पास्ता
फ्लॉवर बारीक चिरून
ढोबळी मिरची (लाल / हिरवी) बारीक उभी चिरून
मटार दाणे
गाजर उभे / गोल चिरून
५-६ टोमॅटो
टोमॅटो सॉस
१ मध्यम कांदा
कोथिंबीर
मीठ
२ चमचे लाल तिखट
१ चमचा हळद
१. पास्ता पाकिटावर दिलेल्या सूचनेनुसार पाण्यात उकळून घ्यावा,
२. टोमॅटो सॉस साठीपाणी उकळत ठेवावे. उकळल्यावर त्यात टोमॅटो टाकावेत.
३. पास्ता आणि टोमॅटो शिजेपर्यंतसगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.
४. टोमॅटो १० मिनिटानंतर गार पाण्यात टाकावेत. त्याची साल काढून घ्यावेत, आणि मिक्सरमधे प्युरे करावी.
५. पास्ता उकळल्यानंतर चाळनीमधे काढून घ्यावा.
६. कढईमधे तेल टाकून , जिरे मोहरी आणि थोडे हिंग टाकावे.
७. आता कांदा परतून घ्यावा.
८. मग सगळ्या भाज्या टाकव्यात.
९. एक वाफ काढून शिजवून घ्याव्यात.
१०. त्यात पास्ता टाकावा.
११. वरुन घरी केलेली प्युरे आणि सॉस टाकावा. हळद , लाल तिखट, मीठ टाकावे. आणि हलवुन घ्यावे.
१२. कोथिंबीर टाकून गरमा गरम पस्ता वाढावा.
विकतचा सॉस खूप आवडत नाही , म्हणून घरची प्युरे आणि सॉस एकत्र केलाय.
भाज्या जेवढ्या बारीक, तेवढा शिजायला वेळ कमी लागेन.
चीज़ आवडत नाही, म्हणून टाकले नाही.
घरात असतीन त्या बहुतेक भाज्या यात वापरता येतीन.
फोटो आहेत, पण अपलोड करणे जमेना. म्हणून सध्या पाककृतीच.
तळटिप: ती ट्युलिप मी नाही
जेव्हा ट्युलिप(ही) रेसिपीज्
जेव्हा ट्युलिप(ही) रेसिपीज् द्यायला लागते ..
भारतीयीकरण केलेला पास्ता रेसिपी सोपी दिसत आहे ..
>> ३ जणांसाठी पुरेन
हे पास्त्याचे स्वगत असेल का?
ही ट्युलिप 'ती' ट्युलिप
ही ट्युलिप 'ती' ट्युलिप नाही.
पण रेसिपी छान आहे!
१. लेखात प्रकाशचित्रांचा
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पाककृती लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा
या दोन पानांचे वाचन करा. I hope that will help. फोटोशिवाय मजा नाही पाकृला.
*
३ जणांसाठी पुरेन
हे पास्त्याचे स्वगत असेल का?
<<
नव्हे.
आमचा एक (आडनावाने) गुज्जू, पण (३ पिढ्या महाराष्ट्रात जन्मलेला) शुद्ध मराठी बोलणारा मित्र अशा प्रकारची बोली बोलतो. (पुरेल च्या ल ऐवजी न वापरणे)
धन्यवाद दीमा .. अशा
धन्यवाद दीमा .. अशा प्रकारच्या बोली बद्दल माहित नव्हतं ..
आणि ह्या ट्युलिप ला "ती" ट्युलिप समजल्यामुळे अशी बोली अपेक्षीत नव्हती ..
आमच्या विदर्भातही अशा ठिकाणी
आमच्या विदर्भातही अशा ठिकाणी ल चा न करतात.
पुरन का?, टिकन का? खातिन का?
दी.मा. मस्त प्रतिसाद.... बाकी
दी.मा. मस्त प्रतिसाद....
बाकी पाकृ पण जबरा...
फक्त फोटू पायजेत...
पास्त्याचे स्वगत >>>
पास्त्याचे स्वगत >>>
पास्त्याचे स्वगत!
पास्त्याचे स्वगत!
धन्यवाद दीमा . बदल केला
धन्यवाद दीमा . बदल केला आहे.
बाकी सर्वाना धन्स.
आले फोटो. मस्तच.
आले फोटो.
मस्तच.
३ जणांना खायला देऊन मग
३ जणांना खायला देऊन मग त्यांना पुरणार?
छान दिसतोय.
छान दिसतोय.
फोटो मस्त आलेत. आता कशी शोभून
फोटो मस्त आलेत. आता कशी शोभून दिसतेय रेस्पी.
बाकी पास्त्यात हळद हा शुद्ध भारतीय टच आहे.
छान दिसतोय पास्ता.
छान दिसतोय पास्ता.
फोटो मस्तच .. दिल्ली गाजरं
फोटो मस्तच ..
दिल्ली गाजरं (भारतातच फक्त मिळतात तशी गुलाबी, गोड चवीची) बघून एकदम मस्त वाटलं ..
मस्त आहे की इंडियन
मस्त आहे की इंडियन पास्ता..
करुन बघण्यात येईल.
दीमा, जिरे मोहोरी हिंग हा
दीमा, जिरे मोहोरी हिंग हा जास्त भारतीय टच.
गोड रसदार गाजरं +१
दिसायला छान दिसतेय पाकृ.
दिसायला छान दिसतेय पाकृ.
मस्त आहे. कलरफुल. मी पण
मस्त आहे. कलरफुल.
मी पण पास्ता करताना मोहरी, जिरं, हिंग फोडणी करून भाज्या टाकते :D. फक्त फोडणीत हळद नाही टाकत. चीज मात्र आवडतं आमच्याकडे त्यामुळे ते भरपूर टाकते. मिरपूड, ओवापण टाकते.
पास्ता आणि मोहरी....
पास्ता आणि मोहरी.... इंडोइटालियन पास्ता
आभार लोकहो!! खुद्द डेविड
आभार लोकहो!! खुद्द डेविड रोक्कोने(तोच तो जो भारतात येऊन इटालियन रेसिपीस करतो आणि इटलीत जाउन भारतीय) सुद्धा पास्त्यामधे हळद टाकलेली मी बघितली आहे.तेव्ह त्याच्याही सहकार्याने तोंड फिरवलेले :-p
हा पास्ता घरी खूप आवडला.
मला एक सांगा, या पूर्ण पाककृतीमधे पास्त्याला काही भारतीय रीप्लेस्मेंट असु शकते का?
गोड रसदार गाजरं >> आजकाल आमच्या इथे ही गाजरं खूप दिसतात.
यम्मी..भूक लागली. हे
यम्मी..भूक लागली.
हे पास्त्याचे भारतीयीकरण आहे. पण मस्त लागेल.
मला एक सांगा, या पूर्ण
मला एक सांगा, या पूर्ण पाककृतीमधे पास्त्याला काही भारतीय रीप्लेस्मेंट असु शकते का?
<<
डाळफळं / वरणफळं नामक प्रकार ऐकलाय का? तो बेसिकली डाळीत शिजवलेला पास्ताच आहे.
मस्त..वरणफळ्/चिकोल्या/चकोल्या
मस्त..वरणफळ्/चिकोल्या/चकोल्या.
भयंकर मोहमयी प्रकार आहे पावसाळ्यात वगैरे. रिप्लेसेस ऑल मील.
साबुदाणा खिचडीमधे श्रेडेड
साबुदाणा खिचडीमधे श्रेडेड चिकन टा़कण्याएवढंच फोडणी मधे पास्ता बनवणं सीनफुल वाटतं आहे मला. पण इतर खुप पदार्थांना भारतीय चव देतो आपण, तसंच हे ही भारतीय मसाले वापरुन छान लागेल. मायनस फोडणी, पण इतर रेडी मसाले ( गरम मसाला, किचन किंग इ इ) अॅड करुन करायला हवा एकदा पास्ता. .
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
डाळफळं / वरणफळं नामक प्रकार
डाळफळं / वरणफळं नामक प्रकार ऐकलाय का? तो बेसिकली डाळीत शिजवलेला पास्ताच आहे.>>वरणफळं वाटल होत.पण मी कधी वरणफळात सगळ्या भाज्या नाही टाकत.
धन्यवाद अनु ,जाई
मनिमाऊ: एकदा करून पहा.
पास्त्याचं भारतीयीकरण छान
पास्त्याचं भारतीयीकरण छान वाटतंय
आता प्रथेप्रमाणे थोडी भंकस : पास्ता कांदा बटाटा रस्सा, पास्तापोहे, पास्ता भरीत, पास्ता दोसा, उंधियो पास्ता, पास्ता रबडी वगैरे ट्राय करून बघा म्हणावं त्या डेव्हिड रोक्कोंना
ट्युलिप, हलके घ्या
पास्त्याचे आप्पे विथ
पास्त्याचे आप्पे विथ पार्मिसान चटणी
ट्युलिप, हलके घ्या स्मित>>
ट्युलिप, हलके घ्या स्मित>> नक्कीच
पास्ता कांदा बटाटा रस्सा>> :-)) त्याआधी त्याला मी ही सगळी नावा १० वेळा ना अडखळता उच्चारायला सांगेन :-p
Pages