कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . ५ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. गेल्या वर्षी आपण तो साजरा केला नाही. पण या वर्षी काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.
मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्या होणार्या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.
१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्यांची नावे बघून अॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.
मी तयार आहे
मी तयार आहे
मला संयोजनाचा काहिच अनुभव
मला संयोजनाचा काहिच अनुभव नाहि.पण मला उपक्रमात सहभाग घ्यायला आवडेल.
मला आवडेल
मला आवडेल
गणेशोत्सव संयोजनाचा अनुभव
गणेशोत्सव संयोजनाचा अनुभव आहे. पुन्हा सहभागी व्हायला आवडेल.. (रच्याकने माझा जुना id आत्मधून होता)
संयोजक मंडळात काम करणे जमणार
संयोजक मंडळात काम करणे जमणार नाही, काही मदत करण्यासारखी असल्यास नक्की करेन.
उपक्रम होतोय ही आनंदाची गोष्ट
उपक्रम होतोय ही आनंदाची गोष्ट आहे. पूर्ण वेळ देणं जमणार नाहीये
उपक्रमाला शुभेच्छा
अरे वा! बरं वाटलं हा धागा
अरे वा! बरं वाटलं हा धागा बघून...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जयू लाडू मॅगी धन्यवाद मी
जयू लाडू मॅगी धन्यवाद
मी जराशा वैयक्तिक हेतूने संयोजनात सहभागी होतो आहे. मी वाचन चालू केले त्याकाळात गोनिदांची अनेक पुस्तके वाचली. ते माझे आवडते लेखक आहेत आणि चालू वर्ष गो. नि. दांडेकरांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे ह्या खेपेचा मभादि त्यांना समर्पित करावा असे मनात आहे.
मागच्या वर्षी माबोवर मभादि साजरा झालाच नाही, त्यापेक्षा जसा जमेल तसा / तितका तरी साजरा करू असे वाटते आहे. तरी सिंडरेला जाई ललिता तुम्हाला जितके जमत असेल तितके सहभागी व्हा / होऊ या.
मलाही खरंतर अगदी पुर्णवेळ सहभाग घेता येईलच असे नाही. पण यावेळी २७ फेब्रुवारी शनिवारी येत असून शनि रवि इथला वाचक / प्रतिसाद दाते यांचा वावर लक्षात घेता दिवसभराचे खेळ न घेता भागेल असे मनात योजून मी होतोय सहभागी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तूप नाही मिळाले तरी चालेल पण उपास नको घडायला ह्या तत्वावर
अॅडमीन टीम - गोनिदा समर्पित मभादि च्या कल्पनेबद्दल काय वाटते ते कळवा.
मी याआधी कधी कशात भाग घेतलेला
मी याआधी कधी कशात भाग घेतलेला नाही, त्यामुळे थोडे बिचकायला होतेय हो म्हणताना, पण एकदा करुन पाहायला काय हरकत आहे असेही वाटतेय. त्यामुळे, मीही तयार आहे.
संयोजनात भाग नाही घेता येणार,
संयोजनात भाग नाही घेता येणार, पण बाहेरून काहीही मदत लागली तर तयार आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही पूर्ण वेळ देणं जमणार
मलाही पूर्ण वेळ देणं जमणार नाहीये पण मदत करायला आवडेल.
तूप नाही मिळाले तरी चालेल पण उपास नको घडायला ह्या तत्वावर>>>>+१११११
गोनिदा समर्पित मभादि. ! मस्त
गोनिदा समर्पित मभादि. ! मस्त आहे कल्पना.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पुर्ण वेळ देता येणाअर नाहीये मात्र संयोजना साठी.
खरतर अर्धा पाव छटाक करत किलोभर झालेत की संयोजक. फार दिवस उरले नाहीत. येणार्या विकांताचा सदुपयोग संभाव्य संयोजकाना करता यावा म्हणून , लवकर सं मंडळाची निवड व्हावी अस वाटत.
माझे आतपाव धरले तरी चालतील.
गोनिदा समर्पित मभादि हि छान
गोनिदा समर्पित मभादि हि छान कल्पना आहे.
येणार्या विकांताचा सदुपयोग संभाव्य संयोजकाना करता यावा म्हणून , लवकर सं मंडळाची निवड व्हावी अस वाटत.>>+१००
किलोभर झालेत की संयोजक.
किलोभर झालेत की संयोजक.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आत्ता उजाडलेल्या लोकांच्या
आत्ता उजाडलेल्या लोकांच्या सोईसाठी पहिल्या पानावर आणून ठेवते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पूर्णवेळ नाही देता येणार, पण
पूर्णवेळ नाही देता येणार, पण मदत करू शकतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अल्रेडी डझन झाले असतील तर जमेल तसा भाग घेणार. शुभेच्छा.
संयोजनासाठी ग्रूप सुरु केला
संयोजनासाठी ग्रूप सुरु केला आहे.
धन्यवाद वेमा !
धन्यवाद वेमा !
धन्यवाद वेमा
धन्यवाद वेमा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)