ताजी (मिळेल तेवढी) कॉफी पावडर (इंस्टंट नको) - ३ टेब. स्पून
पाणी - ३/४ कप
दूध - दीड कप
साखर - दोन चमचे
हा आहे कॉफी फिल्टर
युक्ती सांगा धाग्यावर बरेच डिस्कशन झाल्यावर, फिल्टर कॉफी प्यायची लईच हुक्की आली. लगेहाथ फोटोपण काढले. तर हि कॉफी आणि बरेच फोटो
१. कॉफी फिल्टरच्या वरचा जाळी असलेला भाग नीट बसवून त्यात तीन चमचे कॉफी पावडर नीट पसरवून घाला. (कॉफी पावडर ताजी असावी, जुनी असेल तर कॉफी अती बोअरिंग लागते)
२. पाउण कप पाणी खळखळीत उकळून त्यावर ओता. फिल्टर बरोबर एक स्टीलचा दट्टया मिळाला असेल तर त्याने कॉफी पावडर दाबून ठेवा.
३. झाकण लावून १५ मि. बाजूला ठेऊन द्या.
हा बंद करून ठेवलेला फिल्टर, मिडिअम साइज कॉफी मग बरोबर.
४. फिल्टर उघडल्यावर, आहाहा.. कॉफीचा दरवळ..
जाळी खालच्या भागात कॉफी जमा झालेली असेल.
५. दुध उकळून १ मि. ढवळा. कप मध्ये आवडीनुसार साखर घेऊन त्यात कॉफी ओतुन ढवळा.
६. नंतर त्यावर दुध थोडं उंचावरून ओता म्हणजे मस्त फेस येईल. (कॉफी पावडर आणि दुधाचं प्रमाण आवडीनुसार बदला)
७. आणि हा एकच प्याला! येंजॉय माडी
टिप्सः
१. फिल्टर कोरडा असावा
२. कॉफी पावडर ताजी आणि फिल्टर कॉफीचीच असावी (इंस्टंट कॉफी नको)
३. शक्यतो १५-२० मि. लगेच कॉफी तयार करावी. कॉफी (decoction) गाळून बराच वेळ ठेवली तर बेचव होऊ शकते..
BTW, टाटा ची नवीन coffee ची
BTW, टाटा ची नवीन coffee ची जाहिरात filter coffee ची आहे का?>>>>> इंस्टंट कॉफी आहे.पण मस्त आहे.
................मस्त
................मस्त
वू हूऽ! वाफाळता कप. मस्त.
वू हूऽ!
वाफाळता कप. मस्त.
आताच केली आणि पिटे, आमच्या
आताच केली आणि पिटे, आमच्या झोपेवर चाहा कॉफीचा परिणाम झालाच नाही अगदी परिक्षांसाठी जागायचं होतं तेव्हा पण
मस्त, मी या फिल्टर प्रकारावर
मस्त, मी या फिल्टर प्रकारावर बरेच प्रयोग करून पाहिलेत (एका brewing स्पर्धेत भागही घेतला होता). अनेक गोष्टींनी चव बदलते आणि त्यात फक्त कॉफी कुठली वापरली आहे हा एकच फॅक्टर नसतो.
एक सजेशन, जर स्टील फिल्टर वापरत असाल तर त्याला त्या उकळत्या पाण्यात ठेवून द्या, थोडक्यात तापवून घ्या आणि कॉफी पावडर त्या तापलेल्या फिल्टर मध्ये पाणी न टाकता १ ते २ मिन ठेवा. हे स्टॅंडर्ड तंत्र आहे अम्लीयपणा कमी करण्याचे. मग वरून पाणी टाकून पुढची प्रोसेस सेम. मशीन मध्ये प्लॅस्टिक फिल्टर असतो त्यामुळे त्यातून बनणारी कॉफी अधिक आम्लधर्मी असते आणि म्हणून अधिक कडवट असते. पाणी कसे ओतता यानेही चव बदलते पण दाक्षिणात्य कॉफीत ते करणे शक्य नसते सो जाऊ दे.
ऑफिस मधे डीप डीप चा चहा नको
ऑफिस मधे डीप डीप चा चहा नको म्हणुन कॉफी घेतली जाते पण साउथ रेस्टॉरेन्ट मधे हमखास घेतली जाणारी कापी कशी बनवायची ह्याची उत्सुकता होती.
हा सगळा पसारा विकत घेण्याएवाजी असलेल्या भांडी वापरुन काही वर्क अराउंड आहे का?
@अदिति - पेपर फिल्टर (वर्क
@अदिति - पेपर फिल्टर (वर्क अराऊंड) -> जाड टिश्यू पेपर घेणे (शक्यतो पेपर टॉवेल.). त्याची केमिस्ट्री प्रयोगासाठी घडी घालतात तशी घडी घालणे, कॉफी पावडर घाला आणि पाणी ओता. खाली ठेवायचे भांडे कुठलेही असले तरी चालेल पण फनेल सारखे काहीतरी बनवावे लागेल. जुगाड - प्लास्टिकची बाटली कापून तोंड वापरणे. डिकॉक्शन मिळते पण वेळ जास्ती लागतो. पॉसिबल चुका - पाणी एकदम ओतले (हळू हळू, मध्ये मध्ये थांबत ओतणे), कॉफी जाड दळलेली नव्हती (गाळ होऊन तो डिकॉक्शन मध्ये येईल, पेपर फाटूही शकतो). या वर्क अराऊंडने चवीत खूप फरक पडत नाही (सवयीच्या जिभेलाच हा फरक जाणवतो, हां पण कॉफी लाईट रोस्ट असेल तर लगेच कळून येतो.) पण वेळखाऊ पद्धत आहे (एक तासही लागू शकतो पूर्ण फिल्टर व्हायला) आणि दरवेळी नवा फिल्टर बनवावा लागेल.
पायस, तू जे सांगितलस ते
पायस, तू जे सांगितलस ते नजरेसमोर आलच नाही. पण धन्यवाद. तू एकदा एक एक पायरी सचित्र लिहून दाखवलीस तर आम्हाला ही पाकृ शिकायला मिळेल. बघ ना प्लीज.. हे असे प्रकार वाचून समजत नाही. त्याला चित्रांची जोड असायला हवी.
भारतीय रेल्वे पॅन्ट्रीत हीच
भारतीय रेल्वे पॅन्ट्रीत हीच कॉफी मिळते का?
कॉफी मशीन मधे केलेल्या कॉफीत
कॉफी मशीन मधे केलेल्या कॉफीत आणि ह्यात किती फरक आहे.
गाळायला तासभर लागला तर उकळत पाणी गार होईल ना.
मी १९९१ साली प्रथमच कर्नाटकात
मी १९९१ साली प्रथमच कर्नाटकात ( बळ्ळारी ) ला गेलो आणि अकरा दिवस राहिलो. कापी लोटा असे कापी पिण्याचे स्टिल चा छोटासा ग्लास याच खुप आकर्षण निर्माण झालो. बायकोचे काका चिंचवडला रहातात. माझे स्वागत कापीनेच होते. मजा येते.
कॉफी मशीन मधे केलेल्या कॉफीत
कॉफी मशीन मधे केलेल्या कॉफीत आणि ह्यात किती फरक आहे.
गाळायला तासभर लागला तर उकळत पाणी गार होईल ना.
>> अहो शेवटी वर्क अराऊंड आहे. तुम्ही कुठला कागद घेता, किती डिकॉक्शन बनवणार आहात या सर्वावर वेळ ठरतो, जर प्रॉपर कागदी कॉफी फिल्टर मिळवला तर मॅक्स १० मिन लागतात. दुसरे म्हणजे कॉफी मशीनचा फिल्टर बाहेरून इन्शुलेटेड असतो आणि डिकॉक्शन सतत गरम ठेवण्याची सोय असते. १००% ऑथेंटिक कापीसाठी मात्र कुठला तरी स्पेशली बनवलेला फिल्टरच हवा - साऊथ इंडियन, कोन, कराफे इ.
पायस, दाक्षिणात्य कॉफीसाठी
पायस, दाक्षिणात्य कॉफीसाठी देखिल कॉफी फिल्टर उकळत्या पाण्यातून काढणे वगैरे सोपस्कार करावे लागतील का? दक्षिण भारतीय फिल्टर कॉफी मधे चिकरीपण असते ना?
आणला. सहकार नगर, पुणे, Relax
आणला. सहकार नगर, पुणे, Relax च्या समोर, तुलसी दुकानात १७० ला मिळाला. आज स्वच्छ धऊन ठेवते. उद्या सकाळी filter coffee!! अहाहा!!!
२० रु वाढले :) आम्ही
२० रु वाढले :):)
आम्ही तुलसीमधून १५०ला आणला होता १५ दिवसा आधी.
अचानक मागणी वाढली कि वस्तुची
अचानक मागणी वाढली कि वस्तुची किंमत वाढते हे प्रुव झालं.
वर दाखवलेल्या पद्धतीनी जरी
वर दाखवलेल्या पद्धतीनी जरी डिकॉक्शन मिळवलं तरी ते उकळतं गरम नसतंच. त्यामुळे मी स्वत:पुरती कॉफी करतांना डिकॉक्शन + साखर + दूध असं पुन्हा वेगळ्या भांड्यात गरम करून घेतो. कॉफी ही वाफाळतीच हवी!
योकु, भारी टिप!! मी करून बघते
योकु, भारी टिप!! मी करून बघते पुढच्या वेळी.
अचानक मागणी वाढली कि वस्तुची
अचानक मागणी वाढली कि वस्तुची किंमत वाढते हे प्रुव झालं. >> हो ना
सहकार नगर चे तुलसी आहे. २० रु
सहकार नगर चे तुलसी आहे.
२० रु ट्रॅव्हल कॉस्ट फ्रॉम तुलशीबाग तुलसी टु सहकारनगर तुलसी.
फिल्टर कॉफी मध्येच जायफळ
फिल्टर कॉफी मध्येच जायफळ वेलची घालायची असल्यास ती उकळल्यानन्तर एक चमचाभर जाय+वेलची पुड घालुन झाकुन ठेवावी, नन्तर प्यावी. मस्त सुगन्ध आणी चव येते. इती- साम टिव्हीवरील सुगरण मधली टिप.
बाकी इन्स्टन्ट पेक्षा फिल्टर माझ्या जास्त आवडीची. थॅन्क्स मॅगी.
तोएकअतीमहाभयानकबोअरकुकरीशोआहे
तोएकअतीमहाभयानकबोअरकुकरीशोआहे.
हा माझ्याकडे असलेला कॉफी
हा माझ्याकडे असलेला कॉफी फिल्टर
कॉफी फिल्टरचे भाग
उभं भांडं उघडून आत ही कॉफी वर यायला स्टीलची नळी आहे.
खालच्या भागाला चाडीसारखी असलेली जाळी बसवली
उभ्या भांड्याला ही खालच्या बाजुनी जाळी आहे.
पूर्ण असेंबल केलेला फिल्टर
खालच्या पॉट्मध्ये पाणी ठेवायचं (पहिल्या फोटोत सगळ्यात डावीकडचं भांडं). तीन नंबरच्या फोटोतल्याप्रमाणे जाळी (चाडी/फनेल) ठेवायची आणि त्यात कॉफीपावडर जरा दाबून बसवायची. मग वरचं दांडी असलेलं भांडं जरा घट्ट करून बसवायचं आणि हे सगळं प्रकरण कमी आचेवर ठेवायचं. खालच्या पॉट्मधले उकळलेले पाणी फनेलमधून कॉफी डिकॉक्शन होऊन वरच्या पॉटमध्ये येतं.
योकु, हा फिल्टर मस्तच आहे..
योकु, हा फिल्टर मस्तच आहे.. डिकॉक्शन छान गरम रहात असेल..
शोधायला हवा..
हा फिल्टर कर्वे रोडवर 'कॉफी
हा फिल्टर कर्वे रोडवर 'कॉफी डे -फ्रेश अँड ग्राऊंड' मध्ये मिळतो. रसशाळा आणि सोनल हॉलच्या मधे हे दुकान आहे.
फिल्टर एकदम भारी आहे. मस्त होते कॉफी.
थँक्स अदिजो
थँक्स अदिजो
माझ्याकडे एलेक्ट्रीक फिल्टर
माझ्याकडे एलेक्ट्रीक फिल्टर कॉफी मशिन आहे. (ज्योति कंपनीचा)
त्यातल्या फिइल्टरच्या जाळीवर पावडर ठेवायची अन कंटेनर मधे पाणी. खालच्या भांड्यात डिकॉक्शन तयार होतं, (अन गरमही राहतं) , साधारण पाच कपालापुरेल इतकं. हे होइपर्यंत दुधही उकळून ठेवायच . डिकॉक्शन झाल्यावर वाफाळाती कॉफी तय्यार. कॉफीची पावडर , मी ८०:२० कॉफी अन चिकोरी अशी आणते. फ्रेश ग्राउंड.
समहाउ माझ्या डोक्यात; अशी फिल्टर कापी- गप्पा; एमार कॉफी चहा बनवतात तशी बनवलेली( उकळून) वेलदोडा जायफळ - आजोळी व्हायच ते भजनाचा कार्यक्रम ; इन्स्टंट कॉफी -रात्रभर केलेली सब्मिशन्स ; कॉफी मशिन्स ( बीन्स ग्राइंड करून तयार होणारी ऑफिस भर घमघमाट वाली ) वाली काळी कॉफी - डिझाइन रिव्यु मिटिंग्स ! अशी समीकरण आहेत. अन ह्या सगळ्या कॉफ्या एका फ्यामीलीतल्या असल्या तरी वेगवेगल्या आहेत
फिल्टर कॉफी म्हणजे जीव की
फिल्टर कॉफी म्हणजे जीव की प्राण! त्यामुळे बरेचदा होते. माझ्याकडे मॅगीसारखाच फिल्टर आहे. पण हल्लीच तमिळ शेजारणीकडे वर योकुने दाखवलाय तसा फिल्टर बघितला (आणि त्यातली कॉफी प्यायले.) पाणी त्याच फिल्टरमध्ये डायरेक्ट गरम करता येतं त्यामुळे फारच सोयीचा वाटला. आता तो मिळवण्यात येणार आहे.
योकूने दाखवलाय तो परकोलेटर
योकूने दाखवलाय तो परकोलेटर इथे स्टो टॉप एस्प्रेस्सो मेकर म्हणून मिळतो.
http://www.amazon.com/s/ref=nb_sb_noss?url=search-alias%3Daps&field-keyw...
फिल्टर आणला, फिल्टर कॉफीही
फिल्टर आणला, फिल्टर कॉफीही आणली. मात्र अजून कॉफीचं गणित जमत नाहीये, कॉफी फार फिकी होते आहे. एकदा दोन कप केली, एकदा तीन. आता एकदा एकच कप करून गणित पक्कं करायला हवं. एकाच कपाचं प्रमाण काय आहे तुमचं?
मीही डिकॉक्शनमध्ये दूध घातलं की सगळी तयार कॉफी परत गरम करते.
Pages