१. ३ मोठी लिंबं (इथे मोठी पिवळ्या रंगाची लिंब (Lemon) मिळतात ती घ्यावीत भारतातल्यासारखी छोटी लिंबं (Lime) मिळतात ती घेवू नयेत).
२. स्वीट्न्ड कंडेन्स्ड मिल्कचा १ छोटा डबा (साधारण ४०० ग्रॅमचा मिळतो तो)
३. ताज्या हेव्ही व्हिपींग क्रीमचा १ कार्टन (१ पिंट, साधारण अर्धा लिटर) हे कुठल्याही सुपरमार्केटमध्ये मिळेल
४. १ पाकीट लेडीफिंगर बिस्कीटे (२०० ग्रॅमच्या पाकीटात २४-२५ लेडीफिंगर्स येतात तेव्हडी पुरतात)
५. ३ चहाचे चमचे साखर.
६. साधारण कपभर कोमट दूध.
७. सर्व्ह करतांना सजावटीसाठी डेसीकेटेड कोकोनट किंवा डार्क चॉकलेटचा एक तुकडा खिसून घालायला. हे ऐच्छिक आहे मी वापरत नाही.
तिरामिसुचे क्रीम -
१. पहिल्यांदा एका भांड्यात सगळ्या लिंबाच्या साली बारीक खिसणीने (आलं किसायची) बारीक किसायच्या. किसलेली साल खवलेल्या नारळासारखी दिसते. त्यात २ लिंबाचा रस पिळुन हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.
२. दुसर्या एका मोठ्या भांड्यात सगळे हेवी व्हिपींग क्रीम, साखर घेवून लाकडी चमच्याने ढवळा.
३. क्रीमच्या मिश्रणात कंडेन्सड् मिल्क टाका आणि लाकडी चमच्याने ढवळा. आता हे मिश्रण बासुंदी इतके घट्ट झाले असेल.
४. आता या वरच्या मिश्रणात लिंबाचा रस + किसलेली साले यातले अर्धे मिश्रण टाका. हळू हळू लाकडी चमच्याने हलवा. मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागते. साधारण श्रीखंडाइतके घट्ट होते. या स्टेजला मिश्रणाची चव घेवून बघायची. आंबट गोड चव यायला हवी. नुसतीच गोडमिट्ट चव लागत असेल तर बाकीचा लिंबाचा रस हळू हळू घालायचा. सगळे मिश्रण नीट ढवळायचे, आतापण जर चव गोडच लागत असेल तर तिसर्या लिंबाचा रस घालायला हरकत नाही.
जसे जसे यातले लिंबाच्या रसाचे प्रमाण वाढते तसे तसे याचा घट्टपणा वाढत जातो. हे तयार झाले तिरामिसुचे क्रीम, लेडीफिंगर बिस्कीटं दूधात बुडवून कॅसरोलमध्ये रचेपर्यंत हे क्रीम मस्त घट्ट झालेले असेल.
आता एखादे कॅसरोलसारखे भांडे किंवा 8 बाय 8 चा केक टिन घ्या.
पहिला थर/लेयर - हा थर तयार करण्यासाठी एका पसरट भांड्यात कोमट दूध घ्यायचे आणि त्यात एक एक बिस्कीट बुडवायचे, बिस्कीट पूर्णपणे बुडायला हवे. मग बिस्कीट तळहातावर दाबून त्यातले दूध काढून टाकायचे आणि चपटे बिस्कीटं पॅनच्या तळाशी अगदी एकाशेजारी एक ठेवायची. संपूर्ण भांडेभर बिस्कीटांचा थर लावायचा.
दुसरा थर/लेयर - तयार केलेल्या क्रीममधले अर्धे क्रीम चमच्याने या बिस्कीटांच्या थरावर सगळीकडे पसरवायचे.
तिसरा थर/लेयर - पहिल्या थराप्रमाणेच बिस्कीटं दूधात बुडवून तळहातावर दाबून त्यातले दूध काढून क्रीमच्या थरावर नीट माडून तिसरा थर तयार करायचा.
चौथा शेवटचा थर/लेयर - उरलेले सगळे क्रीम बिस्कीटांवर पसरवायचे. झाऽऽले तिरामिसु तय्यार. आता तयार झालेले तिरामिसु ४-५ तास फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवा.
नंतर सर्व्ह करतांना तिरामिसुवर डेसिकेटेड कोकोनट भुरभुरुन किंवा डार्क चॉकलेट किसून सर्व्ह करता येईल. हे न करता पण तिरामिसु सऽऽही लागते.
Bon appetit!
१. ज्यांच्याकडे इथल्यासारखे मोठे लिंबू (लेमन) मिळत नाही फक्त लहान लिंबू (लाइम) मिळते त्यांनी लिंबाचा रस + संत्र्याची साल टाकायला हरकत नाही. फक्त संत्र्याची साल आणि संत्र्याचाच रस असे चालणार नाही. मिश्रण घट्ट होण्यासाठी लिंबाचा रस आवश्यक आहे.
२. पटकन थंड करायचे असेल तर हिवाळ्यात सरळ १५-२० मि. घराबाहेर बर्फात ठेवायचे आणि उन्हाळ्यात फ्रीजरमध्ये ठेवायचे. समजा फ्रीजरमध्ये जऽरा जास्त वेळ राहीले तर लेमन तिरामिसु आयस्क्रीम म्हणून वाढावे :). अर्थात केल्यावर लगेचच खाल्ले तर कधीतरी लिंबाच्या सालीचा कडवटपणा जाणवतो. तेव्हा पार्टीच्या आदल्या रात्री करून फ्रीजमध्ये ठेवले तर मुरलेले तिरामिसु एकदम मस्त लागते.
३. यात भऽरऽपूऽर कॅलरीज असतात पण हे इतके भारी लागते की खातांना असले काही लक्षात ठेवणे अशक्य आहे तेव्हा दुसर्या दिवशी अवश्य जीमला जाणेचे करावे
४. ही कृती मी जर्मन भाषेत शिकले तेव्हा कोणी जर्मनीत असेल आणि त्यांना हे करायचे असेल तर त्यांच्यासाठी साहित्य देतेय. penimarkt मध्ये सगळे साहित्य मिळेल.
व्हिपींग क्रीमसाठी - 2 Schlagsahne (दह्याच्या डब्यासारख्या दिसणार्या कंटेनरमध्ये हे मिळते, २०० ग्रॅचे २ डबे लागतील.)
स्वीट्न्ड कंडेन्स्ड मिल्क - Gezuckerte Kondensmilk warmebehandelt (Milch Madchen) हे टुथपेस्ट्सारख्या २०० ग्रॅ. ट्युबमध्ये मिळायचे, २ ट्युब्स लागतात.
साध्या सारखेसोबत/ऐवजी तिथे मिळते ती vanila zukcker वापरावी.
५. ओरीजनल तिरामिसुची कृती इथे सापडेल.
६. विद्यार्थीदशेत असतांना बर्याचदा ऐन वेळेला शुक्रवारी रात्री पार्टी ठरत असे तेव्हा घरातल्या असलेल्याच वस्तू वापरून हे तिरामिसु झटपट करता येई म्हणून आम्ही याला इंस्टंट तिरामिसु म्हणायचो.
लेडीफिंगर्स्/कंडेन्स्ड मिल्क/साखर/दूध/लिंबं नेहमी घरात सापडतेच फक्त घरी येतांना हेव्ही व्हिपींग क्रीम आणले की झाले त्यामुळे दहातल्या किमान आठ पार्ट्यांसाठी हे केले जायचे.
७. याला अस्सल इटालियन लोक तिरामिसु म्हणतील का हे माहीत नाही. क्रीम आणि बिस्कीटांचे एकावर एक थर असतात म्हणून आम्ही याला तिरामिसु म्हणायचो.
८. इटलीला गेले होते तेव्हा बघीतले की सगळ्या दुकानात आयस्क्रीमच्या काचेचा कपात, तर कधी छोट्याश्या साध्या काचेच्या वाटीत तिरामिसु विकायला ठेवलेले असते. त्यामुळे सर्व करायला खूप सोपे पडते. छोट्या पार्टीसाठी बर्याचदा मी ७-८ डेझर्ट कपातच तिरामिसु करते म्हणजे मग कापा आणि ताटलीत सर्व्ह करा वगैरे भानगडी कराव्या लागत नाहीत. प्रत्येकाला एक कप दिला की झाले.
ए मस्त आहे ही रेसिपी ..
ए मस्त आहे ही रेसिपी .. मागच्या आठवड्यात केली होती .. परफेक्ट प्रमाण दिलं आहे... भारी लागतं दोन दिवसात तिघांनि खरं तर अडिच म्हणायला हवं खाऊन संपवला... स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्प ..
मी पण केलं हे तिरामिस्सू.
मी पण केलं हे तिरामिस्सू. भन्नाट आहे. खूप खूप धन्यवाद रुनी. अतिशय सोपी आणि चवीष्ट आहे हा प्रकार. मी निम्मं प्रमाण वापरलं आणि बरोबर तीन बाउल झाले.
फादर्स डे साठी या रेसिपीची
फादर्स डे साठी या रेसिपीची फर्माईश आली आहे...अख्खा आठवडा आमचा "बाबा" जिममध्ये नियमाने जातोय आणि जाणारे...;)
एकदम श्~ओलिट आवल्लीय मोठ्याला पण ही रेसिपी...पण धाकट्याला लिंब चालत नाही सो तो बिचारा एकटा दुसरं काहीतरी खाईल....पण काय करणार.....लिंबाशिवाय ही होणार नाही.....असो..तसंही तो बाकी सगळं खातो दुसरं काहीतरी पण करेन.....केक बिक...:)
ह्यात जर का अल्कोहोल / लिकर
ह्यात जर का अल्कोहोल / लिकर टाकायची असेल तर कोणती टाकवी? नेहमीच्या तिरामिसुत मी रम टाकते.
vodka, gin, white rum,
vodka, gin, white rum, white tequila, Grand Marnier (from Google search)
थँक्यु.
थँक्यु.
Pages