Submitted by मंजूताई on 16 June, 2016 - 05:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी काजू पूड, १ वाटी रवा, २ वाट्या आमरस, २ वाट्या दूध व ४ वाट्या साखर सजावटीसाठी भोपळ्याच्या बिया/काजू तुकडे
क्रमवार पाककृती:
सगळे जिन्नस एकत्र करून शिजत ठेवा घट्ट होईपर्यंत! एका वाटीत पाणी घेऊन हे मिश्रण टाका. गोळी झाली तर समजा वड्या थापायला हरकत नाही. तूप लावलेल्या ताटलीत पसरवून काजू/बिया शिवरा व वड्या कापा.
वाढणी/प्रमाण:
आवडीनुसार
अधिक टिपा:
रवा भाजायचा नाही व तूप अजिबात नाही.
उपासाच्या करायच्या असतिल तर राजगीरा/शिंगाडा पीठ वापरुनही छान लागतात.
काजू ऐवजी बदाम्/पिस्ता/ओला नारळ्/डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता.
माहितीचा स्रोत:
स्वप्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मस्त मस्त.... तोम्पासु!!
मस्त मस्त.... तोम्पासु!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नागपुरला पोहोचल्या पोहोचल्या 'स्वप्रयोग'????
स्लर्प! मस्त! मंजूताई
स्लर्प! मस्त! मंजूताई धन्यवाद, मस्त सोपी कृती आहे. धन्यवाद!:स्मित:
आर्या, रश्मी नक्की करुन पहा न
आर्या, रश्मी नक्की करुन पहा न फोटू टाकाच...