्या.
मधे क्रिस्पी वाटल्या नाहीत तरी गार झाल्यावर क्रिस्पी होतात.

ही बेसिक कृती.

आता ज्या चवीच्या पाहिजेत त्या- म्हणजे ओवा, जिरा, कसुरी मेथी, चिली फ्लेक्स, तीळ यातलं तुम्हाला पाहिजे ते पिठात सुरूवातीसच हव्या त्या प्रमाणात मिक्स करा.
त्या त्या कुकीज होतील.

मी बेपा, बेसो घालत नाही कुकीज करताना.

image_13.jpeg
या नुसत्या लोण्या-मीठाच्या कुकीज!

सर्वांना धन्यवाद! Happy करून पाहेन आणि इथे पोस्ट करेन.

>>चहामध्ये दूध टाकता का? तसे असेल तर त्यासोबत खारट पदार्थ खाणे अपायकारक ठरु शकते.

दूध न टाकता चहा कसा घेणार? Uhoh माझ्या आजीआजोबांच्या पिढीपासून चहासोबत खारी-टोस्टस खाणं सुरू आहे. २ आजोबा आणखी एक आजी चांगले ८० च्या पुढे जाऊन गेले. आणि दुसरी आजी ९० च्या घरात आहे. मैदा खाणं आरोग्याला चांगलं नाही हे माहित आहे. पण अपायकारक म्हणजे नक्की काय होऊ शकतं?

स्वप्ना_राज, वरच्या सगळ्या रेसिपी चा छान आहेत, अजून टेस्टी बनवण्यासाठी माझ्या काही टिप्स -
पूर्ण मैदा घेण्याऐवजी जर मैदा, कणिक आणि बारीक रवा यांचं मिश्रण घेतलं तर छान टेक्स्चर येतं. पीठ बनवून झालं की १५-२५ मिनिटं फ्रीज्मध्ये थंड करून घेतलं की ते चांगले फुलतात.

ओवन केकसाठी करतो तेवढा गरम करू नकोस. त्यापेक्षा कमी तापमानावर बेक कर, म्हणजे बाहेरून जळणार नाहीत आणि आत्पर्यंत बेक होतील. All the best Happy