कालपासून तिकडे सचिन पगारेंच्या 'लिंबू - मिरची' च्या लेखावर जोरदार चर्चा चालू आहे आणि आज सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर माझ्या मैत्रिणीने तिच्याबाबतीत घडलेला एक किस्सा मला सांगितला.
हा, तर किस्सा असा आहे कि तिच्या सासूने मसाला करायला घेतला होता आणि माझी मैत्रीण सध्या periods मध्ये आहे आणि चुकून तिचा हात मसाल्याला लागला त्यावरून तिच्यात आणि तिच्या सासूत प्रचंड वादावादी झाली. तिच्या सासुच म्हणन अस होत कि आता तिचा हात लागला म्हणून सगळा मसाला खराब होईल (आणि हे फक्त मसाल्यांच्या बाबतीतच नव्हे तर लोणच्यांच्या बाबतीतही लागू होत म्हणे )
तर मला जाणकारांना हेच विचारायच आहे कि खरच अस असत का ? स्त्रियांनी त्यांच्या 'त्या' दिवसात नवीन बनवायला घेतलेल्या मसाल्याला किंवा लोणच्याला हात लावला तर ते टिकत नाही किंवा खराब होत.
खरच अस आहे का? आणि असेल तर त्यामागे काय (शास्त्रीय) कारण आहे ?
पोरींनो आणि बायकांनो, जशी
पोरींनो आणि बायकांनो, जशी माझी गर्लफ्रेंड मायबोलीवर नाही तसेच तुमचीही सासू इथे नाही याचा फायदा उठवत लई बिनधास्त लिहित आहात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी सस्मित यांचा सल्ला भारी..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसेही निसर्गाच्या अवकृपेने नशीबी आलेला त्रास आपल्या प्राचीन परंपरांच्या कृपेने आरामदायक होत असेल तर का उगाच ढवळाढवळ करा
अवांतर - कुतूहल म्हणून एक शंका. ज्या घरात असले काही काटेकोरपणे पाळले जाते तिथे मोलकरीणीलाही त्या दिवसात भरपगारी सुट्टी देतात का?
Runmesh ho Or molkarin kam
Runmesh ho
Or molkarin kam karun geli ki gharbhar gomutracha shidakava
रीया, ओके. आमच्या ऑफिसमधील
रीया, ओके.
आमच्या ऑफिसमधील विवाहीत मैत्रीणी ज्या जॉब करत असल्याने मोलकरीण ही ज्यांची मूलभूत गरज असते. त्यातही चपात्या करणाऱ्या बाईवरून ज्यांची अर्धीअधिक चर्चा चालते, त्यांना असे काही सांगितले तर त्या सांगणार्यालाच पकडून मारतील.. तर काळाच्या ओघात, गरजेनुसार हे सारे काही आपसूक नष्ट होणारच..
अवांतर - मुंबईपुण्यात साडेतीन वाजलेत. तू पण नाईट रायडर वाटते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शुभरात्री !
Night rider wagaire nahi.aan
Night rider wagaire nahi.aan zop yeina![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Gud nyt
सासूबाईंना मसाला करता येत
सासूबाईंना मसाला करता येत नसणार. नाचता येईना अंगण वाकडं. दुसरं काय?
ह्या काळात असले विचार म्हणजे खरच कीव वाटते त्या सासूची.
मध्यंतरी एका मित्राच्या शेतात
मध्यंतरी एका मित्राच्या शेतात जायचा योग आला होता, त्याने केळीची बाग केली होती. तेथे कळाले कि केळीला शिवाशिव चालत नाही.
त्यामुळे तिकडे स्त्रियांना येवुच दिले जात नाही. कामागार स्त्रिया पण सुट्टीवर असतात त्या काळात. एक क्युरेऑसिटी (जळ्ळी मेली) म्हणुन मी विचारलेच, कि बाकिच्या कामगार लोकांच्या घरी असे असेल तर त्यांना पण सुट्टी देता का?
त्यावर उत्तर ही मिळाले, नाही हो एवढे कसे जमेल, जमेल तेवढे मात्र करत रहायचे. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मागच्या वर्षी बर्यापैकी नुकसान झाले, कुठेतरी शिवाशिव झाली असणार नक्की.
अवघडै. जाता जाता अजुन एक, केळीच्या बागेत डोहाल्जेवण टाइप, ओटीभरायचा कार्यक्रम पण असतो.
मागच्या आठवड्यात आमच्या गावात एका ठिकाणी देशी गाईचा पण डोहाळजेवणाचा मोठ्हा कार्यक्रम झाला. ( जस्ट फॉर अॅडीशनल नॉलेज )
देशी गाईची ओटी कशी भरली
देशी गाईची ओटी कशी भरली असावी?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पृथ्वीपेक्षा 800 पट मोठ्ठा
पृथ्वीपेक्षा 800 पट मोठ्ठा असलेला "शनी" ग्रह , पृथ्वीवरच्या टिचभर जागेतील
"शनी शिंगणापूर "
येथील
"दगडात" सामावलाच कसा ?
यावर जगाच्या पाठीवर असलेल्या 200 पेक्षाही जास्त देशातले शास्त्रज्ञ तोंडात बोटं घालून संशोधन करत आहेत .
धन्य आमचा भारत देश आणि
धन्य आमची
" दगडभोळी_जनता"
माझ्या एका वयस्कर मेडने
माझ्या एका वयस्कर मेडने कामाच्या T&C ठरवताना सांगितलं होतं कि तिच्या अंगात देवी येते त्यामुळे माझ्या त्या चार दिवसात ती माझ्याकडे कामाला येणार नाही. दर महिना चार दिवस सुट्टी मिळणार नाही, त्यापेक्षा बाय बाय, असं सांगितल्यावर मग तिनेच निगोशिएट केलं कि बरं ठीक आहे, येइन मी, पण त्यावेळेस माझ्या जवळपास येवु नका आणि ते चार दिवस माझ्यासाठी चहा करु नका ( म्हणजे उरलेले २६ दिवस चहा करायचा हे indirectly ठरुन गेलं.) मी चहा पित नाही त्यामुळे ते ४ दिवस चहा करायला सुट्टी मिळाल्याच्या आनंदात तिला ठेवुन घेतलं. आता ७ वर्ष ती काम करते.
हे भारी आहे!
हे भारी आहे!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो केळीचा प्रकार आमच्याकडे ही
तो केळीचा प्रकार आमच्याकडे ही पाळतात.. केळीच्या झाडाजवळ जायचं नै. राम/सीताफळाच्या झाडाखाली जायचं नै.. लई वैताग.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
निधी, मागे मी एकीची आठवण अशी
निधी, मागे मी एकीची आठवण अशी वाचलीय की 'त्या' दिवसांत 'लक्ष्मीनारायण' चिवडापण खायचा नाही!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देवाच्या नावाचा चिवडा म्हणून!
तसेही निसर्गाच्या अवकृपेने
तसेही निसर्गाच्या अवकृपेने नशीबी आलेला त्रास आपल्या प्राचीन परंपरांच्या कृपेने आरामदायक होत असेल तर का उगाच ढवळाढवळ करा <<<
निसर्गाची अवकृपा????
बेसिक गंडलं का तुझं?
निधी, मागे मी एकीची आठवण अशी
निधी, मागे मी एकीची आठवण अशी वाचलीय की 'त्या' दिवसांत 'लक्ष्मीनारायण' चिवडापण खायचा नाही!
देवाच्या नावाचा चिवडा म्हणून!
>> आमच्या घरात एक भाडेकरू होते त्यांची ही कर्मकथा.
बरोबर!
बरोबर!
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मागे मी एकीची आठवण अशी वाचलीय
मागे मी एकीची आठवण अशी वाचलीय की 'त्या' दिवसांत 'लक्ष्मीनारायण' चिवडापण खायचा नाही!
काय एकेकाचे समज आहेत.
देवाच्या नावाचा चिवडा म्हणून!
>> आमच्या घरात एक भाडेकरू होते त्यांची ही कर्मकथा. >> भयानक आहे हे, पण जाम हसू येतंय.
आमच्या घरात एक भाडेकरू होते
आमच्या घरात एक भाडेकरू होते त्यांची ही कर्मकथा.
<<
यू मीन आमच्या घरात एक भाडेकरू होते त्यांची ही कर्मठकथा.
>>>> निसर्गाची अवकृपा???? <<<
>>>> निसर्गाची अवकृपा???? <<< >>> बेसिक गंडलं का तुझं?<<<<<
त्यात बेसिक काय गंडायचय? विस्कटुन सांग
मला मात्र सासू च्या राज्यात
मला मात्र सासू च्या राज्यात देवघरात आणि किचन मध्ये बंदी आणि धुणे-भांडी सारखी मेहनतीची कामं करावी लागयची. बाकी जेवण पाणी अगदी हातात मिळायचं. माहेरी मात्र फक्त देव्हार्याला हात लावायचा नाही. खूप चिडचिड व्हायची माझी. पण वर्षभरात वेगळे झालो आणि सगळे प्रकार थांबले.
>>>> निसर्गाची अवकृपा????
>>>> निसर्गाची अवकृपा???? <<<
लिंबूटिबू,
मासिक पाळीचे नियमित चक्र ही अवकृपा कशी? स्त्रीला पाळी आली नाही तर निसर्गाची अवकृपा.
बेसिक गंडलं का तुझं? << That
बेसिक गंडलं का तुझं?
<<
That is normal state of affairs for him. Very high BMR.
तळ टीप : BMR = बेसिक मे राडा
तळ तळ टीप : रा.डा. = ते आपले ते हे नव्हेत.
स्वाती, ते माहित आहे हो,
स्वाती, ते माहित आहे हो, अवकृपा म्हणजे, हा त्रास फक्त स्त्रीलाच होतो.
बाकी सर्व लोक "या प्रथेमुळे" होणार्या त्रासांबद्दल जरुर बोलतात. पण प्रत्यक्ष त्या दिवसात स्त्रीची मानसिक व शारिरीक स्थिती कशी असते याबद्दल कोणीही चकारही शब्द काढत नाही. उलट सर्व स्यानिटरी न्यापकिन वाल्या कंपन्या "त्या दिवसातही " खेळा, बागडा, नाचा असेच काही एक चित्र रंगवत असतात व त्या दिवसातील प्रश्न "निव्वळ फक्त अन फक्त स्वच्छतेचा" आहे असाच ग्रह करुन देतात.
प्रत्यक्षात त्या दिवसात स्त्रीला किती त्रास होतात, ते चार दिवस पर्यंत का इत्यादी प्रश्न पडणे म्हणजे निसर्गास सांगणे की ही तुझी अवकृपाच आहे. ( असे मला वाटते, चूक असेन तर दुरुस्त करा).
पाळी चालू असलेल्या घाणेरड्या
पाळी चालू असलेल्या घाणेरड्या बायकांना गावाबाहेर हाकलायला हवे. सोबत म्हणून नवीन करण्यात येणार्या लोणच्याचा मसाला आणि सासू ह्यांना ठेवायला हवे.
माझे शेर उपरोधिक असतात हे न समजूनच टाळ्या मिळतात ह्याची खंत वाटते. उदाहरणार्थ हा शेरः
पाहिजे तर लाद तू पुरुषांवरी गर्भारपण
स्त्री नको धाडूस देवा, शांततेने चालुदे
'कधीही पाळी न आलेल्या सासूबाईंना अर्पण'!
-'बेफिकीर'!
लिंबूटिंबू , हार्मोन्सची
लिंबूटिंबू ,
हार्मोन्सची पातळी योग्य असेल तर अवकृपा वाटावी असा त्रास होत नाही. खेळा, नाचा, बागडा हे टोकाचे चित्र वाटत असेल तर मासिक पाळीचा त्रास होतोच, तो सोसायचा हे चित्र देखील योग्य नाहीच. अगदी पिएमएसच्या बाबतीतही. या काळात वारंवार वापर करण्यासाठी, स्वच्छता राखण्यासाठी जी स्वच्छ सुरक्षित रेस्टरुम्स आवश्यक असतात त्याच्या अभावाने होणारा त्रास , स्वच्छतेच्या अभावातून होणार्या जंतूसंसर्गामुळे होणारा त्रास, सकस आहाराच्या अभावाने होणारा पाळीचा आणि पिएमेसचा त्रास ही खरी कारणे नजरेआड करता येत नाहीत. बरेचदा एवढा त्रास होतोच या समजातून स्त्री आरोग्याशी संबंधीत समस्येकडे दुर्लक्ष होते.
पाळीच्या काळात भारतात २ तासाच्या वर प्रवास करणे मी टाळायची. इथे अमेरीकेत सलग ५ तास ड्रायविंग करत १० तासाचा प्रवासही सहजतेने केला. अगदी खूप कष्टाची कामे सोडल्यास पेन किलर वगैरे न घेता रोजची सर्व कामे सहजपणे करता येणे हे सामान्य आहे. व्यवस्थित प्रोटेक्शन उपलब्ध असेल तर खेळतानाही प्रश्न येत नाही. मी शाळेत होते तेव्हा बहुतेक मुली पिटीच्या तासाला सवलत मागायच्या. मात्र त्याचे कारण शारीरिक त्रास हे नव्हते तर सुरक्षित हायजिन प्रॉडक्टचा अभाव हे होते.
काहींना त्रास होतो. काहींना
काहींना त्रास होतो. काहींना होत नाही. काहींना पेन किलर्स घ्याव्या लागतात. काहींना न घेता जमते. प्रत्येक केस वेगळी असते.
त्या दिवसात खेळायचे, नाचायचे, बागडायचे, लोणच्याला हात लावायचा की ट्रक चालवायचा हे जिचे तिला ठरवू द्या. फारतर गायनॅकने सल्ला द्यावा. बाकीच्यांनी शांत रहावे.
या प्रकाराला निसर्गाची अवकृपा
या प्रकाराला निसर्गाची अवकृपा सम्बोधणे (वर तो शब्दप्रयोग बरोबर कसा यावर परिच्छेद लिहणे) म्हणणे निसर्गाप्रतीचे मोठे अज्ञान वाटते...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
माझ्या माहितीप्रमाणे त्या
माझ्या माहितीप्रमाणे त्या काळात स्त्रियांना त्रास होतो, पोटात दुखणे वा हलकासा ताप वगैरे, म्हणून निसर्गाची अवकृपा म्हणालो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाळी नियमित येणे म्हणजे सारे सुरळीत असणे हे मला माहीत आहे तसेच मातृत्व एक शाप की वरदान यावरही मला भाष्य करायचे नव्हते.
आणि तसेही त्या पोस्टचा टोन वेगळा होता
पण त्यापुढे सुरू झालेली चर्चा थांबवू नका. स्कूल मध्ये सायन्स वायन्स केले असले तरी माझे ज्ञान पुस्तकीच, अनुभवाचे बोल ऐकणे नेहमीच चांगले.
नशीब , एक नवा धागा काढतो नाही
नशीब , एक नवा धागा काढतो नाही म्हणालास!
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अवांतर आहे. ( या विषयाला पास
अवांतर आहे. ( या विषयाला पास असल्याने)
लिंबूटिंबू यांची प्रशासकांच्या वहीतली विपू वाचली.
ऑनलाईन ईथडगी बांधण्यापेक्षा काही अजरामर प्रतिसादांचे मायबोली अर्काईव्हज त्यापेक्षा कसे वाटते ? लिंबूंजींचे पण असतील ना काही प्रतिसाद, त्यांच्याच प्रतिसादांनी उद्घाटन करावे.
अवांतर - साती, महिनाभर धागा
अवांतर - साती, महिनाभर धागा नाही. कधी नव्हे ते थोडाफार बिजी आहे. धागाकर्ता म्हणून धागा फॉलो करायचे कर्तव्य पार पाडणे जमणार नाही असे वाटते.
तरी वाटल्यास या खुशखबरीसाठी एखादा धागा काढतो..
Pages