चार बर्नरची चांगली गॅस शेगडी घ्यायची आहे. कोणती घ्यावी? ?

Submitted by सांश्रय on 7 May, 2016 - 00:10

दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले. वेगवेगळ्या शो-रुम्स मध्ये शोधही घेतला, पण निर्णय घेताना फारच गोंधळायला होते.

मग विचार केला की माबोकरांना विचारायला हरकत नाही याबद्दल...

कोणती गॅस शेगडी घ्यावी, त्यात कोणकोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल.

सर्वाचे अगोदरच आभार मानत आहे.

धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेस्टीजची बघा. अर्थात हा एक पर्याय आहे.
चार बर्नर्स असले की एकाच वेळी चार भांडी मावू शकतात का ? की एकमेकांना अडतील ?

आमची तीन ची ओके आहे.. तीन भांडी बसतात...
विजय सेल्स मधे जाउन बघा.. आम्हाला तिथे खुप ऑप्शन्स दिसले होते.

मागे एकदा कोणत्यातरी चॅनेलला बहुतेक होमशॉप १८ असावा त्यात ४ बर्नरची जी शेगडी दाखवत होते ती एकाबाजुने थोडी उंच होती म्हंजे २ बर्नर वर २ बर्नर खाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एरवी ४ बर्नरच्या शेगडीवर एकाच वेळी चार भांडी मावू शकत नाहीत म्हणुन त्यांनी अशी डिझाईन केली आहे.
तुम्ही या प्रकारची शेगडी पाहिली आहे का नसल्यास सर्च करुन बघा.

मी गेली ५ वर्ष सनफ्लेमची ४ चुल्याची शेगडी वापरतेय.
चांगली आहे. ४ भांडी बसू शकत नाही असा प्रॉलेम कधी आला नाही अजुन.
म्हणजे सकाळी घाईच्या वेळी -
कढईत भाजी घातकी की मागच्या एका गॅस वर. एकावर दुध्/चहाएकावर नाष्ट्याचं काहीतरी.
एकावर चपात्या करायला घेते.
कदाचित माझी भांडी जास्त मोठ्या आकाराची नाहीयेत म्हणुन मला काही प्रॉब्लेम येत नाही.

४ बर्नरची जी शेगडी दाखवत होते ती एकाबाजुने थोडी उंच होती म्हंजे २ बर्नर वर २ बर्नर खाली.>> ड्युप्लेक्स म्हण्तात त्याला.

सनफ्लेमची ग्लास टॉप शेगडी वापरते. 4भांडी आरामात मावतात.
माॅडेल कोणते आहे ते बघून सांगते. खूप उपयोगी पडते.

सनफ्लेमची चार बर्नरची शेगडी आईकडे गेली पाच वर्षे वापरात आहे. चारही बर्नरवर भांडी नीट वापरता येतात. फक्त ओटा तितका मोठा आहे की नाही ते चेक करून घ्या, आईच्या किचनमध्ये ओटा पूर्णपणे शेगडीमुळे अडवला जातो. (नंतर रीनोव्हेशनकरताना ओटा मोठा करून घेतला) पण भाड्याच्या घरात असताना अथवा घरं ब्दालताना ते जमत नाही.

हाच धागा मिपावर पण आहे ना ?
तिथे चार बर्नरच्या शेगडीला साजेल असं घर बदलावं लागलं तरी चालेल असे सल्ले दिलेत.

मिपावर अपेक्षित ऊत्तर मिळणार नाही याची खात्री असल्याने माबोवर सुध्दा बाफ काढला का? माबोपेक्षा मिपावर जास्त प्रतिसाद आले आहेत ना!

@kapoche
मिपावर धाग्यावर उत्तरे देण्यापेक्षा दंगाच चाललाय. धाग्याचं काश्मिर करणार बहुतेक.

@सारिका.चितळे
मिपावरचे प्रतिसाद धाग्याला धरुन असते तर खुप चांगली चर्चा झाली असती, माहिती मिळाली असती जी इथे मायबोलीवर मिळतेय. माझ्या प्रश्नासंदर्भात बरीचशी गंभीरही माहिती मिळतेय व त्यासाठी अभ्यासही सुरु आहे. मुंबई ग्राहक पंचायतीलाही संपर्क केलेला आहे.

माझ्या भावाकडे १० वर्शापासून सन्फ्लेम 4 बर्नर आहे. उत्तम चालतेय. मी सुद्धा २ वर्शापुर्वी सनफ्लेमची ३ बर्नर घेतलीय. तीही उत्तम आहे.
ग्लासटॉप न घेतात स्टीलचीच घेतली. कारण दुकानदार म्हणाला की ग्लासटॉप वर काही अतिशय गरम भांडे चुकुन ठेवले तर तो तडकतो आणि शेगडी वाया जाते. आपण कितीही काळाजीपुर्वक वापरली तरी स्वयंपाकाला बाई येत असल्याने तिने काही चुकुन ठेवण्याची शक्यता होती. किंमतितही खुप फरक होता. म्हणून स्टीलचीच घेतली. मिस्टर मसल स्प्रे करून पुसली तरीही छान चमकते. Happy

@महेश
होय, खरेदीच्या आधीच कारण काही बाबी कळल्यात त्या फारच गंभीर आहेत ज्याकडे ग्राहक म्हणून आपले लक्ष जात नाहिये, पण त्या सर्व गोष्टींची शहानिशा चाललेली असल्याने आत्ताच इथे सांगता येणार नाहित, पण आठवडाभरात कदाचित यावर वेगळा धागाच काढावा लागेल की काय असे वाटते आहे.

मी महिनाभरापुर्वी सुर्या ची ४ बर्नर ची ड्युप्लेक्स ग्लास टॉप ची शेगडी घेतली. सहा हजारात मिळाली. पाडवा ऑफर चालु होती. साधारण फीडबाक चान्गला मिळाल्या मुळेच घेतली. पण कायम काळजी वाटत राहाते की कूकर/जड भान्डे चुकून कुणाच्या हातुन निसटले / गरम काही सान्डले तर काच फुटेल्/तडकेल.
पण ही शेगडी स्वच्छ करणे जास्त सोपे आहे.

ग्लेन ची ४ वर्ष वापरत आहे.काहिही प्रॉब्लेम नाही ४ भांडी आरामात बसतात
ग्लास टॉप आहे पण त्याचाही अजुन काही प्रॉब्लेम आलेला नाही

@मृनिश
ग्लेन ची कोणती आहे. तुम्हाला कुरुडी आणि मी अमि यांनी माहिती दिल्या प्रमाणे ग्लास तापण्याचा वगैरे इतरही अनुभव आला आहे का?

४ भांडी बसतील पण तुम्ही आंघोळीचे पाणी तापवणार म्हणताय .इतके मोठे भांडे बसणे अवघड आहे

पटत असल्यास ३ वाली घ्या, चार बर्नर इतके मल्टिटास्किंग करताना गोष्टी गंडतात्/>>>> + १०
मी सध्या एलिका ची ३ बर्णर वाली वापरते.एक मोठ अंघोळी साठी पातेल, एक मध्यम आकाराची कढई(मधल्या), आनि एक तवा पोळीसाठी अश्या तीन काम होतात एका वेळी.
साफसफाई चा त्रास खुप वाचतो.काचेची असली तरी खुप गरम वगैरे होत नाही.काही कंपन्याच्या शेगड्याची काचेचा बेस ओवरहिंटींग मुळे फुटलेला पाहिला आहे.

चार बर्नरवाली उपयोगी नक्कीच पडते. माझी आधी ३ वाली होती. आता ४ ची आहे. पण तळण करताना कढई मागच्या बर्नरवर ठेवलेली बरी वाटते, सुरक्शिततेच्या द्रुष्टिकोनातून.

जी चार भांडी वरचेवर ठेवली जाणार ती घेऊन जा शेगडि निवडायला. ज्या शेगडिवर ती नीट बसतील ती शेगडि घ्या. बाकी स्टील टॉप ग्लास टॉप डिस्कषन मध्ये शिरणे नंतरचा मुद्दा. भांडि नीट राहाण्याच्या दृष्टिने ड्युप्लेक्स शेगडि जास्त बरी असावी. किंवा ट्रॅपिझियम शेपमधली.

माझ्या घरी मी चारहि बर्नर एका ओळित अशी शेगडि ठरवून घेतली जरी त्यावर तीन भांडी आणि एक तवा नीट एका वेळि राहत नाहि माहित होते. माझ्यासाठी मागचा बर्नर वापरताना पुढच्या बर्नरवर हात भाजू नये ह्याला प्रायोरिटि होती.

berner 1 va 3 var mothi bhandi ....aani 2 va 4 var Tava aani lahan bhande nit rahate...vel barach vachato...

Pages