Submitted by स्वप्ना_राज on 8 August, 2016 - 23:36
माझ्या ओळखीच्या एकाची ९५ ची होंडा कार आहे. लाडकी कार असल्याने आणि तशी व्यवस्थित चालत असल्याने आत्तापर्यंत विकली नव्हती. पण आता ती थोडा त्रास देऊ लागली आहे. त्यांनी कार खरेदी-विक्रीच्या साईटसवर अॅड दिली. पण कारवर खर्च करावा लागेल त्यामुळे ती विकली जाण्याची शक्यता जवळपास नाही. ही कार मुंबईत कायदेशीररित्या स्क्रॅप करायची सोय आहे का? प्लीज कळवा. धन्यवाद!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२० वर्षांपेक्षा जुनी गाडी
२० वर्षांपेक्षा जुनी गाडी असल्याने तिचे आरटीओ रजिस्ट्रेशन संपलेले असणार आहे.
यावर दोन मार्ग असतात. एक म्हणजे आरटीओ ऑफिसात कळवून, (योग्य तो फॉर्म भरून) गाडी भंगारवाल्याला किलोच्या भावात विकणे. आजूबाजूच्या गॅरेज्/पेट्रोल पंपावर चौकशी केल्यास त्यांचा पत्ता कळेल, व आरटीओ कागदांची पूर्तताही ते लोक करतील. मात्र, ते कागद पूर्ण केले आहेत, व गाडी स्क्रॅप केली आहे, याचे सर्टिफिकेट तुमच्याजवळ कायमजपून ठेवा. उद्या उठून गाडीची नंबरप्लेट कुणी वापरून काही २ नंबर धंदे केलेत तर तुमच्या अंगाशी यायला नको.
दुसरा मार्ग थोडा आडमार्ग आहे.
मुंबईबाहेर गाडी विकली तर पोल्युशन नॉर्मस तुलनेने शिथील आहेत. रजिस्ट्रेशन रिन्यू होऊ शकेल. तालुक्याला खेड्यात वगैरे दिलीत, तर मस्त चालेल ती अजून बरीच वर्षे. फक्त, मुंबईतली गाडी अन तीही इतकी जुनी म्हटल्यावर खार्या दमट हवेने पत्रा गंजलेला असतो, पण किलोपेक्षा थोडा जास्त भाव मिळू शकेल.
गाडी चालवायला खरंच सुरक्षित
गाडी चालवायला खरंच सुरक्षित असल्यास एखाद्या गरजूला फक्त आर सी ट्रास्नफर चा खर्च करायला सांगून आणी सर्व प्रॉब्लेम्स ची कल्पना देऊन (आणि आर सी खरंच ट्रान्स्फर झाले याचा पडताळा करुन) वापरायला देऊन टाका.
अकलेचा कांदा, धन्यवाद!
अकलेचा कांदा, धन्यवाद! पहिल्या मार्गाची चौकशी करायला सांगते. मुंबईबाहेर गाडी विकायची तर नोकरी वगैरे व्याप सांभाळून त्यांना शक्य होईल असं वाटत नाही.
mi_anu, धन्यवाद! गरजू व्यक्तीला देण्यात काही इश्यू नाही. पण आजकाल कोण गरजू आहे आणि कोण नाही हे ठरवणं कठिण आहे. त्यापेक्षा सरळ स्क्रॅप केलेली बरी असा विचार येतो मनात