पूनम यांच्या ओट्सचे आप्पे या रेस्पीसोबत मी दिलेली ही चटणी, कालांतराने सर्च मधून सापडायला सोपी जावी म्हणून वेगळी काढा, असे विपु व धाग्यावरून ज्येष्ठ माबोकरांनी सुचवल्याप्रमाणे धागा वेगळा केला आहे.
-*-*-*-
१-१ मोठा चमचा हरभर्याची डाळ व उडिद डाळ
कढीपत्ता १ काडी (८-१० पाने)
२ मोठे कांदे लांब चिरून.
३ सुक्या लाल मिर्च्या.
२ चिमूट जिरं.
हे सर्व पदार्थ थेंबभर तेलावर खरपूस भाजून घेणे.
यात चमचाभर चिंचेचा कोळ, मीठ, वाटण्यापुरते पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेणे.
आमच्या घरी ही 'आप्प्यांची चटणी' याच नावाने ओळखली जाते. या चटणीशिवाय मला आप्पे खाल्ल्यासारखं वाटत नाही. मी ४-५ वीत असताना मंजेश्वर अशा आड(?)नावाचे एक 'मद्रासी' कुटुंब आमच्याकडे भाड्याने रहात होते. त्या काकूंनीच मातोश्रींना आप्पे अन ही चटणीही शिकवलेली होती. बिडाचा जड लोखंडी आप्प्यांचा तवाही त्यांनीच आणून दिला होता.
ही चटणीसारखी बोटाने चाटून न खाता, भाजीच्या प्रमाणात खावी असा प्रघात आहे.
-*-*-*-
टीपा:
१. डाळी भिजवायच्या वगैरे नाहीत. कच्च्याच भाजायच्या आहेत.
२. मंद आचेवर चांगले चटके लागेपर्यंत खरपूस भाजणे गरजेचे आहे.
३. चिंचेचा कोळ न घेता चिंचोक्या व काड्या/साले काढून साफ केलेली चिंच डायरेक्ट भाजण्यात घालून मग मिक्सरमधे फिरवणे हे एक व्हेरिएशन मनिमाउ यांनी सुचविले आहे.
४. कढीपत्ता नसला किंवा विसरला, तर आभाळ कोसळत नाही.
-*-*-*-
चटणी करून पाहणार्या आवडल्याचे आवर्जून सांगणार्या सर्वांना धन्यवाद!
चटणी चटणी इतकीच तिखट झाली
चटणी चटणी इतकीच तिखट झाली होती. त्यामुळे भाजी सारखी खाता आली नाही.
पूनमच्या अप्प्यांबरोबर
पूनमच्या अप्प्यांबरोबर दीमांची चटणी केली >>>>
!! 
काय आक्का , कॅनिबल बेत एक्दम
ही चटणी फारच भारी होते.
ही चटणी फारच भारी होते. 'कांद्याची' वाटत नाही. डाळींचा सुरेख खरपूस वास, पोत आणि चव या चटणीला येते. आप्पे केले नसले तरी फक्त ब्रेडला, पराठ्यांबरोबरही सही लागेल ही चटणी. थँक्स दीमा इथे वेगळ्या धाग्यावर आणल्याबद्दल.
चिंच डायरेक्ट भाजण्यात घालून मग मिक्सरमधे फिरवणे>> अंहं. चिंचेच्या कोळाची जी चव येते ती नुसती चिंच घालून येत नाही. चिंच मिक्सरमध्ये जरी फिरवली तरी कोळाच्या आंबटपणाइतका आंबटपणा नुसत्या चिंचेला येत नाही.
अदिति, मस्त फोटो.
यम्मी! थँक यू
यम्मी! थँक यू
मी काल ही चटणी केली पण चिंच
मी काल ही चटणी केली पण चिंच विसरून गेले त्यामुळे फाउल झाला. आता परत करावी लागणार. चव झकास होती पण रं अग्दीच अन-अॅपेटायझिंग आला होता. ग्रेइश कैतरीच. मिरच्यांचा रंग नीट आला नाही आणि मिसिंग चिंचेचा पण हात असणार.
मस्तय
मस्तय
चटणी केली मस्त झाली. आणखी
चटणी केली मस्त झाली.
आणखी इंस्टंट करायला टीप:
डाळी - लाल मिरच्या - कढीलिंब असे कोरडे घटक भाजून कॉफी ग्राइंडर मधून पूड केली, कारण मिक्सर करेल का नाही शंका वाटली. भाजी सारखी खायची म्हणून डाळी अंमळ जास्तच घेतलेल्या. तर शेवटी कांदा घालताना पूड बरीच जास्त वाटली त्यामुळे वगळली आहे. नेक्स्ट टायमाला कांद्याच्या पेस्ट मध्ये मिसळली की इंस्टंट चटणी तयार.
तर पूड जास्त करून ठेवा, आयत्यावेळी कांदा भाजून पेस्ट मध्ये मिसळा. नुसत्या पुडी मध्ये तेल घालूनही मस्त लागेल. गन पावडर.
एक शंका .. तुम्ही सर्व लोक
एक शंका .. तुम्ही सर्व लोक (अमेरिकेतले किंवा नॉर्थ अमेरिका खंडातले) लाल मिरच्या कुठल्या वापरता, कुठून आणता?
अशा असतात का? मला ह्या पुरेशा तिखट वाटत नाहीत .. फक्त स्मोकी हीट असते त्यांच्यात असं वाटतं ..
http://www.amazon.com/Swad-Chillies-3-5oz-Indian-Groceries/dp/B00BLBJOO0
आम्ही इंडियातून येताना
आम्ही इंडियातून येताना काहीबाही घेऊन येतो. सध्याच्या मिरच्या इम्पोर्टेड आहेत.
नसल्या की अशाच कुठल्यातरी वापरतो पण.
धन्यवाद अमित .. पुढच्या
धन्यवाद अमित .. पुढच्या भारताच्या ट्रिप मध्ये लक्षात ठेवते ..
आज केली चटणी! खरे तर उद्याची
आज केली चटणी! खरे तर उद्याची तयारी म्हणून केलेय पण चव इतकी छान जमलेय की आजच फस्त होइल अशी भीती आहे.
अमितव, टीप आवडली आहे.
मिरच्यांमध्ये बी असतं आणि
मिरच्यांमध्ये बी असतं आणि त्यातून नवी झाडं उगवून , फुलं फुलून, फळं धरून त्याचा प्रसार होउ शकतो. शिवाय अमेरिकन सरकार मायबोली वाचतं म्हणे.
अमेरिकेला ही भारतीय लिंबू
अमेरिकेला ही भारतीय लिंबू मिरचीची अॅलर्जी का?
दीमा, सॉरी राहवलं नाही.
सिंडरेला, गेल्या दोन ट्रिप्स
सिंडरेला,
गेल्या दोन ट्रिप्स मध्ये मी कडवे वाल आणि काळे वाटाणे (बिया) आणत आहे .. कस्टम्स् च्या फॉर्म मध्ये योग्य तेथे डिक्लेअर करते .. त्या अधिकार्यांनींही दोन्हीं वेळेला त्या पिशव्या व्यवस्थित इन्स्पेक्ट केलेल्या आहेत आणि काही न बोलता परत ठेवून दिल्या .. पहिल्या ट्रिप मध्ये त्यांनां नडियादी भुशात असणारी तळलेली डाळ आवडली नाही म्हणून सगळा भुसा फेकून दिला तर दुसर्यामध्ये त्यांनां फक्त क्युमिन आहे का कशात ते सांगावं लागलं ..
तेव्हा आता मग त्यांनां सांगून सवरून लाल मिरच्या आणाव्या की नाहीत ह्यावर काय मत?
दीमागुरुजींना गुरुदक्षिणा. आज
दीमागुरुजींना गुरुदक्षिणा. आज तुमच्या चटणीसाठी अप्पे आणि उत्तप्पे केले. उत्तप्प्यांचा फोटो अगदीच काळवंडलाय. म्हणून टाकत नाही.
चटणी आवडली सगळ्यांना.
धन्यवाद दिमा. नवर्याला चटणी
धन्यवाद दिमा. नवर्याला चटणी फार आवडली. त्याने त्याच्या वहीत लिहून घेतली आणि आज आवर्जून माझ्या आईला स्काईपवर रेसीपी दिली.
चटणी फारच भारी झाली होती.
चटणी फारच भारी झाली होती. याला मैसूर चटणी असे म्हणायचो आम्ही. बनवल्यावर लक्षात आले की ही तीच
काल केली होती ही चटणी.
काल केली होती ही चटणी. व्हेरीएशन एवढेच की जरा सरसरीत केली आणि वरून फोडणी घातली पुन्हा. सगळ्यांना आवडली.
चटणी केली होती. चांगली
चटणी केली होती. चांगली लागली.बेळगावची मैत्रिण ,पूड चटणी आणायची त्याची आठवण झाली.ती त्या चटणीपूडमध्ये दही घालायची.
मस्त लागते, माझी जरा पातळ्सर
मस्त लागते, माझी जरा पातळ्सर झालिये पण चव आवडली
त
दीमा, आज माझ्या टिफीनला दोसे
दीमा, आज माझ्या टिफीनला दोसे आणि तुमची डाळींची चटणी. एक वेरिएशन केलं कि चिंचेऐवजी टोमॅटो वापरला. बाकीचे पदार्थ खमंग भाजले होते, म्हणुन टोमॅटो कच्चा नाही घातला. तो पण ग्रील वर स्मोक करुन घेतला जसा तुमच्या टोमॅटो भरीताच्या रेसिपी मधे दाखव ला होतात.
मी ही आज करुन पाहिली.उत्तम
मी ही आज करुन पाहिली.उत्तम झाली चटणी. नवरोबाने, आता आप्प्यासोबत अशीच चटणी करत जा असा सल्ला ही दिला.धन्यवाद
@ दीमा: ही चटणी मी अजून कधी
@ दीमा:
ही चटणी मी अजून कधी बनवलेली नाही. पण आपण जी रेग्युलर चटणी बनवतो, ओलं खोबरं + कोथिंबिर + जिरे-मिरची-आलं वगैरे ती चटणी फोडणीच्या डाळभाताबरोबर मस्त लागते.
म्हणजे समप्रमाणात मूगडाळ + तांदूळ भिजवून घ्यायचे. कुकरमध्ये मोहरी-जिरे-भरपूर हिंग-चुरडलेल्या लसूण पाकळ्या-कढीपत्ता-मेथीदाणे-जरा सढळ हाताने मिरे(आपल्याला तिखट झेपेल इतपत) याच क्रमाने फोडणी भरपूर तेलात करुन त्यात डाळ + तांदूळ चांगले परतून घ्यावेत. आणि नेहमीप्रमाणे शिजवून घ्यावेत.
एकदा आता ही चटणी ट्राय केली पाहिजे.
दीमांची चटणी मस्त झाली
दीमांची चटणी
मस्त झाली चटणी. मला कांदा-टोमॅटो-उडीद डाळ-कढीपत्ता- सुक्या मिरच्या अश्या चटणीपेक्षा ही चिंच घातलेली चटणी जास्त आवडली. डाळी कोरड्याच खमंग भाजून घेतल्या. तेलात जिर्याबरोबर हिंगही घातला आणि वर दिलेल्या प्रमाणापेक्षा कांदा थोडा कमी घातला. आणि कांद्याबरोबर चिंचेची बारकी गोळी परतून घेतली.
मस्त आणि सोप्पी पाकृ.. आज
मस्त आणि सोप्पी पाकृ.. आज केली. उत्तम झाली
Pages