दोन मध्यम / मोठी कारली,
एक चिरलेला कांदा,
लसणाच्या पाच-सहा कुड्या चेचून,
मसाला*,
तूरडाळ मूठभर,
ओले / सुके किसलेले खोबरे आणि / किंवा शेंगदाण्याचे कूट (हवेच असे नाही),
कोथिंबीर,
हळद, मोहरी, जिरे, मीठ, हिंग.
१. तुरीची डाळ धुवून घेऊन बाकीची तयारी होईपर्यंत पाण्यातच ठेवावी.
२. कारल्याच्या पातळ चकत्या कराव्यात.
३. खोलगट प्लेट / टोपात या चकत्या घेऊन मीठात कुस्कराव्यात. मग त्यात पाणी घालावे आणि चकत्या मुठीत चांगल्या दाबून (पिळून) पाण्याचा निचरा करावा.
४. कढईत तेल तापवून त्यात लसूण, मोहरी, जिरे, हळद, कांदा, हिंग इ. यांची फोडणी करावी.
५. फोडणीत कारल्याच्या चकत्या टाकून वाफलावे.
६. चवीप्रमाणे मीठ आणि मसाला घालावा.
७. खोबर्याचा किस / शेंगदाण्याचे कूट मिसळावे.
८. तूरडाळ घालावी.
९. चिरलेली कोथिंबीर घालावी.
१०. शिजण्या इतपतच पाणी घालून झाकण ठेवून बारीक आचेवर शिजू द्यावे. एकदम सुकी होईपर्यंत पाणी न आटवता किंचित/अंगलागी रस राहील इतपत आटवावे. डाळ एकदमच मऊ शिजवायची गरज नाही.
* मसाला: आम्ही जो मसाला वापरतो तो कोल्हापुराकडे वर्षभरासाठी एकदम बनवला जातो आणि चटणी म्हणून ओळखला जातो तो. त्याची रेस्पी इथे वाचल्याचे आठवते. थोडावेळ शोधत होतो पण सापडली नाही. सापडली की देईन.
भारि!
भारि!
लय भारी. मस्तच लागत असेल.
लय भारी. मस्तच लागत असेल.
मस्त. वेगळीच आहे.
मस्त. वेगळीच आहे.
मस्त! करण्यात येईल.... फोटू?
मस्त! करण्यात येईल.... फोटू?
मस्त गजानन! साखर / गुळ न
मस्त गजानन!
साखर / गुळ न टाकता कारल्याची भाजी.
करणारच.
घरी मीपन करते. काहि
घरी मीपन करते.
काहि दिवसांपूर्वीच खाल्ली.
ममस्त लागते.
आम्ही पाणी मात्र ठेवत नाही त्यात. सुकिच ठेवतो. फोटो हवा होता.
आम्ही याला कारल्याची अडखळी
आम्ही याला कारल्याची अडखळी म्हणतो...
भारी कृती. ह्याबरोबर गरमागरम
भारी कृती. ह्याबरोबर गरमागरम भाकरी जबरदस्त लागेल. अशी करून बघेन आता. कारलं प्रिय आहे.
तू लिहिलेली चटणीही आहे घरात.
गजानन मस्त रेसिपी, कारल आवडत
गजानन मस्त रेसिपी, कारल आवडत आणि माझ्याकडेही कांदा लसूण मसाला आहे.तेव्हा नक्की ट्राय करणार.
कंटोळीची भाजी अशीच करतात
कंटोळीची भाजी अशीच करतात
धन्यवाद गजा भाऊ. कारली
धन्यवाद गजा भाऊ. कारली मिळाली की लगेच करण्यात येईल ही भाजी
अरे व्वा! मस्तच लागत असणार
अरे व्वा! मस्तच लागत असणार ...
वेगळी आहे रेसिपी. कारली
वेगळी आहे रेसिपी. कारली आवडीची त्यामुळे नक्की करेन.
छान वेगळी पाकृ! कार्ले
छान वेगळी पाकृ! कार्ले आवडणार्या मंडळींना लिंक देइन.
मस्त! कांदा लसूण
मस्त!
कांदा लसूण मसाला:
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/54830.html?1223119678
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93126.html?1134078719
मस्त रेसिपी .. प्रत्येकाच्या
मस्त रेसिपी ..
प्रत्येकाच्या घरचा मसाला (मोस्टली आईने केलेला, खानदान स्पेशल रेसिपी) असणं महत्वाचं ..
वॉव .छान वाटतीये रेसिपी.. (
वॉव .छान वाटतीये रेसिपी.. ( गूळ साखर न वापरल्याने )सिरियसली, गजानन, तू कुकिंग करतोस?? फोटो काढत जा ना अधून मधून..
हाकानाका
आणी मसाल्याची रेसिपी नको देऊस शोधून..सरळ मसालाच दे की पाठवून..
आज केली. तुरीची डाळ कुकर
आज केली. तुरीची डाळ कुकर बाहेर शिजेल की नाही शंका होती पण मस्त झाली. कार्ले मला आवडतात त्यामुळे पुन्हा करणार.
काल केली, पण कोल्हापुरी
काल केली, पण कोल्हापुरी मसाल्याचा अंदाज जरा चुकला,आणि ते प्रकरण भलतेच जहाल झाले,
दाण्याचे कूट वाढवून ,सवरून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिखटपणा कमी होईना.
मग नेट वरची दुसरी रेसिपी कामी आली (हैद्राबादी पद्धतीची कारल्याची भाजी), या भाजीत एक टोमॅटो बारीक कापून शिजवून घातला, आणि खूप सारा गूळ घातला,
ते पण चान्गले लागत आहे.
पुढच्यावेळी अगदी कमी प्रमाणात मसाला घालून भाजी चा रिपोर्ट देईन.
काल केली ही भाजी. कांदा
काल केली ही भाजी. कांदा परतताना आच जरा जास्त्च होती त्यामुळे फोटो काढण्यासारखा रंग वाटला नाही.
पण चव एकदम भारी. सर्व कार्ले प्रेमी मंडळींनी ' प्रिंट अॅण्ड सेव्ह' असं रेटिंग दिलंय रेसिपीला
विकु, सिम्बा, मेधा, धन्यवाद,
विकु, सिम्बा, मेधा, धन्यवाद, आईला प्रतिक्रिया कळवतो.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
मी पण केली होती ही भाजी.
मी पण केली होती ही भाजी. आमच्याकडे पण खूप आवडली.