रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तरी ईथल्या एक गजालीकरणीने झी मराठीच्या फेबु पेज वर जाऊन " तुम्हाला मालवणी जमत नसेल तर संवाद मी लिहून देते" सांगितले होते

हे शाब्बास!!

हि पोस्ट मुगु, निधीसाठी. >>>> गो अन्जु, माझा कांपुटर टायपताना प्रॉब्लेम देत नाssssssssय. बीबी चालु करताना देतय

मंदाकिनी नाईक घराण्यात जन्माला आली नाही म्हणून बरं. पाण्यापासून धोका म्हणजे तिची करियर सुरु व्हायच्या आधीच संपली असती.>>>>>>>> Rofl

गे बाय! त्या सिरियलीपेक्षा हंअ जास्त मजा येता.सिरियल बघताना हंयचा आठ्वून हसूक येता.

तेच ना भगवती, काही घडणार आहे की साप म्हणून भुई थोपटणार आणि डोंगर पोखरून उंदीर काढणार, बघण्यापेक्षा इथेच वाचेन नाहीतर बघायचे आशेने आणि हे लोक पचका करायचे माझा.

आजकाल आईने हाक मारली की मी 'इलंय' म्हणते. आणि ओरडा बसला की 'आई, हो हो'. >>> मे आधीपासुनच अस म्हणते. copy cat कुठले

हे लोक कोणती भाषा बोलतात? कोकणी का मालवणी? >> मालवणी

स्वप्ना_राज, या सिरीयल वरची तुमची खास फटकेबाजी वाचायला आवडेल >>
एपिसोडच पोस्टमॉर्टेम कस कराव याच ट्रेनिंग घ्यायला हव स्वप्नाकडुन >>>

असे काही असेल तर मला बाकीचे धागे पण सान्गा गो...ते पण वाचुक होया माका..फटकेबाजी साठी :स्मितः

<< तेच ना भगवती, काही घडणार आहे की साप म्हणून भुई थोपटणार आणि डोंगर पोखरून उंदीर काढणार, >> कायय झालां तरी आज रात्रीक १२ वाजतां ११तारिख उजाडतली इतक्यां मात्र मीं खात्रीन सांगतंय !! Wink

<< चित्र काय, कमेन्ट्स काय, एकापेक्षा एक सिक्सर मारताय. > > टी-२० ची हवा जोरांत चललीहा, बाधतलीच ना माझ्यासारख्या ज्येष्ठांक !! त्येच्यातच, ही सिरीयल तर माझ्या 'होम-पीच'वरच चललीहा !! Wink

निधी धन्स .
कायय झालां तरी आज रात्रीक १२ वाजतां ११तारिख उजाडतली इतक्यां मात्र मीं खात्रीन सांगतंय !! >>>>:हहगलो:

Pages