पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात.
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! )
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये.
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!)
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?)
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो.....
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
आताच का बया गाण्यात वर्गात
आताच का बया गाण्यात वर्गात शिरायच्या आधी क्षणभरच, आर्ची खरंच घाबरलेली, बावरलेली, पुढे काय होणार ह्या कल्पनेने मोहरलेली दाखवली आहे. तसे एक्स्प्रेशन्स एकदाही नसते तिच्या चेहर्यावर तर ती प्रेमात पडली आहे असे वाटलेच नसते.
परश्या सल्या बाळ्या आरचीला
परश्या सल्या बाळ्या आरचीला फेसबुकवर शोधत असतात. ती सापडत नाही तेव्हा परश्या आता रं म्हणून दोघांकडे पाहतो. तेव्हाचे त्याचे एक्सप्रेशन्स क्यूट आहेत. खूप निरागस वाटतो तेव्हा. >> +१ साधना
परश्याकडे एकटक बघत असते आणि
परश्याकडे एकटक बघत असते आणि मग परश्या बाहेर जातो तेव्हा आर्चीचे एक्स्प्रेशन म्हंजे 'माझं काय चुकलं? हा असा का गेला असेल? असे प्रश्नचिन्ह असलेले बावचळलेला तिचा चेहरा, एकदम लाजवाब
<<
ते 'माझं काय चुकलं ' एक्स्प्रेस्श्न नाही वाटलं मला , ' how could you ?' असं वाचलं मी,
'मी एवढी बघतेय असा उठून कसा गेलास ' वाटलं मला ते एक्स्प्रेशन
7 more to go to get to next
7 more to go to get to next century!!!
In one of the versions of the movie on youtube, Salya's phone ring tone is Zing Zing Zingaat..
मित्रहो असच एक मनात
मित्रहो असच एक मनात आल...
"सैराट" मुळे मराठी सिनेमा मध्ये आता काही नवीन बदल येतील का ?
जर उत्तर "हो" अस असेल तर ते कोणते बदल असतील वा असलेले/झालेले आवडतील ?
>>"सैराट" मुळे मराठी सिनेमा
>>"सैराट" मुळे मराठी सिनेमा मध्ये आता काही नवीन बदल येतील का ? >>
नवीन धागा काढा. विषय वेगळा आणि छान आहे. बरंच काही लिहिता/सांगता येईल यावर. या धाग्याचे प्रतिक्रिया लिमिट देखील संपले आहे - माबोवर २००० चं लिमिट आहे बहुदा.
माझ्यापुरतं तरी आता दुसरा कोणताही सिनेमा बघताना एक प्रेक्षक म्हणून माझी नजर नक्कीच बदलली आहे.
धनश्री | >>> आभार..सुचवल्या
धनश्री | >>>
आभार..सुचवल्या बद्दल... उघडलाबघ नवीन धागा..
http://www.maayboli.com/node/59321
काल एक हॉलिडे नावाचा अक्षय
काल एक हॉलिडे नावाचा अक्षय कुमारचा सिनेमा बघायला घेतला. कुठेतरी हा बरा सिनेमा आहे असे वाचल्याचे आठवत होते. पहिल्या १५ मिनिटात अशक्य हसून बंद केला. अतिशय फालतू कॉमेडी, कशाचा कशाला पत्ता नाही असे संवाद आणि कलाकार. काय अशक्य भंपकपणा होता.
सिनेमाचा पट (कपडे, कला, पार्श्वभुमी) कसा असावा याचा सैराटने उत्तम नमूना घालून दिला आहे.
2199
2199
2200 अभिनंदन
2200 अभिनंदन
२२०० बद्दल अभिनंदन. नविन धागा
२२०० बद्दल अभिनंदन. नविन धागा ही पाहिला आताच !
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=_knVH7C4ZTI&itct=CBoQpDAYACITCJbmzKO16c0...
सैराट झालं जी ,या गाण्याला १ कोटी views आले आहेत,हा मराठी गाण्याला मिळालेला युट्युबवरचा सर्वात मोठा रिस्पॉन्स आहे.
वाह...
वाह...
सैराट झालं जी ,या गाण्याला १
सैराट झालं जी ,या गाण्याला १ कोटी views आले आहेत,हा मराठी गाण्याला मिळालेला युट्युबवरचा सर्वात मोठा रिस्पॉन्स आहे.
>>सिजि - ते १ मिलियन म्हणजे १० लाख आहे.
काल लक्षात आलेली अजुन एक
काल लक्षात आलेली अजुन एक गोष्ट. पोलीस स्टेशन च्या सीन मधे, जेव्हा आर्ची पेपर फाडून टाकते आणि मी त्यांना पळवले वैगरे बोलत असते तेव्हा एक सीन पोलीस स्टेशन च्या बाहेरुन शूट केला आहे, त्यात आर्ची वर कॅमेरा यायच्या आधी एका बोर्ड वर 'FIRE' अशी अक्षरे दिसतात.
त्या सीन चं आणि पुढे इंटरव्हल
त्या सीन चं आणि पुढे इंटरव्हल होईपर्यंत चं सगळंच म्युझिक भन्नाट आहे.
सिजी, राजू७६ ही लिंक
सिजी, राजू७६ ही लिंक बघा
https://www.youtube.com/results?sp=CAM%253D&q=sairat
बादवे झिंगाटला सुद्धा कोटीच्या वर व्हुव्स आहेत. तरीही एकेका गाण्याचे दोन-दोन वर्जन आहेत. त्यांची टोटल वेगळीच भरेल
आर्चीमय, माझ्या
आर्चीमय, माझ्या माहितीप्रमाणे,
१,०००,००० हे १० लाख
आणि
१०,०००,००० हे १ कोटी
Aarchimay अगदी खरय..!! आणि
Aarchimay अगदी खरय..!!
आणि त्या झिंगाटला च्या दोन्ही गाण्याच्य तर ज़वळ पास.. २ कोटी च्या वर आहेत !!!
टि.प.. : कोणाला शन्का असल्यास.."तुनळी" वर स्वःता "Sairat" टाइप करा आणि मोजा..!!
माझी जुनी पोस्ट...
morpankhis | 2 July, 2016 - 02:51
मी असच सहज म्हणुन पाहिल... तुनळी वर यातील चारही गाण्यच्या (जे ओफीशियल आहेत ते)
त्याच्या एकुण हिट्स ४१ मिलीयन च्या वर आहेत..
म स्त च...!!!! >>>>
४१ मिलीयन == ४.१ कोटी..
तुनळी == युट्युब
मंजुळेनी जब्या / सोमनाथला पण
मंजुळेनी जब्या / सोमनाथला पण सैराटमध्ये संधी द्यायला हवी होती.
कशाला श्री? त्यांनी पोरांना
कशाला श्री?
त्यांनी पोरांना नाव कमवून दिलं आता पुढचं पोरांनी स्वतः बघायचं
मंजुळे बहुदा रिंकु आणि आकाशला पण परत इतक्यात रोल ऑफर करायचे नाहीत.
तशीच भूमिका असेल तर का नाही
तशीच भूमिका असेल तर का नाही देणार? प्रिन्सदादा तीनही चित्रपटात आहे, रोलला सूट होईल असे वय तीनही चित्रपटात आहे, त्याने काम केलेयही तितक्याच सहजतेने. जब्या झिंगाट गाण्यात दोन सेकंद दिसतो.
जब्याला परश्याचा रोल दिला असता तर फँड्रीचा उत्तरार्ध वाटला असता. फँड्री मी आता बघितला, सतत पराश्याच आठवत होता. अर्थात फँड्री खूप वेगळा आहे, त्यात जब्याची शालूवरची ओढ जेवढी दिसते तेवढेच त्याचे आपली कुवत नाही हे सतत जाणवणे दिसत राहते. जात जितक्या ठळकपणे फँड्रीत येते तितकि सैराटमध्ह्ये नाही. सैरातमध्ये ती अदृश्यपणे जाणवते.
ह्म्म्म! ते ही झालंच म्हणा
ह्म्म्म! ते ही झालंच म्हणा
माझी मैत्रीण मुळशी तालुक्यात
माझी मैत्रीण मुळशी तालुक्यात आठवी, नववी दहावीच्या मुलांना शिकवते तिथे सैराट सिनेमा बद्दल चर्चा प्लॅन केली आहे. मुलांना गाणी आवडतात पण इतर बाबतीतही चर्चा होणे आवश्यक आहे. म्हणून प्रपंच. असे संवाद चित्रपटामुळे सुरू झाले तर भविष्यात काही अनावश्यक हत्या होणार नाहीत असे वाट्ते.
झिन्गाट गाण्याच्या आधी आर्ची
झिन्गाट गाण्याच्या आधी आर्ची व परश्याचा फोन कॉल आहे तेव्हा आर्ची च्या मागे पार्टीची लायटिंग केलेली आहे तिच्या मागे लाइटची माळ उघड मिट करते ते तिला एंजल विंग्स असल्या सारखे दिसते पण इन अ विअर्ड वे. ते सर्व लायटिंग तिच्या मनात काय होते आहे ते दर्शवतात. असे मला वाट्ते. थोडे खट्याळ. थोडे घाबरट असे.
जब्याला परश्याचा रोल दिला
जब्याला परश्याचा रोल दिला असता तर फँड्रीचा उत्तरार्ध वाटला असता. >>> नाही नाही , परश्याच्या रोलमध्ये आकाशच परफेक्ट आहे, मी बाळ्या सल्या प्रिन्स सोडुन इतर ही कुठला तरी रोल देता आला असता असं म्हणत होतो. जसा बाळ्याचा चेहरा बोलका आहे तसाच जब्याचा चेहराही बोलका वाटला. पण बाळ्या जबरदस्त नॅचरल आहे. बाळ्याच्या अॅक्टिंग वर फिदा.
फँड्री आवडला नाही त्यामुळे
फँड्री आवडला नाही त्यामुळे जब्या - शालुला पुन्हा बघायची पण काही उत्सुकता नाही..
आकाश रिंकुला बघायला आवडेल पुन्हा पण चॅलेंजिंग असेल सैराट इमेज बाहेर पडून वेगळे रोल्स करणे.
आणखी एक डायरेक्टर स्पेशल ..
आणखी एक डायरेक्टर स्पेशल .. शेवटी अर्चि ची रांगोळी अर्धवटच पूर्ण झालेली दाखवली आहे तिच्या आणि परशाच्या जीवना सारखी .
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=AQ-P5RR7r40&itct=CCkQpDAYASITCKeWv5687c0...
@आर्चीमय ,ध्न्यवाद,मागच्या लिंकमध्ये १०लाख views होत,े या लिंकमध्ये १ कोटी आहे.
, परश्याच्या रोलमध्ये आकाशच
, परश्याच्या रोलमध्ये आकाशच परफेक्ट आहे, मी बाळ्या सल्या प्रिन्स सोडुन इतर ही कुठला तरी रोल देता आला असता असं म्हणत होतो. जसा बाळ्याचा चेहरा बोलका आहे तसाच जब्याचा चेहराही बोलका वाटला. पण बाळ्या जबरदस्त नॅचरल आहे. बाळ्याच्या अॅक्टिंग वर फिदा.>>>> +१११
आर्ची परशा बाळ्या सल्या मंग्या प्रिन्स आनी यांनी आपापली कॅरॅक्टर्स जिवंत करून ठेवलीयेत.
Pages