लोकसत्ताने मागे घेतलेला अग्रलेख

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 19 March, 2016 - 10:12

‘असंतांचे संत’ हा १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीय अग्रलेख लोकसत्ता या आघाडीच्या वर्तमानपत्राने मागे घेतला.

मागे घेतला म्हणजे नेमके काय केले तर इंटरनेटवरील आवृत्तीत जिथे हा लेख प्रसिद्ध झालेला दिसत होता तिथून तो हटवून केवळ दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन छापले आहे. परंतु त्याखालील प्रतिक्रिया तिथे दिसत आहेत. कदाचित काही प्रतिक्रिया हटविल्या देखील असतील, त्याबद्दल मात्र काही उल्लेख नाहीये.

http://www.loksatta.com/sampadkiya-category/aghralekh/

अर्थात छापील आवृत्ती ज्या लाखो लोकांपर्यंत पोचला आहे तो मात्र मागे घेता येणे अशक्यच आहे. जर इंटरनेटवरील आवृत्तीचा जमाना नसता तर अग्रलेख मागे घेण्याकरिता काय केले असते हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. मागे आणिबाणीच्या कालखंडात सरकारचा निषेध म्हणून या एक्स्प्रेस वृत्तसमूहाने अग्रलेखाची जागा कोरी ठेवल्याचे स्मरते परंतु अशा प्रकारे अग्रलेख छापून तो नंतर मागे घेतलाय असे कधी आठवणीत नाही.

अशा प्रकारे अग्रलेख मागे घ्यावा लागणे ही नामुष्की समजायची का? की शहाणपण समजायचे? आणि शहाणपणच असेल तर ते उशिरा सुचलेले. मग आधी असा लेख छापणे हा मूर्खपणा म्हणावा का? आधी असे लेख छापायचे आणि मग भावना दुखावल्याचे निमित्त करून ते मागे घ्यायचे योग्य आहे काय?

अशा प्रकारे मागे घ्यायचेच असतील तर मग यापूर्वी छापलेले इतर अग्रलेख जसे की, विधानसभेत चर्चिला गेलेला बळीराजाची बोगस बोंब, त्याचप्रमाणे कुमार केतकरांच्या घरावर मेटेंच्या अनुयायींनी हल्ला करण्यास कारणीभूत ठरलेला शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयीचा अग्रलेख असे कितीतरी अग्रलेख मागे घ्यावे लागतील. लोकसत्ता हे सर्व अग्रलेख मागे घेणार का?

तसे नसेल तर चोवीस तासांत असंताचे संत हा अग्रलेख मागे का घ्यावा लागला? तो छापील आवृत्तीत तर आहेच शिवाय ईपेपर आवृत्तीत देखील आहे.

http://epaper.loksatta.com/c/9181266

तसेच समजा जर ईपेपर आवृत्तीतूनही तो लोकसत्ताने काढला तरी इतर अनेकांनी तो सेव्ह करून ठेवला असल्याने ते जनहितार्थ गुगल डॉक्स अथवा इतर माध्यमांतून प्रसिद्ध करणारच अशा वेळी हा अग्रलेख मागे घेऊन लोकसत्ताने काय साधले?

एका वाचकाने प्रतिक्रिया दिल्याप्रमाणे अग्रलेख मागे घेतल्याने "गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले" अशी पुरोगामी लोकसत्तेची अवस्था झाली आहे.

मायबोलीकरांची या विषयावरील मते जाणून घेण्यास उत्सुक आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"लैंगीक शोषण करणारे बाबाबापु" असं लिहिलंय, ते बहुतेक बाबा (असुमल?) च्या संदर्भात असावं. तरीहि असुमलची बातमी खरी असताना इंए ने कायद्याच्या भितीने अग्रलेख मागे घेणं यात पांचव्या स्तंभाचा डळमळीतपणा दिसुन येतो.

बायदवे, सध्या इंए ची मालकी कोणाकडे आहे?..

तर मग
लोकसत्ताने पूर्ण अग्रलेख मागे घेण्याऐवजी ती स्पेसिफिक ओळ मागे घेतली आहे असं म्हणायला हवं असतं.
म्हणजे आत्ता जी कुजबूज सुरू आहे ती झालीच नसती. बाबांनी आदेश काढला काय नि साक्षीदार मेले काय... एव्हढी चर्चा कुठे होते ? सहीष्णूच आहेत कि लोक !

राज पहिल्यांदा वाचलं तेव्हा मलाही ते असुमल बद्दल वाटल.
पण एकाच ओघात लिहिलं आहे, त्याचा नक्की काथ्याकुट कुणी वकिलच काय ते करु शकेल.

शेवटच्या परिच्छेदात "खटला दाखल" होण्याइतपतही काही नाही. त्या भितीने मागे घेतला हे अजिबात पटत नाही.
यामागे वेगळीच कारणे असावित असे माझे मत.

एका वाक्यासाठी, तेही संदिग्ध वाक्य, ज्यात बाबाबापू म्हटलेय, त्यासाठी अग्रलेख मागे? तीही कायद्याची भीती आहे म्हणून? एक्सप्रेस ग्रुपकडे चांगले वकील नाहीत काय?

आज मीडिया कायद्याला न घाबरता सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयसुद्धा चूक असू शकतात म्हणतेय आणि एका मोठ्या ग्रुपच्या वृत्तपत्राने एका संदिग्ध वाक्याने घाबरावे हे पटत नाही. आणि तसेही एका बाबावर लै. शो. चे आरोप आहे, तो जेलची हवा खातोय. त्यामुळे कोणी लोकसत्ताला उद्या कोर्टात खेचलेच तर त्यांचे वकील याचा आधार घेऊ शकतात.

चिनूक्स, आज कुठल्याही वृत्तपत्राला कोणीही न्यायालयात आव्हान देऊ शकतो, हे त्यांनाही माहीत असते. कायद्याच्या भीतीने जर लिहायचे थांबवले तर सगळे पेपर बंद करावे लागतील.

लोकमतच्या बाबतीत त्यांच्या कार्यालयात घुसून मोडतोड झालेली. लोकसत्तेच्या बाबतीत मी आत्ता मायबोलीवर प्रथम हि शक्यता वाचली. बाकि कुठेही या संदर्भात काहीही नाहीय. बापूभक्तानाही हे माहीत आहे का देव जाणे. मी केश्विनीला विचारले, तिलाही काही माहीत नाही. मग अग्रलेख लिहिताना जे कळले नाहि ते नंतर कोणीही न सांगता अचानक कळले का कुबेरांना? कि फक्त मायबोलीलाच कळलंय?

परवा अग्रलेख वाचून आश्चर्य वाटलेले. काल तो उडवल्याचे आश्चर्य वाटतेय, आज इथली कारणमीमांसा वाचून आश्चर्य वाटतेय. पण हि कारण मीमांसा लंगडी आहे. वृत्तपत्रे कायदेशीर कारवाईला घाबरू लागली असा याचा अर्थ होतो. असो.

अनिरुद्ध बापू आणि गर्भसंस्कारवाले बापू ह्यांच्यामुळे लेख मागे घेतला?

पूर्ण लेख मदर तेरेसांवर आहे आणि शेवटचा प्यारा वाचकांना खटकावा? का तर तेरेसा ख्रिश्चन आणि हे दोघे हिंदू आहेत आणि त्यामुळे सध्याचे हिंदू राज्यकर्ते त्रास देतील? कमॉन?

दोन्ही लोकांवर कितीतरी टिका होते. अनिरुद्ध बापू अन बालाजी तांबेंना अनेक लोक उघडपणेच विरोध करतात मग आत्ताच का?

हे खरे कारण ते नसावे.

अग्रलेख मागे घेतला हेच मुळात हास्यास्पद आहे. अग्रलेख मागे घेण्याऐवजी कुबेरांनी राजीनामा द्यावा. ( मला त्यांचे अनेक मत आवडतात, पण हे अगदीच बुळबुळीत आहे.)

चिनूक्स यांनी सूचित केलेलेच कारण निदान ९५% तरी या सगळ्याच्या मुळाशी असावे. मला स्वतःला संशय नाही. अधिक लिहिणे कठिण आहे.

>>चिनूक्स यांनी सूचित केलेलेच कारण निदान ९५% तरी या सगळ्याच्या मुळाशी असावे. मला स्वतःला संशय नाही. अधिक लिहिणे कठिण आहे.<<

आयला, अनिरुद्धबापु एव्हढा पावरबाज माणुस आहे? कैच्याचै...

एक शक्यता आहे - नेहेमीप्रमाणे कुबेरांनी वहावत जाउन तो बिनबुडाचा आरोप केला असावा; प्रकरण पुढे शेकण्याच्या भितीने अग्रलेख मागे घेतला असावा. "लेकिन बुंद से गई वो हौद से नहि आती" हि उक्ती कुबेरांना ठाऊक असावी... Wink

<<चिनूक्स यांनी सूचित केलेलेच कारण निदान ९५% तरी या सगळ्याच्या मुळाशी असावे. मला स्वतःला संशय नाही. अधिक लिहिणे कठिण आहे.>>
----- सहमत...

हे सर्व लोक खुप पावर्बाज आहेत. कायद्याच्या लढाई पेक्षाही जिवाची (स्वत: च्या नसेलही आप्तस्वकीयान्च्या जिवाची) भिती हे कारण असावे असे मला वाटतो.

असुमल तुरुन्गात आहे पण बाहेर खटल्याशी सम्बन्धित अनेक साक्षीदारान्ची शार्प शुटर करवी हत्या होते. एक नाही दहा घटना आहेत.

शेवटचा पॅरा हे कारण असेल तर ते उसंडू मुळेच असावे. बहुधा त्यांना दोन स्वतंत्र वाक्ये लिहायची असतील, कदाचित वेगवेगळ्या व्यक्तींविरूद्ध, व एकत्र लिहीले गेले.

पण मग अग्रलेखात 'करेक्शन' हा प्रकार नसतो का? तेवढा भाग वगळून, सुधारून उरलेला लेख तसाच ठेवता नसता का आला?

वेगवेगळी मतं वाचायला मिळाली. नव्या शक्यता कळाल्या.

चौकशी करूनही अंदाज येत नव्हता. आज कुनीतरी सूचकपणे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं नाव उधळलं होतं. त्यांना जेव्हढं ऐकलंय त्यावरून ते सहमत नसतील पण अग्रलेख मागे घ्या असं म्हणणार नाहीत. पण आसूमल किंवा अ.बापू यांचं नाव कुठेच ऐकायला मिळालं नाही. म्हणजे तेच खरं असं काही नाही हेसांनल.

सडेतोड लेख ! इन्क्लुडिंग बालाजी तांबे अन बापू यांच्याबद्दल लिहिलेला तो पॅरा!!
मला वाटले मदर तेरेसांबद्दल च्या स्टेटमेन्ट्स मुळेच मागे घेतला असावा. बापू - तांबे मंडळींची इतकी पावर नसावी.
उगीच मागे घेतला!

वा वा २ २ धागे एकदम अगदी ठरवून
असो अग्रलेख वाचला नाही पण मागे नाही घ्यायला पाहीजे

पण तिकडे बिचार्या शक्तिमान नामक घोड्याचा भाजपाच्या आंदोलनात पाय तोडला त्यावर चकार शब्द कुठे दिसला नाही.

बाकी चर्चा चालू द्या

भक्तांचे आर्थिक,लैंगिक शोषण करणारे कोणी बाबाबापू असोत. >>> हे त्या लेखातील वाक्य वाचताना आसूमलच आठवला.एकूण लेख परखड होता.फारएण्ड यांच्या प्रतिसादाशी सहमत.

<<< लेखातल्या शेवटच्या कॉलममधला एक उल्लेख मात्र लोकसत्तेला कायद्याच्या कचाट्यात पकडू शकतो, असं वाटतं. 'वाचकांच्या भावना' असं नाव देऊन कुबेरांनी त्यातून सुटका करून घेतली असावी. >>> असं का वाटलं तुला चिनुक्स ?

फा. ब्रिटो यांनी आपली नापसंती सौम्य प्रतिसादाद्वारे व्यक्त केली आहे. ते आणि त्यांचे इथले अनुयायी या टोकाला जाणार नाहीत.

हा हा; उसंडु मुळे अग्रलेख मागे घेतला या पाॅइंटवर गिनेस नाहि तर कमीतकमी लिम्का बुक आॅफ रेकाॅर्ड्स मध्ये तरी नोंद घेतली गेली पाहिजे... Lol

काही दिवसांपूर्वी लोकमत ह्या दैनिकाने आयसिसचा झेंडा पैसे साठवायच्या डुकराच्या पाठीवर काढला तेव्हा त्यांच्या कार्यालयाची जाळपोळ झाली होती. त्यांनी माफी मागितली, ते चित्र काढणारा आणि तो लेख लिहिणार्‍यांची हकालपट्टी केली पण तरी लोकांचे समाधान झाले नव्हते.
एरवी आयसीस व इस्लामचा काहीही संबंध नाही असे उच्चरवात सांगणारे ह्या वेळेस आयसिसची टिंगल म्हणजे इस्लामचा अपमान असे का समजले ते नीट कळले नाही. असो. भारतातील अभिव्यक्तिस्वातंत्र्य असे खाचखळग्यातून जाणारे आहे. तमाम लोकांच्या पचनी पडले तरच स्वातंत्र्य नाहीतर बंदी!

सॅटेनिक व्हर्सेस, लोकमतचे व्यंगचित्र ह्या घटनांनी एक पायंडा पाडला आहे. त्यांच्या धर्माच्या भावना दुखावल्या तर बंदी मग आमच्या भावना दुखावल्यावर का नाही असे बाकी धर्मापंथाचे लोक विचारू लागतात. एक अनिष्ट व व्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटणारी अहमहिका सुरू होते आणि मग अशा घटनांची मालिका सुरू होते.

हम्म.... लोकसत्ता सारखे मोठे ग्रुप कोर्टाला घाबरून लेख मागे घेतात. लेखात लिहिलेय ते खरे असेल तर कोणालाहि घाबरायचे काय कारण? मग भले कोर्टकेस का होईना. उलट तिथे गेल्याने बाबा आणि बापूंचे दुकान बंद पडायची जास्त भीती, जे व्हावे म्हणून अंनिसपासून प्रयत्न सुरु आहेत.

बरे, धमकीला घाबरून, कोर्ट केसीला घाबरून असे केले तर तसे लिहा तरी. असल्या दडपणांचा निषेध करा. तुम्ही करत नसाल तरी तुमचे इतर मीडिया बांधव तरी करू शकतात. त्यांना तर कोर्ट केस आणि धमकीचे भीती नाही, निदान या केसपूर्ती तरी, तेही नाही.

मुळात माझा मुद्दा हा होता कि एका प्रथितयश वृत्तपत्राची मुस्कट दाबी होतेय आणि इतर मीडिया गप्प. एरवी तर एवढ्यात रान उठले असते. याचे कारण काय?

या मूळ मुद्द्याला दिलेली बगल पाहता यात कोणी बाबाबापू गुंतले नसावेत तर काही वेगळाच प्रकार असावा हे माझे मत अजून पक्के झाले.

सगळ्यांचे धन्यवाद. बरेच काही कळले या निमित्ताने.

साधना कोर्टाला घाबरून म्हणजे काय? जे लिहीले आहे ते सिद्ध करू शकत नसतील तर मानहानीचा आरोप आणि लोकांचा अविश्वास हे दोन्ही होउ शकते. वृत्तपत्रे कायद्याच्या कक्षेबाहेर नाहीतच ना?

सर्वांचे प्रतिसाद वाचले. कपोचे यांच्या प्रतिसादाचा अर्थ मला असा जाणवला.

हिंदू धर्मावर लोकसत्ता कितीही बेफाम टीका करू शकते व लेख मागे घेणे किंवा माफी मागणे अशी वेळ संपादकांवर येत नाही परंतु हिंद्वेतर धर्मावर टीका केल्यास चोवीस तासांत लेखच मागे घ्यावा लागून संपादकाला व्यक्तिशः माफी मागावी लागते. याचाच अर्थ, हिद्वेतर इतर धर्मच अतिशय असहिष्णू आहेत असा संदेश समाजात पसरविणे.

सारासार विचार केल्यास कपोचे यांचे हे मत मलातरी पटते. शिवाय इथे हिंद्वेतर धर्मावर टीका करताना मुद्दामच लिटमस टेस्ट केल्याप्रमाणे जास्त प्रखर धर्म न निवडता सौम्य धर्म निवडून चटकन माफी मागत लेख मागे घेत (व प्रत्यक्षात इपेपर आवृत्तीत लोकांना वाचण्याची सोय ठेवून) असल्याचा आव आणला आहे.

ठळक केलेल्या शब्दांवर लक्ष दिल्यास चिनूक्स यांचा कायदेशीर कारवाईचा मुद्दा पटत नाही.


साधना कोर्टाला घाबरून म्हणजे काय? जे लिहीले आहे ते सिद्ध करू शकत नसतील तर मानहानीचा आरोप आणि लोकांचा अविश्वास हे दोन्ही होउ शकते. वृत्तपत्रे कायद्याच्या कक्षेबाहेर नाहीतच ना?

असे असेल तर मग लोकत्तेने आजवर जे लिहिले त्यातले कितपत विश्वसनीय? उगाच गावगप्पा वाचल्या काय वेळ देऊन?

अर्थात मी काही वर्षां पुर्वीच रामराम ठोकलाय लोकसत्तेला. पण प्रमुख व्रुत्तपत्र जर असे काही लिहित असेल जे सिद्ध होऊ शकत नाही तर इतर लोक काय लिहित असतील? काल त्यांनी जे लिहिले ते कोणी सल्ला दिला/धमकी दिली आणि मागे घेतले. या आधी किती काय लिहिले असेल, कसे कळायचे... असो. मिडियावरील विश्वास पुर्ण उडाला आता.

Pages