Submitted by सुलेखा on 29 July, 2016 - 02:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी कणिक
१/२ वाटी नाचणीचे पीठ
१/४ वाटी ओट्स [मिक्सर मधुन एकदा फिरवुन घ्यावे.]
चवीपुरते मीठ व मोहनासाठी १ चमचा तेल.
१/४वाटी किसलेले चीज
१/४ वाटी बारीक चिरलेला कांदा,
१ हिरवी मिरची व थोडीशी कोथिंबीर बारील चिरलेली
१ चमचा किसलेले आले
पराठ्यासाठी तूप्, बटर
क्रमवार पाककृती:
कणिक व नाचणी पिठ ,ओट्स एकत्र करा त्यात मीठ व तेल घालुन लागेल तितके पाणी घालुन हे पिठ भिजवुन घ्या.
किसलेले चीज्,कांदा,हि.मिरची, कोथिंबीर,आले एकत्र करा.
भिजवलेल्या पिठाचे पराठ्यासाठी लहान गोळे करा.
प्रत्येक गोळा लहान पुरी इतका लाटुन त्यात चमचाभर सारण भरुन बंद करा व पिठी घेवुन लाटा.व गरम तव्यावर तूप किंवा बटर लावुन छान भाजुन घ्या.
अधिक टिपा:
चीज ऐवजी पनीर घेता येईल.
गाजर्,रताळे,स्वीट कॉर्न,बीट घेता येईल.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
તમે કેમ છો? જ્યાં જેથી લાંબા
તમે કેમ છો? જ્યાં જેથી લાંબા સમય માટે તમે ક્યાં હતા?
मस्त आहे रेसिपी.. करुन
मस्त आहे रेसिपी.. करुन पाहण्यात येईल नक्कीच.
मस्त! चीज चिकट नाही होत? मी
मस्त! चीज चिकट नाही होत? मी निम्मा बटाटा आणि निम्मं चीज किंवा पनीर घेते.
वावे चीज चे सारण खुप जास्त
वावे चीज चे सारण खुप जास्त म्हणजे आलु-पराठ्या इतके भरायचे नाही.त्यामुळे चिकट होत नाही.
झंपी. सध्या इथेच आहे .
साधना धन्यवाद.नक्की करुन पहा.
मस्तच.
मस्तच.