खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< विक्रांतने मोनिकाला काल सही सुनावलं. मजा आली बघायला.>> विक्रांतला असं सुनावल्याचं समाधान , आपल्याला तें ऐकल्याच/बघितल्याचं समाधान पण मोनिकावर त्याचा कांहींही परिणाम नाहीं; निदान तिच्या चेहर्‍यावर तरी यत्किंचितही दिसला नाही किंवा तिला दाखवतां आला नाही !

विक्रान्त ने सरळ सरळ मोनिकाला सान्गायचे होते ना, की, बाई ग, या गर्भपातामुळे तुझ्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे तुझी इच्छा असो वा नसो, हया मुलाला तुला जन्म दयावाच लागेल." मूल होण्याचे सुख हया विषयावर भाषण देण्याची काय गरज होती त्याला?

मोनिकाला जास्तीत जास्त बेजबाबदार दाखवणार, ग्रे शेड नाही पार व्हिलन. तरच मग नायिकेचं उद्दात्तीकरण करता येतंना. हिच्यापुढे ती मानसी समजूतदार, सोशिक वगैरे वगैरे सर्वगुणसंपन्न. नेहेमीप्रमाणे.

आता प्रेग्नंट आहे हे कळूनही विक्रांतने लग्न केलंना, मग सांगायचं तिला की तू बाळाला जन्म दे, मी बाप होईन त्याचा.

मोनिकाला जास्तीत जास्त बेजबाबदार दाखवणार, ग्रे शेड नाही पार व्हिलन. तरच मग नायिकेचं उद्दात्तीकरण करता येतंना. हिच्यापुढे ती मानसी समजूतदार, सोशिक वगैरे वगैरे सर्वगुणसंपन्न. नेहेमीप्रमाणे.>>> नैतर काय्,मला ह्या मालिकान्चे एक कळत नाही, जिला मुलाबाळाची, स्वयमपाकाची आवड नसते, ती करीयर करणारी असते तिला नेहमी खलनायिका, वाईट, उद्दट दाखवतात. मनापासून स्वयमपाक करणारी, मन्दीरात जाणारी, सदा रडणारी मुलगी ही नायिका असते.

नायकान्च्या बाबतीत मात्र उलट असते, नायक कसाही असला, अगदी गुन्डही असला तरी तो चान्गलाच वागतो.

मी झी युवा channel ची वाट बघतेय, आमच्याकडे दाखवतात का नाही माहिती नाही, तिथल्या पण पकाऊ असल्या तर काही खरं नाही.

जान्हवीच्या डिलीव्हरी लागलेला अवास्तव वेळ लक्षात घेवून
.
.
.
.
खुलता कळी खुलेना ह्या मालिकेतील नायिकेला आधीच प्रेग्नंट दाखवल्या बद्दल सर्व संबंधितांचे आभार Happy

Khulata-Kali-Khulena-a-Zee-Marathi-New-Serial.jpg

हो आज w a वर हा मेसेज फिरतोय Lol . पण उरलेले 6 महिने किती दिवसात दाखवतात काय माहिती, नाहीतर दोन टोकं उरकतील किंवा लांबवतील.

खुलता कळी खुलेना ह्या मालिकेतील नायिकेला आधीच प्रेग्नंट दाखवल्या बद्दल सर्व संबंधितांचे आभार >>>> पण मालिकेची नायिका मानसी आहे ना?

विक्रांत एकदम सही जारेला है! मस्त गोची केली आहे मोनिकाची त्याने. मोनिकाला मस्त एक्स्पोज करायला पाहिजे त्याने. इमोशनली वीक झाला तर वांदे आहेत.

आशा शेलारच्या साड्या खूप मस्त दाखवल्या आहेत. इन फॅक्ट मोनिका सोडून सगळ्यांचेच कपडे मस्त आणि विविध घेतले आहेत. मोनिकाच्या अंगावर मात्र आलटून पालटून सेम पॅटर्नचे तीन रंगातले तीन ड्रेस... का असं कल्पनादारीद्र्य Sad

बाकी काही असो, पण झीला नायिका मात्र छान सुंदर मिळतात हं !
आपल्याला बोवा आवडली ही "मानसी" ... ! (अस लिंबीला सांगितल तर तिने फणकार्‍याने नाक मुरडुन सांगितले की कैच्च्याकैच आहे ती चपट्या चेहर्‍याची.... Lol )
यावरुन मी एक धडा शिकलो, अन आता छायागीत (हिंदी गाणी) वगैरे लागली नवि जुनी (खास करुन जुनीच) की अगदी नाव ओठांवर असले तरीही दर वेळेस विचारतो, ही कोण, ती कोण, Proud
अन कित्येकदा आमच्यात वादही होतात की मी म्हणतो ही शर्मिला टॅगोर आहे, ति म्हणते नाही ही आशा पारेख आहे... सरते शेवटी मला काही कळत नाही/ आठवत तर त्याहुन नाही यावर एकवाक्यता नक्की होते...

नाही ...ती आधी बाहेर जायचा बहाणा म्हणून मला मानसीची खूप आठवण येत्ये वगैरे म्हणत होती तेव्हढ्यात मानसीच दारात हजर झाली..... मग हिचे सगळे फिसकटले ना......
....तिला विक्रांत काल म्हणे , " की तुला घरा बाहेर जाऊ द्यायची इच्छाच होत नाहीये!!"

अरे राम!!
आपली पत्नी विवाहाप्रसंगी 3 महिन्याची गरोदर असली तरी मनाला क्रोधाचा स्पर्शही होऊ न देता आई होणे ही किती परमभाग्याची गोष्ट आहे हे त्या होऊ न इच्छिणार्या माऊलीला पटवून देण्याचा उच्च आदर्शवाद या मालिकेद्वारे घालून आम्हा अजाण प्रेक्षकांची अंतरंगे उजळली जात आहेत. असा देवमाणूस या भूतलावर असू शकतो का 'हेच कोडे सुटेना' अशी आमची गत झाली आहे. तर मोनिकादेवींची अवस्था त्याच महात्म्यामुळे ’खुडता कळी ही खुडेना’ अशी झाली आहे.

काल परवा जाहिरातीत दाखवत होते ती थोरली बहिण (मोनिका?) धाकटीला (मानसी?) हाकलुन का देते म्हणे?>>>

मानसी मोनिकाला हनिमूनचे विचारायला फोन करते तेव्हा तिचा फोन बंद असतो. मग मानसी विक्रांतला फोन करते तेव्हा तो मोनिकाची तब्येत बरी नसल्याने हनिमून कॅन्सल करावा लागला असे सांगतो. म्हणुन मानसी मोनिकाला भेटायला घरी येते. अर्थातच मोनिकाला ते आवडत नाही. म्हणुन मोनिका मानसीला हाकलून देते. नंतर मानसी मी उद्या परत येते असे म्हणल्यावर आजेसासू तिला एक दिवस इथेच थांबायचा आग्रह करते. ते ऐकुन मोनिकाच्या हातातली (बहुदा) भांडी खाली पडतात. ते विक्रांतसुध्दा पहातो.

सध्या तरी इतकेच...

....तिला विक्रांत काल म्हणे , " की तुला घरा बाहेर जाऊ द्यायची इच्छाच होत नाहीये!!">> असं म्हणण्यामागचा उद्देश तुम्हाला माहिती नाही, कळला नाही की इथे काहीतरी(च) प्रतिसाद द्यायचा म्हणून मुद्दाम नजरेआड करताय? Happy

मला वाटतं विक्रांतने काय ते स्पष्ट सांगावं मोनिकाला. तो स्पष्ट करत नाहीये कि तो त्या बाळाला स्वीकारणार आहे की नाही. मोनिका हट्टीपणा करतीय म्हणून तिच्यावर मुलं जन्माला घाल असा दबाव घालण्यापेक्षा मुलं जन्माला आल्यावर परिस्थिती कशी असेल ह्याबद्दल बोलावं त्याने तिच्याशी. नाहीतर सगळ्यांना कळल्यावर किंवा बाळाचा जन्म झाल्यावर घरच्यांच्या सांगण्यावरून तिला आणि बाळाला वाऱ्यावर सोडून देणं हा पर्याय नाही.

मोनिकाच्या अंगावर मात्र आलटून पालटून सेम पॅटर्नचे तीन रंगातले तीन ड्रेस >>
मोनिकाच्या सगळ्या ड्रेसेस वर एकच ओढणी आहे असं वाटलं मला काल Lol

<<मानसी मोनिकाला हनिमूनचे विचारायला फोन करते तेव्हा तिचा फोन बंद असतो.>> का बर ?
हिला का इंटरेस्ट त्यांच्या हनिमुनात Happy

>>>> काल फायनली कुणितरी बोलल्याचं ऐकलं की विक्रांत जरा बदलल्यासारखा वाटतोय नै <<<<
कोण म्हणले ते ? Uhoh
अग, शेंदुर फासला की दगडही बदलल्यासारखा वाट्टो...... Proud इथे तर काहीच नाहीये तसे, एकच एक सुतकी अविर्भाव, अर्धवट वाढलेली दाढी, चिंताग्रस्त डोळे, सगळे जग आपल्यावर अन्याव करतय असे भाव चेहर्‍यावर.... बदलले काय म्हणतो मी?
आयला, याच्या पेक्षा तर आम्ही आमच्या ऐन उमेदीतल्या "कफल्लक बेकारीच्या" काळातही जास्त सुंदर दिसत असू... Lol

याच्या पेक्षा तर आम्ही आमच्या ऐन उमेदीतल्या "कफल्लक बेकारीच्या" काळातही जास्त सुंदर दिसत असू...
प्रतिसाद>> आत्ता गं बया. फटु टाका..

आपण सर्व छानच होतो, फक्त तेव्हा आपल्याला माहीत नव्हते. जन्माची जोडिदारीण प्रेग्नंट आहे म्हणून
नव्हे तर ती इतकी स्वार्थी, खोटे बोलणारी , आपमतलबी आहे हे लक्षात आल्यावर तिच्या बरोबर राहून
सुखाचे नाटक करणे आजच्या जमान्यात पटत् नाही.

Pages