परवा चायनीज दुकानात गेलो. एका ठिकाणी गोठवलेल्या ताज्या तिसर्यांचे पाकीट दिसले. नेटवर मिळालेली सोप्पी पाककृती आणि मी केलेले बदल पुढीलप्रमाणे.. उत्तम झाल्या चवीला.. सोबत चित्र देत आहे..
पाककृती मधे सुका/सुके इत्यादी शब्द हे तयार होणार्या पदार्थाचे विशेषण आहे.. मुळ तिसर्या ताज्या न वाळवलेल्या आहेत...
१. एक पाकीट तिसर्या.
२. १ मोठा कांदा बारीक कापून.
३. काद्यांएवढे खोबरे (ओला नारळ).
४. १ टीस्पून तिखट.
५. १/२ टीस्पून हळद.
६. चवीला मीठ.
७. एक टेबलस्पून कोकम आगळ
८. १ टीस्पून मालवणी मसाला..
९. १ ते १/२ टेबलस्पून तेल.
तिसर्यांचे पाकीट उघडून ४/५ तास ठेवा म्हणजे त्या सर्वसाधारण तापमानाला येतील.
त्यातले सगळे पाणी काढून टाका. मी पेपर टॉवेल वापरून कोरड्या करून घेतल्या.
तेलावर कांदा परता. अर्धवट शिजला की त्यात खोबरे टाकून दोन्ही थोडे तपकीरी होईपर्यंत परता.
आता त्यात तिसर्या टाकून ३ ते ४ मिनिटे परता (मी घेतलेल्या आधीच शिजलेल्या होत्या त्यामुळे खूप वेळ शिजवल्यास रबरी होतील).
उरलेले जिन्नस टाकून १ ते २ मिनिटे ढवळून घ्या आणि लगेच खा...
मालवणी मसाल्याची पाककृती दिसली.. नसेल तर गरम मसाला घालता येईल.
तिसर्या.... पदार्थ...
तिसर्या....
![TisaryaaPacket.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u25/TisaryaaPacket.jpg)
पदार्थ...
![FinalProd.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u25/FinalProd.jpg)
मस्त पण चाननीज दुकान म्हणजे
मस्त
पण चाननीज दुकान म्हणजे कोणतं ते कळलं नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
धीर धरा धीर धरा.. तत्वास
धीर धरा धीर धरा.. तत्वास हडबडू गडबडू नका...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे सध्या मायबोलीवर किंवा
अरे सध्या मायबोलीवर किंवा सार्वत्रिक पेस्कॅटेरिअन सप्ताह, पंधरवडा, मास असलं काही सुरू आहे का? सीफूडच्या रेसिपीज् चं उधाण आलेलं दिसतंय ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू ऐवजी बटाटे घालणार हे
तू ऐवजी बटाटे घालणार हे माहीतच आहे..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हे म्हणजे फोडणीची पोळी किंवा
हे म्हणजे फोडणीची पोळी किंवा पोह्यांसारखंच वाटतंय ..
तर चेन्ज म्हणून मी चायनीज दुकानातलं टोफू आणून करून बघते .. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सशल, पोहे असे दिसतात तुझे? मी
सशल, पोहे असे दिसतात तुझे? मी आल्यावर करू नकोस बरं! फोचीपो चालेल.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरेरे सायो, काय हे .. मला
अरेरे सायो, काय हे
.. मला म्हणायचंय एक जनरल कॉन्सेप्ट लेव्हल ला .. म्हणजे फोडणी करा, त्यात कांदा घाला, खोबरं घाला .. मग जे काय मेन इन्ग्रिडिअन्ट आहे तो घाला परता, वाफ काढा इत्यादी ..
चायनीज दुकान..आयला शोधाव
चायनीज दुकान..आयला शोधाव लागेल हे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
देसाई, शिंपले सोलावे लागतात
देसाई, शिंपले सोलावे लागतात का? की आतलं काढलेललच असतं ?
इथे मिळतात त्यात आतलं काढलेलं
इथे मिळतात त्यात आतलं काढलेलं असतं....
काही ठिकाणी एक शिपी म्हणजे एका बाजूला शिंपला काढलेलाही मिळतो..
पण या पाककृतीसाठी काढलेला मासा हवा...
छान छान! मी फक्त तिसर्या
छान छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी फक्त तिसर्या शिकल्या की शिजल्या तेवढंच बघायला आले.
रत्नागिरीत मिळतात अशी तिसर्यांची माष्टं(असंच म्हणायचं, मासा नव्हे, जास्तीत जास्त मांस म्हणू शकता).
आम्ही तिकडे गेलो की नेहमी स्टॉक आणून ठेवतो.
रस्सा किंवा सुके, कोणतीही पाकृ करायच्या आधी फक्त गरम पाण्यात अर्धा तास भिजत घालायची माष्टं.
आईला कशाला त्रास... तुम्हीच
आईला कशाला त्रास... तुम्हीच शोधा...
रत्नागिरीत मिळतात अशी
रत्नागिरीत मिळतात अशी तिसर्यांची माष्टं >>>>>> कितीतरी वर्षांनी हा शब्द ऐकला.
गोगो,बरीचशी आमची पद्धत.फक्त्तेलात ओ.खो.न घालता सर्व झाल्यावर घालते आणि आगळाऐवजी कोकमं/सोलं घालते. तिसर्या इथे मिळत नाहीत आताशा.
ताज्या तिसर्याच खायला चिवट
ताज्या तिसर्याच खायला चिवट (रबरी) लागतात, मग सुक्या कशा लागत असतील?..
सुक्या कशा लागत असतील?..>>ते
सुक्या कशा लागत असतील?..>>ते ओल्या तिसर्यांचे सुके आहे.तिसर्या जास्त न उकळता केल्या की चिवट लागत नाहीत.
.
.
उप्स, माय बॅड. मला वाटलं
उप्स, माय बॅड. मला वाटलं सुकवलेल्या तिसर्या (सोड्या सारख्या)
मलाही आधी सुकवलेल्या
मलाही आधी सुकवलेल्या तिसर्याच वाटलं होतं ..
>> तिसर्यांचे पाकीट उघडून ४/५ तास ठेवा म्हणजे त्या सर्वसाधारण तापमानाला येतील.
फ्रोजन आहेत असं पाकीटावर लिहीलं आहे ..
(No subject)
सशल, तू बटाटे घालशील तर त्या
सशल, तू बटाटे घालशील तर त्या सुक्या दश्श्या होतील मग.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Bharee disatoy ha prakar paN.
Bharee disatoy ha prakar paN.
ताज्या तिसर्याच खायला चिवट
ताज्या तिसर्याच खायला चिवट (रबरी) लागतात, मग सुक्या कशा लागत असतील?. >>
Cento Whole Baby Clams कॅनमधल्या , किंवा अशा फ्रोझन दोन्ही मस्त लागतात. वेगमन्स मधे कधी कधी फ्रोझन मिळतात.
बुवा, दश्शा म्हणजे काय म्हणता
बुवा, दश्शा म्हणजे काय म्हणता हो? मेंडीकोटातल्या मेंढ्या?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला नेहेमी इवन क्रिओल/केजन
मला नेहेमी इवन क्रिओल/केजन सुप, जंबलाया मधल्या तिसर्या हि चिवटंच मिळाल्यात...
मला नेहेमी इवन क्रिओल/केजन
मला नेहेमी इवन क्रिओल/केजन सुप, जंबलाया मधल्या तिसर्या हि चिवटंच मिळाल्यात >> त्या बरेचदा अधिक उकडलेल्या असतात म्हणून असेल.
तिसर्या ! हम्म इंटरेस्टिंग ,
तिसर्या ! हम्म इंटरेस्टिंग , लईच अवघड शब्द आहे , पहिला आणि दुसरा पं असतो का ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण तैयार डिश जाम भारी दिसतेय.
माष्टं/कोलंबी आधी शिजवलेली
माष्टं/कोलंबी आधी शिजवलेली असली तर परत जास्त शिजवली तर चिवट (रबरी) होतात. त्यामुळे परत जास्त वेळ शिकवू (शिजवू) नये..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्री.. खायला ये..
सशलः दश्या म्हणजे एकादश्या..
>> दश्या म्हणजे
>> दश्या म्हणजे एकादश्या
तरीसुद्धा नाही कळलं .. (आधी वाटलं बुवांच्या पेशल व्होकॅब मधला शब्द आहे ..)
पहिला,दुसरा म्हणजे शिपल्याचे
पहिला,दुसरा म्हणजे शिपल्याचे दोन भाग असतिल, दोन्ही भाग काढुन झाल्यावर आत जे काय दिसत ते तिसर्या !!
असच आहे का मासे एक्सपर्टानो!
Pages