मी टिळकांशी बोलते
निघाले आज लेकासवे
सार्वजनिक गणपती त्या दाखवावे
होता भव्य मंडप दिमाखदार
रांगही होती अपरंपार
आलो एक फेरी मारुन
ओळखीचे कुणी दिसते का म्हणून
शॉर्टकट मारायची सवय बापडी
नसांनसांत आहेच भिनली
एकदाचे शेवटी आत पोहोचलो
देखावा पाहून स्तिमित झालो
टिळकांचा तिथेच पुतळा भारी
खुणावू लागला मला दुरुनी
गेले तडक लाईन मोडून
'लोकमान्यांची' हाक ऐकून
जवळ जाताच भांबावले नेत्र
टिळकांचा आवेश दिसत नव्हता मात्र
स्वराज्याचा हक्क सांगणारी तर्जनी
भासली म्लान, खाली होती झुकली
नाराज का दिसे टिळकांची स्वारी?
रुचत नाही का उत्सवाची परी?
आणले गणेशाला घरातून मंडपात
उद्देशाची त्या पुरी झाली वाताहात
वाटले विचारावे एकदा स्पष्ट नि थेट
नाराजीचे कारण, होताच नजरभेट
"पसंत नाही का आपणांस उत्सवाचे स्वरुप?
सर्वच स्तरांवर बदललेले ते रंगरुप?"
"नाही गं पोरी, असे मुळीच नाही
काळानुरुप बदल मी ही स्वीकारी
अंमळ 'टेनिस एल्बो मुळे' तर्जनी ही झुकली
आराम द्यावा तिस, इच्छा ही झाली
तंत्रज्ञानाचा वेग नि झेप पाहून डोळे दिपले
नजर झुकवून किंचित मिटून ते घेतले
कौतुकच वाटतं बरं का तुमच्या पिढीचं भारी
सार्वजनिक उत्सवाची परंपरा जोपासलीत खरी
बेंजो, डी जे अन फिल्मी नाचगाणे
उत्सवाचे क्वचित उडतात वाभाडे
पण चालायचंच हे ही मान्य मला आहे
चंद्राच्या सौंदर्यालाही डागांचा शाप आहे"
नमस्कार केला आम्ही दोघांनी त्यांस
आशिर्वाद म्हणून दिली एक 'पेन ड्राईव्ह ' खास
"हे काय?" असा अस्फुट निघाला उद्गार
"तुमच्या काळातील लेखणी ही स्वीकार
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? अग्रलेखाचा
पार्ट २ सेव्ह केलाय यावर साचा
मात्र 'सरकारचे' हा शब्द रिप्लेसेबल आहे
योग्य वेळी योग्य 'नाम' वापरायची सोय आहे
वाटलं तुमच्यसवे राहून जरा आधुनिक व्हावं
नव्या तंत्रज्ञानाला अंमळ आपणही अनुसरावं
भारीच सोय आहे की आता व्याख्याने द्यायची
पीपीटीच्या स्लाईड्स भराभर बदलायची
केलाय अपलोड मी ही एक 'ग्रुमिंगचा" कोर्स
एटिकेटस शिकण्याचा करेन पुणेकरांना फोर्स
त्या चितळ्यासाठी वेळ ठेवलीये रात्री सोयीची
दुपारी १ ते ४ दुकान बंद, सबब नको रोजची
आल्यासारखा चक्कर टाकून येईन इस्रोतुनी
अंतराळ/खगोल शास्त्रातील ज्ञान अपडेटावे म्हणूनी
गणितीय संकल्पना, वेदिक पंचांगाचे निदान
तपासून घेतो एकदा सारे, संगणकीय सूत्रात
' व्हिझिट रिपोर्टची' मी ई-मेल धाडून देतो
नाहीतर एक व्हिडीओ काँफरंसच घेतो
खात्री आहे मला, आपण महासत्ता होणार
अमेरिकेची अरेरावीही निमुट सॅल्युट ठोकणार
शेजारच्यांच्या पापांचा घडा लागलाय भरु
जागतिक नकाशावरुन त्यांचे नावच खोडू
वर्धमान होणारी ही विजयगाथा मातेची
पाहुनी 'बाळ' करितो स्तुती तिची
आशिर्वाद 'बाळा'चा या तुम्हा सर्वांस
करणार तुम्ही सारे महासत्तेत वास"
---------------------------------------------------------------------------
टिळक -आशिकाचा संवाद अवघा
जैसा घडलासे मंडपद्वारी
तैसा सादर करितसे
मायबोलीवरील गणेशोत्सवी
वॉव! काय कल्पनाशक्ती आहे
वॉव! काय कल्पनाशक्ती आहे आशिका. फारच सुंदर!!!
आधी वाटलं अगदी टिपिकल 'गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप' टाईप असेल पण तू किती पॉझिटिव्ह कलाटणी दिली आहेस. ग्रेट!
सुरेख लिहिलंस आशिका, भारी
सुरेख लिहिलंस आशिका, भारी कल्पना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त कल्पना .
मस्त कल्पना .
शॉल्लिड आहे. छान वाटले वाचुन.
शॉल्लिड आहे. छान वाटले वाचुन.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
छान कल्पना व मांडणी!!!
छान कल्पना व मांडणी!!!
भारी आहे कल्पना
भारी आहे कल्पना
छान लिहिलेय, आवडले. वेगळा
छान लिहिलेय, आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेगळा विचार म्हणून नाही तर योग्य विचार म्हणून
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंयस
मस्त लिहिलंयस
आशिका , जबरी लिहिलेस . पण
आशिका , जबरी लिहिलेस .
पण चालायचंच हे ही मान्य मला आहे
चंद्राच्या सौंदर्यालाही डागांचा शाप आहे >>>> हे एकदम गझलेतलं वाटतंय
आशिका, कित्ती छान लिहिलं आहेस
आशिका, कित्ती छान लिहिलं आहेस
आधी वाटलं अगदी टिपिकल
आधी वाटलं अगदी टिपिकल 'गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप' टाईप असेल पण तू किती पॉझिटिव्ह कलाटणी दिली आहेस. ग्रेट!
+१
वा क्या बात है, ग्रेट आशिका.
वा क्या बात है, ग्रेट आशिका.
मस्त लिहीले आहे.
मस्त लिहीले आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच. आवडलं. आधी वाटलं अगदी
मस्तच. आवडलं.
आधी वाटलं अगदी टिपिकल 'गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप' टाईप असेल पण तू किती पॉझिटिव्ह कलाटणी दिली आहेस. ग्रेट!> +१
भारी लिहिलंय! पद्यही छान
भारी लिहिलंय! पद्यही छान जमलंय. 'बाळ' शब्दाचा वापर चपखल.
भारी लिहिलंय आवडलं.!
भारी लिहिलंय आवडलं.!
मस्तच आशिका! आधी वाटलं अगदी
मस्तच आशिका!
आधी वाटलं अगदी टिपिकल 'गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप' टाईप असेल पण तू किती पॉझिटिव्ह कलाटणी दिली आहेस. ग्रेट!> +१
क्या बात है आशिका! पद्य मस्त
क्या बात है आशिका! पद्य मस्त जमले आहे.
सही!
सही!
खासच जमलेय !
खासच जमलेय !
तुस्सी महान हो
तुस्सी महान हो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)