पनीर टिक्का मसाला

Submitted by Swara@1 on 23 March, 2016 - 06:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १५० ग्रॅम पनीर,
२. १ शिमला मिरची
३. ४ टोमाटो
४. दीड कांदा
५. आलं - लसूण पेस्ट
६. लाल तिखट आवडी प्रमाणे
७. हळद
८. तंदुरी मसाला २ चमचे
९. मीठ
१०. तेल
११. जिरे

क्रमवार पाककृती: 

हि रेसिपी मी इथे असलेल्या तमाम सुगरणीची माफी मागून पोस्ट करते आहे. मुळात मी काही सुगरण नाही पण आई जे पदार्थ बनवते ते आवर्जून बघते आणि जेव्हा ती घरी नसते तेव्हा ट्राय करते, कुकिंगची फार आवड आहे त्यामुळे सुट्टीच्या दिवशी असेच खाण्याचे कार्यक्रम चालू असतात टी.व्हि. वर ते पाहते आणि एखादा नवीन पदार्थ पहिला कि तो घरी करून बघते. अश्यातच सापडलेली हि एक पा. कृ. घरी बनवुन पाहिली आणि चक्क छान झाली म्हणून दबकत बिचकत आणि फायनली धीर करून इथे देतेय.

प्रथम पनीरचे आणि शिमला मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे करावेत. आता एका भांड्यात पनीरचे तुकडे घेऊन त्यांना लाल तिखट, १ चमचा तंदुरी मसाला, १ चमचा आलं -लसूण पेस्ट लाऊन हलक्या हाताने toss करून marinet करायला ठेवावे (पनीरचे तुकडे न मोडू देत करायचं आहे हे) आणि दुसरीकडे ग्रेव्हीची तयारी करायला घ्यावी. त्यासाठी प्रथम gas वर pan गरम करत ठेऊन त्यात थोड तेल घालावे. थोडस गरम झाल कि मग त्यात थोडंस जिर घालाव. जिरे तडतडले कि त्यात १ बारीक चिरलेला कांदा परतून घ्या थोडासा परतला कि त्यात ४ बारीक चिरलेले टोमतो परतून घ्या. ते थोडेसे मऊसर झाले कि त्यात आवडी प्रमाणे लाल तिखट, थोडीशी आलं - लसुण पेस्ट, नावापुरती हळद, १. चमचा तंदुरी मसाला, आणि मीठ घालून परतावे. गरजेपुरत पाणी घालावं. हे सगळ एकजीव झाल कि gas बंद करून ह्याची मिक्सरला छान ग्रेव्ही करावी.

त्यानंतर पुन्हा pan मध्ये थोडंस तेल घालून त्यात १/२ चौकोनी कापलेला कांदा आणि चौकोनी कापलेली शिमला मिरची परतून घ्यावी. जास्त मऊ नाही होऊ द्यायची (खाताना थोडी क्रंच लागली पाहिजे). त्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार केली आहे ती टाकायची आणि मग त्यात पनीरचे marineted तुकडे टाकावेत. ग्रेव्ही तुमच्या आवडीप्रमाणे दाट - पातळ adjust करा. (चव घेऊन मीठ हव असेल तर टाका) सगळे घटक आधीच शिजवले असल्याने फार शिजवायची गरज नाही १-२ उकळी आली कि gas बंद करा.

खायला द्यायच्या वेळी कोथिम्बिर घालून सर्व्ह करा.

तयार आहे पनीर टिक्का मसाला.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांना आरामात पुरते
अधिक टिपा: 

पहिलीच रेसिपी आहे कमी जास्त (चुका) असल्यास सांगावे. (ग्रेव्ही दाट होण्यासाठी टोमाटो बरोबर ४-५ काजू वाटले तरी चालतील)

माहितीचा स्रोत: 
नेट आणि मी केलेले थोडेसे बदल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय.

पनीर टीक्का मसालामधे जे पनीर, सिमला मिरची मॅरिनेट केले आहेस ना त्याला ग्रील करुन घेतात. नॉन स्टीक पॅनवरही थोड्याश्या तेलात परतुन मसाल्यात घातले तरी छान लागेल.

आहा!
पोटु के बगैर लैच अधुरा अधुरा लग रहा था, अब झाक दिखरेला हय! Wink
पोटात कावळे बोंब मारने लगै हय अब..

अवांतर- ही पाकृ बघून पुन्हा एकदा सैपाक करण्याचे धाडस करु म्हणातोय.. Uhoh
तर मग आता पाकृ इभाग- साSवधान... लवकरच हम आ रैले हय एक नवीन पाकृ लेके... Wink Wink Wink

विठ्ठल | 25 March, 2016 - 01:47
त्यासाठी प्रथम gas वर पण गरम करत ठेऊन त्यात थोड तेल घालावे. >> ते पण च्या जागी PAN हवय. स्मित बाकी छान

<<< कित्ती ते बारीक निरीक्षण. धन्यवाद, बदल केला आहे. Happy

काल केला. लेकीला प्रचंड आवडला, अगदी हॉटेलसारखा झाला असं म्हणाली. धन्यवाद स्वरा Happy

मी पनीरला लाल तिखट व तंदुर मसाला लावुन ठेवला आणि मग निल्सननी सुचवल्यानुसार नॉन-स्टीक पॅन मधे थोड्या तेलावर ते पनीर परतुन घेतले. आ.ल. पेस्ट फक्त ग्रेव्हीसाठी वापरली.

भ्रमर | 28 March, 2016 - 01:16 नवीन
काल केला. लेकीला प्रचंड आवडला, अगदी हॉटेलसारखा झाला असं म्हणाली. धन्यवाद स्वरा स्मित

मी पनीरला लाल तिखट व तंदुर मसाला लावुन ठेवला आणि मग निल्सननी सुचवल्यानुसार नॉन-स्टीक पॅन मधे थोड्या तेलावर ते पनीर परतुन घेतले. आ.ल. पेस्ट फक्त ग्रेव्हीसाठी वापरली.

<<<< धन्यवाद भ्रमर