सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

Submitted by जाई. on 18 March, 2016 - 03:18

टॅक्स प्लॅनिंगच्या दृष्टीने पीपीएफ , एलआयसी , एनएसइ वगळता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( SIP ) हा ही एक पर्याय आहे .
तर या पर्यायात कशी गुंतवणूक करायची , त्यासाठी घेतली जोखीम , ह्यात असणारे फायदे तोटे या बाबतीत माहिती हवी आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lic for tax saving? .छान छान.
Nse or nsc?
Sip is not a different plan or scheme. It is only a facility to invest regularly, unless u r talking about a plan named sip by an insurance firm.

f for tax saving? .छान छान>>> या तिरक्या पोस्टसच कारण कळू शकेल का भरत मयेकर ???

You should buy an insurance policy to insure your life, health, etc. Saving tax cannot be a primary objective of buying lic policy.

जाई.जी, एल आय सी चे मुख्य उद्दिष्ट विमा आहे, गुंतवणुक नव्हे. विमा काढायचा असेल तर टर्म ईंशुरंस काढावा.
SIP म्हणजे एखाद्या मुच्यल फंडात एकदम रक्कम घालण्यापेक्षा दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणे. त्यानुसार तुम्हाला युनिट्स मिळतात (त्यादिवसाच्या NAV प्रमाणे).

ते माहीत आहे . त्यात छान छान काय करायचं ? त्यात टॅक्स सेविंग हा ही एक पैलू आहे . मी तरी लाइफ , हेल्थ वगैरे साठी झाल्यावर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एक इन्शुरन्स policy घेतलीये . त्यावर नंतर कधीतरी .

आता SIP बद्दल कमेंट्स येऊ द्यात

मला ऑफिसातून ऍक्सिक्स बँकेच्या SIP बद्दल माहिती मिळाली आहे . कोणी केलीये त्यात गुंतवणूक

{एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एक इन्शुरन्स policy घेतलीये} पुन्हा छान छान. असो. सध्यातरी तुम्हाला फक्त शुभेच्छा. डिटेल लिहायला महिन्याभराने वेळ मिळेल

IP म्हणजे एखाद्या मुच्यल फंडात एकदम रक्कम घालण्यापेक्षा दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणे. त्यानुसार तुम्हाला युनिट्स मिळतात (त्यादिवसाच्या NAV प्रमाणे).>>>> हो बरोबर . धन्यवाद विठ्ठल

sip मध्ये टॅक्स प्लान्निंग करताना ELSS स्कीम चा विचार करावा पण त्यात मी तरी गुंतुवणूक करत नाही.कारण खालीलप्रमाणे
१. प्रत्येक installment चे lockin ३ वर्ष्याचे असते.
२. शोर्ट टर्म रिटर्न खूप कमी असतात.
३. जर मी ३ वर्षे सतत पैसे भरले तर मला पैसे मिळायला पुढची 3 वर्षे वाट बघावी लागते.

जाई tax saving साठी Equity Linked Saving Scheme - ELSS मध्ये गुंतवणूक केलीत तर 80 C मधून १,५०,००० रुपयांपर्यंत टॅक्स सेव्ह करु शकाल.
हे पैसे- समजा जर तुम्ही एक लाख भरणार असला तर एकरकमी १,००,०० पण भरु शकता किंवा SIP (systematic investment plan) करुन दर महिन्याला १०,००० असे दहा महिने भरु शकाल. ज्या वर्षात पैसे भरले त्याच वर्षात तुम्हाला टॅक्ससाठी फायदा होतो. या स्कीम्सना तीन वर्शांचा लॉक इन असतो. Dividend and capital gains are both tax free.

यात मुख्य रिस्क हीच की इक्विटी स्कीम असल्याने तोटा होऊ शकतो. याऐवजी जर पाच वर्षं लॉक इन असलेलं एफ डी जर चांगल्या बँकेत केलंत तर मुद्दल नक्की सेफ राहील.

जाई, आय सी आय सी आय वर टॅक्स सेव्हर एफ डी नावाचा प्रकार आहे.
स्वतः ऑनलाईन करता येतो. व्याज दर पण चांगला आहे.पण पैसे पाच वर्षे अडकतात.

For tax saving ideally SIP should not be done. Sip should be done for higher return (than FD, NSC) and lesser risk ( than stock). Nonetheless it's investment in company shares so they are prone to market risks. Axis bank ELSS FUND is popular fund but it has lock-in period. You can't use your own money if need arises.

https://www.valueresearchonline.com/funds/

Check above link to compare various fund performances. If you are beginner in mf investment then look for 5 star rates funds.

There are free tutorials available for investors on all the popular websites, please go through to understand the concept / fund better. All the best for investment.

जाई, चांगला उपयोगी धागा. इन्व्हेस्टमेंट एक्स्पर्टची मते वाचायला आवडतील.

काही बेसिक प्रश्नः
सिपमध्ये गुंतवणूक करन्यासाठी मिनिमम किती रक्कम अपेक्षितआहेत? या रकमेची वारंवारता काय असेल (वार्षिक, सहामाही, मासिक इत्यादि)

गुंतवणूकीच्या रीटर्न्स वर किती खात्रआ/हमी अस्ते?

Locked -in tax saver fd - the interest is taxable.

ओके धन्यवाद राजसी

सिपमध्ये गुंतवणूक करन्यासाठी मिनिमम किती रक्कम अपेक्षितआहेत? या रकमेची वारंवारता काय असेल (वार्षिक, सहामाही, मासिक इत्यादि) >> मी महिना १००० रु ची SIP suu kelI aahe.
गुंतवणुकीच्या रीटर्न्स वर खात्री देता येईलच असे नाही पण किमान १०-१२% परतावा मिळु शकतो. अर्थात आपण लक्ष ठेवुन असावेच. मी रीलायन्स च्या गोल्ड स्कीम मधे सिप सुरु केली. ३ वर्षे निगेटीव्ह होते, मग बंद केली.

SIP चे फायदे म्हणजे दर महिन्याला पैसे बाजूला पडतात. अनेक वेळा आपल्याला एकदम एक लाख भरायला पैसेच नाहीत असं होतं पण महिना ५००/१०००/२००० वगैरे तुलनेने सोपं जातं. एरव्ही हे पैसे कदाचित असेच खर्च होऊन गेले असते.
दुसरा मोठा फायदा म्हणजे मार्केटमध्ये जे चढ उतार होत असतात ते average out होतात. एकदम एक लाख नेमके मार्केट peak ला असताना घातलेत तर डुबलात पण वर्षभरात थोडे थोडे घातलेत तर 'to correctly time your investment' यात डोकं खर्चावं लागत नाही.
तिसरा फायदा- अनेक मोठया कंपन्यांचे शेअर्स कॉस्टली असतात- एक शेअर अडीच-तीन हजार किंवा जास्त असतो. उदा. मारुती किंवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. पण तुम्ही महिन्याला फक्त पाचशे किंवा हजार रुपये अशा फंडात टाकू शकता जिथे या कंपन्यांचे शेअर्स तुमच्या फंडात आहेत.

अनु धन्यवाद . पाहते तो प्लॅन

सनव पुन्हा एकदा चांगली पोस्ट . विठ्ठल कोणती SIP चांगली आहे याबाबत लिहू शकाल का

सनव | 18 March, 2016 - 14:21
SIP चे फायदे म्हणजे दर महिन्याला पैसे बाजूला पडतात. अनेक वेळा आपल्याला एकदम एक लाख भरायला पैसेच नाहीत असं होतं पण महिना ५००/१०००/२००० वगैरे तुलनेने सोपं जातं. एरव्ही हे पैसे कदाचित असेच खर्च होऊन गेले असते.
>>>> yup ह्यासाठीही SIP चा विचार करत्ये

Pages