मेथि-- एक जुडी निवडुन (शक्यतो फक्त पान घ्या)
कान्दा-- एक बारिक चिरुन
शेन्गदाण्याचा कुट-- अर्धी ते पाउण वाटी
आल-लसुण-मिरची पेस्ट-- २-३ चमचे
लसुण -- २-३ पाकळ्या ठेचुन किवा चिरुन
फोडणीच साहित्य.
मेथि निवडुन धुवुन बारिक चिरुन घ्या, एकदा पाण्यात घालुन घट्ट पिळुन घ्या (सत्व जायची चिन्ता असेल तर ही स्टेप वगळा).. कढईत तेलाची फोडणी करा त्यात कान्दा लालसर परतुन घ्या, त्यातच लसुण घालुन परता, दोन्ही लालसर झाले की आच कमी करुन आल-लसुण-मिरची ची पेस्ट परता, हळद घालुन पिळलेली मेथी घाला, जरा परतवुन मेथी आळली की पाणी घालुन थोड उकळु द्या...आता दाण्याचा कुट घालुन सगळ निट मिसळुन घ्या, मध्यम आचेवर सगळ एकजिव होवु द्या...पाणी आटुनही रस्सा राहिला पाहिजे या बेताने पाणी घाला...
अगदी साधी क्रुती आहे , म्हटल तर नेहमिचीच पण, बहुधा आईच्या हातची चव उतरत असणार, मेथी-कुटाच चविच रसायन जमुन पाणि चवदार होत त्यात गरम भाकरी चुरुन खायला मजा येते... ही भाजी जरा कमी तिखट करुन बाळतिणीला देतात... कारण डाळीच पिठ लावुन भाज्या त्यावेळेस करता येत नाही... कोरडी भाजी पुरवठ्याला येत नाही त्यामुळे मोठ्या कुटुबात अशा युक्या करत असावेत.
मस्त होते ही भाजी.... मी
मस्त होते ही भाजी.... मी अनेकदा करते. अल्पनाने लिहिली आहे. एक मस्त नवीन रेसिपी मिळाली मेथीच्या भाजीची.
कृती छान आहे पण
कृती छान आहे पण शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्या तर बरे होईल
मेथी आवडती भाजी आहे , पण
मेथी आवडती भाजी आहे , पण निवडायचा कंटाळा अन भाजी चोरटी होते या कारणाने फार कमी वेळा होते भाजी. बहुतेक वेळा पराठे, नाहीतर मिनोतीच्या रेसिपीने वरण , नाहीतर मेथी मटर हेच प्रकार आलटून पालटून होत असतात घरात.
आता अशा प्रकारे करणार.
मस्त आहे रेसिपी.
मस्त आहे रेसिपी.
छान आहे कृती.. मेथी सारखी
छान आहे कृती.. मेथी सारखी व्हर्सटाईल भाजी नाही, किती प्रकारे करता येते ती !
छान सोपी रेसिपी .. करून
छान सोपी रेसिपी .. करून बघायला हवी ..
धन्यवाद सगळ्याना, खरतर अगदी २
धन्यवाद सगळ्याना, खरतर अगदी २ ओळीची क्रुती वेगळी काय लिहायची पण मेथी फॅन क्ल्ब दिसला नाही म्हणुन वेगळा धागा काढला, मला लहानपणी मेथीची भाजी अजिबात आवडायची मग, एकदा आईने अशी करुन त्याबरोबर बाजरीची भाकरी केली तेव्हापासुन मेथी आवडायला लागली.
मस्तच.
मस्तच.