स्त्रियांनी अस करणे खरच जरुरी आहे का?

Submitted by Swara@1 on 30 January, 2016 - 01:29

कालपासून तिकडे सचिन पगारेंच्या 'लिंबू - मिरची' च्या लेखावर जोरदार चर्चा चालू आहे आणि आज सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर माझ्या मैत्रिणीने तिच्याबाबतीत घडलेला एक किस्सा मला सांगितला.

हा, तर किस्सा असा आहे कि तिच्या सासूने मसाला करायला घेतला होता आणि माझी मैत्रीण सध्या periods मध्ये आहे आणि चुकून तिचा हात मसाल्याला लागला त्यावरून तिच्यात आणि तिच्या सासूत प्रचंड वादावादी झाली. तिच्या सासुच म्हणन अस होत कि आता तिचा हात लागला म्हणून सगळा मसाला खराब होईल (आणि हे फक्त मसाल्यांच्या बाबतीतच नव्हे तर लोणच्यांच्या बाबतीतही लागू होत म्हणे )

तर मला जाणकारांना हेच विचारायच आहे कि खरच अस असत का ? स्त्रियांनी त्यांच्या 'त्या' दिवसात नवीन बनवायला घेतलेल्या मसाल्याला किंवा लोणच्याला हात लावला तर ते टिकत नाही किंवा खराब होत.

खरच अस आहे का? आणि असेल तर त्यामागे काय (शास्त्रीय) कारण आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण शिक्षण घेउनही मानसिक गुलामगिरीतून सुटका कुठे झाली आहे? सा विद्या: या विमुक्तये. जी असल्या भरताडापासून मुक्ती मिळवून देते ती विद्या ( शिक्षण ), पगारा पुरत्या शिक्षणाने विचारप्रक्रिया कुठे सुरू झालीय ? अन्यथा कॉम्प्युटरचे आधुनिक शिक्षण घेऊन अडाण्यासारखे धागे निघालेच नसते.

खरतर लिंब्याने शहाबानोचे अभिनंदन करायला पाहिजे
शहाबानो प्रकरण झाले नसते तर बाबरीचे दरवाजे राजिव गांधींनी उघडले नसते. Wink आणि यांनी "हातपाय पसरले" नसते Lol

नंदिनी, धन्यवाद.

फुले-कर्वे बरोबर भारतिय संविधान व संविधान निर्मात्याचे पण ऋण मानुयात ज्यांनी स्त्रियांना संविधान मार्फत एवढे हक्क अधिकार दिले.
आता कृपया या धाग्यावर माझे नाव घेऊ नये उगाच स्वराचा धागा भरकटेल.

पादुकानन्द पटले.
अजूनही 'स्त्रियांनी अस करणे खरच जरुरी आहे का?' हे पब्लिक फोरम वर विचारायची वेळ शिकलेल्या मुलींना का येत आहे? चर्चा वैगरे ठीक आहे. पण एवढा निर्णय ही स्वतः घेऊ शकत नसू तर आपण शिकून फक्त बाह्यरूप बदलले. विचारांनी फॉर्वर्ड होणे आवश्यक आहे.

लोणंचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी धार लागते एकदम...
मी काय म्हणते जाऊबाई, लोणचं कसं बनवायचं शिकून घ्या मालकीण बाईंकडून...

त्या अशौचाचे वेळेस मलाही पुरुष असुनही सक्तिने "बाहेर बसावे लागते ">>
४ दिवस स्त्रीया अशौच असतात का? आज सकाळी शौचास गेल्याने दिवसभरात देवाला हात लावू शकत नाही, हात धुतल्यानंतरही असे असते का?
जाऊदे, मी पण कोणाला सांगतेय जे हे सगळे चुकीचे आहे असे म्हणतायत पण त्याचवेळी हे अशौच आहे असे म्हणतायत.
सामी, पटले तुमचे. तावातावाने हे चुकीचे आहे असे सांगणर्या स्त्रीयाच नाहीत तर असे काही पुरुषही बोलतात एक आणि मनात दुसराच विचार ठेवतात.

>>> सकुरा | 1 February, 2016 - 15:32

सनव तै विचारत जाईन हो प्रश्न......

Swara@1 ,या घाग्या वरच्या सगळ्या जेन्ट्स्,पुरषांना हकलुन दे.
फक्त लेडिज्,बायका सासु-सुना एवढेच राहु दे.
म्हणजे थोडक्यात ज्यांना periods येतात तेवढेच.....
<<<

ह्याच न्यायाने:

१. हिंदू धर्म / पंथ / जीवनशैली जे काय असेल त्याबाबत हिंदू नसलेल्यांनी बोलू नये.
२. ब्राह्मणांबाबत ब्राह्मणेतरांनी बोलू नये.
३. हिंदू किंवा ब्राह्मणांनी इतर धर्म व जातींबाबत बोलू नये.
४. भाजप व काँग्रेस ह्यांच्या समर्थकांनी एकमेकांबाबत बोलू नये

असे काही किरकोळ नियम केले की किती सुसह्य होईल इथे वावरणे.

(टीप - हे अवांतर नाही. हे विषय वर इतरांनी काढलेले आहेत. त्यावरील प्रतिसाद आहे. धन्यवाद.)

-'बेफिकीर'!

वुईथ ड्यू रिस्पेक्ट टू युवर अबॉव्ह पोस्ट, .....

>>>>> आज सकाळी शौचास गेल्याने दिवसभरात देवाला हात लावू शकत नाही, हात धुतल्यानंतरही असे असते का? <<<< असे अर्थातच नसते, पण माझ्या पोस्ट मधील "कन्टिन्युअस अनकन्ट्रोल्ड ढेण्डाळायला" हा मजकुर नजरेआड केला आहेत का तुम्ही? तो कळीचा शब्दप्रयोग आहे.

शौच/अशौचाचे कडक नियम आहेत, ज्यांना माहित आहेत ते पाळतात. इतके की धार्मिक विधी सुरु असते समयी अगदी पुरुषाने लघुशंकेला जाऊन आल्यासही "स्नानाने " शुद्धी सांगितली आहे. मात्र दुष्काळी भागात प्यायला मिळत नाही, तर कुठे मिळणार उठसुठ स्नानाला पाणी? तेव्हा अन्य मार्गाने, जसे की शेंडीला/डोळ्यांना/पायावर पाणी घेऊन, तसेच पंचगव्य प्राशन करुन, तसेच विशिष्ट संख्येने गायत्री जपुन शुद्धी करण्यास सुचविले जाते.

>>>>>> जाऊदे, मी पण कोणाला सांगतेय जे हे सगळे चुकीचे आहे असे म्हणतायत <<<<< होय, ते सद्यस्थितीत चुकीचे आहे असे मी म्हणतोय, याचे कारण इतके पराकोटिचे शौच/अशौच पाळून केल्या जाणार्या साधनांमधे /धार्मिकविधींमधे जितकी तरलता/सजगता/गांभिर्य व पंचेंद्रियादिक जाणिवांची जागरुकता एकाग्रतेसहित जितकी असावयास हवी तितकी ती सामान्य माणसांची नसतेच. मग असामान्यांकरताचे (सर्वसंगपरित्याग करुन सन्यास घेतलेल्यांचे) नियम सामान्यांकरता कशासाठी? हा मला पडलेला प्रश्न आहे, व त्याला अनुसरुन मी या प्रथांना वैयक्तिक पातळीवरील धार्मिक कृत्यांकरता त्याज्यच ठरवतोय.

>>>>> पण त्याचवेळी हे अशौच आहे असे म्हणतायत. <<<<< होय, मला जितकी माहिती आहे, तितकी द्यायचा प्रयत्न करतोय, व मी स्वतः देखिल पूजाविधी करताना/सांगताना मलमूत्रादी विसर्जनानंतरची अशौचाची प्रायश्चित्ते (प्रोक्षण्/पंचगव्य /गायत्रीजप) हे करतोच करतो कारण व्यक्तिशः मला तसे करण्याची गरज्/आवश्यकता भासते व मी करीत असलेल्या धार्मिक कृत्यांचा तो अंगभूत भाग आहे, तो मी टाळू शकत नाही, टाळणारही नाही.

आता, मासिकपाळीच्या वेळेस काही पूजापाठ वगैरे करावेत वा नाही, हा व्यक्तिशः घराच्या आत पूर्णतया खाजगी प्रश्न आहे. मात्र सार्वजनिक देवस्थानांचे बाबतीत तो नाजुक व गंभीर सार्वजनिक प्रश्न आहे. प्रश्नांच्या दोन स्वरुपांची कृपया सरमिसळ होऊ नये म्हणुनच मी वरील विश्लेषण दिले आहे. व सार्वजनिक ठिकाणी काय करावे/न करावे या बद्दल मत मांडण्यायेवढी माझी कुवत/पात्रता नाही.

तरीही, घराच्या बाहेर ध्वजवंदन होत असेल, तर घराच्या आत मी बसुन राहिलो काय कि उभारलो काय, प्रश्न पडणार नाही, मात्र तेच मी त्या ध्वजवंदनाच्या जागेवरच उपस्थित असेन, अन तरीही नै मी उभे रहाण्याची प्रथा पाळणार असा आडमुठे पणा केला तर जे होईल, तेच सध्या होत आहे असे माझे मत.
शौच/अशौचाचे काही नियम आहेत. व्यक्तिशः तुम्ही तुमच्या खाजगी जीवनात पाळा अथवा नका पाळू. त्याने फरक पडतच नाही.
अन याचबरोबर, आधीच्या पानावर, स्वच्छतेच्या बैलाच्या धाग्यावरील मजकुराच्या निमित्ताने, केवळ स्त्रीयांकडून घेतल्या जात असणार्‍या सक्तवसुलीबाबत हेच गैरलागु "अशौचाचे" कारण आहे काय असे विचारतो आहे त्याबाबत मांडायला कुणाकडेच काहीच विचार का नाहीत? तेच मजकुर तेव्हडे सोईस्कर दुर्लक्षित का केले जात आहेत ?

>>>>> जाऊदे, मी पण कोणाला सांगतेय <<<<
आणि हो, तुम्ही कुणाला/कोणत्या आयडीला सांगता आहात असा कोता/ कदाचित पूर्वग्रहदुषित विचार करण्यापेक्षा, मी जे दोनही बाजुंचे मुद्दे विचारार्थ मांडले आहे, निव्वळ त्यावर भाष्य कराल तर अधिक बरे नाही का?

बेफिकीर, तुमचा वरील युक्तिवाद पटतो आहे. सहमत.
<<
घंटा.
काय पटलं अन का, ते नीट लिहा. फडतूस बोल्ड अन लाल निळ्या हिरव्या पोस्टी टाकू नका. एच्टीएमेल लै लोकांना येतं इथे.

>>> दीड मायबोलीकर | 1 February, 2016 - 22:57 नवीन

बेफिकीर, तुमचा वरील युक्तिवाद पटतो आहे. सहमत.
<<
घंटा.
काय पटलं अन का, ते नीट लिहा. फडतूस बोल्ड अन लाल निळ्या हिरव्या पोस्टी टाकू नका. एच्टीएमेल लै लोकांना येतं इथे.
<<<

ही कोणती भाषा?

एकमेकांच्या अधिकारावर अतिक्र्मण करू नये, कुणाला मंदीरप्रवेशाला बंदी केल्याने हिंदू असताना हिंदू नसण्याचे स्टेटस कवटाळावे लागू नये या बिनमहत्वाच्या विषयांवरून कुणी गळे काढू नयेत.

भगवे इमाम लिंबूमहाराज पिंपरीकर
(हादाअ संस्था )

फालतूचे स्वतः धर्मविधाते अथवा धर्मरक्षक असल्यागत पोस्टी टाकणार्‍या मूर्खांचा निषेधही करण्याची इच्छा नाही माझी.

माबोवर अनेकदा पूर्वी लिहिले ते पुन्हा लिहितो :

धारयति इती धर्मः अर्थात, (समाजाला) धारण करतो, तो धर्म. लोकांनी अमुक प्रसंगी कसे वागावे, याचे सर्वांनी मान्य केलेले नियम = धर्म.

या ब(ह)डव्यांनी उर्फ तथाकथित पुजारी/वा या धर्मविधात्या धर्मरक्षकांनी त्याच यमनियमांचे माजविलेले अवडंबर = कर्मकांड.

हळूवारपणे, आपल्या भावभावनांना हात घालत, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला हलकेच पीळ घालत आपल्या गळी उतरविलेले निरर्थक रिच्युअल्स म्हणजे कर्मकांड.

कोणे एके काळी, जसे साती यांच्या प्रतिसादात लिहिले आहे,त्यानुसार (ख्रिश्चन प्रथा बरे का) जिथे रजःस्वला स्त्री बसली, तिथे आसनास त्या उत्सर्जनाचा डाग पडला, ते आसन बसण्यास योग्य नाही. यावरून तिला बसण्यायोग्य जागा वेगळी असणे इतक्या मायनर बाबीपासून आज त्याचे माजवलेले स्तोम घृणास्पद आहे. (डाग का पडावा? ज्या काळात कापड विणणे ही कला हाताने कातले जाणारे सूत अन तिथून कापडापर्यंतही होती, त्याकाळी महाराणी द्रौपदीही रजःस्वला असताना "एकवस्त्रा" असे. विचार करा जरा.)

हे इतके अन इतकेच समजून उमजून चर्चा बंद केली तर पुरेसे नाहिये का?

याच मायबोली वर "सॅनिटरी नॅपकीन वापरणार्‍या पुरुषाची" गोष्ट आहे, अन त्याला मिळालेल्या पद्मपुरस्काराचीही.

आपण कॉम्प्युटर वापरता येण्याइतपत हुषार आहोत. सारासारविचारबुद्धी वापरता न येण्याइतपत मठ्ठ आहोत का? कारण आपला मठ्ठपणा, मुसलमान बायकांची पाळी आल्यावर, "त्या धर्मातले हरामखोर कर्मठ धर्मरक्षक काय करतात? हा प्रश्न विचारून, ते 'तसे' करीत असतील तर आपणही अर्थात "हिंदूंनी"तेच केले तर वाईट काय?" असा प्रश्न आपल्या मनात येण्याइतके निर्बुद्ध व धुतल्या मेंदूचे झालो आहोत, हे मान्य केलेच पाहिजे.

आपल्या आजोबाच्या पिढीने आपला देश स्वतंत्र करण्यासाठी कष्ट केले (यात संघ नव्हता)
आपल्या आईबापाच्या पिढीने आपल्याला शाळा-कॉलेज शिकवले. (शासकीय अनुदानित शाळा व कॉलेज)
अन आज आपण इथे पाळी आलेल्या बाईने हात लावल्यावर लोणचे नासेल का? असा प्रश्न विचारतो आहोत? अन त्यावरून "चर्चा" करतो आहोत हे लज्जास्पद नव्हेच काय?

असो. पुरे करतो आता.

ही कोणती भाषा?
<<

शिकायची आहे का? गुरुदक्षिणेसाठी ऑनलाईन मनी ट्रान्स्फर उपलब्ध आहे. व्यनि करतो, दक्षिणा मिळताच उत्तर मिळेल.

अन हो, बेफिकीर महोदय, ती भाषा तुम्हाला नव्हे, तर येडलिम्बूला उद्देशून वापरलेली आहे. तेव्हा डोक्यात राख, माती, इ. घालून घेऊ नका. Wink

स्वरा,

अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
=======================

जालीय वर्तन 'किमान' कसे असावे ह्याचे 'नि:शुल्क' 'ऑनलाईन' प्रशिक्षण येथे उपलब्ध आहे. संबंधितांनी लाभ घ्यावा.

http://www.maayboli.com/node/4843

ते तुम्ही वाचले असेलच, व त्यानुसारच तुम्ही माझा बाप काढला असावा, याची तुम्हाला पुन्हा एकदा नि:शुल्क आठवण करून देतो बर्का, स्वघोषित गझलसम्राट व भासापरबू.

ती भाषा तुम्हाला नव्हे, तर येडलिम्बूला उद्देशून वापरलेली आहे
>>>
ती भाषा लिम्बू टिम्बू ना उद्देशून असली तरी त्यामुळे सार्वजनिक साधन शुचितेचा भंग होतो असे त्यांचे म्हणणे असावे. एकूणच शुचितेचे त्यांना वेड आहे. आणि तुमची ही शिवराळ भाषा अ‍ॅड मिनसाहेब यांच्या नजरेस आणून अ‍ॅडमिन कडे असलेल्या लेजरमधल्या तुमच्या पापाच्या चोपडीत त्याची नोंद व्हावी म्हणून हा विशेष उल्लेख. तुमचे १०० अपराध लवकरात लवकर पंजीकृत व्हावेत म्हणून हा खटाटोप..

बाकी तुमची २३:१३ ची पोस्ट आल्यावर ह्या बीबीचा उद्देशच आटोपल्यासारखा आहे इतकी ती चपखल आहे....

त्या २३:१३च्या पोस्टीत द्रौपदीचा कंस अ‍ॅड केला आहे, त्यामुळे ती आता २३:३२ची पोस्ट आहे. Happy

स्त्रियांनी त्यांच्या 'त्या' दिवसात नवीन बनवायला घेतलेल्या मसाल्याला किंवा लोणच्याला हात लावला तर ते टिकत नाही किंवा खराब होत.>>>>>> नाही गं असं काही नसतं.... तसं असेल तर त्या दिवसात केलेला स्वयंपाक पण खराब होणार नाही का? Happy
लोणची, मसाल्यात काय स्पेशल आहे असं ? जिथे घरात करणारे दुसरे कोणीच नसते तिथे रोजच्या पीठ, मिठ, तांदुळ, मसाले, तेल सगळ्याला हात लागतोच ना.
शास्त्रीय कारणापेक्षा मानसिक कारण जास्त असावे ते यासाठी की पाळी असताना केलेले मसाले, पापड नंतर नैवेद्याच्या स्वयंपाकात वापरले जर गेले तर विटाळ अशी काही समजूत असावी.

तुझ्या मैत्रीणीबद्द्ल सहानुभूती वाटते. काही एकत्र कुटुंबात खरंच अवघड असते या विषयांवर एकमत होणे किंवा नवीन गोष्टी पटवून देणे.

>>>>> कारण आपला मठ्ठपणा, मुसलमान बायकांची पाळी आल्यावर, "त्या धर्मातले हरामखोर कर्मठ धर्मरक्षक काय करतात? हा प्रश्न विचारून, ते 'तसे' करीत असतील तर आपणही अर्थात "हिंदूंनी"तेच केले तर वाईट काय?" असा प्रश्न आपल्या मनात येण्याइतके निर्बुद्ध व धुतल्या मेंदूचे झालो आहोत, हे मान्य केलेच पाहिजे. >>>>>>

दीडम्यासाहेब, वरील मजकुराप्रमाणे, आपण कोण निर्बुद्ध झालो आहोत वा नाहीत हा प्रश्न इथे बाकी सर्वांना विचारण्या ऐवजी, "ज्यांनी या धाग्यावर साळसूदपणे फुसकुली सोडल्यागत "इसाई,मुस्लिम धर्मात पण हे पाळतात का? " हा प्रश्न सार्वजनिकरित्या विचारणार्‍या आयडीला वरील बोधामृत तुम्ही त्यांच्या व्यक्तिगत विपुमधे का पाजित नाही?"

  • अन कधीकाळी वाचलेल्या गोष्टीच्या आड दडुन.... "हे कदाचित थोडंस अवांतर होईल, पण मला कधीकाळी वाचलेली एक गोष्ट आठवतेय. एकदा एका घरात सत्यानारायणाची पूजा होती, ..." इत्यादी सांगत शेवटी ठरवुन "हिंदू धर्मच" मधे आणला, तर त्यांना चर्चा निव्वळ "लोणच्यापुरतीच" मर्यादित ठेवायचे बौद्धिक तुम्ही का देत नाहीत?
  • जे स्वतः हिंदु धर्म, त्यातिल देव/देवता मानित नाहीत, त्यांचेकडुन अक्कल (वा सुधारणांच्या नावाखाली हिंदु धर्मावरील लाखोली) शिकायची गरज पडण्याइतकीही आमचि बुद्धि भ्रष्ट झाली नाहीये.

    म्हणुन हे दीडम्यासाहेबा, मी तुमची आख्खी पोस्ट सांगुन "इग्नोर मारतो आहे" Proud

    <पुर्वी बाजुला बसवायच्या नावाखाली त्या बाईकडुन धान्य निवडुन घे, साठवणीतले कपडे धुवुन घे, मोठ मोठाली भांडी घासुन घे अशी कामे करुन घेत असत.>

    हे पहिल्यांदाच ऐकलं. मग या दिवसांत स्त्रीला विश्रांतीची गरज असते म्हणून आपल्या सुज्ञ पूर्वजांनी योजलेल्या उपायाचं काय झालं?

    माझ्या लहानपणी एका गावठाणातल्या माझ्या मावशीच्या शेजारच्या घरात कोणी बाई कधीमधी कोपर्‍यात बसलेली दिसायची. आता ते घर दोन खोल्यांचं असल्याने तो कोपरा अगदी दाराशीच. म्हणजे घरात येणार्‍याजाणार्‍यांनाच नाही, तर घरासमोर येणार्‍यांनाही ती दिसणार. तेव्हा हे काय ते कळायचं नाही. तिचा लहानगा मुलगाही तिच्या जवळच. मी एकदा त्याचा गालगुच्चा घेतलेला आणि बाकीच्यांनी त्याला हात लावायचा नाही असं सांगितलेलं आठवतंय.
    पण हे असं गावातल्या भर चौकात पिंजर्‍यात बसवल्यासारखी शिक्षा म्हणजे किती मनस्ताप असेल? आता कंडिशनिंगही अशी होत असेल की यात मनस्ताप काही नाही.

    आता लहान कुटुंबांत बाजूला बसवणं परवडण्यासारखं नाही. तरीही लोणची मसाले आणि देवधर्माच्या रूपाने या गोष्टींची आठवण तर राहतेच.

    वर कोणीतरी पाळी पुढे ढकलण्यासाठीच्या गोळ्यांचा उल्लेख केलाय. मंगळागौरीसाठी अशा गोळ्या घेतल्याने क्युरेटिंग करावे लागायचे प्रकरण पाहण्यात आहे.

    वर कोणीतरी पाळी पुढे ढकलण्यासाठीच्या गोळ्यांचा उल्लेख केलाय. मंगळागौरीसाठी अशा गोळ्या घेतल्याने क्युरेटिंग करावे लागायचे प्रकरण पाहण्यात आहे.>>>. एवढेच नाही तर ते प्रकरण अनेक गम्भीर आजार निर्माण करत, उदा. कॅन्सर. असे माझ्या साबाना त्यान्च्या फॅमिली डॉकने ( त्यावेळी त्या मुम्बईत होत्या) सान्गीतले होते. डॉक गायनॅक नव्हते, पण अ‍ॅलोपॅथीक होते.

    एका प्रसंगी, नवरीमुलिलाच लग्नाचे आदले दिवशीच सीमंतपूजन होता होताच पाळी आली.
    मुलिकडचे व मुलाकडचे माझे संबंधितच होते. मुलिकडच्यांनी ही बातमी घाबरत घाबरत सांगितली, तेव्हा "काळजी करु नका, पण उगाच वाच्यताही करीत बसु नका, योग्य ती सॅनिटरी नॅपकीन्स वगैरे वापरा व लग्नाला उभ्या रहा" हे सांगुन, व मुलाकडच्यांनाही अर्थातच सांगुन लग्नविधी पार पाडले गेले. मुलाकडचेही समजुतदारच होते त्यामुळे सर्व निर्विघ्नपणे पार पडले.
    तेव्हापासुन मी लग्नाच्या पीन पासुन पियानोपर्यंतच्या तयारिमधे, नवरीमुलगी (व अन्य स्त्रीयांकरताही) सॅनिटरी नॅपकीन्सची एकदोन पॅकेट राखिव कीटमधे ठेवायचे योजू लागलो, ठेवत जा असा सल्ला देऊ लागलो.

    पिरीयेड बर्थ कंट्रोल पिल्सनी पुढे ढकलला जातो. त्याने लगेच कॅन्सर कसा होईल? जनरली बर्थ कंट्रोल पिल्स ची रिस्क लागू होईल. http://www.mayoclinic.org/healthy-lifestyle/birth-control/in-depth/women...
    अर्थात किती कालावधी साठी आणि कुठल्या गोळ्या इ. वर अवलंबून असेलच.
    हा प्रतिसाद पिरीयेड पुढे ढकला इ. चे समर्थन नाही. बाकी चालुद्या.

    अंजली_१२ | 1 February, 2016 - 14:48
    स्त्रियांनी त्यांच्या 'त्या' दिवसात नवीन बनवायला घेतलेल्या मसाल्याला किंवा लोणच्याला हात लावला तर ते टिकत नाही किंवा खराब होत.>>>>>> नाही गं असं काही नसतं.... तसं असेल तर त्या दिवसात केलेला स्वयंपाक पण खराब होणार नाही का? स्मित
    लोणची, मसाल्यात काय स्पेशल आहे असं ? जिथे घरात करणारे दुसरे कोणीच नसते तिथे रोजच्या पीठ, मिठ, तांदुळ, मसाले, तेल सगळ्याला हात लागतोच ना.
    शास्त्रीय कारणापेक्षा मानसिक कारण जास्त असावे ते यासाठी की पाळी असताना केलेले मसाले, पापड नंतर नैवेद्याच्या स्वयंपाकात वापरले जर गेले तर विटाळ अशी काही समजूत असावी.

    तुझ्या मैत्रीणीबद्द्ल सहानुभूती वाटते. काही एकत्र कुटुंबात खरंच अवघड असते या विषयांवर एकमत होणे किंवा नवीन गोष्टी पटवून देणे.
    <<<< मला माझ उत्तर मिळाल आहे, त्यामुळे बाकिच्या मुर्ख (पुरुषांनी ) हि चर्चा इथेच थांबवावी. कारण प्रश्न काहीही असो जात- धर्म मध्ये आणल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यामुळे जी काय घाण करायची आहे ती स्वताच्या धाग्यावर करा माझ्या धाग्यावर मी हे अजिबात खपवून घेणार नाही (admin ना तसा विपु केला आहे मी ) आणि हो ह्यापेक्षा जास्त खालच्या पातळीची भाषा मला वापरता येते आणि मी वापरूही शकते पण तुमच्या सगळ्यांच्या वयाचा विचार करता ते माझ्या संस्कारात बसत नाही (आणि कृपया मला तस करायला भाग पडू नये ) मी खूपच सौम्य भाषा वापरीये इथे त्यामुळे अपेक्षा आहे कि सगळ्यांना कळेल मला काय म्हणायचय ते.

    त्याने लगेच कॅन्सर होत नाही, पण उठसुठ स्वतच्या मनाने डॉक च्या सल्ल्याविरुद्ध जाऊन असे उपद्व्याप करणार्‍या बायका आहेत. त्यातल्या एक माझ्या सासरच्या नात्यातल्या होत्या. माझे कुठलेच सणवार आत्ता पर्यन्त चूकले नाहीत असे अभिमानाने त्या बोलायच्या. आणी मग कळले की त्या या गोळ्या घेत होत्या. मग गर्भाशयाचे नको ते आजार जडल्यावर वाईट वाटले पण वेळ गेली होती.

    >>>> त्यामुळे बाकिच्या मुर्ख (पुरुषांनी ) हि चर्चा इथेच थांबवावी. <<<<<<
    तुमच्या भावनेशी सहमत.
    फक्त अडचण इतकीच झालीये वरील वाक्यामुळे की, जर माझ्यासारख्याने इथे "चर्चा थांबवली" तर तुमच्या म्हणण्याप्रमाणेच स्वतःहूनच स्वतः मूर्ख (पुरुष) आहोत अशी कबुली दिल्यागत होईल.... Proud नै? Wink
    अन चर्चा सुरु ठेवली तर...... हे म्हणजे धरल तर चावत, सोडल तर पळत अशागत झालय...

    तेव्हा जरा विन विन सिच्युएशनला वाव द्याकी प्लिजच. Happy

    >>>> माझ्या धाग्यावर मी हे अजिबात खपवून घेणार आहे (admin ना तसा विपु केला आहे मी ) <<<<<
    टाईपण्याच्या ओघात होते चुक, पण तो "आहे" शब्द बदलुन "नाही" हा शब्द घालाल का प्लिज? Happy

    Pages