काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Tya vicky navachya makdala hakla re ...kiti irritating ahe to ..ani tya gauri la kas kalat nai to kasa ahe te

...nehmi
chidka swar...he jara ati hotay ...>>> याच धाग्यावर झीच्या हिरवीनी किती मुळुमुळु असतात याचा उल्लेख आहे तेच वाचल आहे झी वाल्यांनी . आणि ते त्यांनी फारच मनावर घेतल आहे . म्हणून हा ठसका .

ही गौरी जाम डोक्यात जायला लागलीये
बिचारा दोन दिवस उपाशी असतो आणि ही बया त्याला शांतपणे जेवून सुद्धा देत नाही ,
हम शब्दावरून हीच भाषण सुरु Sad Sad Sad
हे भाषण गौरी स्वतःच्या वडीलांना का ऐकवत नाही ?
कारण त्यांना 'हम ' शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची जास्त गरज आहे
कारण ते सतत आपलं परकं करत असतात

आत्ता बघितला एपिसोड.

तो विकी अति अति अति डोक्यात जातो. तो सगळीकडे झोल करतो पैशाचा. त्या आजींना डब्यांची ऑर्डर देतो म्हणून त्या दबुन असतात का त्याला.

गौरीला पश्चाताप झालाय ते शिवशी बोलताना नाही दिसत, घरी रडते. पण शिवला हम बद्द्ल सांगताना कीती तावातावाने सांगतेय, नीट नाही का सांगता येत. त्यामानाने शिव खुपंच सॉफ्ट बोलतो, वैतागला तरी.

प्युअर हिंदी बोलतांना हम आणि आप असं जास्त बोलतात ना. मै, तुम, तु असं नाही. अगदी काही ठिकाणी लहान मुलांनापण आप आप करतात.

माउ ही मालिका झीला असते रात्री ९ आणि १२ वाजता.

प्युअर हिंदी बोलतांना हम आणि आप असं जास्त बोलतात ना. मै, तुम, तु असं नाही. अगदी काही ठिकाणी लहान मुलांनापण आप आप करतात. >>> हो अंजुतै, प्युअर हिंदी मध्ये मी म्हणजे हम वापरतात, आणि तू म्हणजे आप (तू कोणत्याही वयाचा असला तरी Wink )

अर्थात शिवने स्वतःला हम म्हणताना समोरच्याला आप म्हणायला हवं, गौरीलाही.>> एक्झॅक्टली! तसं नाही केलं तर त्या 'हम'मधे दर्पोक्ती वाटते. परस्परांना संबोधताना एक अंतर ठेवल्यासारखं वाटतं. ज्याचा गौरीने चांगलाच समाचार घेतला. एपिसोडच्या शेवटी तिने त्या हमचा 'आम्ही' असा केलेला उल्लेख मला भयंकरच आवडलेला आहे.

मागच्या पानावर कोणीतरी लिहीलंय तसं त्या विकीमूळे ही मालिका बघणं (मलातरी) स्ट्रेसफुल होतंय. कोणाच्याही विश्वासाचा गैरफायदा घेणं (विशेषतः पैश्याची अफरातफर) माझ्यासाठी मालिकेत बघणंसुद्धा नकोसं आहे. शिवाय हा मनुष्य स्वतःला त्याचा मित्र म्हणतो तर बसमध्ये त्याला वाचविण्यासाठी काहीही केले नाही.. एकवेळ आपसात मस्करी केली तरी खरा मित्र आपल्या मित्राला लोकांचा मार खायला वाऱ्यावर सोडत नाही. महा इरीटेटींग कॅरॅक्टर Angry

मुळात युपीवरून आलेला माणूस एका रँडम मराठी माणसाकडे पहिल्या दिवसापासून रहायला लागतो, हेच किती अविश्वसनीय आहे ...

शिव गौरीला चांगल गौरीजी म्हणतो की. आता अजुन काय पहिजे हिला Uhoh एकुणाच तिने जे "हम" वरुन त्याला लेक्चर पाजले ते जरा जास्तच वाटले. ती जामच डिक्यात जाते Angry

गौरी बेंबीच्या देठापासून "गणपती बाप्पा मोरया" किंचाळते ते झेपत नाही.
झी वाले तिला जेवढं रूड आणि स्ट्राँग दाखवत आहेत तेवढं तिचं लग्नानंतरचा अचानक होणारा मेकओव्हर अनझेपणेबल होणार आहे आपल्याला.. कोणाला जर आत्ता तो "आपकी गुढीपाडवा की भेट" वाला प्रोमो आत्ता पहिल्यांदा दाखवला तर त्याचा विश्वास तरी बसेल का?

मुळात युपीवरून आलेला माणूस एका रँडम मराठी माणसाकडे पहिल्या दिवसापासून रहायला लागतो, हेच किती अविश्वसनीय आहे ...>> त्याचा मुंबईतला एकमेव काँटॅक्ट चोबेजी, जे पात्र अजून मालिकेत समोर आलं नाहीये, केवळ संवादातूनच उभं राहिलंय, हे त्या बिल्डिंगचे वॉचमन असतात बहुतेक. ही दोन मुलं इथे भाड्याने घर घेऊन राहत आहेत तिथेच शिवही राहू शकेल, जेणेकरून त्यांच्या संपर्कात राहू शकेल अशी व्यवस्था त्यांनी करणं यात काय अविश्वसनीय आहे? Happy

ते बिल्डिंगच्या वॉचमनचे पात्र समोर येऊन गेले आहे मंजूडी. ते त्याला आधीपासून ओळखत नसतात, हा भुकेलेला असताना खाली जातो आणि ते स्वयंपाक करत असताना त्यांच्याशी ओळख होऊन त्यांच्याबरोबर जेवायला लागतो.

ते त्याला आधीपासून ओळखत नसतात,>> हो का? मग माझी चूक झाली.
पण त्याने घरभाडं शेअर करून राहणं यात अविश्वसनीय असं मला काही वाटलं नाही.

ते गणपती बाप्पा मोरया वगैरे लेक्चर आणखी काही दिवसांनी आलं असतं, (म्हणजे शिवला मुंबईत येऊन १-२ महिने झाल्यावरही तो इथे रुळत नाहीये हे लक्शात आल्यावर) तर आवडलं असतं. काल जरा तो आततायीपणा वाटला.
गौरी भाजीबाजारात वडिलांची मराठी वाक्यं भाजीवाल्यांना हिंदीत करून सांगताना दाखवली होती. असं असताना शिवला मराठी बोललेलं कळत नाहीये हे तिला लक्शात आलेलं नाही हे पटत नाही.
(बहुतेक लेखकालाच यूपीवाल्यांचा प्रचंड तिटकारा आहे. त्यामुळे कधी एकदा त्यांच्याविरोधात जोरदार प्रसंग मालिकेत टाकतोय असं त्याला झालंय. Proud )

प्लस, त्या आजीला हिंदी अजिबातच समजत नाही हे पण पटलं नाही. मुंबईत राहणारी मालवणी आजी, मोडकंतोडकं हिंदी तरी बोलणारच! त्यामुळे कालचा तो विकीचा दुभाषा गंडवागंडवी प्रकार पूर्ण फ्लॉप गेला. Uhoh

एकंदर कालचा एपिसोड बोअर झाला.

असं असताना शिवला मराठी बोललेलं कळत नाहीये हे तिला लक्शात आलेलं नाही हे पटत नाही.>> अगं तिच्या लक्षात आलंय, पहिल्याच भेटीत पत्ता सांगताना. ती मुद्दामच असं करतेय.
आणि आजीचं म्हणशील तर मुंबईत राहणार्‍या आमच्या कोकणी आजीलाही हिंदी अजिबात समजत नाही.

... आणि काल 'गणपतीबाप्पा...'ला तो दक्षिण भारतीय मित्र 'मोरया' म्हणतो, ते लक्शात आलं का? म्हणजे मुंबईत आता लुंगीवाले चांगले रुळलेत, पण भैय्या नाही... असं दाखवायचंय लेखकाला... उद्देश चांगला आहे, पण जरा घाई होते आहे. प्रत्यक्श गणपतीच्या दिवसांत आणि गणपतीच्या दृश्यांत हे बघायला मजा आली असती.

मी काल बघितलेच नाही. नांदा सौख्य भरे मधल्या वेळात प्रोमो मध्ये ती जे किंचाळली त्याने कुत्रे देखील घाबरले. किती लाउड आणि मठ्ठ आहे ती. आता इथे फॉलो करणार आणि काही मेजर झाले तर बघणार. आजी पण कधी मालवणी कधी शुद्ध मराठी( प्रमाण) बोलते. तिची एकूण बोलण्याची पट्टीच
उच्च रवातली आहे. टिपिकल बट अव्हॉइड रे बाबा .

मंजूडी, सर्वसाधारणपणे माणसे पहिल्या दिवशी हॉटेलवर जाऊन घर शोधायला लागतात, नाहीतर ओळखीचे/नातेवाईक ह्यांच्याकडे जातील. युपीवाले त्यांचे गाववाले वगैरे बघतात. हा म्हणजे अगदी इंटरनेटवर लिस्टींग बघून सगळं आधीच बुक करून टाकलंय ह्या थाटात ह्या विकीकडे सामान टाकायला आला, ते अविश्वसनीय वाटले.

आजी पण कधी मालवणी कधी प्रमाण मराठी बोलते >>> हो ना... ते पण फारच खटकतं.

आजकालच्या सर्वच मालिकांमध्ये (खासकरून नायिकांना) एक विशिष्ट स्टाईलचेच कपडे वापरताना दाखवतात. गौरीचे ड्रेस सगळे एकाच पद्धतीचे; आईच्या सगळ्या साड्या एकाच प्रकारचे काठ-पदर असलेल्या... असं का? Uhoh
(त्या तुलनेत 'एलदुगो'त मुक्ता बर्वेचे ड्रेसेस चांगले वाटले होते. साधेच, पण असे छाप नव्हते.)

हा म्हणजे अगदी इंटरनेटवर लिस्टींग बघून सगळं आधीच बुक करून टाकलंय ह्या थाटात ह्या विकीकडे सामान टाकायला आला, ते अविश्वसनीय वाटले.>>> एखाद्या गाववाल्याकडूनच ह्या घराचा रेफरन्स मिळालेला असू शकतो की..

गौरीचे ड्रेस सगळे एकाच पद्धतीचे; आईच्या सगळ्या साड्या एकाच प्रकारचे काठ-पदर असलेल्या... असं का? अ ओ, आता काय करायचं>> +१००

शुभांगी गोखलेला अजून म्हणावं तसं एक्स्पोजर दिलेलं नाहीये, तिचा कारेदुमधला सुभा नाही केला म्हणजे झालं.

आणि सगळे स्कूलबसने गेल्यासारखे काय जातात. सर्व अ‍ॅडल्ट आहेत आपापले जाउ शकतात ना?

पण त्याने घरभाडं शेअर करून राहणं यात अविश्वसनीय असं मला काही वाटलं नाही.>> मलाही. तो वेणू पण सौंदेडियनच दाखवलाय तो पण घरभाडं शेअर करुनच राहतोय की.

विकीबद्दलच्या सगळ्यांच्या सगळ्या पोस्टना मम. मी तो आला की उठून जाते. Angry फक्त पैशांची अफरातफर नाही तर तो प्रचंड स्वार्थी दाखवलाय. इतरांचे संबंध जितके बिघडवता येतील तितके बिघडवून स्वतःचा फायदा करून घेणारा.

Pages