आज आपण दाब चिंगरी बघणार आहोत. ही एक बंगाली पाकृ आहे. 'दाब'म्हणजे नारळ आणि 'चिंगरी'म्हणजे कोळंबी. नारळात शिजवलेली कोळंबी.
साहित्यः
शहाळे - २
कोळंबी - ५०० ग्रॅम
कांदा - २ लांब चिरुन
काजु - ७ - ८
खसखस - २ चमचे
मोहरी - २ चमचे
हिरवी मिरची - ३
लसुण - ३-४ पाकळ्या
आल्याचा छोटा तुकडा
मोहरीचे तेल - २ चमचे
पंचफोराण - २ चमचे (मेथी, जीरे, कलौंजी, मोहरी,बडिशेप यांचे मिश्रण)
कणिक - १ वाटी
मिठ चवीनुसार
कृती:
१. दोन्ही शहाळ्यांमधील पाणी ग्लासात काढुन घ्यावे व दोन्ही शहाळ्यांची मलई काढुन घ्यावी. शहाळे कापुन घेताना नारळवाल्याकडुन त्याचे वरचे झाकण सुद्धा मागुन घ्यावे.
२. एका पॅनमधे तेल गरम करुन त्यात चिरलेले आले, लसुण व कांदा टाकुन ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.
३. कांदा परतल्यावर त्यात काजु, भिजवलेली मोहरी व खसखस टाकुन परतावे.
४. ह्या मिश्रणात थोडी मलई टाकुन मिक्सरवर मऊसर वाटुन घ्यावे. वाटताना पाण्याची गरज वाटल्यास शहाळ्याचे पाणी वापरावे.
५. एका बाऊलमधे कोळंबीला थोडी हळद व हिंग चोळुन घ्यावे.
६. पॅनमधे मोहरीचे तेल गरम करावे व कोळंबी टाकुन २ मिनिटे परतुन लगेच बाऊल मधे काढुन घ्यावी.
७. ह्या बाऊलमधे वाटलेले मिश्रण, उरलेली मलई, हिरवी मिरची, मिठ व एक चमचा मोहरीचे तेल टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.
८. हे तयार झालेले मिश्रण दोन्ही नारळामधे भरुन त्याला वरुन झाकण लावावे.
९. ह्यामधुन वाफ बाहेर पडु नये म्हणुन कणकेने सील करावे. त्यास वरती पंचफोरण लावावे.
१०. ओव्हन २०० degree Celsius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
११. ह्या ओव्हनमधे दोन्ही नारळ ठेवुन ३० मिनिटे शिजवुन घ्यावेत.
१२. जेवायला बसतानाच नारळ उघडुन दाब चिंगरी गरम भात किंवा तांदुळाच्या भाकरी सोबत serve करावे.
तोंपासू फोटोज! ओले काजू गर
तोंपासू फोटोज! ओले काजू गर घालून करून बघेन
वा खुप आवडली. खरे तर आधी
वा खुप आवडली.
खरे तर आधी नावावरून कळलेच नाही ही मांसाहारी पाककृती असेल.
कोलंबी ऐवजी चिकनही ठेवता येईल.
व्वा ! अगदी वेगळी रेसिपी,
व्वा ! अगदी वेगळी रेसिपी, मस्तच !
मी करून पाहिली आज
मी करून पाहिली आज ...घरच्यांना खूप आवडली ..फक्त नारळात न शिजवता पॅन मधेच शिजवली ..रेसिपी बद्दल धन्यवाद ☺
पाकृ. व फोटु फार्फार आवडले.
पाकृ. व फोटु फार्फार आवडले.
वॉव!! कोळंबी खाणार्या
वॉव!! कोळंबी खाणार्या मेंबरांना रेसेपी देते. आणि या प्रकारे चिकन करुन बघते स्वतःसाठी.
Thanks to all. विनार्च,
Thanks to all.
विनार्च, सगळ्यांना चव आव्डली वाचुन मस्त वाटले.
अल्पना, हो चिकन सुद्धा छान लागेल, फक्त त्याला शिजायला जरा वेळ लागेल. त्यामुले त्या प्रमाणे वेळ adjust करायला लागेल.
भारी दिसतेय ही दाब चिंगरी,
भारी दिसतेय ही दाब चिंगरी, करुन बघायला हवी
दाब चिंगरी एखाद्या शास्त्रिय
दाब चिंगरी एखाद्या शास्त्रिय रागांच नाव वाटलं...
बाकी मस्त दिसतोय हा पदार्थ.
यम्मी.
यम्मी.
(No subject)
मस्तच! एकदम delicacy समजतात
मस्तच! एकदम delicacy समजतात या डिश ला इथे पण घरी करायच्या फंदात फार जण पडत नाहीत. तुमची चिकाटी थोर आहे
एक बदल करणार का? ते 'डाब' चिंगरी असं नाव आहे, दाब नव्हे
वॉव काय झबर्रदस्त पाकृ आहे..
वॉव काय झबर्रदस्त पाकृ आहे.. कोळंबी म्हणजे चवीचा प्रश्नच नसणार.. त्या दिवशीच वाचलेले पण फोटो लोड होत नव्हते. आता पाहिले तृप्त झालो
आजच करुन बघितली. मस्त झाली
आजच करुन बघितली. मस्त झाली होती. thanx for the recipe
मस्तच अनघा... पाकृ
मस्तच अनघा... पाकृ आवडल्याबद्दल धन्यवाद.
Pages