पूनम यांच्या ओट्सचे आप्पे या रेस्पीसोबत मी दिलेली ही चटणी, कालांतराने सर्च मधून सापडायला सोपी जावी म्हणून वेगळी काढा, असे विपु व धाग्यावरून ज्येष्ठ माबोकरांनी सुचवल्याप्रमाणे धागा वेगळा केला आहे.
-*-*-*-
१-१ मोठा चमचा हरभर्याची डाळ व उडिद डाळ
कढीपत्ता १ काडी (८-१० पाने)
२ मोठे कांदे लांब चिरून.
३ सुक्या लाल मिर्च्या.
२ चिमूट जिरं.
हे सर्व पदार्थ थेंबभर तेलावर खरपूस भाजून घेणे.
यात चमचाभर चिंचेचा कोळ, मीठ, वाटण्यापुरते पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेणे.
आमच्या घरी ही 'आप्प्यांची चटणी' याच नावाने ओळखली जाते. या चटणीशिवाय मला आप्पे खाल्ल्यासारखं वाटत नाही. मी ४-५ वीत असताना मंजेश्वर अशा आड(?)नावाचे एक 'मद्रासी' कुटुंब आमच्याकडे भाड्याने रहात होते. त्या काकूंनीच मातोश्रींना आप्पे अन ही चटणीही शिकवलेली होती. बिडाचा जड लोखंडी आप्प्यांचा तवाही त्यांनीच आणून दिला होता.
ही चटणीसारखी बोटाने चाटून न खाता, भाजीच्या प्रमाणात खावी असा प्रघात आहे.
-*-*-*-
टीपा:
१. डाळी भिजवायच्या वगैरे नाहीत. कच्च्याच भाजायच्या आहेत.
२. मंद आचेवर चांगले चटके लागेपर्यंत खरपूस भाजणे गरजेचे आहे.
३. चिंचेचा कोळ न घेता चिंचोक्या व काड्या/साले काढून साफ केलेली चिंच डायरेक्ट भाजण्यात घालून मग मिक्सरमधे फिरवणे हे एक व्हेरिएशन मनिमाउ यांनी सुचविले आहे.
४. कढीपत्ता नसला किंवा विसरला, तर आभाळ कोसळत नाही.
-*-*-*-
चटणी करून पाहणार्या आवडल्याचे आवर्जून सांगणार्या सर्वांना धन्यवाद!
वा वा! रेस्पी आणि फोटो,
वा वा! रेस्पी आणि फोटो, दोन्ही मस्तं आहे. आज आप्प्यांबरोबर आपल्या त्या ह्यांच्या त्या त्यांची आयती कोथिंबीर चटणी खाल्ली. पुढल्या वेळी ही चटणी करणार.
(No subject)
२ मोठे कांदे? म्हणजे
२ मोठे कांदे? म्हणजे कांद्याची चटणी होणार तर.
मस्त! या विकेंडला करेन.
मस्त! या विकेंडला करेन.
सायो, फार मोठे नाहीत हो, आपले
सायो,
फार मोठे नाहीत हो, आपले भारतीय साईजचे कांदे . भाजून आक्रसतात ते. चमचाही मोठा घेतलाय डाळीसाठी, म्हणून थोडे जास्त घेतलेत.
छान रेसिपी. आप्प्यांचाच अजून
छान रेसिपी. आप्प्यांचाच अजून योग येत नाहीये. लवकरच करणार.
दिमा, धन्यवाद.
बाय द वे, दोन धागे झाले आहेत. दिमा, अॅडमीनना एक उडवायला सांगणार का?
बर्बर. मग इथल्या साईजचा एकच
बर्बर. मग इथल्या साईजचा एकच कांदा पुरेल.
दिमा, फोटो जरा मोठा टाका
दिमा, फोटो जरा मोठा टाका की.
माझ्या सासूबाई अगदी थोडा टोमॅटो घालतात यात. ती चवही बदल म्हणून छान लागते. वरून हिंगाची फोडणी.
मस्तच, दिल्ली सरवणा भवनात
मस्तच, दिल्ली सरवणा भवनात मिळत होती ही आधी, मध्ये एकदा गेलो तर मात्र दोनच (खोबरे आणि टोमॅटो) दिल्या.
ओह ,आप्प्यांसोबत खायची चटणी
ओह ,आप्प्यांसोबत खायची चटणी होय!!! स्लर्प!!!
आप्प्यांची चटणी वाचून आधी वाटलं कि पूनम च्या रेसिपीने आप्पे बनवून मग त्यांची चटणी करायची
बर्बर. मग इथल्या साईजचा एकच
बर्बर. मग इथल्या साईजचा एकच कांदा पुरेल. << वर दोन चमचेच डाळी आहेत. म्हणजे कांद्याचीच चट्णी होणार.
१/२ कांदा घेतलेला बरा.
दिमा आप्पांची चटणी
Jokes apart, this was the
Jokes apart, this was the response that prompted me to give this recipe first on that thread. Thank You!
मस्तं आहे चटणी.
मस्तं आहे चटणी.
थांकु थांकु दीमा !!! उद्याच
थांकु थांकु दीमा !!! उद्याच मुहुर्त आहे , चटणी चा.. आप्प्यांना मात्र थांबावं लागेल..
'आप्प्यांबरोबर खायची चटणी '
'आप्प्यांबरोबर खायची चटणी ' असं नाव हवं , हे टायटल मिसगायडींग आहे , मला वाटलं जुने अप्पे किंवा न जमलेले अप्पे कुस्करलेली चटणी
मला वाटलं जुने अप्पे किंवा न
मला वाटलं जुने अप्पे किंवा न जमलेले अप्पे कुस्करलेली चटणी डोळा मारा
<<
छेछे!
अहो, मस्त जमलेल्या आप्प्यांची चटणी कशी उडवली त्याची स्टोरी आहे, ती!
मला वाटलं आप्पांची चटणी
मला वाटलं आप्पांची चटणी
हायला मलाही वाटले आप्प्यांची
हायला मलाही वाटले आप्प्यांची चटणी जसे चपातीचा चिवडा असतो..
छान आहे रेसिपी .. >> २ मोठे
छान आहे रेसिपी ..
>> २ मोठे कांदे? म्हणजे कांद्याची चटणी होणार तर
कांदे खाल्ल्यानंतर काही लोकांनां जे उपद्व्याप करावे लागतात (आठवा : जुन्या मायबोलीतली मृ ची एक रेसिपी ;)) त्याकरता सायो ला असा प्रश्न पडला असेल का?
थेंब भर तेल म्हणजे अगदीच
थेंब भर तेल म्हणजे अगदीच डॉक्टरी प्रमाण की हो..
रेसिपी मस्त..
आठवा : जुन्या मायबोलीतली मृ
आठवा : जुन्या मायबोलीतली मृ ची एक रेसिपी >>> तू थालिपीठांबद्दल बोलते आहेस काय?
इइइइइइ, सशल, रमड, नको ती आठवण
इइइइइइ, सशल, रमड, नको ती आठवण ! पदार्थ बनवायची इच्छाही मरुन जाईल , खाणे तर दूर की बात.
दीमा, रेस्पी मस्त आहे. ठँकू
पूनमच्या अप्प्यांबरोबर
पूनमच्या अप्प्यांबरोबर दीमांची चटणी केली.
एकदम साउथी फ्लेवर.
मस्त!
धन्यवाद!
दीमांची चटणी केली >>> अर्र!
दीमांची चटणी केली >>> अर्र!
मस्तय ही रेसिपी! मोठा चमचा
मस्तय ही रेसिपी! मोठा चमचा म्हणजे टेबलस्पून ना..
छान छान. अजुन मुहुर्त लागला
छान छान. अजुन मुहुर्त लागला नाही पण तोंडावर आलाच आहे.
अरे वा! आली का ती चटणी. दीमा,
अरे वा! आली का ती चटणी.
दीमा, बरं झालं वेगळी पाकृ टाकलीत ते. आप्पे नसतील तर नुसती पोळी/भाकरीबरोबर पण खायला छान लागेल.
जरा चमच्याचा साइज टाकला तर
जरा चमच्याचा साइज टाकला तर बरं पडेल, भाजीसारखी चटणी खायची आहे म्हणून.
टेबलस्पून.
टेबलस्पून.
ओके.
ओके.
Pages