मूळचा हा प्रकार विएतनाम चा असला तरी पुष्कळश्या थाय रेस्टॉरेंट्स च्या मेन्यू मधे सापडतो छाओ थॉम.
पहिल्यांदा चीन मधे एका साऊथ ईस्ट एशियन वरायटी सर्व करत असलेल्या रेस्टॉरेंट मधे चाखला होता आणी मग तेथील कुक च्या टिप्स, लोकल मासिकात आलेली रेसिपी ,नेट इ. च्या मदतीने घरीच बनवून पाहण्याचा प्रयत्न सफल झाल्यामुळे , तुम्हा सर्वांबरोबर शेअर करत आहे.
तर ऊस,प्रॉन एकत्र... ऊफ.. कस्काय लागत असेल अश्या (कु)शंका मनातून काढून टाका आणी पुढे चला..
छाओ थॉम करता
१) १ पाउंड सोललेले,स्वच्छ केलेले श्रिम्प्स
२) २ टेबलस्पून बारीक केलेला चिकन खीमा
३) २ टी स्पून कॉर्न स्टार्च
४) १ टी स्पून काळीमिरीपूड
५) अर्धा टी स्पून पांढरी मिरपूड
६) १ अंड- थोडसं फेटून
७) लसणाच्या ३,४ पाकळ्या + २ लहान कांदे (shallot)= एकत्र वाटलेले
८) सजवण्याकरता - लेट्यूस्,कोथिंबीर्,पुदिना चिरून
९) ऊसाचे अर्धा इंच डायमीटर चे लांबटसर तुकडे
१) श्रिम्प्स ना थोडे मीठ लावून लगेच धुवून टाकून, कोरडे करा.
२) श्रिम्प्स मधे सर्व जिन्नस घालून मिक्सर वर जाडसर वाटून घ्या. फार बारीक करू नका.श्रिम्प्स चे लहान तुकडे दिसले पाहिजेत.
३) आता या मधे बारीक केलेला चिकन खीमा नीट मिसळून हे मिश्रण फ्रीज मधे अर्धा तास ठेवा. म्हंजे मिक्शचर छान सेट होईल.
४) आता एका हाताला तेल लावून एकेका ऊसाच्या काडीवर हे मिश्रण कबाब सारखे घट्टं रॅप करा. हाताने छान स्मूद करा.
५) सगळे कबाब रॅप झाल्यावर ४,५ मिनिटे स्टीम करा. ( ढोकळा पात्रात किंवा जसे जमेल तसे )
६) सर्व बाजूंनी सोनेरी रंग येस्तोवर शॅलो फ्राय करा.
७) लेट्यूस च्या पानावर सर्व करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर्,पुदिन्याची पाने घालून सजवा.
स्नॅक्स म्हणून सर्व केला जाणारा हा पदार्थ मी बेसिक चिकन फ्राईड राईस बरोबर सर्व केला . त्यामुळे पोटभरी चा झाला.
कबाब वळणे इन द प्रोसेस
स्टीम झाल्यावर
कबाब खाऊन झाल्यावर मजेत ऊस चावत बसावे..
१) स्टीम करण्या करता स्टीमर मधे parchment paper ठेवला तर तेलाचा हात लावण्याची गरज नाही पडणार.
२) छाओ थॉम, ओपेक दिसू लागले आणी जरासे फुगले कि नीट स्टीम झालेत असे समजावे.
३) शॅलो फ्राय ऐवजी ७,८ मिनिटे गोल्डन रंगावर ग्रिल केले तरी चालतात. पण मला शॅलो फ्राईड ची चव जास्त आवडते.
कसल सॉल्लीड्ड दिसतय वर्षू
कसल सॉल्लीड्ड दिसतय वर्षू हे..वॉव...
दिसायला तरी छान आहे. बनउन
दिसायला तरी छान आहे.
बनउन बघीतल्या वर कळेल
उस आणि श्रिम्प्स विचित्र
उस आणि श्रिम्प्स विचित्र कॉम्बिनेशन वाटताय. पण फिनिश फोटो यमी दिसताय. विदाउट उस करुन बघेन
भारी दिसतय हे! कॉम्बो चांगलं
भारी दिसतय हे!
कॉम्बो चांगलं लागेल. पण ऊस खूप कडक लागेल ना? की वाफवल्यावर मऊ पडतो ?
भार्री वाटतेय रेसिपी!! उसाचा
भार्री वाटतेय रेसिपी!! उसाचा फ्लेवर किंवा गोडसर चव येते का कबाब ला?
अदिती, साऊथ ईस्ट देशातील
अदिती, साऊथ ईस्ट देशातील प्रॉन्स , श्रिम्प्स आणी इतर सी फूड्स पासून तयार केलेले पदार्थ नेहमी हनी बेस्ड डिप्स किंवा सॉस बरोबर सर्व केले जातात. मलाही आधी गोडु नकोसं वाटे, पण सवयी ने आवडू लागले आणी असे जर्रासे गोडसर डिप्स ( या केस मधे ऊस ) श्रिम्प्स बरोबर उत्तम कॉम्प्लीमेट करतात अशी खात्री पटली.
ऊसा ऐवजी Fennel fronds, स्प्लिट लेमन् ग्रास इ. चे दांडे वापरता येतील.
ऑस्सम मला वाटते एक बॉबी चिनचा
ऑस्सम
मला वाटते एक बॉबी चिनचा कार्यक्रम होता ट्रॅव्हल आणि लिविंग चॅनेलवर
टू डू लिस्टवर आहे
पराग, चांगला,फ्रेश्,कोवळा ,
पराग, चांगला,फ्रेश्,कोवळा , ईझीली चाऊ शकणारा मऊ ऊस मिळतो ना.. सुपर मधे चेक कर!!
त्यांच्या रूपावरून त्यांचा रसरशीत पणा कळतो!!!
मैत्रेयी.. ऊसाचा अजिबात फ्लेवर किंवा चव कबाब मधे उतरत नाही.. ओन्ली चावल्यावरच . पण ही खात्री लेमन ग्रास वापरल्यास नाही देता यायची!!
अमेय बहुत सोप्पा है...
अमेय बहुत सोप्पा है... माझ्यावरून सांगतेय कोणालाही सहज जमेल..
भारी आहे पाकृ . वर्षूताई तू
भारी आहे पाकृ . वर्षूताई तू भारतात आलीस मी येते तुझ्याकडे हे खायला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान दिसतेय रेसिपी .. (उकडलेले
छान दिसतेय रेसिपी ..
(उकडलेले बटाटे, सोया चंक्स् , पनीर, टोफू वापरून करून बघायला हरकत नाही .. ;))
मालाडला एक अंकल्स् किचन नावाचं चायनीज रेस्टॉरन्ट पुर्वी फार फेमस होतं (आताही तेव्हढं फेमस आहे का ते माहित नाही) .. तर मला असं फार वाटतंय की पुर्वी तिकडे चिकन लॉलीपॉप चिकन चं मीट उसाच्या करव्यावर वरच्यासरखं लावून फ्राय करून द्यायचे .. (ह्याच्याशी माझ्या माहितीतले काही अंकल् किचन फॅन सहमत नाहीत .. त्यांचं म्हणणं तिकडचे चिकन लॉलीपॉप्स ही पारंपारीक बोनवरच असायचे ..)
आज काय तू आणि जागु एकत्र
आज काय तू आणि जागु एकत्र मार्केटमध्ये श्रीम्प्स आणायाला गेल्या होत्या का? जरा थॉमा की
बच्चे कंपनी/त्यांच्या बाबाला आवडेल असं वाटतंय. माझ्याइथे उस अॅज सच मी तरी पाहिला नाहीये सो दिस इज ऑन यु (अगेन :P)
वेका.. नेकी और पूछ पूछ मला
वेका.. नेकी और पूछ पूछ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला ही इकडे Trader Joe's च्या रीबा स्मिथ नावाच्या बहिणीकडे नीट कापलेले ,स्वच्छसे ऊसाचे करवे मिळाले.. मस्त फ्रेश होते. लांब निवडून घेतले, बाकीचे तसेच खाऊन टाकले.
तू पण Joe's मधे ट्राय करून बघ..
Jabaree disatay. Restaurant
Jabaree disatay. Restaurant madhye milalyas chaan hoil. Shodhate!
आयला हे ड्रॅगन ॲंड फिनिक्स
आयला हे ड्रॅगन ॲंड फिनिक्स बाॅल्स सारखं दिसतंय, ऊसाच्या कांड्या वगळल्यातर. मस्त फिंगरफुड!
इकडे ऊस मिळतो, इंडियन स्टोर मध्ये. काहि कस्टमर सेंट्रिक, उत्साहि दुकानदार ऊसाचा ताजा रस काढुन देतात...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षु मस्त रेसिपी. ट्राय करुन
वर्षु
मस्त रेसिपी. ट्राय करुन बघाविशी वाट्तेय.
भारता बाहेर स्थायिक लोकहो, तुमच्या इकडील चायनीज दुकानात/बाजारात ( china town etc)शोधा. तिथे ऊस मिळायला हवा.
मी हे नक्की करून बघणार
मी हे नक्की करून बघणार थँक्यु......बायदवे, फ्राईड राईस ची पण लिही ना वर्षुताई.... माझा असा नाही दिसत.
वर्षू तै तु सुद्धा मुंबैत
वर्षू तै तु सुद्धा मुंबैत आलीस की रेस्टॉरण्ट सुरु कर बै. आम्ही सगळे माबोकर येऊच शिवाय त्याचं मार्केटिंग सुद्धा करु
@ राज- अगदी!!अगदी!! ड्रॅगन
@ राज- अगदी!!अगदी!! ड्रॅगन ॲंड फिनिक्स बाॅल्स चा विएती भाऊ .. !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रियास- यस्स्स चायनीज शॉप इज अ गुड आणी हमखास ऑप्शन!!!
वेल.. नको नको रेस्टॉरेंट नको.. घरीच ये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आभा.. वेळ मिळाला की टाकते रेसिपी..
किती यम्मी दिसतय.. मस्तच
किती यम्मी दिसतय.. मस्तच
(No subject)
. चुकून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)