गेले बारा दिवस चालू असलेल्या मायबोली गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. 'मायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती' मध्ये सांगितल्याप्रमाणे भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला
लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या हे सगळे घटक पदार्थ घेऊन साजरा केलेला गणेशोत्सव दणक्यात साजरा न होता तरच नवल !!! हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी संयोजक मंडळाला पडद्यामागच्या अनेक कलाकारांची खूप मदत झाली. ह्या मायबोलीकरांना पडद्यासमोर आणून त्यांची ओळख व आभार प्रदर्शनाचा हा एक महत्वाचा आणि गोड कार्यक्रम.
मायबोलीकरांच्या सक्रीय सहभागाशिवाय गणेशोत्सव साजरा होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम गणेशोत्सवात स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, अवांतर कार्यक्रम आणि जाहिराती ह्यांना मनमोकळी दाद व भरभरून प्रतिसाद देणार्या सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मन:पूर्वक आभार. तुम्हा सगळ्यांचा हा सहभाग आम्हा संयोजकांना रोज नवीन उत्साह देऊन जात असे.
मागच्या वर्षी चालू झालेला लिखित व श्राव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपक्रम यंदाही उत्साहात साजरा झाला!
लिखित विभागामध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात घडणार्या घडामोडींचा आढावा कथामालिकेच्या माध्यमातून खास नेमाडे शैलीत घेतला मायबोलीकर बो-विश ह्यांनी. ही कथामाला आवडल्याचे अनेक मायबोलीकरांनी आम्हांला तसेच बो-विश ह्यांना कळवले आहे. श्री गणेशाचे, अष्टविनायकाचे दर्शन चित्रांच्या माध्यमातून पल्ली ह्यांनी आपल्याला घडवले तर अवती भवती असणार्या परिचितांमधल्या अपरिचित व्यक्तींची ओळख मायबोलीकरांना अॅडम ह्यांनी करून दिली. चीझ ह्या विषयावरची माहितीपूर्ण लेखमाला मायबोलीकर शोनू ह्यांनी सादर केली. ह्या सर्व लेखमालांबद्दल बो-विश, पल्ली, अॅडम आणि शोनू ह्यांचे संयोजकांतर्फे आभार!
ह्या व्यतिरिक्त लिखित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गुंडाळलेल्या कापडाची कहाणी, ॐ नमोजी आद्या, आई..ते लेखिका-कवयित्री, सार्थ गणपत्यथर्वशीर्ष, तू असे विविध विषयांवरचे लेख सादर केल्याबद्दल अनुक्रमे नीधप, बासुरी, प्राजु, झक्की व श्रावण मोडक ह्या मायबोलीकरांचे तर आपल्या खास शैलीतल्या गुंफण, दृष्टीभ्रम, आणि सुरूवात ह्या कथा सादर केल्याबद्दल अनुक्रमे सुपरमॉम, कविता नवरे, आणि विशाल कुलकर्णी ह्या मायबोलीकरांचे शतश: आभार!
मायबोलीकर उपासक यांनी संगीतबध्द केलेल्या 'जय हेरंब' ह्या ध्वनीफितीतली सगळी गाणी श्राव्य विभागात सादर झाली. संगीतप्रेमी मायबोलीकरांना ही एक अनोखी मेजवानीच मिळाली. मायबोलीवरचे प्रसिध्द कवी वैभव जोशी ह्यांचे काव्य वाचन तर प्रसिद्ध विडंबनकार मिल्या ह्यांचे हझल वाचन सांस्कृतिक कार्यक्रमांत निराळेच रंग भरून गेले. स्वत: रचलेल्या गणेशविषयक रचना स्वरबध्द करून त्या आपल्या गणेशोत्सवासाठी मायबोलीकर श्यामली आणि जयावी ह्यांनी उपलब्ध करून दिल्या. आपल्या कलाकृती मायबोलीकरांसाठी घेऊन आल्याबद्दल संयोजकांतर्फे उपासक, वैभव जोशी, मिल्या, श्यामली आणि जयावी ह्यांचे आभार.
वरील सर्व लेखक, कवी आणि कलाकारांनी हे कार्यक्रम आपल्यासमोर सादर करता यावेत म्हणून वेळात वेळ काढून अपार मेहनत घेतली आहे. गणेशोत्सव संयोजन समिती ह्या सर्वांच्या मेहेनतीला दाद देत त्यांचे मन:पूर्वक आभार मानत आहे.
यंदाच्या वर्षी प्रथमच गणेशोत्सवात दोन गद्य STY घेण्यात आली. ह्या दोन्ही STYची उत्कंठावर्धक आणि चटकदार सुरवात करुन दिल्याबद्दल मायबोलीकर psg (जळ्ळं मेलं 'लक'क्षण) आणि प्रकाश काळेल (अपराजित) ह्यांचे खास आभार!
मायबोलीकरांना कोड्यात टाकायला सदा उत्सुक असलेले स्लार्टी, गजानन देसाई आणि क्ष ह्यांनी वेळातवेळ काढून "परस्पर संबंध ओ़ळखा" साठी कोडी बनवून दिली तर "कायापालट" स्पर्धेसाठी मिल्या ह्यांनी मायबोलीवरच्या असंख्य कविता चाळून कवितांची निवड करून दिली. तसेच ह्या कवितांच्या रचनेबद्दल माहितीही दिली. याच स्पर्धेसाठी मायबोलीकर कवी वैभव जोशी, हरीष दांगट, झाड, आणि चक्रपाणी ह्यांनी आपल्या रचना उपलब्ध करून दिल्या. ह्या अमूल्य योगदानासाठी स्लार्टी, गजानान देसाई, क्ष, मिल्या, वैभव जोशी, हरीष दांगट, झाड, आणि चक्रपाणी ह्यांना धन्यवाद !
पाककृती स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल परिक्षकांचे आभार. तसेच शुध्दीकरण, मुद्रित शोधन व वेळोवेळी लागेल ते सहाय्य केल्याबद्दल मायबोलीकर आयटीगर्ल, psg, शोनू, सुपरमॉम, सशल, चिनूक्स तसेच मंडळाच्या सल्लागार रुनी ह्यांचे विशेष उल्लेखनीय आभार!!
ह्यावर्षी मायबोलीकरांच्या परिवाराला गणेशोत्सावात सामिल करून घेण्यासाठी लहान मुलांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. आपल्या मुलांना ह्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल पालक मायबोलीकरांचे तसेच अतिशय छान छान चित्रे काढल्याबद्दल सर्व छोटुकल्यांचे कौतुक.
आता सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाचे. आम्हां सर्वांवर विश्वास दाखवून गणेशोत्सव संयोजनाची संधी दिल्याबद्दल संयोजक मंडळातल्या प्रत्येकातर्फे अॅडमिन ह्यांना मनापासून धन्यवाद. अॅडमिन आणि वेबमास्टर ह्यांनी वेळोवेळी तांत्रिक मदत, कायदेशीर बाबींबद्दल सल्ले, मार्गदर्शनपर प्रेमळ सूचना आणि अनुभवांचे बोल सढळ हस्ते आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांच्या मदती शिवाय तसेच सहकार्याशिवाय गणेशोत्सव पार पाडणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्या दोघांचे आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत !
गणेशोत्सवाच्या संयोजनामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लागला आहे पण अनवधानाने इथे उल्लेख करायचा राहून गेला अशा सर्वांनाही संयोजकांतर्फे धन्यवाद!
कुठल्याही गोष्टीमध्ये सुधारणेला वाव असतोच. जर यंदा गणेशोत्सवात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील किंवा काही गोष्टी अधिक चांगल्या पध्दतीने करता आल्या असत्या असं आपल्याला वाटत असेल तर ते आम्हाला नक्की कळवा. पुढच्या वर्षीच्या संयोजक मंडळाला त्याची निश्चित मदत होईल. आपल्याला काय आवडलं, काय नाही आवडलं किंवा आणखी काय करता आलं असतं ह्याबद्दल जाणून घ्यायला आम्ही सर्व जण उत्सुक आहोत.
स्पर्धांच्या मतदानासाठी ह्या दुव्यावर पहा.
धन्यवाद,
मायबोली गणेशोत्सव २००९ संयोजक मंडळ.
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोरया मोरया मोरया रे, बाप्पा
मोरया मोरया मोरया रे, बाप्पा मोरया मोरया मोरया रे
मोरया मोरया मोरया रे, बाप्पा मोरया मोरया मोरया रे........!!!!
अरे मी तिकडे पोस्टून आले की
अरे मी तिकडे पोस्टून आले की आत्ताच
हे पण जब्बर्र्दस्त ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पल्ले सहिइइइइइइइइच
यंदाचा गणेशोत्सव दणदणीत झाला. सगळ्याच संयोजकांचे कौतुक.
पन्ना, अल्पना,चंपक भाग्यश्री, अडम, सिंड्रेला आणि आरजे सगळ्यांचच अभिनंदन. सगळ्या स्पर्धा आणि खेळ झक्कासच मजा आली. झब्बु ची कल्पना विशेष उल्लेखनिय. तुम्ही केलेल्या सगळ्याच जाहिराती कल्पक. गुड टीमवर्क. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रात्रंदिवस काम करत होते सगळेच
तुम्हा सगळ्यांसाठी जरासा श्रमपरिहार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती बाप्पा....................मोरया
जय गणेश! गणपती बाप्पा मोरया,
जय गणेश!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
मा बो करांना हाच आशिर्वाद द्या, असेच उत्तम उत्तम साहित्य सदैव येऊ द्या....
जय गणेश!
ह्यावर्षी गणेश उत्सवात खूप
ह्यावर्षी गणेश उत्सवात खूप मजा आली. स्पर्धा पण छान होत्या. झब्बू जेव्हा कळला तेव्हा खेळायला ज्यास्त मजा वाटली.
सर्व संयोजकांचे मनःपुर्वक आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जाहले भजन आम्ही नमितो तव
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा||
वारुनीया विघ्नें देवा रक्षावे दीना ||
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!!
निरोप घेतो आम्हा आता आज्ञा
निरोप घेतो आम्हा आता आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..
गणपती चाल्ले गावाला चैन पडेना
गणपती चाल्ले गावाला
चैन पडेना जिवाला.......!!!
गणपती बापा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या......!!!
एक दोन तीन चार
गणपतीचा जय जय कार......!!!
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!! स्मित
एकदोन तीन चार गणपतीचा जय जय कार......!!!
एक लाडु फुटला गणपती बाप्पा उठला!!
मेरे सारे पलछिन सारे
मेरे सारे पलछिन सारे दिन
तरसेंगे सुन ले तेरे बिन
तुझको फिरसे जलवा दिखाना ही होगा
अगले बरस आना है आना ही होगा
देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें
तो मान ले तू मान भी ले कहना मेरा
लौटके तुझको आना है
सुन ले कहता दीवाना है
जब तेरा दर्सन पाएंगे
चैन तब हमको आना है
मोरया मोरया मोरया रे
बाप्पा मोरया मोरया मोरया रे
तुझको फिरसे जलवा दिखाना ही होगा
अगले बरस आना है आना ही होगा
गणपती बाप्पा मोरया पुढच्या
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या.
संयोजकांना अनेक धन्यवाद. अगदी
संयोजकांना अनेक धन्यवाद. अगदी घरचा गणपती असल्यागत वाटत होतं गेले काही दिवस!
अगदी मस्त, मस्तच कार्यक्रम केलेत सगळे.
पुढच्या वर्षी लवकर या विघ्नेश्वरा!
सहीच!! संयोजकांचे खुप खुप
सहीच!!
संयोजकांचे खुप खुप आभार्..एवढ्या छान गणेशोत्सवाबद्दल.
गणपती बाप्पा मोरया!!
पुढच्या वर्षी लवकर या!!
गणपती निघाले गावाला....चैन
गणपती निघाले गावाला....चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या !!!
संयोजक मंडळाचे अनेक आभार. सर्व कार्यक्रम उत्तम झाले.
||मोरया||
"गणपति चालले गावाला, चैन
"गणपति चालले गावाला, चैन पडेना ना आम्हाला"
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!! मंगलमूर्ती मोरया!!
मोरया रे बाप्पा मोरया रे...
मस्त गणेशोत्सव! संयोजकांचे
मस्त गणेशोत्सव! संयोजकांचे अभिनंदन.
बाप्पा मोरया!!
खरंच यावेळचा गणेशोत्सव एकदम
खरंच यावेळचा गणेशोत्सव एकदम दणक्यात साजरा झाला !! भरपूर द्रुक श्राव्य कार्यक्रमांमुळे अगदी खर्या मांडवात आल्यासारखं वाटत होतं रोज, अन हे विसर्जन मिरवणुकीचे ताशे पण जबर्याच !!
संयोजक, तुमचं मनापासून अभिनन्दन बर का!! खूप मज्जा आली उत्सवात !!
गणपती बाप्पा मोरया!! पुढच्या वर्षी लवकर या !!
मोरया हो मोरया! पुढच्या वर्षी
मोरया हो मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
या आपल्या गणेशोत्सवाच्या संयोजकांचे निश्चितंच खूप कौतुक केले पाहिजे. स्वतःचे व्याप / कामे सांभाळून त्यानी ज्या पद्धतीने हा उत्सवाचे व्यवस्थापन सांभाळले, त्याला तोड नाही. साईट चे डिझाईन अतिशय सुंदर! लॅन्डिग पेज, आणि प्रत्येक विषयाची पाने सर्व एकदम मस्तं!
सपना ,रुपाली, पराग, अल्पना , भाग्यश्री , भारत , तृप्ती , राहुल .. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. समीर तुझे व्यक्तीशः आभार.. अजय, धन्यवाद!
आणि सर्वच मा बो कराना हार्दिक शुभेच्छा! गीतसंग्रहाचं भरभरून स्वागत केलंत .. कौतुक केलंत.. प्रोत्साहन दिलंत.. सुरेख लिखाण, मुलाखती, माहितीपर लेख वाचायला मिळाले, रचना ऐकायला मिळाल्या, शतशः धन्यवाद!!
अजून काही पुढे केलं, तर नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करायला आवडेल..
खूप मजा आली उत्सवाला...पुढचे काही दिवस नक्कीच चैन पडणार नाही!
जय हेरंब गिरीजा तनया
परतुनी तुम्ही लवकर या!!
गणपती बाप्पा मोरया पुढच्या
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लौकर या
मायबोलीचा गणेशोत्सव एकदम जोरदार झाला! संयोजक आणि कार्यकर्ते, तसेच सर्व भाग घेतलेल्यांचे अभिनंदन! देशात असताना या दिवसांत सारखे 'बाहेर काहीतरी जोरदार चालू आहे' असे वाटत असते तसे मायबोलीच्या गणेशोत्सवामुळे साईट वर काहीतरी मस्त चालू आहे असे वाटत होते. मजा आली.
जय देव जय देव जय गणपती
जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||
लंबोदर सुंदर पाषंकुशधारी
वरदहस्ते मुर्ती मुषकाची स्वारी
नागेन्द्राचा विळखा धारूनिया उदरी
रत्नजडीत मुकुट शोभतो शिरी ||१||
सर्वांग सुंदर देवा गणराया
आदिशक्तीशाली गौरीच्या तनया
भक्तांची दु:खे नेशी तु विलया
तारिशी सारी विघ्ने करूनी तू किमया ||२||
कार्यारंभी पूजन तुझे करावे
निर्विध्न तू कार्य सिद्धीस न्यावे
संकट येता देवा मज तू तारावे
अनंतरूपे दर्शन आम्हा तू द्यावे ||३||
त्रैलोक्याचा देव देवांचा त्राता
दीनांचा उद्धार, ज्ञानाचा दाता
बुद्धीचा तू देव विद्यागणनाथा
सद्भावे ठेवितो तव चरणी माथा ||४||
तू कोटी सूर्य तेज निर्गुण आकार
ज्ञानियांचा राजा सद्गुण साकार
जय जय श्री गणराज मज तू पावावे
मानून घे ही सेवा केली मनोभावे ||५||
आनंदे उत्सवे राहिलासी देवा
पुढच्यावर्षी लवकर येशील ना देवा
काही झाले अनुचित देवा क्षमा असावी
तुझी सतकृपा सदैव आम्हावरी व्हावी || ६||
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!
यावेळचा मायबोलीवरचा गणेशोत्सव खरंच सुंदर झाला. संयोजक मंडळाने खूप कष्ट घेऊन विविध प्रकारचे कार्यक्रम या बारा दिवसांत सादर केले. त्याबद्दल त्यांचे अगदी मनापासून आभार!
अडमच्या मुलाखती आणि विशालचे 'मंडळ' ही लेखमाला हे विशेष आवडले. इतर मान्यवरांचे लेखही छान होते. यावेळी श्रवणीय कार्यक्रम म्हणजे पर्वणी होती. उपासक यांच्या अल्बममधली सर्व गाणी, तसेच श्यामली, जयावी यांची गीते, सर्व सुरेख होती. रोज एक एक गाणे ऐकायला मिळाले. त्याबद्दल त्यांचेही आभार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता स्पर्धेचे मतदान कुठे करायचे ते सांगा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं सुरु आहे मिरवणुक
मस्तं सुरु आहे मिरवणुक !!
गणापती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !
गणपती चाल्ले गावाला, चैन पडेना आम्हाला.
गणपती चाल्ले गावाला चैन पडेना
गणपती चाल्ले गावाला चैन पडेना आम्हाला!
गणपती बापा मोरया पुढल्या वर्षी लवकर या!
एक दोन तीन चार गणपतीचा जय जय कार!
गणपती बापा मोरया पुढल्या वर्षी लवकर या!
संयोजक मंडळ - स्वयंसेवक, उपासक सर्वांचेच आभार.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!!
खुपच छान झाला यावेळेचा गणेशोत्सव...
संयोजक मंडळाचे खुप खुप आभार आणि अभिनंदन!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या वर्षी खरच गणपती अगदी
ह्या वर्षी खरच गणपती अगदी घरचा, बिल्डिंगचा वगैरे असल्यासारखा "आपला" वाटला. त्यामुळे आज ह्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एकदम हातात लेझिम घेऊन उतरावसं वाटलं. आणि ...
आणि त्याबरोबरच, घरचा गणपती निघताना जे हमखास माझं होतं... ते झालं.
डोळ्यात पाणी आलं...
संयोजक, स्वयंसेवक, सगळे कलाकार, आणि कल्लाssकार, किती आभार मानावेत तुमचे?... किती घर-दारं आणि मनं अशा निर्भेळ आनंदाने भरलीत तुम्ही...
ज्या सद्-बुद्धीने, प्रेमाने, भक्तीने हे कार्य पार पाडलत ती सदैवं जागृत राहो, अन त्यातला अंशतरी माझ्यात येवो ह्यापरतं मागणं नाही.
जय गणपती गुणपती गजवदना...
मोरया मोरया मोsssssरया!
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
संयोजकांचे मनःपुर्वक आभार!
सगळ्या स्पर्धा, कार्यक्रम यात खूप वैविध्य होतं.
देशाबाहेर राहूनही गणेशोत्सवाची मजा मायबोलीमुळे थेट घरबसल्या घेता आली !!
Pages