Submitted by दिनेश. on 19 July, 2016 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोघांना पूर्ण जेवण म्हणून
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
नेट !
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे मिळो न मिळो, कधी खायला
इथे मिळो न मिळो, कधी खायला मिळेल तेही नाही माहीती; पण वरच्या फोटोंतील डीश दिसायला लय भारी दिसतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतेय डिश. परवा
मस्त दिसतेय डिश. परवा वाशीच्या हायपरमार्टात वाईल्ड राईस चे पाकिट पाहिले. बहुतेक आयात केलेले असणार, किंमतही भारी होती. आपल्या इथे पुर्वेकडील राज्यांमध्ये वाईल्ड राईस खातात असे इथेच माबोवर वाचल्याचे आठवतेय.
राळे हे आकाराने खूप लहान
राळे हे आकाराने खूप लहान तृणधान्य आहे.
आमच्या लहानपणी ' काळे राळे गोरे राळे एकमेकांत मिसळले, काळे निराळे गोरे निराळे'
असा एक टंग ट्विस्टर होता.
बाकी ही डिश खूप छान दिसत्येय.
नक्की करून पाहिन.
अनायासे मशरूम्सचा टीनही घरात आहे. पण सध्या काळा तांदूळ नाही घरात.
कर्नाटकात तांदळाचे खूप पारंपारिक प्रकार मिळतात. एखादे ऋषीप्रदर्शन युनिव्हर्सिटीत लागले तर नक्की घेऊन येईन इथले पारंपारिक प्रकार आणि तुम्हाला पाठवेन.
मसाले भातालाच काळा भात
मसाले भातालाच काळा भात म्हणतात. तो साध्या भाताचाच करतात. वांगी शेंगदाणे वाटाणे व बटाटु घालतात. लग्नात्वगैरे असतओ
दिनेशराव, भन्नाटच
दिनेशराव, भन्नाटच
योकु +१ मस्त आहे पाकृ
योकु +१
मस्त आहे पाकृ
इथे मिळो न मिळो, कधी खायला
इथे मिळो न मिळो, कधी खायला मिळेल तेही नाही माहीती; पण वरच्या फोटोंतील डीश दिसायला लय भारी दिसतेय>>>>+१
आमच्या लहानपणी ' काळे राळे गोरे राळे एकमेकांत मिसळले, काळे निराळे गोरे निराळ>>>>>भन्नाट.
अमेरिकेत वाईल्ड राइस वुइथ
अमेरिकेत वाईल्ड राइस वुइथ मश्रुम आणि चिकन हे फेमस सूप आहे. काही थायी डिशेस मधे ही वाइल्ड राइस वापरलेला पाहिला आहे.
मस्त!
मस्त!
यम्मी दिसते आहे हे वन डिश
यम्मी दिसते आहे हे वन डिश मिल.
GISKAA.com वर हा राइस नेहमीच दिसत होता, पण त्याचा काळाभोर रंग आणि किंमत ( Rs304/kg) पाहुन दुर्लक्ष केलं होत. पण आता १/२ किलो ऑर्डर केलाच. अर्थात यात पांढरे तांदुळ अजिबात नाहीत, बहुतेक गोअन ब्राउन राइस आणि हा काळा राइस असे मिळुन एकत्र शिजवायला लागतील ( गोअन राइस शिजायला पण मरेस्तोवर वेळ लागतो त्यामुळे या मणिपुर काळ्या राइसबरोबर जोडी बरी जमेल)
काळे राळे गोरे राळे राळ्यात
काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले असं होतं बहुतेक
आभार सर्वांचे, साती, मला
आभार सर्वांचे,
साती, मला नुसती नावं आणि वर्णन वाचायला मिळाले तरी खुप आवडेल.
मनिमाऊ, गोव्यात तांदूळ शिजवणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. मोठ्या तपेलीत भरपूर पाणी घालून शिजत ठेवलाआणि अधून् मधून कुलेर नी ढवळला कि झाले. शेवटी पाणी वेळायचेच असते, म्हणून खाली लागायची वगैरे भिती नसते.
माझ्या आईच्या देखरेखी साठी एक मणिपुरी नर्स येत असे, तिने कोमल चावल म्हणून एक तांदूळ आणले होते. ते शिजवावेही लागत नाहीत. पाण्यात भिजवले कि झाले. त्यावर मग ते दही घालून घेतात.
आता कुणीतरी अस्सल काळ्या भाताची रेसिपी लिहा बरं.... मी खाऊन ४० तरी वर्षे झाली असतील.
इथे मिळो न मिळो, कधी खायला
इथे मिळो न मिळो, कधी खायला मिळेल तेही नाही माहीती; पण वरच्या फोटोंतील डीश दिसायला लय भारी दिसतेय.>>>>>>+१११११
तुमच्याकडिल जादूई पोतडीत कुठल्या कुठल्या रेसिप्या असतील ते एक देवच जाणे....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान दिसतोय भात. मश्रुम्स
छान दिसतोय भात. मश्रुम्स आवडतात. साध्या तांदळाचा करून पहाण्यात येईल.
'राळ उडवणे' हा वाक्प्रचार ह्या राळीवरूनच आला असावा असं दिसतंय. राळेच्या दाण्याला / कणीला वजन नसतं का? हा प्रकार पाहिलेला नाही. ज्या अर्थाने वाक्प्रचार वापरला जातो, तो पहाता असं वाटलं.
अनिलचेंबूर म्हणतायत तसंच माझ्याही माहितीप्रमाणे मसालेभातालाच पश्चिम दक्षिण महाराष्ट्र पट्ट्यात काळा भात म्हणतात. काळ्या भातात चटणी (कांदालसूण मसाला) वापरली जाते तर मसालेभातात गोडा मसाला, चिंच/आमसूल आणि चवीपुरता गुळ, हाच फरक. त्या त्या समाजांप्रमाणे त्याचे नामाभिधान बदलते. चटणी वापरलेला भात खरोखर काळपट दिसतो, तर मसालेभात मातकट तपकिरी.
शाळा कॉलेजात असताना केवळ ह्या काळ्या भातासाठी लग्ना-वास्तूकांच्या आमंत्रणांना झाडून हजेरी लावल्याची आठवण झाली आज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिने कोमल चावल म्हणून एक
तिने कोमल चावल म्हणून एक तांदूळ आणले होते. ते शिजवावेही लागत नाहीत. पाण्यात भिजवले कि झाले. त्यावर मग ते दही घालून घेतात. >>> दिनेशदा, मी हे चित्रातले मणिपुरी तांदुळ ऑर्डर केले आहेत. ते जर शिजायला कोमल असतील तर गोअन ब्राउन राइसबरोबर नाहीच चालणार. मग त्यासाठी घरातला साधा तांदुळच लागेल ना?
फोटो बघुन खुप छान असणार ह
फोटो बघुन खुप छान असणार ह राईस असे वाटतेय.
पुण्यात कुठे मिळाला तर नक्की करुन बघेन.
ईतक्या छान रेसीपी साठी धन्यवाद.
रेसिपी छान दिसतेय. मनीमाऊ
रेसिपी छान दिसतेय.
मनीमाऊ काळा तांदुळ आणि कोमल चावल वेगवेगळे असतात. त्या लिंकबद्दल थँक्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी मणिपुरला काळ्या तांदळाचा भात खाल्ला आहे. नुसता खाल्लातर चिकट, चवदार पण अगदी किंचीत कडवट होता. मणिपुरी लोकांनी सांगितल्याप्रमाणे तो काळा भात आणि त्यावर पांढर्या तांदळाची थोडी खीर घालुन अगदी चविष्ट लागला. मणिपुरी जेवणात इतके प्रचंड पदार्थ होते आणि हा भात सगळ्यात शेवटी , पोट तुडंब भरल्यावर वाढला त्याचे फारच वाईट वाटले होते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जपानमधेही काळा राईस खाल्लाय. तिथे तो बहुतेकदा पांढर्या भाताबरोबर मिक्स करुन बनवला जातो. चिकट असतो आणि चवदार असतो. हा शिजवायला बराच वेळ लागतो असा अनुभव आहे.
चान आहे ...रेसिपी.. आमच्या
चान आहे ...रेसिपी..
आमच्या इकडे संगम्नेर भागात "काळ भात " मह्नुन मिळतो ..तो पण फार भारी लागतो...आम्ही आणतो नेहमी..
मनिमाऊ, सावलीने
मनिमाऊ, सावलीने लिहिल्याप्रमाणे हे आणि कोमल राईस वेगळे. हे शिजायला मात्र भरपूर वेळ लागतो. किंचीत कडवट तरी पण छान चव असते, म्हणून इतर तांदूळ मिसळत असावेत.
एस एल डी, नगर जिल्ह्यातले संगमनेर ? मग मित्रांना सांगायला पाहिजे.
हो नगर जिह्यातले
हो नगर जिह्यातले संगमनेर..आम्ही पुण्यात आणतो तांदुळ विकायला..जीरे साळ, काळ भात , आंबेमोहर हातसडीचे..
मस्त.
मस्त.
'काळे राळे गोरे राळे, काळ्या
'काळे राळे गोरे राळे, काळ्या राळ्यांत गोरे राळे, राळ्यात राळे गोरे राळे' असे आम्ही म्हणत असू. राळे हे एक भरड धान्य आहे. गुजरातीत (आणि काही ठिकाणी मराठीतही) त्याला कांग म्हणतात. गुजराती लोक पक्ष्यांना हेच कांग घालतात. मात्र अंगावर राळ उडणे या वाक्प्रचारातली राळ हा एक अगदीच वेगळा प्रकार आहे. ही राळ लाखेपासून बनते. काही ठिकाणी लाखेलाच राळ म्हणतात. लाख हा एक प्रकारच्या किड्यांच्या माद्यांतून निघणार्या स्रावापासून बनणारा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. महाभारतातले लाक्षाघर हे या लाखेपासूनच बनवले होते. लाक्षा म्हणजे अर्थातच लाख. पूर्वी शिक्का किंवा मोहर उमटवण्यासाठी आणि दस्तऐवज लखोटाबंद करण्यासाठी लाख वापरत. मुद्रा किंवा मोहरेचा लाखेतला ठसा उमटवण्यासाठी ही लाख किंवा राळ वितळवावी लागे. वितळताना तिचे बारीक कण तडतड उडत. (जशी दाट भाजी उकळताना रटरट उडते.) अंगावर उडले तर चटका बसे. राळ उडणे, अंगावर चिखल उडणे, किटाळ उडणे(येणे) हे सर्व बहुतांशी समानार्थी वाक्प्रचार आहेत.
हीरा, मग धूप म्हणून जी राळ
हीरा, मग धूप म्हणून जी राळ वापरतात ती कुठली?
हीरा, ती लाख आमच्याकडे होती.
हीरा, ती लाख आमच्याकडे होती. पत्रांना सील करण्यासाठी वापरत. अजूनही पोस्टात वापरतात ती ! ( परदेशी पार्सल पाठवताना वापरतात. )
मुंबईत कांग मिळते ( लव्ह बर्डस ना घालतात ) त्याचे दाणे किंचीत होडीच्या आकाराचे असतात. त्यातच राळ हे धान्य निघते का ?
हीरा, दिनेश, छान माहिती!
हीरा, दिनेश, छान माहिती!
हा राईस जास्त पोष्टिक असतो
हा राईस जास्त पोष्टिक असतो का? पांढरा आणि ब्राउन च्या स्केल मधे कुठे फिट होतो हा?
फोटो एक्दम टेम्पटींग आहेत.
फोटो सॉलिड मस्तच. मला
फोटो सॉलिड मस्तच. मला मश्रुम्स नाही आवडत.
हिरा छान माहिती.
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती आणि फोटो.
मी बाम्बू राईस करुन पाहणार
मी बाम्बू राईस करुन पाहणार आहे. जवसासारखा असतो.
आदिती... या तांदळाचे गुणधर्म
आदिती... या तांदळाचे गुणधर्म आणि पौष्टीक घटक नेहमीच्या तांदळा पेक्षा वेगळे आहेत. पण वेगळी चव असल्याने, रोज खायला कितपत आवडेल त्याची शंकाच आहे.
हर्ट, कुठे मिळाला बाम्बू राईस ? त्याची खीर पण छान होते म्हणतात. जमले तर फोटो देशील का ?
या तांदळाला एक करुण किनार आहे. याचे पिक अमाप येते, पण नंतर उंदीर वाढतात व रोगराई येते, असा समज आहे. शिवाय यानंतर सर्वच बांबू मरतो.
Pages