रेमेदी चर्च परिसर -वसई

Submitted by पाटील on 8 September, 2009 - 00:05

IMG_7352-small.JPG
चित्र मोठ्या आकारात पाहाण्यासाठी कृपया http://colors-etc.blogspot.com/ या ब्लॉगवर जाउन चित्रावर टिचकी मारा

गुलमोहर: 

सुंदर चित्र.
मला एक छोटी शंका आहे. इतर कुठलंही माध्यम वापरताना रेषा आणि रंग अगदी स्पष्ट असतात तसे वॉटर कलर मधे का नसतात. माझी शंका बालीश असेल पण मला ही शंका नेहेमी येते वॉटर कलरची चित्र पाहताना.

दक्षिणा,कराडकर्,प्रकाश, अभि़जीत- धन्यवाद

अभिजीत- वसई गावात (पार नाक्यावरुन निर्मळ ला जाण्यार्‍या रस्त्यावर) रमेदी चर्च (our lady of remedy)परिसरातलं चित्र आहे हे

meenu- ट्रांस्परंट वॉटर कलर ची लिमीटेशन्स हीच त्या माध्यमाची ताकद ही आहे. हे माध्यम प्रवाही असल्याने अगदी बारीक डीटेल्स करणे हे खुप जिकरीचे तसेच कंटाळवाणे असते , तसेच हे पारदर्शक माध्यम असल्याने आधिचा मारलेला वॉश आणि त्यावर मारलेला दुसरा वॉश हे थोडे येकमेकात मिसळुन वेगळि शेड तयार होते ( याला ग्लेझिंग म्हणतात उदा. पिवळा रंगाचा वॉश दिल्यावर त्यावर जर निळा वॉश दिला तर हिरव्या रंगाची शेड तयार होईल). दोन किंवा तीन पेक्षा जास्त वॉशेस दिले तर चित्रातली पारदर्शकता निघुन जाते आणि ते डल दिसते. यामुळे मोठ्या बोल्ड मासेस मधे वेट इन वेट पेंट करुन सुकल्यावर थोडे डीटेल्स आणि डेप्थ क्रियेट करायची पद्धत बरेच जण वापरतात. या पद्धतीने हुबेहुब चित्र न काढता त्याचे बोल्ड इम्प्रेशन तयार करता येते (google for impressionist style painting ).
अर्थात वॉटर कलर मधे सुध्धा डीटेल काम करता येते त्यासाठी येक येक लेयर सुकु द्यायला लागते तसेच मास्किंग फ्लुईड ने काही भाग मास्क करुन घेणे इत्यादि गोष्टींचा आधार घ्यावा लागतो.

अजय चित्र तर सुंदर आहेच पण तंत्राबद्दलचं स्पष्टीकरणही. एक सचित्र लेख लिहावा अशी विनंती आहे स्टाईलस आणि माध्यम यावर. चित्रकाराच्या तोंडून ऐकणे औरच असते.

मस्त Happy

वा!

यामुळे मोठ्या बोल्ड मासेस मधे वेट इन वेट पेंट करुन सुकल्यावर थोडे डीटेल्स आणि डेप्थ क्रियेट करायची पद्धत बरेच जण वापरतात. या पद्धतीने हुबेहुब चित्र न काढता त्याचे बोल्ड इम्प्रेशन तयार करता येते (google for impressionist style painting ). >>> हे नाही कळलं. शोधते गुगलवर.

बाकी या चित्रात पण तुम्ही आधी पांढर्‍या रंगाचा किंवा ऑफ व्हाईटचा वॉश दिला आहे का? वॉटर कलरचे एकावर एक थर दिल्याने कागद ओला होऊन खराब होत नाही का.. ? कागदावर पाणी पडल्याने होतो तसा.

जलरंगातला ताजेपणा, पारदर्शकता, आणि सौंदर्य वेगळच असतं नाही का? अप्रतिम आहेत, हे आणि विक एन्ड ब्रशस्ट्रोक्स वरील इतरही चित्रे. ग्रेट!

सगळ्याना धन्यवाद
मीनु-
बाकी या चित्रात पण तुम्ही आधी पांढर्‍या रंगाचा किंवा ऑफ व्हाईटचा वॉश दिला आहे का? वॉटर कलरचे एकावर एक थर दिल्याने कागद ओला होऊन खराब होत नाही का.. ? कागदावर पाणी पडल्याने होतो तसा.>>
ट्रांस्परंट वॉटरकलर मधे पांढरा रंग शक्यतो टाळतात कारण तो ओपेक असतो तसेच कालांतराने कागद थोडा पिवळसर होतो आणि पांढरा रंग आणि कागद यांच्या शेड मधे फरक दिसतो.

चांगला वॉटर कलर हँड्मेड पेपर १००% cotton rags चा बनवतात आणि तो PH न्युट्रल , अ‍ॅसीड फ्री असतो. ( भारतात बनणारा कागद या सर्व कसोट्यांवर उतरेलच असे नाही मात्र पुणे येथे येक दोन ठिकाणि चांगला कागद मिळतो जो माझ्या माहिती प्रमाने लातुर भागातल्य फॅक्टरी मधे बनतो)तसेच तो कमि जास्त जाड प्रतीत (gsm -grams per square metre )मिळतो . ३०० GSM चा कागद पाण्याने वेडावाकदा होत नाही मात्र त्याहुन कमी जाडिचा पेपर स्ट्रेच करुन घ्यावा लागतो ( कागद पाण्यात पुर्ण भिजवुन घ्यायचा, चिमटित पकडुन पाणी निथळु द्यायचे , नंतर तो बोर्ड वर पसरवुन घ्यायचा, पेपरच्या चारी कडांवरुन ब्राउन पेपर टेप लाउन घ्यायची, तीन चार तासात हा पेपर सुकल्यावर व्यवस्थीत स्ट्रेच होतो आणि टेप लावलेली अस्लयाने वेडावाकडा होत नाही)