रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दत्ता मात्र कोकणी रजनीकांत वाटतो. >>> अगदी बरोबर !!! मी कधीपसून सांगतेय की तो सौंदीडीयन हिरो दिसतो म्हणून Happy

मी कधीपसून सांगतेय की तो सौंदीडीयन हिरो दिसतो म्हणून >>>> असा नुसता सौदिंडीयन हिरो म्हणुन ता फील येत नाय, जो रजनीकांत म्हटल्यावर येता.

एक नोटिस केलेली गोष्ट बाकीच्या बीबींवर टायपुन पोस्टल किंवा बीबी ओपन केले की लग्गेच पोस्ट/ओपन होतय, फक्त याच बीबीवर पोस्ट करताना आनि हो बीबी ओपन करताना नेटाचा स्पीड स्लो होतो... Uhoh

कुणाचा हात असेल यात?

फक्त याच बीबीवर पोस्ट करताना आनि हो बीबी ओपन करताना नेटाचा स्पीड स्लो होतो...
रात्रीस खेळ चाले....??? Sad

कदाचित ठोकळीकडे याचे एक सायंटीफिक उत्तर असेल! Wink

एक नोटिस केलेली गोष्ट बाकीच्या बीबींवर टायपुन पोस्टल किंवा बीबी ओपन केले की लग्गेच पोस्ट/ओपन होतय, फक्त याच बीबीवर पोस्ट करताना आनि हो बीबी ओपन करताना नेटाचा स्पीड स्लो होतो... >> हायला, मुग्धा खरं सागतेस का? मला वाटलं माझ्याचं बाबतीत हा प्राॅब्लेम होतोय की काय? मी तर टाईपलं तरी मध्येच काना टाइपला जात नाही, कधी वेलांटीच गायब होते असले प्रकार चालू आहेत. Uhoh

ठोकळा.. ठोकळी, दत्ता.. दत्ती... अरे काय ह्या..:खोखो:
सगळे खुळावलेत नुस्ते..

ह्या सगळ्या मागे ठोकळीचोच हात आसा बहुतेक.. कसा काय ता नेमक्या ठावक नाय..पण 'ती'च अशी माका दाट शंका येता हा. ( शंकासूर जागो झालो :P)

सुशला मागच्या दाराने जावन पुढच्या दाराने ईला आसात..
तशी पण गावच्या घरांना मागचे आणि पुढचे अशी दोन दारे असतातच.

सुशल्याचा डब्बल रोल असेल हां. उगाच नाही बाल्कनीत आणि फाटकात दोन्ही कडे दिसली ते.>> कदाचित, घरातून झाडापर्यंत एखादी चोरवाट पण असू शकते. सुशी आधीही घरात येऊन गेलेली असणार. घरात आत कुठे काय आहे , हे कसं माहित तिला? नेमकीच खोली कशी निवडली तिनं?

रच्याकने ते क्रोम वापरताना फार असं होतं पण गुगल इनपुट टूल्स वापरलं, मायबोलीच्या देवनागरीऐवजी की बरोबर होतं. मी जनरली गुगल इनपुट टूल्स वापरते.

क्रोम मी कमी वापरते जास्त इंटरनेट एक्सप्लोरर वापरते, त्याने कुठल्याही देवनागरीला काहीही प्रोब्लेम येत नाही.

सायंटिफिक रीझन Lol .

हि पोस्ट मुगु, निधीसाठी.

हे लोक कोणती भाषा बोलतात? कोकणी का मालवणी? ज्यांना ती येते त्यांनी तीच वापरा ना इथे. मस्त वाटते ऐकायला आणि वाचायला.

अगो बाsssssय माझे काय ह्या!!!! किती ते प्रतिसाद!!! सावध रहुक होया!! आजची रात्र वैर्याची असा .. बीबी चो दरवाजो लावुन घेवुक होया!!

दत्तीचा अभिनय वरिजिनल वाटतोय.>> होय ती अभिनय चांगला करते. आणि बोलण्याचे मुद्दे पण एकदम बरोबर असतात. तो तेव्हढा मालवणी भाषेचा ठसका आला असता तर दुधात साखर होती. तरी ईथल्या एक गजालीकरणीने झी मराठीच्या फेबु पेज वर जाऊन " तुम्हाला मालवणी जमत नसेल तर संवाद मी लिहून देते" सांगितले होते. Proud

स्वप्ना खरं मालवणीच भाषा आहे ती, पण हे सिरियलवाले मध्येच नगरकडे बोलतात तशी भाषा पण वापरतात. सगळा फालुदा करतात... कोकणी अजून वेगळी आहे जी गोव्याकडे बोलतात

तरी बरं डायरेक्टर राजू सावंत आहे, त्यामुळे मालवणी नीट असायला हवी होती, तेवढी काळजी घ्यायला हवी होती, चुका नको होत्या. पहिल्या दिवसापासून लोकांनी फेसबुकला लिहिलंय झीच्या तरीही असं.

अन्जू, मी क्रोम वापरतच नै. आता बोल Proud तरीपण फक्त याच बीबीवर हा प्राॅब्लेम येतो. बाकी कुठलाही धागा झटपट आहे.

मला वाटतं बीबी ओव्हरलोड झालाय हा म्हणून असं होत असावं. Wink

मंदाकिनी नाईक घराण्यात जन्माला आली नाही म्हणून बरं. पाण्यापासून धोका म्हणजे तिची करियर सुरु व्हायच्या आधीच संपली असती.

Pages