लोकसत्ताने मागे घेतलेला अग्रलेख

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 19 March, 2016 - 10:12

‘असंतांचे संत’ हा १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीय अग्रलेख लोकसत्ता या आघाडीच्या वर्तमानपत्राने मागे घेतला.

मागे घेतला म्हणजे नेमके काय केले तर इंटरनेटवरील आवृत्तीत जिथे हा लेख प्रसिद्ध झालेला दिसत होता तिथून तो हटवून केवळ दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन छापले आहे. परंतु त्याखालील प्रतिक्रिया तिथे दिसत आहेत. कदाचित काही प्रतिक्रिया हटविल्या देखील असतील, त्याबद्दल मात्र काही उल्लेख नाहीये.

http://www.loksatta.com/sampadkiya-category/aghralekh/

अर्थात छापील आवृत्ती ज्या लाखो लोकांपर्यंत पोचला आहे तो मात्र मागे घेता येणे अशक्यच आहे. जर इंटरनेटवरील आवृत्तीचा जमाना नसता तर अग्रलेख मागे घेण्याकरिता काय केले असते हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. मागे आणिबाणीच्या कालखंडात सरकारचा निषेध म्हणून या एक्स्प्रेस वृत्तसमूहाने अग्रलेखाची जागा कोरी ठेवल्याचे स्मरते परंतु अशा प्रकारे अग्रलेख छापून तो नंतर मागे घेतलाय असे कधी आठवणीत नाही.

अशा प्रकारे अग्रलेख मागे घ्यावा लागणे ही नामुष्की समजायची का? की शहाणपण समजायचे? आणि शहाणपणच असेल तर ते उशिरा सुचलेले. मग आधी असा लेख छापणे हा मूर्खपणा म्हणावा का? आधी असे लेख छापायचे आणि मग भावना दुखावल्याचे निमित्त करून ते मागे घ्यायचे योग्य आहे काय?

अशा प्रकारे मागे घ्यायचेच असतील तर मग यापूर्वी छापलेले इतर अग्रलेख जसे की, विधानसभेत चर्चिला गेलेला बळीराजाची बोगस बोंब, त्याचप्रमाणे कुमार केतकरांच्या घरावर मेटेंच्या अनुयायींनी हल्ला करण्यास कारणीभूत ठरलेला शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयीचा अग्रलेख असे कितीतरी अग्रलेख मागे घ्यावे लागतील. लोकसत्ता हे सर्व अग्रलेख मागे घेणार का?

तसे नसेल तर चोवीस तासांत असंताचे संत हा अग्रलेख मागे का घ्यावा लागला? तो छापील आवृत्तीत तर आहेच शिवाय ईपेपर आवृत्तीत देखील आहे.

http://epaper.loksatta.com/c/9181266

तसेच समजा जर ईपेपर आवृत्तीतूनही तो लोकसत्ताने काढला तरी इतर अनेकांनी तो सेव्ह करून ठेवला असल्याने ते जनहितार्थ गुगल डॉक्स अथवा इतर माध्यमांतून प्रसिद्ध करणारच अशा वेळी हा अग्रलेख मागे घेऊन लोकसत्ताने काय साधले?

एका वाचकाने प्रतिक्रिया दिल्याप्रमाणे अग्रलेख मागे घेतल्याने "गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले" अशी पुरोगामी लोकसत्तेची अवस्था झाली आहे.

मायबोलीकरांची या विषयावरील मते जाणून घेण्यास उत्सुक आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग्रलेख मागे घ्यावा लागला हि वृत्तपत्राच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. इतकी मोठी लाजिरवाणी घटना घडलीय, त्याबद्दल इतर मीडियाची मते काय आहेत हे जाणून घ्यायला मला आवडेल. मीडिया तर प्रचंड आग्रही आहे स्वातंत्रयाबद्दल आणि त्याची जराही पायमल्ली झालेली त्यांना खपत नाही.

http://www.opindia.com/2016/03/marathi-newspaper-apologizes-for-saying-t...

अतिशय धोकादायक लक्षणे ...
मार्केटचा दबाव आल्याने मालकांचा दबाव आला हे स्पष्ट आणि स्वच्छ आहे...
आणि मदर तेरेसेंवर टीका केल्याने भावना दुखावल्या म्हणजे हे 'मार्केट' कुठले असणार याचा अंदाज बांधणे अशक्य नाही ...
या घटनेमुळे लोकसत्ता आणि कुबेर दोहोंच्या credibilityची ऑलरेडी वासलात लागलीये ...

मदर तेरेसा यांच्यावर टीका व्हायची पहिली वेळ नाही. आजवर कधीही कुणीही आक्षेप घेतल्याचं ऐकीवात नाही. भाजप -१ च्या काळात मध्यप्रदेशात चर्चमधल्या नन्सवर सामूहीक बलात्कार होण्याचं प्रकरण असो, फादर स्टेन्स आणि त्यांची गोजिरवाणी लहान मुलं जिवंत जाळण्याचं प्रकरण असो , कधी कुणाला माफी मागताना पाहीलेलं नाही. कुणी मागणी केल्याचंही ऐकीवात नाही.
गोध्रा गुजरात प्रकरणी अद्याप कुणी माफी मागितल्याचं ऐकीवात नाही. खैरलांजी प्रकरणी निघालेल्या मोर्चात नक्षलवादी होते असं वृत्तपत्रांनी म्हटलं होतं, त्या बद्दलही भावना दुखावल्या म्हणून माफी मागितल्याचं ऐकिवात नाही. देवयानी खोब्रागडे प्रकरणी तिच्या अपमानाबद्दल निषेधही न करता तिच्याबद्दल अवमानकारक अग्रलेख लिहील्याबद्दल स्वत: गिरीश कुबेरांनी कधी पश्चातबुद्धी म्हणून वेगळं काही लिहील्याचं आठवत नाही. जवखेडा प्रकरणात मोर्चा काढलेले सर्व नक्षलवादी होते अशी दिशाभूल आपल्या अग्रलेखातून करणा-या गिरीश कुबेरांनी त्या संदर्भात विचारणा करायला गेलेल्या शिष्टमंडळाला उद्दाम उत्तरेच दिली होती. झाली आमची चूक, मग ? असा प्रश्न विचारल्याचे त्या शिष्टमंडळातील काहींनी फेसबुक वॉलवर म्हटले आहे. त्यात तथ्य आहे किंवा नाही हे ठाऊक नाही, पण दिलगिरी व्यक्त केलीच नाही.
इंडीयन एक्स्प्रेस मधे चर्चचे हिस्से नाहीत. ते वृत्तपत्र परकीय फंडींगने चालत नाही. स्वत: गिरीश कुबेर उजव्या विचारसरणीकडे झुकलेले आहेत. बेनेट कोलमनप्रमाणे इंडीयन एक्सप्रेसची मालकीही बहुराष्ट्रीय उद्योगाकडे नाही.
मग आजच मदर तेरेसा यांच्यावरचा लेख मागे घेत आहे अशी नाटकीय भूमिका घेण्याचं कारण काय ? कुठल्या शिष्टमंडळाला कुबेर यांनी भीक घातली ?
कि, भारत माता की जय वरून चाललेल्या नाट्यात क्लायमॅक्सचे रंग तर नाहीत ना भरायचे ?
आता घोषणा येतात कि नाही ते पहा..
एकवेळ भारतमाता कि जय म्हटले नाही तरी चालेल, पण मदर तेरेसांबद्दल काही बोलू नका..!

अग्रलेख मागे घेणं हे देखील एक वक्तव्यच आहे. घोडा अडीच घर मागे घेणं
असंतोष , द्वेष अत्यंत सभ्य रितीने देखील फैलावला जात असतो असं ऐकून होतो.

कर्करोग्याला दुरुस्त केल्याचा चमत्कार प्रकार सर्व बोगस कथा आहे. अग्रलेख मागे घ्यायला लावणे हा त्यान्नी मृत्युनन्तर घडवलेला चमत्कार आहे.

त्यान्चे तळागाळातल्या लोकान्साठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे, महान आहे. इतरान्नी त्यान्च्या कार्यापासुन प्रेरणा घ्यावी.

मदर तेरेसांवर लोकसत्तेतून आणि इंडियन एक्स्प्रेसमधून बरीच टीका झाली आहे. अगदी माधव गडकर्‍यांनी 'चौफेर'मधूनसुद्धा लिहिलं होतं. शिवाय महाराष्ट्रातल्या एकाही ख्रिस्ती संघटनेनं निषेध केल्याचं वाचनात आलं नाही.

लेखातल्या शेवटच्या कॉलममधला एक उल्लेख मात्र लोकसत्तेला कायद्याच्या कचाट्यात पकडू शकतो, असं वाटतं. 'वाचकांच्या भावना' असं नाव देऊन कुबेरांनी त्यातून सुटका करून घेतली असावी.

लेखातल्या शेवटच्या कॉलममधला एक उल्लेख मात्र लोकसत्तेला कायद्याच्या कचाट्यात पकडू शकतो, असं वाटतं. 'वाचकांच्या भावना' असं नाव देऊन कुबेरांनी त्यातून सुटका करून घेतली असावी.
>>>
चिनूक्स, यू टू?

मदर तेरेसांंमुळे अग्रलेख मागे घेतला असेल असे अजिबातच वाटत नाहीये. इतर जिवंत मराठी व्यक्तींच्या उल्लेखामुळे हा दबाव आलेला असणार..
अतिशय उत्तम अग्रलेख होता.

एवढा का आश्चर्यचकित टण्या? Happy
मदर तेरेसांवर आणि त्यांच्या संतपदावर जगभर टीका होते आहे. लोकसत्तेतल्या अग्रलेखांमधूनही अनेकांवर उर्मट टीका होते. याच वेळी का लेख मागे घेतला? आणि लेख मागे घ्यायचा होता, तर त्याच दिवशी वाचकांची पत्रंही छापली. त्या पत्रांत मला 'धर्माचा अपमान झाला' असा आरोप दिसला नाही. लोकसत्तेच्या कार्यालयावर मोर्चा वगैरे गेल्याचंही वाचनात आलं नाही. मग लेख मागे घेण्याइतपत भावना नक्की कोणाच्या आणि कशा दुखावल्या? महाराष्ट्रात लोकसत्तेपेक्षा एक्सप्रेस आणि टाईम्स वाचणारी ख्रिस्ती जनता अधिक असावी. त्यांच्या भावना या वर्तमानपत्रांतले लेख वाचून दुखावतील की लोकसत्तेच्या लेखाने?

मात्र अग्रलेख वाचल्यावर मला शेवटच्या कॉलममधला तो उल्लेख नक्की खटकला होता.

>>लेखातल्या शेवटच्या कॉलममधला एक उल्लेख मात्र लोकसत्तेला कायद्याच्या कचाट्यात पकडू शकतो, असं वाटतं. 'वाचकांच्या भावना' असं नाव देऊन कुबेरांनी त्यातून सुटका करून घेतली असावी.<<

अग्रलेखाचा फोकस मदर तेरेसा (विथ आॅल ड्यु रिस्पेक्ट टु हर सोशल सर्विस), एका भोंदुवरुन दुसर्या भोंदुंवर फिरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन...

वरदा...... कालच्या लेखातल्या जिवंत मराठी व्यक्तींना आजवर लोकसत्ता आणि इतर यांनी हजारदा झोडून झालेय. पण याआधी कधी त्यापैकी एकावरही स्वतःचे शब्द गिळण्याची वेळ आली नव्हती. हा लेख आल्यापासून कुठेही लेखातल्या जिवंत मराठी व्यक्तींनी लेखाचा निषेध केल्याचे वाचलेले किंवा पाहिलेले नाही.

साधना,
त्या जिवंत व्यक्तीचा उल्लेख 'लैंगिक शोषणा'संदर्भात पूर्वी मी तरी वाचलेला नाही. माझ्या दृष्टीनं हा गंभीर आरोप आहे.

अग्रलेख मागे घेण्याच्या निमित्ताने ज्या थिअ-या आधुनिक कुजबूज मीडीयातून फिरवल्या जात आहेत ( जाहीरातदार ख्र्सितींचा दबाव, अमेरिकेकडून दबाव, पोपकडून नाराजी इ.) हे साध्य असावं असा विचार मनात येतो. द विन्सी कोड ने ज्यांच्या भावना दुखावल्या नाहीत किंवा दुखावल्या जाऊनही विन्सीकारांच्या अभिव्यक्तीवर ज्यांनी टाच आणली नाही ते या विश्वातल्या महाराष्ट्र नामक प्रदेशातल्या एका लोकसत्ता नामक मराठी वृत्तपत्रातील एका अग्रलेखाने व्यथित होऊन जागतिक दबाव बिबाव आणत असतील तर मज्जाच मज्जा आहे

चिनूक्स, तुझे म्हणणे खरे असेल तर लोकसत्ता उगीचच असे आरोप करेल का? आणि जर खरेच असेल तर या प्रकरणाची पाळेमुळे खोदायची कि लेखच मागे घ्यायचा?

लेख मागे घेतला हे चूकच आहे. मी फक्त कारणांचा विचार करतोय.
आणि मग हा गंभीर आरोप अग्रलेखातून का करावा, हा प्रश्नही आहे. आर्थिक शोषणाबद्दल आता आपण कोडगे झालो आहोत. पण निदान लैंगिक शोषणाबद्दल लिहिताना एका वर्तमानपत्राने पुराव्यांसकट प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं. अग्रलेखात असा आरोप करायचा आणि लेख मागे घ्यायचा हा मूर्खपणा आहे. लेख मागे घेतला तरी त्या आरोपाची शहानिशा व्हायलाच हवी.

मलाही ते वाचून अरे बापरे, हेही आहे का असे वाटलेले कारण मीही आजवर ऐकले नव्हते. जर खरे असेल तर लोकसत्ताने असे का केले कळत नाही. मी तरी त्या गोष्टीवर आक्षेप घेणारी एकही कमेंट कुठे वाचली नाही. मग लोकसत्ताला कुठून भावना दिसल्या? लोकसत्ताला कोणालाही घाबरायचे कारण काय? आजवर एक्सप्रेस ग्रुप कोणाला घाबरल्याचे कधीही पाहिले नाही.

मला बाकी मीडिया गप्प का याचेही आश्चर्य वाटतेय. लोकसत्ता जरी प्रादेशिक असला तरी त्याचा ग्रुप राष्ट्रीय आहे.

इतर वर्तमानपत्रं याबद्दल बोलतील असं वाटत नाही. मध्यंतरी लोकमतनं माफी मागितली, पण वर्तमानपत्रांनी त्याबद्दल लिहिलेलं माझ्या वाचनात आलं नाही. लोकमतच्या कार्यालयावरच्या हल्ल्याची मात्र बातमी होती.
चार मिळमिळीत पत्रं मिळाल्यावर कुबेर माफी मागतील, हे अशक्य वाटतं.
इतर नियतकालिकं, ब्लॉग यांच्यावरचा मजकूर लोकसत्तेत छापल्यावर मूळ लेखकानं किंवा प्रकाशनानं केलेल्या फोनला किती उर्मट आणि अरेरावीची उत्तरं मिळतात हे ऐकून आणि अनुभवून आहे.

बाकी 'लेख मागे घेणं' ही मजाच आहे. लोकांच्या घरातल्या रद्दीत आहे अजून तो अंक. 'मागे घेतला' म्हणजे काय केलं नक्की? आणि संपादकाला जे लिहायचं आहे, ते लिहून झाल्यावर 'लेख मागे' म्हणजे मजाच आहे.

हो, साधना, टीका यापूर्वीही झालीये पण काल वापरलेला एक शब्द आरोप म्हणून गंभीर आहे. आणि मी हा आरोप त्या व्यक्तींबद्दल प्रथमच ऐकला/ वाचला. खरेखोटे माहीत नाही आणि त्या व्यक्तींविषयी निगेटिवच मत असले तरी एखाद्या जबाबदार वृत्तपत्राने असे शब्द वापरताना काळजी घ्यायला हवी होती. जर साधार पुरावे असतील तर लेख मागे घ्यायला नको होता आणि पुरावे नसतील तर मग पूर्ण लेखच या एका 'चुकी'मुळे वाया गेला ना..

द विन्सी कोड ने ज्यांच्या भावना दुखावल्या नाहीत किंवा दुखावल्या जाऊनही विन्सीकारांच्या अभिव्यक्तीवर ज्यांनी टाच आणली नाही ते या विश्वातल्या महाराष्ट्र नामक प्रदेशातल्या एका लोकसत्ता नामक मराठी वृत्तपत्रातील एका अग्रलेखाने व्यथित होऊन जागतिक दबाव बिबाव आणत असतील तर मज्जाच मज्जा आहे
≠======
कपोचे अहो काय बोलायचे. निधर्मि / सर्वधर्मसमभावी व्हॅटिकन कुठे आणि हे नुकतीच सत्ता हाती आलेले हिंदू धार्मिक उन्मादी धर्मान्ध कुठे. काय तुलना करता तुम्ही. दा विंची कोड विरुद्ध व्हॅटिकनने काहीच केले नाही हो

And within a few hours and few replies on this thtead, it has been confirmed that names mentioned in last para of the editorial have been responsible for revocation. Even if it turns out to be true, the speed of confirmation is amazing. Bloody right wing capitalist religious rulers!

मानव पृथ्वीकर,
वेबसाईटवर नाहीये लेख. ईपेपरमध्ये आहे. ते कदाचित त्यांच्या लक्षातही आलं नसावं. वेबसाईटवरून लगेच काढला होता.

मला तरी तो अग्रलेख मागे घ्यावा असे वाटत नाहीये ! लोकसत्ता विचारस्वातंत्र्याबद्दल इतके बोलत असताना त्यांनी तो अग्रलेख मागे घ्यायला नको होता.

चिनूक्सशी संपूर्ण सहमत. लेखाच्या शेवटच्या परिच्छेदातला उल्लेख धक्कादायक आहे. कदाचित उसंडू मुळे सुटला असावा आणी आता उगीच लोकभावनेचा कांगावा करून लेख मागे घेतला. अग्रलेख मागे घ्यायला तेच कारण असावे.

धनी, विचार स्वातंत्र्य आणी एखाद्या व्यक्तीविरुद्ध केलेले गंभीर आरोप यात फरक आहे.

कसलाही बोभाटा न होता लेख मागे घेतला, तेव्हा त्यामागे चिनुक्स यांनी सांगितलेले कारण असावे असे वाटतेय.

ते आरोप जर पुराव्या निशी नसतील तर ते बरोबर नाही, पण तेवढे वाक्य परत घ्यायला हवे होते. आणि माफी मागायला हवी. त्यासाठी पूर्ण अग्रलेख परत घेणे हे लोकसत्तेकडून अपेक्षीत नाही. यामुळे स्वतःची पत घसरवून घेतली आहे त्यांनी आता. आणि लोकभावनेचा कांगावा केल्यामुळे तर आता त्यांच्या शब्दाला काही दिवस तरी काही किंमत राहणार नाही.

टण्यासाहेब !
व्हॅटिकन सिटी म्हणजे लोकांचे फ्रीज चेक करायचे आदेश काढणारे, रोममाता की जय म्हणा नाहीतर देशद्रोही म्हणू असे म्हणणारे, दा विन्सी कोड सारखा धार्मिक सिनेमा रिलीज नही होने दूंगा म्हणत मोर्चे काढणारे, इतर धर्माच्या धर्मोपदेशकांना जिवंत जाळणारे तेच का ? या क्रियांनाच उद्देशून तुम्हाला सहीष्णू म्हणायचे होते का ? चालू द्या !
रच्याकने, शेवटचा परिच्छेद काय होता हे वाचायला नाही मिळाले. पण जवखेडाच्या बाबतीतले कुबेरांचे वागणे माहीत आहे. अशा माणसाने अग्रलेख मागे घेतला हीच खरी गंमत आहे.
मुद्यावर बोलायचे असेल तर स्वागत आहे. व्हॅटकिन सिटी कशी होती यावर उपरोधिक बोलताना त्यांनी कायदा हाती घेतलाय का हे पण पाहत चला की ! तुमच्याकडे दा विन्सी बाबत वेगळी माहिती असल्यास शेअर करा, आमचीही मतं बदलतील.

Pages