Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवरा (असल्यास) त्याच्या
नवरा (असल्यास) त्याच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे बेकायदेशीर आहे का? > नाही
पण भारतात फक्त काही कारणांसाठीच गर्भपात करता येतो... उदा: रेप, बाळाला झालेले/ होउ शकणारे विकार/ आईला धोका..इत्यादी.
पण ह्यापैकी कुठल्याही कारणासाठी नव-याची परवानगी लागत नाही...
सोर्स- विकीपीडीया
मला एक समजत नाही ३ महिने
मला एक समजत नाही ३ महिने झालेत प्रेग्नन्सीला मॉनिकाला मळ मळ उलट्या काहीच कसे झाले नाही???
सगळ्यांनाच pregnancy त, मळमळ,
सगळ्यांनाच pregnancy त, मळमळ, उलटया होतात, भोवळ येऊन, चक्कर येऊन बायका पडतात, हा एक मोठ्ठा गैरसमज आहे, मालिका आणि चित्रपटांनी करून दिलेला. मला ह्यापैकी काहीही झाले नव्हते pregnancy त!! आणि बऱ्याच जणींना होत नाही असलं काहीही!!
असो, मात्र ह्या मालिकेत दाखवलंय ना ते लग्नात मॉनिका ला उलट्या झालेल्या, मधूनच चक्कर आलेली इ.
कालच्या भागात शेवटच्या
कालच्या भागात शेवटच्या सीनवरून ती मॉनिका पक्कीच बनेल असणार असं वाटतंय. नवर्याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन मूलही टिकवायचंय वाटतं. म्हणजे ते गाय्नॅककडे जाणं वगैरे प्लॅन्ड होतं तर. खरंच मूल नको असतं तर लग्नाआधीचे साडेतीन महिने कशाला थांबली असती? आणि सादेतीन माहिन्यांपर्यंत आजकालच्या बाईला आपली प्रेग्नन्सी कळत नाही का? आणि हे प्रेक्षकांना कळत नाही असं वाटतंय का चॅनेलवाल्यांना? मूर्खपनाचा कहर चाललाय.
मला अज्जिबात आवडत नाहीय ही मालिका.
पण भारतात फक्त काही
पण भारतात फक्त काही कारणांसाठीच गर्भपात करता येतो... उदा: रेप, बाळाला झालेले/ होउ शकणारे विकार/ आईला धोका..इत्यादी.
>> फक्त बाळ नकोय इतके कारण पुरेसे नसते का?
ती मोनिका किती खप्पड दिसते?
जनरली झीच्या खलनायिका सुद्धा स्मार्ट आणि सुंदर असतात.
हि बारीक व्हायच्या नादात हिचे गाल, डोळे.. सगळे आत गेलेत.
नवरा (असल्यास) त्याच्या
नवरा (असल्यास) त्याच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे बेकायदेशीर आहे का? अ ओ, आता काय करायचं>> माझे मूल माझा निर्णय असे का नाही?
एक्झॅक्टली डिविनिता.. मलाही
एक्झॅक्टली डिविनिता.. मलाही असंच विचारायचं होतं. तू माझा डूआयडी असल्याने तूही तेच विचारलं
सानी अगं दुसर्या
सानी अगं दुसर्या महिन्यापासुनच मी उलट्यांनी बेजार झाले म्हणुन एक भाबडी शंका गं !
मॉनिका अगदीच गिरे तो भि टांग उपर टाईप्स दिस्तेय, ३ महिने चम्स मिसलेत आणि मॅडम लग्नाआधीच कांड करुन आल्यात म्हटल्यावर आधीच युपीटी करता आली नाही का मॉनिला.
>> फक्त बाळ नकोय इतके कारण
>> फक्त बाळ नकोय इतके कारण पुरेसे नसते का? अ ओ, आता काय करायचं>>
>> माझे मूल माझा निर्णय असे का नाही?>>
तुम्ही दोघी सिरीयसली विचारताय हे?
पोटातले बाळ म्हणजे हातापायावरचे केस असतात की तोंडावर आलेला पिंपल?
तुम्ही दोघी सिरीयसली विचारताय
तुम्ही दोघी सिरीयसली विचारताय हे>>> हो मंजू. त्यात एवढ का झालं तुला? रेप, बाळाला झालेले/ होउ शकणारे विकार/ आईला धोका..इत्यादी कारणे आहेतच पण मुलासाठी आता तयार नसणे (आर्थिक, मानसिक, नवर्याशी पटत नाही, करीअरच्या ह्या टप्प्यावर मुल नको अशी वैयक्तीक कारणेही असु शकतात ना? आणि ती त्या स्त्रीसाठी त्यावेळी योग्यही असतात. जर नंतर बाळाचे नीट पालनपोषण होणार नसेल तर आधीच निर्णय घेणे कधीही चांगले.
तयारी नसेल तर आधीच काळजी घायला हवी हे बरोबर आहे पण असे अपघात होतातच. आणि अपराधी भावना असली तरी काही कटू निर्णाय घ्यावे लागतातच.
हो...पण अॅट लीस्ट नवर्याची
हो...पण अॅट लीस्ट नवर्याची तरी परवानगी नको का? माझे मूल म्हणजे काय...तिचे एकटीचे आहे का?
नताशा, बरोबर. तू म्हणतेयस तशा
नताशा, बरोबर.
तू म्हणतेयस तशा परिस्थितीत स्त्री एकटीने असा निर्णय घेऊ शकते. त्यावेळी तिने नवर्याला विश्वासात घेणं भावनिक वगैरेदृष्ट्या अपेक्षित असतं, पण त्याचा कन्सेंट अनिवार्य नसतो. नवर्याशी नीट पटत नसताना अपघाताने प्रेग्नन्सी राहिलेल्या आणि नवरा अजिबात समजून घेण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे हतबल झालेल्या एकीचं उदाहरणही माझ्या डॉकनी सांगितलं होतं. अशा वेळी गरज पडल्यास नीट केस मांडली तर कायदा स्त्रीच्या बाजूने असतो.
तळटीप- अशा घटना राजरोस घडत नसल्यामुळे. आणि तरीही त्या आताच्या काळात अगदीच दुर्मिळ नसल्यामुळे वरच्या परिच्छेदात कोणत्याही एकाच बाजूने जनरलाईज्ड असं काहीही लिहिलेलं नाही.
माझे मूल म्हणजे काय...तिचे
माझे मूल म्हणजे काय...तिचे एकटीचे आहे का?>>>>>>> असु शकतं की. दरवेळी नवरा असेलच का?
पण मुलासाठी आता तयार नसणे
पण मुलासाठी आता तयार नसणे (आर्थिक, मानसिक, नवर्याशी पटत नाही, करीअरच्या ह्या टप्प्यावर मुल नको अशी वैयक्तीक कारणेही असु शकतात ना? >> या कारणांसाठी गर्भपात करणे आणि करवून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे.
या कारणांसाठी गर्भपात करणे
या कारणांसाठी गर्भपात करणे आणि करवून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे.>>>>+१
माझे मूल म्हणजे काय...तिचे
माझे मूल म्हणजे काय...तिचे एकटीचे आहे का?>>>>>>> असु शकतं की. दरवेळी नवरा असेलच का?>> नवरा नसेल, जोडीदार तर असेल की नाही?
उन्मादाच्या भरात घडलेल्या चुकांपायी जन्माला आलेला जीव मारून टाकणं हाही कायद्याने गुन्हा'च' आहे.
या कारणांसाठी गर्भपात करणे
या कारणांसाठी गर्भपात करणे आणि करवून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे>>> हो का. मला ह्याची कल्पना नव्हती. मला वाटले फक्त मुलगी आहे म्हणून गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
'कायद्याने गुन्हा'च' आहे' हे
'कायद्याने गुन्हा'च' आहे' हे तर आहेच मंजूडी.
पण दरवेळी नवरा, जोडीदार सोबत असेलच असं नाही ना. आंबट गोडच्या "माझे मूल म्हणजे काय...तिचे एकटीचे आहे का?" ह्या वाक्यावर लिहिलं होतं मी. असो.
या कारणांसाठी गर्भपात करणे
या कारणांसाठी गर्भपात करणे आणि करवून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे.
>> ओहह.. हे मलाही माहित नव्हतं.
पण "मुलासाठी आता तयार नसणे (आर्थिक, मानसिक, नवर्याशी पटत नाही, करीअरच्या ह्या टप्प्यावर मुल नको" ही पुरेशी जेन्युईन कारणं आहेत असं (मलातरी) वाटतं.
पण दरवेळी नवरा, जोडीदार सोबत
पण दरवेळी नवरा, जोडीदार सोबत असेलच असं नाही ना.>> सोबत म्हणजे कुठे? डॉक्टरकडे जाताना म्हणताय का तुम्ही? असेल मग तसं... माबुदोस!
पण "मुलासाठी आता तयार नसणे
पण "मुलासाठी आता तयार नसणे (आर्थिक, मानसिक, नवर्याशी पटत नाही, करीअरच्या ह्या टप्प्यावर मुल नको" ही पुरेशी जेन्युईन कारणं आहेत असं (मलातरी) वाटतं.>>> मलाही पियू.
मंजुडी, MTP ऍक्ट नुसार,
मंजुडी, MTP ऍक्ट नुसार, प्रेग्नन्सीच्या १२व्या आठवड्यापर्यंत रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर फक्त प्रेग्नंट बाईच्या परवानगीने प्रेग्नन्सी मेडिकली टर्मिनेट करू शकतो. (यात नको असलेली प्रेग्नन्सी एवढं कारण पुरेसं आहे, कायदा म्हणतो नको असलेल्या प्रेग्नन्सीमुळे बाईच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतो) नवऱ्याच्या परवानगीची गरज नाही. पण १२व्या आठवड्यानंतर बाईच्या जीवाला धोका असल्याने परवानगी लागते.
१२ आठवडे टू बी हायलाईटेड!!
१२ आठवडे टू बी हायलाईटेड!!
येस्स
येस्स
सोबत म्हणजे कुठे? डॉक्टरकडे
सोबत म्हणजे कुठे? डॉक्टरकडे जाताना म्हणताय का तुम्ही? >>> हो. आणि इन जनरलच सोबत
ह्या मालिकेचे तीन चार भाग
ह्या मालिकेचे तीन चार भाग पाहिले. मला एक कळत नाही त्या विक्रांतला मॉनिकाचा इतका पुळका का आहे?
विक्रांत एक टोक आह आणि ती निर्मला दुसरं! अर्थात सिरीयल आहे त्यामुळे मध्यममार्गाने काही हाताळायचा प्रश्नच नाही.
मोठं एकत्र कुटूंब दाखवायची सुरूवात प्रपंचने झाली त्यामुळे अश्या सिरीयल पाहिल्याकी हमखास प्रपंचची आठवण होते.
बादवे हे घर जुयेरेगामधलं आहे का? तशीच टेबलच्या मागे शेजारी दोन दारं आहेत.
बादवे हे घर जुयेरेगामधलं आहे
बादवे हे घर जुयेरेगामधलं आहे का? तशीच टेबलच्या मागे शेजारी दोन दारं आहेत.>>> कोणाला अशाच तर कोणाला कशाच
नाही पराग.. जुयेरेगा मध्ये
नाही पराग.. जुयेरेगा मध्ये घरातून जाणारा एकही जीना नव्हता. वरच्या मजल्यावर ती अर्चू राहायची तिथे जायला घराबाहेरून जावे लागे.
उन्मादाच्या भरात घडलेल्या
उन्मादाच्या भरात घडलेल्या चुकांपायी जन्माला आलेला जीव मारून टाकणं हाही कायद्याने गुन्हा'च' आहे. >>>
abortion करणं दु:खद आहे, पण गुन्हा ठरवणं मला चुकीचं वाटतं आहे. मी विनिता, नताशा आणि पियुच्या पोस्टशी सहमत आहे. मानसिक, आर्थिक तयारी नसणे, अपघाताने कन्सिव होणे, किंवा (मुलगा हे एक कारण सोडता) इतर काही कारणाने आईला मुल नको असेल तर कायद्याने सक्ती करणं कितपत योग्य आहे? मग अशा मजबुर आयांनी मुलांना सोडुन द्यायचं आणि अनाथाश्रम भरायचे, हे त्याहुनही क्रुर आहे. आजारी आईने सक्ती असल्यामुळे मुलाला जन्म देवुन unhealthy प्रजा निर्माण करणं त्या बाळासाठी योग्य नाहीच.
अर्थात abortion गुन्हा ठरवताना त्यात काही sub clauses नक्कीच असणार, कारण कायदा लिहिणारे सगळा विचार करुनच लिहित असतील.
मनिमाऊ, सरसकट गर्भपातावर बंदी
मनिमाऊ, सरसकट गर्भपातावर बंदी नाहीये, काही अपवाद आहेत, जसे की बलात्कार किंवा बाळाच्या किंवा आईच्या जीवाला धोका असणे वगैरे..
या मालिकेच्या संदर्भात बोलायचं तर यापैकी कुठलंही कारण मोनिकाच्या गर्भपाताला लागू होत नाही. मूळात ती गर्भार कशी राहिली हेच तिला माहिती नाहीये ह्यातूनच तिचा बेजबाबदारपणा ढळढळीतपणे अधोरेखित होतो. डॉक्टरांना ती सांगते की तुम्हाला याचे पैसे मी देणार आहे तर तुम्हाला तुमचं काम करायला काय प्रॉब्लेम आहे
कुठलंही सबळ कारण नसल्याने साहजिकच त्या डॉक्टर तिचा गर्भपात करायला नकार देतात कारण तो बेकायदेशीर ठरेल.
Pages