साखर आंबा (हापुस + तोताफल्ली/ तोतापुरी आंब्याचा)

Submitted by सायु on 18 July, 2016 - 08:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उन्हाळा संपत आला आणि एक चांगला मुसळधार पाऊस येऊन गेला की आपण सग़ळे लोणचे, तक्कु, साखर आंबा, गु़ळआंबा करायाला सुरवात करतो.. वर्षभर साठवुन ठेवायचे असते, त्यामु़ळे ते छान टीकले पाहिजे म्हणुन लोणचे घालतांना पावसाची वाट तर हमखास पहावीच लागते.. साखर आंब्याचे तोतापुरी आंबे सुध्दा वड सावित्री पासुन तर जुलै महिन्या पर्यंत छान लालसर केशरी आणि गोड मिळतात.. साखर आंबा लहानांन पासुन तर जेष्ठांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा.. उपवासाला पण चालतो. तसेच पोळी, पराठे, ब्रेड कशाबरोबर ही छानच लागतो.. श्रावण सोमवारचे उपवास सोडतान तर पानात याला मानाचे स्थान.:)
तर वळुया कृती कडे...

तोतापुरी आंबा = १ कीलो ,( १ कोलो मधे साधारण ३, ते ४ बसतात') सोलुन जाडसर खिसुन घ्यावा..
(आंबा निवडतांना छान लालसर केशरी, पण कडक, नरम असेल तर खिसायला त्रास होतो ,म्हणुन जरा थाडा असलेला निवडायचा, हिरवट आंबा, आंबट निघतो आणि मग खुप साखर घालायला लागते)

हापूस आंब्याच्या रस = दीड् ते दोन वाट्या.. (४, आंब्याचा पुरेसा होतो)

साखर = खिसलेल्या आंब्याच्या दीड पट

जायफळ विलायची पुड + केशर ,
दोन, तीन लवंगा (ऐच्छीक)

क्रमवार पाककृती: 

तर सगळ्यात आधी आंबे धुवुन पुसुन कोरडे करावेत, मग सोलुन त्याचा जाड खिसणीने खिस करावा, आणि खिसाच्या दीड पट साखर घालुन एका जाड बुडाच्या गंजात एकतास भर झाकुन ठेवावे.. आता हा गंज/पातेलं गॉस वर मंद आचेवर ठेवावे.. अधुन मधुन ढव़ळत रहा, पाकाला यऊ लागले की त्यात हापुस आंब्याचा रस घालावा आणि दोन तारी पाक होईस्तोवर शिजवत राहावे..

गार झाला की मग त्यात जायफळ - वेलची पुड आणि केशर घालावे, वाटल तर लवंगा पण कुटुन घालाव्या..(लवंगाचे वेरीयशन हेमा ताईंकडुन समजले, आणि चवीला छान देखिल लागले ) आता काचेच्या हवाबंद बरणीत भरुन ठेवा.

नाशता आणि जेवणाची लज्जत वाढवायला साखर आंबा तयार आहे..:)

माझ्या माहेरी, जेवतांना साखर आंब्यावर साजुक तुप घ्यायची पध्दत आहे..:)

वाढणी/प्रमाण: 
काय सांगु
अधिक टिपा: 

हापुस आंब्याच्या रसा मु़ळे खुप सुरेख चव येते आणि रंग देखुल खुलुन येतो.:)

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव.. पाकृ वाचुन खावासा वाटला हा साखर आंबा. Happy अरे वा,, फोटो पण.. आता तर लाळच गळायला लागली...

मस्त फोटो! थोड्या प्रमाणात करून पाहीन.
साखरांब्यात हापूस च्या रसाची अ‍ॅडीशन नवीन आहे.
कैर्‍यांच्या दिडपट साखर + हापूसचा गोड रस यानी अतीगोड तर होत नाही ना?

मस्त मस्त , सायु ! फोटु तर जबरी.
साखर आंब्यावर साजुक तुप घ्यायची पध्दत आहे. >>>+१ , आमच्याकडेही.

अवांतर : मायबोलीवरील आवडलेल्या पाकृ.ची चव घेता येईल, याची (किमान पहिल्या दहा प्रतिसाद देणार्‍यांस)सोय व्हावी. Wink

फोटो फारच मस्त ... हापूस आंब्याच्या रसाची कल्पना छान वाटतेय ..मला खूप आवडतो साखरआंबा आता कधी एकदा खाईन अस झालंय ..
माझ्या माहेरी पण साखरआंब्यावर तूप घेऊन खायची पद्धत आहे Happy

आमच्या घरी तर खास माझ्यासाठी तोतापुरी पण न वापरता हापुस आंबा व थोडा त्याचाच रस वापरुन साखरांबा बनवला जातो. साखरांब्याप्रमाणेच फणस व अननस पण वापरता येतात व ते कमाल लागतात. Happy