पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात.
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! )
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये.
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!)
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?)
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो.....
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
आणि मास्तरंच 'हे गाभडं
आणि मास्तरंच 'हे गाभडं कुणाचंय रे' आणि 'तुझ्या बापाचं गठुडं थिवलंय व्हंय ईथं' असं पोरांसमोरंच म्हणायाला लागले तर पोरं वर्गातंच बिन पाण्यानं नाही का करायचे मास्तरची.
अहो..येवढ काय मनाला लावुन
अहो..येवढ काय मनाला लावुन घेताया...आपल गावाकडच मस्तर हाइती ते...चालायच तेवढ..!!
आमच्या शाळेची ट्रिप गेली होती
आमच्या शाळेची ट्रिप गेली होती तेव्हा एक जण रेंगाळत एका तासलेल्या दगडावर बसला होता तेव्हा आमचा एक मास्तर त्या मुलाला " ए चल पटापट, तुझ्या बापाची समाधी हाय काय तिथं? बसलाय उगाच" असं आख्या वर्गासमोर म्हणाला होता
त्यामानाने सातपुते सर जरा सौम्यच होते ......
अतरंगी ... हा हा..हा.. ..
अतरंगी ... हा हा..हा.. :D.. ( अरे..केवढ हसलो.. )
तो कॉमेंटरी करत असतो म्हणुन
तो कॉमेंटरी करत असतो म्हणुन त्याला सर म्हटले असेल. गाण्यात दाखवल्या प्रमाणे तो सलुन वाला दाखवला आहे असे वाटतेय.
अरे असं कसं म्हणता, डीटेलिंग
अरे असं कसं म्हणता, डीटेलिंग लssssssय हाय.
डीटेलिंग तुम्हालाच दिसत नाहीये
परश्यासारखी हुषार पोरं वर्गात नाहीत, मासेमारी करतायेत, अवेळी आंघोळ करून आर्चीमागे जातायेत ,सगळीच पोरं -पोरी मंग्याच्या हिरीत स्विमिंग करतायेत याचाच अर्थ कॉलेजला सुट्टी हाय.
मास्तर पार्ट टाइम बिजनेसला सलोन मधे बसले तर काय बिघडलं , आं ?
जर वीक डे दाखवला असेल तरी डिटेलिंग हाय हाय.
इतर मास्तर शिकवताना दाखवलेत पण हेअरकटींग सलोन असल्यामुळे सातपुते कॉलेजात फिरकत नाहीत, बंक मारतात स्वतःचीच लेक्चर्स असा त्याचा अर्थ आहे
मास्तर म्हणुन आपण त्यना किती
मास्तर म्हणुन आपण त्यना किती स्टिरिओटाइप मध्ये आडकवनार...मास्तर झाले तरी ते पण मनुष्य आहेत..इतरा सारखे..!!!
( नशीब ते पिन्जरा सारख मास्तर न्हाय दावल )
जर वीक डे दाखवला असेल तरी
जर वीक डे दाखवला असेल तरी डिटेलिंग हाय हाय.
इतर मास्तर शिकवताना दाखवलेत पण हेअरकटींग सलोन असल्यामुळे सातपुते कॉलेजात फिरकत नाहीत, बंक मारतात स्वतःचीच लेक्चर्स असा त्याचा अर्थ आहे >>>
वीक डे न्हाय त्यो.. सुट्टीच असनार.. तुम्हीच नीरिक्षान केलय...!!
परश्यासारखी हुषार पोरं वर्गात नाहीत, मासेमारी करतायेत, अवेळी आंघोळ करून आर्चीमागे जातायेत ,सगळीच पोरं -पोरी मंग्याच्या हिरीत स्विमिंग करतायेत याचाच अर्थ कॉलेजला सुट्टी हाय.
>>>>
याच गाण्यात आपल मास्तर..सलुन मधी दिसल्यात नव्ह ?
गावाकडे मास्तर सलूनमध्ये,
गावाकडे मास्तर सलूनमध्ये, आईस्क्रिमच्या दुकानात, पानटपरीवर, इस्तरीच्या दुकानात बसतात की...
परश्यासारखी हुषार पोरं वर्गात
परश्यासारखी हुषार पोरं वर्गात नाहीत, मासेमारी करतायेत, अवेळी आंघोळ करून आर्चीमागे जातायेत ,सगळीच पोरं -पोरी मंग्याच्या हिरीत स्विमिंग करतायेत याचाच अर्थ कॉलेजला सुट्टी हाय.
>>>>
याच गाण्यात आपल मास्तर..सलुन मधी दिसल्यात नव्ह ?
<<
हो , म्हणूनच म्हंटल ना.
ज्यांना वीकडे आहे असा युक्तीवाद करायचाय त्यांच्यासाठी ऑप्शन २ देउन ठेवली झालं
उन्हाळ्याची सुट्टी असते की
उन्हाळ्याची सुट्टी असते की तेव्हा म्हणून मॅचेस, पोहोणे, सलून सग़ळे चालते. नंतर मग कॉलेज सुरु होते आणि वर्गातला तो स्वतःच्या ओळखी करून देण्याचा सीन होतो ना!
See , MT is top fan of sairat
See , MT is top fan of sairat :p
MT, ghe udi.
(No subject)
maitreyee >>> परफेक्ट ..मस्त
maitreyee >>> परफेक्ट ..मस्त निरीक्षण... !!!
संपूर्ण रिकाम्या कटिंग सलुनात
संपूर्ण रिकाम्या कटिंग सलुनात पेपर वाचत आणि रस्त्यावरून जाणार्याच्या तोंडाकडं वखावखा बघत मालकाशिवाय अजून कोण बसणार >>> बसतात रे हाय्झेन , मालक जरा हलकं व्हायला गेलेला असु शकतो किंवा जेवायला गेलेला असु शकतो , आणि गावाकडे टाईमपाससाठी सगळ्यात हक्काची जागा म्हणजे न्हाव्याचं दुकान.
दारूकामानं तर्राट होवून
दारूकामानं तर्राट होवून पोरांबरोबर झिंगाट बी करतायेत की नंतर मंग सातपुते मास्तर. लईच अॅडव्हान्स्ड म्हणायचे मास्तर. आम्हाला अशे मास्तर कामुन न्हाई भेटले कधीच.
श्री : अगदी खरय... !!
श्री : अगदी खरय... !!
कदाचित..गावाकडच्या लाइफ स्टाइलची जास्त ओळख नसेल त्याना काही गोष्टी व त्यान्चा सन्दर्भ लावणे थोड अवघड जातअसेल ...!!
आमच्या प्राथमिक शाळेतले एक
आमच्या प्राथमिक शाळेतले एक मास्तर दारु पिऊन यायचे शेवटी त्यांना शाळा सोडुन जावं लागलं होतं.
एक मास्तर असा जोरात कान उपटायचे की काटकन आवाज यायचा .
बाकीचे मास्तरही आहेत ना
बाकीचे मास्तरही आहेत ना झिंगाट होणाऱ्यांत?
'गावाकडं असतंय तुम्हाला नसेल
'गावाकडं असतंय तुम्हाला नसेल माहित' च्या नावाखाली काहीही कसं काय खपेल हो?
कटींग सलून, पानाचा ठेला, ईस्त्रीची टपरी, दारूचा गुत्ता वगैरे चालवणारा मास्तर मी तरी कुठल्याही खुर्द, बुद्रूक, वाडी मध्ये बघितलेला नाही.
हां आता, मेथ लॅब वाले एक मास्तर माहिती हायेत पण त्यांचा जरा येगळा प्रिब्लेम व्ह्ता!
अरे सलूनवाला मास्तरांचा जुळा
अरे सलूनवाला मास्तरांचा जुळा भाऊ असेल.
हायझेन तुला एवढा कल्चरल शॉक
हायझेन तुला एवढा कल्चरल शॉक का बसलाय पण ?
कटींग सलून, पानाचा ठेला,
कटींग सलून, पानाचा ठेला, ईस्त्रीची टपरी, दारूचा गुत्ता वगैरे चालवणारा मास्तर मी तरी कुठल्याही खुर्द, बुद्रूक, वाडी मध्ये बघितलेला नाही.
>>>
पानाचा ठेला आणि इस्त्रीचे दुकान - या दुकानांचे मालक आमच्या शाळेत शिक्षक होते. आमच्या काळेसरांनी पोरालाच पानटपरी काढून दिली होती.
दारु गुत्तावाला शिक्षक मात्र पाहिलेला नाही. कॉलेजात फायनल इयरला मास्तर लोकांबरोबर दारुकाम अगदी सर्रास होत असे. विशेषतः प्रोजेक्ट गाइडबरोबर.
टण्या, अरे काढून देणे वेगळे
टण्या,
अरे काढून देणे वेगळे रे. पण मास्तरणे शाळा सांभाळून फुल टाईम कटिंग सलून चालवणे मला अवघड वाटतेय.
कॉन्फ्लिक्ट ऑफ प्राईड माझ्या मते.
लईच गलतीसे मिसअंडरस्टँडिंग होऊ राहिली.
मास्तरच्या दारू पिण्यावर आक्षेप नाहीये नाचण्यावरही नाहीये ते फक्त मास्तर लई हरहुन्नरी आहेत अश्या अर्थाने लिहिले.
पुन्हा मोजक्या समंजस मुलांबरोबर दारू पिणे वेगळे आणि दारु पिवून आख्या गावच्या पब्लिकसमोर पोरांमध्ये तर्राट होवून नाचणे वेगळे.
आपले मास्तरच तसे (तर्राट आणि झिंगाट) आहेत हे बघितल्यावर प्रिंसने कानाखाली ठेवल्यावर आर्चीला शॉक का बसावा मग.
मास्तरांनीं पार्टीइंग करू
मास्तरांनीं पार्टीइंग करू नये, शिक्षकी पेशाव्यतिरीक्त इतर पोटापाण्याचे धंदे करू नयेत असं म्हणत आहेस का हयझेनबर्ग?
(पिक्चर राहिला बाजूला आणि हे नवीनच पण बिघडलं कुठे? ;))
प्रिन्स कडून कानाखाली वाजवून घेऊन, परत त्याबद्दल पाटलांकडून ऐकून घेऊन मग प्रिन्सच्याच बड्डे पार्टीत झिंगाट होऊन नाचले मास्तर तर गोष्ट वेगळी.
आणि मास्तर तर्राट/झिंगाट होत असले ऑफ ऑफीस अवर्स ना तरी वर्गात स्वतःच उद्धटपणा करायचा आणि मास्तरांनीं त्याबद्दल टोकलं तर त्यांच्या कानाखाली मारायची हे कुठल्याही लॉजिकने पटेल का?
सगळा घोळ 'सातपुते सर' वरून
सगळा घोळ 'सातपुते सर' वरून चालू झाला.
मला वाटतं ती एडिटिंग ची चूक असावी, किंवा कोणी सातपुते मास्तरांनी केलेल्या भाषणाला (निवडणुकी साठी दिलेल्या सदिच्छा - जो नागराज त्याच्या तात्याबद्दलच्या ओळ्खीत देतांना दिसला नाही)) सिनेमात कात्री लागली असावी पण चुकून संदर्भ राहिला, किंवा ओळख करून देणार्याला सर वगैरे म्हणून आपला दर्जा ऊंचवायचा असं एक काही तरी तात्याचं जनरल राजकारणी बोलण्यातलं लॉजिक असावं.
अवो सातपुते सरांच्या ट्युशन
अवो सातपुते सरांच्या ट्युशन क्लासेस असतील गावात!
मास्तरांनीं पार्टीइंग करू
मास्तरांनीं पार्टीइंग करू नये, शिक्षकी पेशाव्यतिरीक्त इतर पोटापाण्याचे धंदे करू नयेत असं म्हणत आहेस का हयझेनबर्ग? >>> आजिबात असं म्हणणं नाहीये. पण शिक्षक आणि कटींग सलून (काढून दिलेलं नाही तर मास्तर स्वतः भादरिंग करतोय ) वा पान टपरी कॉन्फ्लिक्ट ऑफ प्राईड होणारे प्रोफेशन्स आहेत असं नाही वाटत.
मास्तरानं पोरांबरोबर दारू पिऊन नाचणं - नो प्रॉब्लेम अॅट ऑल.... पण तुम्ही म्हणाल मला शाळा कॉलेजात मास्तर सारखा रिस्पेक्ट पोरांनी दिला पाहिजे.... शक्य तरी आहे का हे होणं? असं कुठे असतं का?
मला प्रॉब्लेम काहीही नाहीये मास्तरांनी असं असण्याबाबत फक्त ते प्रॅक्टिकल वाटत नाही, एवढंच.
हा.ब काही चूक बिक नाही,
हा.ब
काही चूक बिक नाही, तुमच्या मनाला नाय पटतेत मास्तरांचे साइड बिझनेस आणि तर्राट नाचणं (आज इतने दिनोंके बाद ये सवाल.)
पिंजरा बघून मास्तर बिघडले जोक विसरलात का
>> शक्य तरी आहे का हे होणं?
>> शक्य तरी आहे का हे होणं? असं कुठे असतं का?
माझ्यासाठी हे काल्पनिक आहे किंवा माझ्या दृष्टीआड कुठले मास्तर दारू पिऊन नाचत असतील तर मला कल्पना नाही.
पण मास्तर शाळेबाहेर कितीही उनाडपणा करत असले तरी शाळेत त्यांच्या वर्गात मी उनाडपणा करायला धजावणार नाही असंच वाटतंय. कदाचित त्या विषयात लक्ष कमी लागेल पण तरी मास्तरांच्या थोबाडीत मारणे ही कल्पना ही करवत नाही मला.
Pages