३-४ बीटं
नारळाचं दूध
कढीपत्ता
१/२ कांदा (अमेरिकन राक्षसी), भारतातला एक चालेल
अगदी अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट
५-६ मेथी दाणे
मोहरी
२ चमचे बडीशेप
२-३ हिरव्या मिरच्या
धने- जिरे पावडर
बीट हा प्रकार कोशिंबीरीत आवडतोच पण बाकी त्याखेरीज जिकडे तिकडे केवळ लोटलेलाच बघितला आहे. मेव्हण्याने मध्यंतरी ही करी खाऊ घातली तेव्हापासून व्यसन लागलं आहे
१. बीटं कुकरमधून शिजवायची आणि सालं काढून तुकडे करून घ्यायचे.
२. तेलात मोहरी, कढीपत्ता, मेथी दाणे, आणि बडिशेप अशी फोडणी करून घ्यायची
३. त्यात बारिक चिरलेला कांदा परतून, शिजवून घ्यायचा.
४. आलं-लसूण पेस्ट आणि धने-जिरे पूड घालून ती शिजवलेली बीटं त्यात परतून घ्यायची
५. शेवटी नारळाचं दूध घालून एक वाफ काढायची
६. भात / पोळीसह ओरपायची
- आलं-लसूण पेस्ट अती घालू नये- उरलेल्या सगळ्या तुलनेने सौम्य मसाल्यांची मजा जाते असं वाटतं.
(No subject)
काय तो रंग! तोंडाला पाणी
काय तो रंग!
तोंडाला पाणी सुटलं बघून.
दिवसाची छान सुरूवात.
धन्यवाद!
छानच !
छानच !
तोपासू , मस्त
तोपासू , मस्त
तोंपासु.. नक्की करणार
तोंपासु.. नक्की करणार
मी खाल्ली आहे बीटरुटाची अशी
मी खाल्ली आहे बीटरुटाची अशी भाजी इथे सिंगापुरात. पण वाफवलेला बीट जरा रबरासारखा लागतो. मला गोल गोल चकत्या करुन बीट जास्त आवडतो. तो कापताना जो रस झरतो तो खूप दाट असतो पण हळदीसारखा कशालाच चिकटून बसत नाही ते एक चांगले आहे.
तुमची कृती आवडली.
अजून कृत्या पोस्ट करा.
लंकेत सगळे काही आकाराने राक्षशीसच असते त्यांची जिलेबीसुद्धा ताटाइतकी गोल असते आणि आकाराने केळ्यासारखी जाड
भारी. नक्की करणार. या
भारी. नक्की करणार. या रेसिपीनं जरा परतून घेतलेली वांगी किंवा शिजवलेल्या दुधीच्या फोडी पण चांगल्या लागतील असं वाटलं.
मस्त! बिटात आलं-लसूण घालताना
मस्त!
बिटात आलं-लसूण घालताना हात अडखळेलच, त्यामुळे जास्त पडायची भीती नाहीच.
छान वाटतय.
छान वाटतय.
आज या पाकृत काही बदल करून
आज या पाकृत काही बदल करून बीटाची सरसरीत भाजी केली.
घरात ओलं खोबरं नव्हतं. म्हणून मग सुकं खोबरं + आलं लसूण पेस्ट + हिरव्या मिरच्या + जिरे + कोथिंबिरीचं वाटण केलं. फोडणीत कांदा परतल्यावर वाटण घालून तेल सुटेस्तोवर परतलं. मग बीट, धणेपूड घालून परतलं, एक वाफ आणली. त्यात थोडसं पाणी, एम टी आरचा सांबार मसाला सढळ हस्ते व मीठ घालून पुन्हा थोडी वाफ आणली. गॅसबंद करून मसाला मुरू दिला. चांगली चव आली होती भाजीला. यावेळी आणलेली बीटं चवीला जरा तुरट वाटली. त्यामुळे सांबार मसाला, हिरवी मिरची व मीठ यांनी भाजी तारली.
संशोधक, दिनेश, ऑर्किड, मॅगी,
संशोधक, दिनेश, ऑर्किड, मॅगी, हर्ट, सिंडरेला, स्वाती_आंबोळे, सुनिधी, अरुंधती कुलकर्णी- धन्यवाद!
हर्ट- तुमच्या पद्धतीने गोल चिरुन करून बघीन एकदा.. आळस म्हणून आधी शिजवून घेतली.. दुसरं काय? तुमच्याकडेही काही लंकन कृत्या असतील तर जरुर टाका, मजा येईल.
सिंडरेला- करून बघा आणि दुधी / वांगं आवडलं तर सांगा
अरुंधती- मस्त वाटतंय.. सांबार मसाला घालून बघतो पुढच्या वेळेला..
ही भाजी फार म्हणजे फारच सुंदर
ही भाजी फार म्हणजे फारच सुंदर होते. तरी मी नारळाचे दूध जरा कमीच घातले. खुप धन्यवाद रसायन. बीटचा हा इतका चवदार पदार्थ सांगितल्याबद्दल.
अरे वा! धन्यवाद सुनिधी!!
अरे वा! धन्यवाद सुनिधी!!
मी पण केली. सही होते. मी
मी पण केली. सही होते. मी नुस्तीच खाल्ली
तशीही छान लागते. धन्यवाद
तशीही छान लागते. धन्यवाद सानुली!
मस्त यम्मी झाली ही करी!!
मस्त यम्मी झाली ही करी!!
मस्त झाली करी. थँक्स रसायन
मस्त झाली करी. थँक्स रसायन आणि अकु!
मस्तंय. शीर्षक क्रिकेटशी
मस्तंय.
शीर्षक क्रिकेटशी संबंधित असल्यासारखं वाटत होतं म्हणून उघडलाच नाही हा धागा::हाहा:
अरे धन्यवाद सगळ्यांना!! सपना-
अरे धन्यवाद सगळ्यांना!!
सपना-
100% करणार
100% करणार
छान
छान
मी सुकी भाजी बनवते...सेम
मी सुकी भाजी बनवते...सेम प्रोसिजर फक्त विदाऊट कोकोनट मिल्क आणि आलं लसूण पेस्ट....
अशी बनवेन एकदा..
हो मी सुद्धा बीटा ची कोशिंबीर
हो मी सुद्धा बीटा ची कोशिंबीर किंवा नुसतंच सॅलेड म्हणून असंच खाल्लय आत्तापर्यंत. नारळाचं दुध घालून बघितली पाहीजे करी .
ही भाजी करुन बघेन,
ही भाजी करुन बघेन,
बिटाची जिरे फोडणीला घालून खोबरक, कोथिंबीर आणि मिरची वाटून घालून पण भाजी छान होते.
मी हा प्रकार कुणाकडेतरी
मी हा प्रकार कुणाकडेतरी खाल्ला आहे. फॉर चेंज चांगला आहे. आता एकदा करून पाहिन. बीट आणावं लागेल
मी हा प्रकार कुणाकडेतरी
मी हा प्रकार कुणाकडेतरी खाल्ला आहे. फॉर चेंज चांगला आहे. आता एकदा करून पाहिन. बीट आणावं लागेल
चांगली होते ही करी. मी दोन
चांगली होते ही करी. मी दोन तीन वेळा केली आहे.
मी आधी पण दोन तीनदा बनवली आहे
मी आधी पण दोन तीनदा बनवली आहे.. आज फोटो काढला.. छान बनते या रेसिपीने.