पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात.
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! )
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये.
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!)
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?)
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो.....
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
चिनूक्स तू आता सैराट टीमच
चिनूक्स तू आता सैराट टीमच घेऊन ये रे सगळी. एकदोगांनी न्हायी व्हायचं काम....>>>
हितगुज दिवाळी अंक मध्ये किंवा गणेशोत्सव स्पेशल करता येईल. तोपर्यंत सैराट ची टीम पण सद्ध्याच्या रणधुमाळीतुन मोकळी झाली असेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सैराट टीम माधुरीच्या शोमध्ये
सैराट टीम माधुरीच्या शोमध्ये आली असतानाचा फोटो!
लेडी गब्बर ला माझा मानाचा
लेडी गब्बर ला माझा मानाचा मुजरा - १
"माझ नाव अर्चना पाटील.
मला बारावीला ५५ टक्के.
मला पोहायला आवडते
पिक्चर बघायला आवडतो
बुलेटबी चालवायला आवडते
अजुन काय ग?
बया.... मला काय माहीत तुला काय आवडत? तुझ काय बी असत.
बस्स एवढच"
----------------------------------------------------
आर्ची - काय बघतोय र...
परशा - कुठ काय...खोखो बघतोय
आर्ची - खोखो? मगापासून डोळा आ वासून बघतोय माझ्याकड
परशा - तुला कस कळाल तुझ्याकडच बघतोय म्हणून
आर्ची - मी माझ्या डोळ्याने बघितल
परशा - तूच कशाला बघते, तूच नकोस ना बघू
आर्ची - मी बघीन तर काय पन करीन
परशा - मी पन बघीन तर काय पन करीन. तुला नसन आवडत तर नको बघू
आर्ची - मी कुठ म्हटल मला नाही आवडत.....
काल बोरिवली ते ठाणे बस ने
काल बोरिवली ते ठाणे बस ने ट्रॅव्हल करताना टिकिटाच काम उरकुन कंडक्टर जागेवर येउन बसला अन ड्रायव्हर ला सांगत होता .. सैराट बघितला का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लय भारीये पिक्चर.. ८२ कोटी केलत..
नाना पाटेकर्चा नटसम्राट हे ना त्यला पण माग टाकल..
मी भिवंडी ला जाउन बघुन आलो..
खुप खुप बोलत होता .. मजा आली ऐकताना..
हाच धागा आठवला
आता बघतेय. ते प्रिन्स केवढसं
आता बघतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते प्रिन्स केवढसं हाय
मोसा, एक नंबर. अजुन खोखो
मोसा, एक नंबर. अजुन खोखो च्या सीन वर। बोलणं च नाही झालं. होऊन जाऊदेत मंडळी.. कार्य हाय घरचं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोअर दिल्ली वाली मुलं जाम
कोअर दिल्ली वाली मुलं जाम डोक्यात जातात.>> म्हणून चांगला खेळुनही विराट आवडून घ्यावा लागतो आम्हांस
(अवांतर आहे.)
धागा सुरुवातीपासून वाचायला देखील मजेशीर वाटतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कार्य हाय घरचं >> व्हय व्हय
कार्य हाय घरचं >> व्हय व्हय होऊदे खर्च![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लेडी गब्बर ला माझा मानाचा
लेडी गब्बर ला माझा मानाचा मुजरा - २
ए मनग्या सोड त्याला...
आर तुला मराठीत सांगितलेले कळत का, की इंग्लीश मधे सांगू? सोड...
मनग्या इकड ये र...
पुन्हा त्याला हात तर लावून बघ, नाही तुझ थोबाड फोडल तर नावाची आर्ची नाही.
--------------------------------------------------------------
आर्ची मला तू लय आवडते..
मला पण तू आवडतो...
मराठीत सांगितलेल कळत नाही, इंग्लीश मधे सांगू?
I Love you
पाकिस्तानच्या न्यूज पेपरने
पाकिस्तानच्या न्यूज पेपरने सुद्धा दखल घेतलीय सैराटची
परशाला इलु२ बोलायलाही सुचत
परशाला इलु२ बोलायलाही सुचत नाही, तोंड उघडे टाकुन बघत राहतो तितक्याच आनी येतेच...
(No subject)
लेडी गब्बर ला माझा मानाचा
लेडी गब्बर ला माझा मानाचा मुजरा - ३
कस काय आत्या बर हाय ना?
इथून मी थेट शेतात जाणरए
बर का...
एकटीच जाते मी
-------------------------------------------------------------
मला तर खरच वाटना मी इथ आहे,
अन तू माज्या संग बोलतीय
त्यात खर न वाटयला काय झाल
मी खरच आलेय ..
अरे अरे अरे..काय धागा आहे का
अरे अरे अरे..काय धागा आहे का काय चेष्टा.....अरे किती पळवताय...वरा दम खावा की...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
१००० झाले पण...ईथे कामात लक्ष लागेना झालय....सारखं सारखं येउन चेक करतेय नवीन पोष्टी आल्या का ते....
काल परत पाहिला....सेन्सॉर कॉपी मधे....आर्ची आणी परशा फ्लॅट बघायला गेले असताना आर्ची आईला फोन करते आणि फोनवर बोलत असते.....तेव्हा बोलता बोलता मद्धेच मोबाईल ची स्क्रीन बघते आणि मग परत बोलणं कंटीन्यु करते....तोच बाळ्याचा मिसकॉल असतो हे काल कळलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नागराज ने प्रत्येक न प्रत्येक फ्रेम चा कीती विचार केला असेल रे देवा...
ऑस्करला पाठवावा हा पिक्चर असं
ऑस्करला पाठवावा हा पिक्चर असं वाटतंय. भारतीय सिनेमांमधली गाणी नेहेमी आडवी येतात तिथे पण ह्यात एकाही गाण्यात लिपसिंक नाही, गाण्यांतून कथा पुढे जाते आणि सिम्फनीमुळे ही गाणी जितकी लोकल आहेत तितकीच इंटरनॅशनल ! भारतातली जातीव्यवस्था आणि सामाजिक विषमता हा इथे ज्वलंत आणि जागतिक प्लॅटफॉर्मवर नक्कीच कुतूहल चाळवणारा महत्त्वाचा विषय आहे.
लांबी जास्त असली तरी बघताना तसं जाणवत नाही. शिवाय टायटॅनिकसारख्या कित्येक हॉलीवूड मूव्हीजही तीन तासाच्या वर आहेत.
ऑस्करला गेलेल्या इतर काही बॉलिवूड मूव्हीजपेक्षा ह्याची ट्रीटमेंट खूप वेगळी आहे. शेवट एकदम ट्विस्ट इन द टेलसारखा आणि त्यातला खास दिग्दर्शकीय टच ज्यामुळे ही लव्हस्टोरी एकदम लक्षवेधी होऊन जाते ( नंदिनीने लिहिलंय की पिक्चर संपला की परत एकदा शेवटापासून सुरु करुन प्रसंग आठवत जा. खरीच अशी उलटी रिळं फिरतात डोक्यात. ) तसंही ऑस्करला लव्हस्टोरीजचं वावडं कुठेय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
लास्ट बट नॉट द लिस्ट, ऑस्करच्या नामांकनांपर्यंत पोचण्यासाठी अर्थकारण आणि विशिष्ट पद्धतीने पब्लिसिटी फार फार महत्त्वाची आहे. काही अतिशय चांगले चित्रपट ह्याच गणितात अपयशी ठरल्याने पुढे जाऊ शकले नाहीत असे वाचले आहे. पण सैराट ज्या पद्धतीने उचलला गेलाय, त्याची चर्चा फक्त महाराष्ट्रापुरतीच राहिलेली नाही हे बघता त्यांना समर्थ स्पॉन्सर्स लाभतील आणि त्या पाठबळाच्या जोरावर 'सैराट' किमान नामांकनांपर्यंत तरी बाजी मारेल अशी शक्यता दिसतेय
आणि तेव्हाच नेमकं 'दोघांना
आणि तेव्हाच नेमकं 'दोघांना मिळंन मस चाळीस हजार पगारे आता.. ' सांगत असते ते आईला ऐकू गेलंय का नाही ही शंका!
फार एंड ते काचिगुडा स्टेशन
फार एंड ते काचिगुडा स्टेशन आहे. बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला काचीगुडा पोस्ट ऑफिस आहे मी तिथे
काय बाय काम करायला जात असते दर ट्रिपेत. ते कदाचित पॅसेंजर ट्रेन ने आले असतील. १३ ट्रेनी आहेत
सोलापूर ते काचिगुडा.
http://indiarailinfo.com/search/solapur-sur-to-hyderabad-kacheguda-kcg/1...
नंतरच्या शॉट मध्ये इमलीबन बस स्टॉप आहे. सरळ काचीगुडाहून चालत गेले की बस स्टेशन ला जातंय माणूस. विम नस्क अवस्थेत जात असतील ती भुकेली बाळं. इमली बन नदीच्या काठावर आहे.
दुसरे म्हणजे हैद्राबादेत नांदे ड, सोलापूर व मधल्या साईडचे खूप मराठी लोक स्थाइक आहेत. माझ्याकडे काम करणार्या बाईंचा नवरा इथे दुस रे लग्न करून राहात होता( का तर हिला मुलगी झाली )
मग त्या बाईला पण मुलीच झाल्या दोन . ते सोडा. पण त्याला शोधायला ही अशिक्षित काळी सावळी
बाई बाळाला घेउन हैद्राबादला आली बसने. भाषा आजिबात येत नाही. असे काहीतरी मिक्स बोलत असत.
मारवाड्याक्डे मुलीला पाठीला बांधून काम केले. नवरा मेस्त्री म्हणून कन्स्ट्रक्षन साइट वर जाउन शोधायची.
मग त्याने बस्तीत एक खोली हिला बांधून दिली सापडल्यावर. ती आमच्याकडे पण तेलुगुच बोलत असे.
मग एक दिवस अपघाताने ती मरा ठी आहे ते समजले. अत्यानंद. मग आमचे पुणेरी व तिचे गावाकडचे असे
मिक्स बोलणे सुरू झाले. अश्या हिंमत करून राहणा र्या सुमनताईसारख्या बायका आहेत प्रत्यक्षात.
लेडीज ग्रूप असतो. बचत गट. द्वाकरा मेला मध्ये त्या भेटतात. ( म्हणजे तिथले महालक्ष्मी सरस सारखे)
एक एक करत वस्तू घेत. घर बसवतात. आर्ची परश्या सारखेच त्यांचे घर आहे. रिमोट वाला टीव्ही वगैरे अभिमानाने सांगतात बघा म्हणून. घरात पाण्याचा ड्रम. डस्ट्बीण सर्व नीट. अॅप्लिकेशन करून घेतलेला सवलतीतला गॅस. इट इस व्हेरीमच रीअल अॅज इट इज.
आयो!!!!!!!! काय सैराट पळतोय
आयो!!!!!!!! काय सैराट पळतोय धागा!
माझ्याकडे मैत्रिणीने दिलेलं "सेन्सॉर कॉपी" छापलेलं डिविडी वर्जन आहे, त्यात काही गोड सीन्स नाहीतच! म्हणजे होळीचा सीन, दुसर्या कुणाच्यातरी लग्नात अक्षता टाकताना हे दोघं नजरानजर करतात तो सीन, या दोघांचं लग्न आणि मग डोहाळजेवणाचं फोटोशूट, घोडा-गाढव पॅरलल राईड (हा तर कळस!
) हे गयब आहेत. मी ऑफिशिअल गाणी पाहिली होती म्हणून माहिती होतं. त्याऐवजी एकतर कट्स आहेत किंवा दुसर्या गाण्यातले सीन्स टाकलेत. भांडण होऊन निघून गेलेली आर्ची जेव्हा परत येते त्यानंतर लग्न आहे हे मात्र माहिती नव्हतं. मी थेट घर बघायला आलेला सीनच बघितला डिव्डीत. ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
एकूण धम्माल धागा. पण शेवट आधीच समजला होता त्यामुळे सतत सिनेमा बघताना आर्ची-परश्याला "नका रे असं करू! घरी समजेल तेव्हा मराल फुकट!!" असं सांगावंसं वाटलं मला. इतका मनापासून बघितला मी हा सिनेमा!
लेडी गब्बर ला माझा मानाचा
लेडी गब्बर ला माझा मानाचा मुजरा - ४
अस किड्या मुंगीवानी नाही रे जगू वाटत परशा.
मला घरची लैई आठवण येती.
मला तुझ्या पाशीबी राहू वाटत
आणि घरीबी जाउ वाटतय.
मला नाही करमत....
एकटी बसून कसलेबी विचार येतात मनात
परशा मला लई एकटे वाटत....
--------------------------------------------------------------
झक मारायला, मरायला आले मी तुझ्याबरोबाबर .हित...
--------------------------------------------------------------
मी वतलाय, तू देऊन य.
"आर्ची मद्धेच मोबाईल ची
"आर्ची मद्धेच मोबाईल ची स्क्रीन बघते आणि मग परत बोलणं कंटीन्यु करते" - हो खरच की , हे लक्ष्यात आले नव्हते. काय कमाल आहे नागराज ची.
घरी मुलीने काही ऐकले नाही
घरी मुलीने काही ऐकले नाही एकदा सांगुन (तसं तर कधीच ऐकत नाही म्हणा) की मी म्हणते मराती नाय इंग्लिश मदे सांगु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्रॅक्ट्रच्ता सीननंतर शेतात सल्याला-![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुटखा बिट्का खातो काय तु?
आरं गिळला का कय तु गुटका?
आता पुना मला तुम्ही दिसला ना गुट्का खाताना तर मी बरोबर इंग्लिश्मदी सांगीन गुटका खाउन काय होतं ते
सतत सिनेमा बघताना
सतत सिनेमा बघताना आर्ची-परश्याला "नका रे असं करू! घरी समजेल तेव्हा मराल फुकट!!" असं सांगावंसं वाटलं मला. >>>>
सैराट झालं जी गाणं ऐकताना घशात आवंढा दाटुन येतोय. अगदी रोज ऐकते तरीही !
काल यूट्यूबवर लग्न आणि
काल यूट्यूबवर लग्न आणि फोटोशूट मुद्दाम बघितलं कारण ते सीन्स आहेत हेच माहिती नव्हतं. फोटोशूट मधे ती धनुष्य घेऊन फोटो काढताना सारखी हसते पण तेही किती नॅचरल आणि गोड वाटतं! ते बघून तर डोळ्यात पाणीच आलं माझ्या! कशाला मारतात अशा सुखी लोकांना! जीव महत्त्वाचा की तुमचं पॉलिटिकल करिअर आणि समाजाबिमाजातलं स्थान महत्त्वाचं! जगू द्या की त्यांना त्यांच्या पद्धतीने!
खरंच जाणवतंय की मी फार मन लावून बघितला आणि घाव बसल्यासारखं दुखलंय मनात! असा आनंदही आणि त्रासही कधीच नाही अनुभवला मी!
हे
हे बघाच
https://www.youtube.com/watch?v=ceHiu5bLYX0
https://www.youtube.com/watch?v=dRTvxgXhmvs
https://www.youtube.com/watch?v=1aOfKj_fa9M
https://www.youtube.com/watch?v=H6LeCgT_CIo
स्पॉईलर: वाचू नका शेवट पाहिला
स्पॉईलर: वाचू नका शेवट पाहिला नसल्यास.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शेवटच्या सीन मध्ये आर्चीचे एकदम निर्जीव दिसणारे वर बघणारे डोळे पाहिले का?
फक्त त्यांचं एकमेकांना एक्झॅक्ट अपोझिट पडलेलं असणं जरा फिल्मी वाटलं.
मी लिहिलं होतं ऊत्तर माझ्या
मी लिहिलं होतं ऊत्तर माझ्या अंडर्सटँडीग्ग्नुसार. नातं आणी वट मुळे.
<<
बुवा,
लिहिलं होतं का आर्चीधी ?
धागा इतका सुसाट सुटलाय, मिस केलं असणार :).
धागा इतका सुसाट सुटलाय
धागा इतका सुसाट सुटलाय +१११
अरे काही लिहू म्हणल तर १ पान पुढे जातोय हा धागा
शेवट बघवलाच नाही. त्यामुळे
शेवट बघवलाच नाही. त्यामुळे आर्चीचे निर्जीव डोळे वगैरे काहीच पाहिले नाही.
मायबोली जाॅइन केल्यापासून,
मायबोली जाॅइन केल्यापासून, पहिल्यांदा च पाहिले.. कोणतेही वादविवाद न होता, फक्त कौतुकास्पद पोस्टींनी अगदी जलद गतीने पळतोय धागा.. सगळ्यांचं अभिनंदन.!
एखाद्या सिनेमावर इतके धागे आणि प्रत्येक धाग्यावर भरपूर प्रतिसाद..खरचंह्या सैराट ने सगळ्यांना याड लागलं.
अवांतर.. सैराटव्यतिरिक्त कोणता असा दुसरा मुवी आहे का,मराठीत इतके अभूतपूर्व यश मिळालेला..?
फारेंडा, माझ्यामते ढवळी
फारेंडा, माझ्यामते ढवळी म्हणजे वेंधळी टाईप.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
हळद जपून लावा कारण पोर अजून कोवळी आहे म्हणून. हळद त्वचेवर घासली गेल्यावर त्वचेवर भडके मारतात. (म्हणून लग्नात हळद लावण्यापूर्वी त्वचेवर थोडे तेल लावतात. आमच्याकडच्या लग्नांमध्ये काहीजण मुद्दाम कुठलातरी वचपा काढण्यासाठी नवरा-नवरीला मुद्दाम चोळून चोळून हळद लावतात. म्हणून कधी कधी नात्यातली भारदस्त व्यक्तीमत्त्वाची एखादी काकू हळदीसमारंभाच्या वेळी देखरेखीवर असते.
त्या चार ओळी मला स्पष्ट ऐकू येतात. एवढा गोंधळ झाला नाही,
अजयचे उच्चार कुठे कुठे गडबडलेत असे मला वाटले. - झोप लागणं सपान जागवाया लागलं अश्या ठिकाणी.
(आणि हे लिहावेसे वाटत नव्हते पण आता विषय निघालाय म्हणून लिहितो. त्याचे अनुनासिक गाणे कुठे कुठे अचानक लक्षात येऊन रसभंग करते.)
Pages