त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले. म्हणजे फाश्टफ्रेंड हो. तर त्याने यापेक्षा भारी आयडीया दिली. म्हणाला हाटेल कशाला? सीधी बात नो बकवास! आपलीच माडी बांधून घे की. कमॉन, मन साफ तन साफ तर माडी बांधण्यात कसले आलेय पाप!
बस्स सकाळ होताच हाच डायलॉग 'उठी उठी गोपाळा' या आमच्या व्हॉटसप ग्रूपवर चिपकवला. एकेक संत महंत उगवू लागले आणि प्रत्येकाला ही आयडीया आवड्यायला लागली. हो हो करता सारेच जण त्या मला म्हणू लागले तू हो पुढे आणि ईथे माझ्या डोक्यात मेणबत्ती पेटली..
तर एक प्रे ता त्मा म्हणाला, आपले काय दुकान आहे ? समुद्राला भरती आल्यावर आपल्या माडीकडे कोण बघणार ? पण उगाच ती माडी बघून एखाद्या कुत्र्याला मोह अनावर झाला तर ईंज्जतीचा पंचनामा होईल तो वेगळाच. समुद्राजवळ भटकी कुत्री असतात म्हणे . . .
तर, आता ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून,
१) दहा दिवसांत लज्जानिवारण करण्याईतपत मजल्यांची माडी कशी चढवावी?
२) यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरुपी योजनेच्या अंतर्गत येत्या चार-सहा महिन्यात माडीचे पक्क्या हाटेलात रूपांतर कसे घडवावे?
माहिती दोघांची तितकीच गरजेची नसली तरी कृपया आधी नंबर १ बाबत नका सुचवू. मी केळ खात नाही पण आता आणखी वेळ नक्की खाऊ शकतो.
एवढे दिवस हाटेलात धिंगाणा घातला, आता काही दिवस माडीवर धिंगाणा घालायचा विचार करतोय.. खरंच, धिंगाणा घालायला वय नसते..
कसले धन्यवाद वगैरे नाहीत !
आपला पा. जी. माडीवाले
हैला लोकं माडीवरून चड्डीवर
हैला लोकं माडीवरून चड्डीवर घसरली की![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धनि ये अपने चॉईस का मामला है
धनि ये अपने चॉईस का मामला है![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माडीवर चढल्यावर अजुन काय
माडीवर चढल्यावर अजुन काय शिल्लक राहणार आहे रे धनि ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
श्री , तुम्ही आमच्या सोज्ज्वळ
श्री , तुम्ही आमच्या सोज्ज्वळ माबोची बेकरी करताय हां!
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तोंड , आपलं- बोटं आवरा!
श्री पेटेश.
श्री पेटेश.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी चुकून अल्पावधीत माडी कशी
मी चुकून अल्पावधीत माडी कशी 'चढावी' वाचले......
एका 'वा' च्या अभावी अर्थाचा अनर्थ होउ शकतो!
अरे काय वात्रट आहेत लोक
अरे काय वात्रट आहेत लोक![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
साती तुमची पोस्ट पाहुन मला ती
साती तुमची पोस्ट पाहुन मला ती म्हण आठवली , मी नाही............ वगैरे वगैरे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
चालतंय! तसंच आहे ते!
चालतंय!
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तसंच आहे ते!
आवरा अरे
आवरा अरे
श्री >>> हा हा..हा हा..हा
श्री >>>
हा हा..हा हा..हा हा..
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खरच आवरा अरे...
इथे प्रो़जेक्टची डेड्लाइन आलीय जवळ... सारख माबो याव लागत प्रतीसाद वाचायला...
एक आयडिया ... मायबोलीवाले एकाद अॅप का नाही बनवत हो.. नोटिफीकेशन पॉपअप होत राहतील अस..
म्हणजे एखाद्या धाग्याला सबस्क्राइब केल की मग नोटिफीकेशन पॉपअप होत राहतील...
मायबोलीवाले एकाद अॅप का नाही
मायबोलीवाले एकाद अॅप का नाही बनवत हो.. नोटिफीकेशन पॉपअप होत राहतील अस..
म्हणजे एखाद्या धाग्याला सबस्क्राइब केल की मग नोटिफीकेशन पॉपअप होत राहतील... >>>> १०० मोदक
@ मायबोली अॅप .. +७८६
@ मायबोली अॅप .. +७८६ ..
माझ्या ऑफिसमध्येही मागे एकाने मायबोलीबाबत उत्सुकता दाखवत पहिला प्रश्न हाच विचारला होता की, मायबोलीचे अॅप आहे का? मी नाही बोलताच पुन्हा मायबोलीबद्दल कधीच काहीच विचारले नाही. जर अॅप असते तर मायबोलीची सदस्य संख्या आज किमान एकने नक्कीच वाढली असती.
पण खरेच शक्य आहे का माबोचे मोबाईल युजर फ्रेंडली अॅप बनवणे?
मोरपंखिस आणि ऋन्मेष , नेकी और
मोरपंखिस आणि ऋन्मेष , नेकी और पुछ पुछ , होऊन जाऊद्या , काढा एक बाफ , मायबोली अॅपवर.
श्री : मोरपंखिस आणि ऋन्मेष ,
श्री : मोरपंखिस आणि ऋन्मेष , नेकी और पुछ पुछ , होऊन जाऊद्या , काढा एक बाफ , मायबोली अॅपवर.
तु म्हणत होतास..आणि मी बाफ सबमीट करत होतो..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अत्ताच काढला बघ..
http://www.maayboli.com/node/59381
हय रे पट्ठे , होऊन जाऊदे .
हय रे पट्ठे , होऊन जाऊदे .
रुंम्या अरे तू स्टार आहेस
रुंम्या अरे तू स्टार आहेस मायबोलीचा ...
सगळे कॉपी करतायत तुला
अर्थकारणआधारउद्योजकक्षेत्रझेन
अर्थकारणआधारउद्योजकक्षेत्रझेनभटकंतीकूटप्रश्नगुंतवणुकजमीन जुमलायोगलेखनसंगीत-नाटक-चित्रपटसंगीततत्त्वज्ञानधर्मनिसर्गपर्यावरणप्रवासमनोरंजनसंगीतसंस्कृतीसंशोधन/अभ्याससमाजअवांतर
काही संबंध आहे का.. किती ठिकाणी टॅग करून ठेवलाय
Pages